बोलताना का सुचेना शब्द आता सांग ना
तेच सारे भाव आणि त्याच सार्या कल्पना..!!
पायवाटा त्याच त्या की, चालते मी तीच ती
तीच माझी पाउले अन त्याच त्या खाणाखुणा..
सांगताना थांबते मी त्या तिथे पुन्हा पुन्हा
भासते का नित्य तेथे तीच शब्दऽ वंचना..
घाव ते ही ओळखीचे, खोल गेले नेमके
त्याच जखमा आणि सार्या ओळखीच्या वेदना..
तेच मंदिर आणि तोची फ़त्तराचा देवही
तोच चाले काकडा अन तीच रोजऽ प्रार्थना..
का कुठेही वेगळेसे फासलेले रंग ना
ना कुणीही वेगळीशी मांडलेली भावना..
तीच ती स्वप्ने अजूनी पाहते मी रोजला
अन कशाला मी कराव्या मोठमोठ्या वल्गना..!
- प्राजु
प्रतिक्रिया
23 Nov 2009 - 9:18 pm | प्रभो
बोलताना का सुचेना शब्द आता सांग ना
तेच सारे भाव आणि त्याच सार्या कल्पना..!!
मस्तच प्राजूतै....
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
23 Nov 2009 - 9:20 pm | गणपा
चांगल काव्य.
एखाद कडव उचलुन/निवडुन बाकिच्यांचा अपमान नाही करणार.
23 Nov 2009 - 9:26 pm | मदनबाण
मस्त...
तेच मंदिर आणि तोची फ़त्तराचा देवही
तोच चाले काकडा अन तीच रोजऽ प्रार्थना..
हे कडवे विशेष आवडले... :)
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
24 Nov 2009 - 9:01 am | विसोबा खेचर
क्या बात है!
तात्या.
24 Nov 2009 - 9:09 am | निमीत्त मात्र
क्या बात है प्राजु! अतिशय सुंदर रचना. तुम्ही मिपावरील सर्वोत्तम कविंपैकी एक आहात.
24 Nov 2009 - 11:07 am | फ्रॅक्चर बंड्या
मस्तच...
binarybandya™
24 Nov 2009 - 11:17 am | अवलिया
सु रे ख !
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
24 Nov 2009 - 11:32 am | sneharani
सुंदर...
बोलताना का सुचेना शब्द आता सांग ना
तेच सारे भाव आणि त्याच सार्या कल्पना..!!
सुंदरच..!
24 Nov 2009 - 2:26 pm | श्रावण मोडक
बोलताना का सुचेना शब्द आता सांग ना
तेच सारे भाव आणि त्याच सार्या कल्पना..!!
मी इथेच अडकून राहिलो! सुरेख!
24 Nov 2009 - 2:47 pm | घाटावरचे भट
छान कविता...
24 Nov 2009 - 4:01 pm | परिकथेतील राजकुमार
सुंदर काव्य, एकदम बेस्ट.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
25 Nov 2009 - 8:14 am | llपुण्याचे पेशवेll
छान आहे कविता. वेगवेगळ्या संदर्भातही चपखल लागू पडते.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
25 Nov 2009 - 9:23 am | सहज
आवडली.
25 Nov 2009 - 10:44 am | ऋषिकेश
मस्त...
"काय त्या खाणाखूणा अन काय माझ्या कल्पना" ह्या खरे-कुलकर्णी जोडगोळीचे गाणे आठवले
ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?