अंतरीच्या यातानाना
तुझाच रे सहारा
दयाघना गणराया
दे चरणी आसरा
क्षणिक ही मोहमाया
जीव असा जडावा
जुळता तुटता नाती
तूच रे आठवावा
त्याचे डोळे आठवती
पाहता रूप तुझे
तुझ्या अशिर्वादा विन
अधूरे स्वप्न माझे
मनातील या भावना
उमजाव्या तुला रे
कृपासिन्धु गजानना
तुझा धावा आता रे