माझ्या "अंजिर बर्फी" या पाककृतीस भरघोस प्रतीसादांची आपेक्षा होती पण ५३२ वाचने आणि केवळ ५ प्रतीसाद !!!
( बहुत बडी नाईन्साफी है/ पण म्हणुन काही--- जातो,चाललो ,माझं नाव काढा असा त्रागा करणार नाही) त्याच सदरात मी हे देखिल नमुद केले होते की अल्प प्रतीसाद आले तर दुसरी रेसीपी टाकिन. मंडळी मी दिल्या शब्दाला जागुन आता वचन पुर्ती करतो आहे . सादर आहे साधी, सोपी , पण पौष्टीक पाककृती "केळयाचा शीरा"
साहीत्य
१. नमुनेदार पिकलेली केळी साधारण ५ नग
२.रवा १.५ कप
३.साखर १.५ कप
४.साजुक तुप १.५ कप
५.दुध १.५ कप (गरम)
६.मुठभर बेदाणे
७. वेलची ४/५ नग
८. सजवटीसाठी केशर
९. चवी प्रमाणे मिठ
तुप घालुन रवा चांगला लालसर रंगावर खरपुस भाजुनघ्या
गरम दुध,
केळ्याचे काप,
वेलची पुड,
साखर व मीठ
बेदाणे घालुन
मंद आचेवर चांगले शीजु द्या
सर्व्ह करताना वरुन थोडे केशर टाका.
ता.क. हा शिरा गरम तसाच थंड देखिल चांगला लागतो.
ह्याला बनविताना आपल्या आवडीनुसार ईतर फळे / सुकी फळे उदा.अननस,अंजिर,काजु,बदाम ई. देखिल वापरता येतात.
प्रतिक्रिया
22 Nov 2009 - 5:50 pm | विसोबा खेचर
सुरेख..
22 Nov 2009 - 6:16 pm | jaypal
१लाच प्रतिसाद साक्षात "स्त्रीसंत तात्यामहाराजांचा" धन्य,धन्य धन्य झालो तात्या.
(आज तिर्थ प्राशन करायलाच लागणार )
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
22 Nov 2009 - 6:18 pm | पर्नल नेने मराठे
वाव ;;)
चुचु
22 Nov 2009 - 6:35 pm | स्वाती२
एक दुरुस्ती. आधी दूध घालून एक वाफ आणायची आणि मग साखर टाकायची. मी लग्नानंतर पहिल्यांदा उत्साहाने शीरा केला तेव्हा वर दिल्याप्रमाणे सर्व एकदम घातले होते. मग आईसारखा झाला नाही म्हणून रडारड. मी काय केले कळल्यावर नवर्याने कपाळाला हात लावला आणि झकास आई सारखा शीरा करुन खायला घातला.
22 Nov 2009 - 6:43 pm | jaypal
दिवसभर दंगा , धुडकुस घातल्यावर मुलं आनंदानी खातात आणि ताजीतवानी होतात.(परत हैदोस घालायला
) स्वानुभवावरुन सांगतो आहे.
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
22 Nov 2009 - 7:03 pm | अवलिया
मस्त रे मित्रा !!
:)
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
22 Nov 2009 - 7:08 pm | सुनील
केळ्याचा शिरा म्हटले की सत्यनारायणाची पूजा आठवते. पाकृ छान आहे. अननसाचा शिरादेखिल छान लागतो. सीप्झमधिल आयसीएच ह्या उपहारगृहात, जर स्वीट डिश म्हणून पायनॅपल शिरा असेल, तर मुद्दामून जादा मागवून खात असे, त्याची आठवण झाली!
अवांतर - प्रतिसादांची फार चिंता करीत जाऊ नका. लिहित चला.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
23 Nov 2009 - 1:46 am | गणपा
क्या बात !!!! अननसाचा शीरा मस्त आठवण काढलीत.
माझी पहिली कंपनी पण अंधेरीला पण साकिनाक्याला होती. तिथे हा अननसाचा शिरा मिळायचा. एकदम ए१
-(आठवणितला) गण्या
22 Nov 2009 - 7:30 pm | शार्दुल
:)
नेहा
22 Nov 2009 - 8:32 pm | लवंगी
प्रसादाच्या शिर्याची आठवण झाली.
22 Nov 2009 - 9:16 pm | मदनबाण
व्वा. माझा आवडता पदार्थ...
फोटो युक्त पाकृ आणि तुमचे फोटो युक्त प्रतिसाद आवडले. :)
साध्या केळ्या ऐवजी वेलची केळी पण छान लागतात या शिर्यात.
या पाककृतीस भरघोस प्रतीसादांची आपेक्षा होती पण ५३२ वाचने आणि केवळ ५ प्रतीसाद !!!
छ्या... ज्यादा सोचने का नय...बिनधास्त लिवायचे बस्स्... :)
मदनबाण.....
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् |
23 Nov 2009 - 1:48 am | गणपा
मस्त रे जय.
वचनाला जागलास :)
येउदे अश्याच मस्त मस्त रेसिपी....
-(गोडातला)गणपा
23 Nov 2009 - 2:33 am | चतुरंग
सत्यनारायणाचा शिरा मजबूत चापणे हे एकच आद्य कर्तव्य मला पूजेच्या दिवशी असे. अननसाचा शिराही फार मस्त लागतो फक्त त्यातले अननसाच्या फोडींचे प्रमाण पर्फेक्ट जमायला हवे. बदामाचा शिराही अफलातून लागतो! मुगाचा शिरा मात्र्....जाऊ दे..
आणि तुला रे कधीपासून प्रतिसादांची काळजी वाटायला लागली? :?
(मुगदळ)चतुरंग
23 Nov 2009 - 10:44 am | पर्नल नेने मराठे
मुगाचा शिरा खायच्या वेळेस बाजुला झोपायची व्यवस्था असावी कारण खाउन एवढे जडत्व येते कि तिकडेच आडवे व्हावेसे वाटते. :P
चुचु
23 Nov 2009 - 4:48 am | नंदू
पण जयपाल भौ, नमुनेदार केळी कुठुन आणावी बरं? :?
नंदू
23 Nov 2009 - 11:08 am | jaypal
मी सांगणार नाही.
शोधा म्हणजे सापडतील. 


****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
23 Nov 2009 - 3:53 pm | नंदू
केळ्यांचे धागे कढून टाकावे काय?
मला वाटतं याने नक्किच आस्वादात फरक पडेल.
मंदू
23 Nov 2009 - 4:04 pm | llपुण्याचे पेशवेll
ते केळ्यावर अवलंबून. लहान केळ्यांवर फारसे धागे नसतात असलेच तर ते मऊ असतात.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
23 Nov 2009 - 7:23 pm | jaypal
प्रिय नंदुजी केळ्यांवरील धागे हे आरोग्यास तंतुमय आहार म्हणुन खुप चांगले आहेत. शक्यतो ते काढु नका.
अंजीर, खजुर, केळे ,अननस ई. फळांमधील पोषक मुल्य (उष्मांक, प्रथीनं ई.) जाणुन घेण्यासाठी इथे टीचकी मारा
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
23 Nov 2009 - 5:12 am | प्रभो
मस्त रे
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
23 Nov 2009 - 10:58 am | समंजस
वा!! सुंदर आणि चविष्ट पाककृती :)
खाउन बघावी लागेल
23 Nov 2009 - 2:49 pm | धमाल मुलगा
व्वा...
व्वा व्वा....
व्वा व्वा व्वा.....
प्रसादाचा शिरा झाला, आता पुढे? मस्तपैकी पुजेदिवशीच्या जेवणाचं ताट कधी वाढताय? :)
(स्वगतः अंजीर झालं, केळे झालं....आता ह्या जयप्याच्या डोक्यातुन पुढंच काय येतंय? केळ्याचं शिकरण??? )
23 Nov 2009 - 2:55 pm | टारझन
घ्या केळं !!
23 Nov 2009 - 4:08 pm | परिकथेतील राजकुमार
वा वा वा !
अगदी केळेदार पाककृती.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
23 Nov 2009 - 5:46 pm | सूहास (not verified)
वा वा वा !
अगदी केळेदार पाककृती.
©º°¨¨°º© सुधरा ©º°¨¨°º©
सू हा स...
23 Nov 2009 - 7:07 pm | अविनाशकुलकर्णी
साखर व मिठाचे प्रमाण किति घ्यायचे?....फोतुत दाखवल्या प्रमाने मिक्स करायचे का साखर व मिठ?..शि~यात मिठ घालतात हे प्रथमच वाचले..तिखट मिठाच्या शि~यात मिठ घालतात...हे माहित होते
23 Nov 2009 - 7:15 pm | गणपा
अविनाश भाय... गोडाच्या शिर्यात चिमुट भर मिठ टाकुन पाहा मस्त चव येते..
बाकी प्रमाण धागा-धारी बल्लव सांगेलच..
-(आगाऊ) गणपा
23 Nov 2009 - 7:51 pm | jaypal
अविनाशजी गणपा म्हणतो आहे ते खरं आहे.प्रमाण म्हणाल तर धाग्यातील साहीत्य लक्षात घेता २ चिमुट मिठ पुरवे. आवश्य करुन पहा.
धागाधारी केळ रत्न बल्लव
जयपाल
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
23 Nov 2009 - 7:20 pm | अविनाशकुलकर्णी
गणपा हे प्रथमच ऎकतो आहे करुन बघेन..
23 Nov 2009 - 7:51 pm | प्रभाकर पेठकर
पाकृ आणि छायाचित्रं मस्तच आहेत. अभिनंदन.
एक - दोन शंका....
कुठल्याही शिर्याला जेवढ्यास तेवढी किंवा पाऊणपट साखर घेतात. इथे जेवढ्यास तेवढी साखर + ५ केळी (गोड)+ मुठभर बेदाणे (गोड) सांगितले आहेत. शिरा जास्त गोड होईल अशी भीती वाटते.
तसेच, वेलची आणि केशरचे स्वाद केळ्याच्या स्वादाला मारक आहेत.
साध्या शिर्यात वेलची, केशर शिर्यात केशर आणि केळ्याच्या शिर्यात फक्त केळ्याचा स्वाद असावा असे माझे मत आहे.
केळी पांढरी असल्याने शिर्याचा केशरी रंग सुसंगत वाटत नाही.
केळ्याच्या शिर्यात केळी आणि किंचित बनाना एसेन्स वापरावा.
अननस शिर्यात अननसाच्या (शिजवलेल्या) फोडी, पायनॅपल एसेन्स आणि कणभर पिवळा रंग वापरावा.
केशरी शिर्यात केशर वापरून काजू तुकडे किंवा बदामाचे काप वापरावेत. क्वचित प्रसंगी खवाही वापरतात. शिरा जास्त खमंग लागतो.
--------------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
23 Nov 2009 - 7:57 pm | गणपा
काका मस्त टिप,
धन्यु.
>>विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
अंतिम सत्य.
24 Nov 2009 - 12:02 am | विसोबा खेचर
येथील काही अवांतर आणि फालतू प्रतिसाद उडवून लावले आहेत. काही सभासदांना अशी विनंती की त्यांनी प्रत्येकच धाग्याचा खरडफळा बनवू नये. अन्यथा त्यांचे मिपाचे सभासदत्व रद्द केले जाईल..
तात्या.
24 Nov 2009 - 5:05 am | रेवती
मलाही केळं घालून शिरा म्हटलं की सत्यनारायणाचा प्रसाद आठवतो. पेठकरकाकांच्या प्रतिसादाशी सहमत!
रेवती