प्रेशर कुकर पाककृती
येथे प्रेशर कुकरचा उपयोग करून तयार करता येणार्या शाकाहारी / मांसाहारी पाककृती द्याव्यात.
उदा. भात, पुलाव, इडली, केक, हलवा, वरण, पुरण, चिकन इत्यादी.
बर्याचशा मंडळी ज्या कामानिमित्त बाहेर रहातात, सगळ्यांकडेच काही microwave असतोच असे नाही. पण कुकर बहुतेकांकडे असतो. तो सहज बाजारात उपलब्ध आणि स्वस्त देखील असतो. काहींना भात करणे किती कमी खर्चिक आणि सोपे असते हे देखील माहिती नसते. म्हणून आपल्याकडे जर काही अशा पाककृती असतील तर त्यांची इथे देवाणघेवाण करू!
वाजवा तर मग शिट्टी.....!!!
प्रतिक्रिया
9 Mar 2008 - 1:06 am | स्वाती राजेश
मनस्वी तु जर एका पाककृती ने सुरवात केली असतीस तर फार मस्त वाटले असते:))))
मला आणखी एक छान रेसिपी मिळाली असती...
चल मी सुरवात करते..सगळ्यात सोपी कृती मुगाच्या डाळीची खिचडी.... येथील पुरुष वर्गाला सुद्धा सहज जमणारी..
साहित्यः
१ वाटी तांदुळ
१/२ वाटी मुगाची डाळ ( सालीची वापरली तरी चालते)
१ डाव तेल
फोडणीचे साहित्य
२ लवंगा
४/५ दाणे काळे मिरे
१/२ इंच दालचिनीचा तुकडा
१ टे.स्पून. सुके खोबरे + १/२ च. जीरे भाजून कुटून घेणे.
१ टे.स्पून गोडा मसाला
चवीनुसार मीठ
१.खिचडी करण्यापुर्वी १ तास तांदुळ व डाळ स्वच्छ धूवून, निथळून ठेवावे.
२. तांदुळ व डाळीच्या दुप्पट म्हणजे ३ वाट्या पाणी उकळायला ठेवावे.
३. कुकर मध्ये डावभर तेल घालून त्यात फोडणी करावी (मोहरी, जीरे, हिंग, हळद). त्यात लवंग, काळी मिरी, दालचिनी घालावी.
व धुतलेले डाळ, तांदुळ घालावेत.थोडा वेळ परतावे.
४.त्यात उकळते पाणी घालावे व कुटलेले जीरे+खोबरे, गोडा मसाला व चवीनुसार मीठ घालावे व उकळी आणावी.
कुकरची शीटी काढून झाकण लावावे.मोठ्या गॅस वर ठेवावे जोरात वाफ आल्यानंतर, मंद गॅस वर १० मिनिटे ठेऊन कुकर बंद करावा.
ओले खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
नाहीतर गरम गरम ताकाच्या कढी बरोबर मस्त लागते.....
11 Mar 2008 - 11:55 am | विसोबा खेचर
झकास झाली आहे! :)
तात्या.
9 Dec 2008 - 3:07 pm | टारझन
सहमत,
तीळाराम चटणे*
(आम्ही तीळाची, जवसाची, खोबर्याची, शेंगदाण्यांची आणि बोंबलाची चटणी माफक दरात विकतो.)
* : ही सही साभार मित्रगण सौजन्याने
9 Dec 2008 - 3:39 pm | टारझन
प्रैशर कुकर मधे उकडलेली अंडी
साहित्य : भरलेला गैस , प्रैशर कुकर, लायटर , कोणाचीही (म्हणजे कोंबडी, शहामृग, वै वै) ऐक किंवा अनैक (गजरेनुसार) अंडी.लिंबू,मिठ, चाट मसाला.
कृती:
१. गैसला लैटरने चालू करा. आणि त्याच गैसवर कुकर ठेवा, काही महाभाग ऐक गैस चालू करून दुसर्याच गैसवर कुकर ठेवतात म्हणून मैन्शन केलंय.
२. कुकरात ७६% पाणि घाला, उरलेली जागा अंड्यांच्या वस्तुमानाने व्यापली जाते. ज्यास्त पाणी घातलं तर कुकर उतू जाऊन गैस विझेल आणि हवेत गैस पसरून दुर्घटणा होणे संभवते. मी किचन मधे एक्स्ट्रा सेफटी रेकमेंड करतो.
३. पाण्यानंतर कुकरात एक लिंबू घालावे, ते फोडूनच टाकावे नाही तर फायदा होणार नाही. शक्य झाल्यास कापून दोन फोडी करून टाकावे. लिंबू तब्बेतीला चांगले असते. त्यात सी.व्हिटामिन्स असतात म्हणे. पण आपण इथं सी.व्हिटामिन साठी त्याचा वापर करणार नाही आहोत. उगाच कुकर काळा नको पडायला म्हणून वापरू .. जर कुकर काळाच असेल तर मग आपण त्याच लिंबाला दारूत पिळून गट्टम करावे.
४.मग पाण्यात अंडी सोडावीत. (जशी फेकाड्या पुड्या सोडतो, तसे हळूच सोडावे) ही अंडी आधी फुटलेली नसावीत. नाही तर त्याच प्रैशर कुकर मधे त्याचे औमलेट होईल. नोद घ्या.
५. मग कुकरचे झाकण बंद करून कुकर मधे प्रैशर तयार होऊ द्यावा.
६.१०-१५ मिनीटांनी अंडी उबतात आणि त्या तुन चिकन्स बाहेर येतात. त्यांना पटकन बाहेर काढावे. नाही काढलं तर चिकन आतमधेच शिजेल. ते मग तांबडा रस्सा करण्या साठी वापरावे.
आता अवांतर पाककृती. (ही पाकृ प्रैशर कुकर मधे होत नाही म्हणून अवांतर आहे, पुन्हा नोंद घ्या)
आता हे पण मीच सांगू का ? एक रेडिमेड मसाला आणा, त्यात मिठ, तिखट, उकडलेलं चिकन , हळद वै वै ... टाका... थोडं हालवा... गैस वर परता.. तेल टाका .. नाय तर नीट नाय लागणार ... दुसर्या गैस वर चपात्या केल्यास आपला वेळ वाचू शकतो...
आता खाऊन पहा... नीट झालं तर झालं .. नाय तर आपल्या पेट्स ला खायला द्या ... मी अन्न वाया जाउ नये या मताचा आहे.
तीळाराम चटणे*
(आम्ही तीळाची, जवसाची, खोबर्याची, शेंगदाण्यांची आणि बोंबलाची चटणी माफक दरात विकतो.)
11 Mar 2008 - 1:44 am | चतुरंग
मी फोडणीला लवंग, काळी मिरी आणि दालचिनी च्या ऐवजी कढिपत्ता आणि हिरव्यागार मिरच्या उभ्या चिरुन घालतो
नंतर डाळ-तांदूळ परतायला घेतले की त्यात चिरलेला पालक घालतो किंवा मायक्रोवेवमधे २ मिनिटे वाफवून गाजर, मटारदाणे घालतो. वरुन गोडा मसाला घालतो आणि गरम करुन पाणी घालतो व कुकर बंद करतो. (खिचडी थोडी असट (किंचित सरबरीत) हवी असेल तर पाण्याचे प्रमाण वाढविणे, पावसाळ्याच्या दिवसात अशी खिचडी छान लागते:))
खिचडी वाढताना त्यावर साजूक तूप, बारिक चिरलेली कोथिंबीर+ओले खोबरे हवेच.
सोबतीला पापड, लिंबाचे लोणचे असेल तर काय बोलावे!:)
चतुरंग
9 Dec 2008 - 2:27 pm | प्रभाकर पेठकर
सोबतीला लसणीचे तिखट घ्यावे....
पाककृती:-
गरजे नुसार लसूण सोलून आणि बारीक चिरून घ्यावा. भरपूर तेल तापवून त्यात लसूण घालावा. मध्यम आंचेवर लसूण चांगला लाऽऽऽऽल होऊ द्यावा. लसूण लाल झाला की गॅस बंद करावा. आता त्यावर आवडीनुसार लालभडक तिखट घालावे. (तिखटाची पावडर जितकी जास्त तिखट तेवढी मज्जा जास्त) चवीनुसार मीठ घालावे. आणि आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर किंचीत घालून खिचडीबरोबर मस्त मजेत खावे.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
11 Mar 2008 - 10:54 am | मनस्वी
१ वाटी तांदुळ धुवून त्यात पाणी टाकावे. (मोकळ्या भातासाठी दुप्पट, गुरगुट्या भातासाठी साधारण ३-४ वाट्या)
१/४ चमचा मीठ (हवे असल्यास) टाकावे.
कुकरमध्ये १ ग्लास पाणी टाकावे व वरील भांडे त्यात ठेवून कुकरचे झाकण लावावे.
कुकर गॅसवर ठेवावा.
पहिली शिट्टी झाल्यावर ३ मिनिटांनी कुकर बंद करावा.
पूर्ण वाफ गेल्यावर कुकर उघडावा. भात तयार.
(तूप / मेतकूट / वरण / आमटी / कढी / पातळ भाजी / तूप मीठ वरण लिंबू / तिखट रस्सा लिंबू / गूळ तूप भात / ताक भात / दही भात काहीही combination करून खाता येतो!)
(तूप मीठ भातवरण लिंबू * तिखट रस्सा लिंबू * आमटी प्रेमी) मनस्वी
11 Mar 2008 - 12:02 pm | सर्किट (not verified)
कूकरच्या आकाराचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे संख्येत बटाटे घ्यावेत. बटाटे कुकर मध्ये ठेवून भरपूर पाणी टाकावे. २ शिट्ट्या झाल्या, की बटाटे उकडलेले असतात. (त्यावेळी कुकर बंद करावा.)
ह्या बटाट्यांचे नंतर बायकोला बटाटेवडे करायला सांगावे. छान लागतात. मूळ बटाटे आपण उकडल्याने वड्यांचे क्रेडिट स्वतःकडे घ्यावे.
- (बल्लवाचार्य) सर्किट
11 Mar 2008 - 8:31 pm | प्राजु
सर्किट राव,
हे मात्र सह्ही आहे तुमचे... उकडलेले बटाटे...
खूप हसले.
- (सर्वव्यापी)प्राजु
9 Dec 2008 - 1:51 pm | सुनील
ह्या बटाट्यांचे नंतर बायकोला बटाटेवडे करायला सांगावे. छान लागतात. मूळ बटाटे आपण उकडल्याने वड्यांचे क्रेडिट स्वतःकडे घ्यावे.
क्रेडिट घेण्यासाठी बटाटे उकडायचीही गरज नाही. नुसते बाजारातून आणले, यावरही क्रेडिट घेता येईलच की!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Mar 2008 - 12:05 pm | मनस्वी
वरीलप्रमाणे साधा भात करून घ्यावा.
फोडणीचे साहित्य: तेल, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, हळद
कांदा, शेंगदाणे, मीठ, कोथिंबीर
कृती:
वरीलप्रमाणे क्रमवार जिन्नस टाकून फोडणी करावी.
त्यात चिरलेला कांदा आणि शेंगदाणे परतून घ्यावेत.
त्यात भात टाकून मिश्रण एकसारखे करावे.
चवीनुसार मीठ टाकावे.
एक वाफ आल्यावर गॅस बंद करावा.
वाढताना वरून कोथिंबीर भुरभुरावी.
मनस्वी
11 Mar 2008 - 12:15 pm | धनंजय
ताज्या भातापेक्षा शिळा घेतला तर फोडणीचा भात मोकळा होतो.
फोडणीची पोळी (अथवा फोडणीचा कुस्करलेला पाव) सुद्धा शिळ्या पोळीची (पावाचा) जास्त चांगली (चांगला) होते.
11 Mar 2008 - 8:37 pm | प्राजु
१ वाटी तांदूळ, १/२ वाटी तूर डाळ.. एकत्र धुऊन, त्यात थोडा ओवा, हिंग, हळद, मीठ आणि जिरे घालावे दुप्पट पाणी घालावे.. एकदम मऊ हवा असल्यात पाणी चढ घालावे. आणि कुकर मध्ये शिजवावा ह भात. २-३ शिट्ट्या झाल्या कि, झाला भात.
यात मग मस्त तूप घालून सोबत लिंबाचे लोणचे घेऊन खावे.
- (सर्वव्यापी)प्राजु
9 Dec 2008 - 1:17 pm | सोनम
१.नारळाचा पुलाव
साहित्य : एक ग्लास बासमती ता॑दूळ, एक ग्लास किसलेला नारळ, पाव ग्लास साजूक तूप, दोन मोठे चमचे काजू , दोन मोठे चमचे मनुका, चार लव॑गा, दोन तमालपत्र, दोन तुकडे दालचिनी, चार लहान वेलची, दोन ग्लास दूध, अर्धा लहान चमचा मोहरी, आठ दहा कढीपत्ते, मीठ चवीनुसार.
कृती : ता॑दूळ धुऊन तीस मिनिटा॑पर्यत भिजत ठेवा. जाड बुडाच्या भा॑ड्यात तूप गरम करा. काजू आणि मनूका तळून काढा. त्यात सर्व मसाले टाकून परता व खोबर टाका. ते पाच मिनिट परता. ता॑दूळ, दूध व मीठ टाका. उकळल्यावर गॅस म॑द करा. फळफळीत शिजवा.
२.डाळीचा पुलाव
साहित्य : १-१ वाटी तुरीची डाळ व ता॑दूळ, १ वाटी चिरलेला पालक, ५-६ फणसाचे तुकडे, १ मोठा का॑दा, १ लहान टोमॅटो, ४-५ तमालपत्र॑, ४-५ सुक्या लाल मिरच्या, २-३ मोठ्या मसाला वेलच्या, २-३ लव॑गा, पाव लहान चमचा हळद पूड, एक लहान चमचा मसाला पूड, तीन चतुर्थाश लहान चमचा लाल मिरची पूड, दीड मोठा चमचा तेल, क्कोथि॑बीर व हिरवी मिरची मीठ चवीनुसार.
कृती : डाळ व ता॑दूळ भिजत ठेवा. कुकर कि॑वा पातेल्यात तेल गरम करा व फणसाचे तुकडे तळून काढून घ्या. तेलात तमालपत्र॑, सुकी मिरची टाकून तडतडवा. मोठी वेलची, लव॑ग टाका. चिरलेला का॑दा टाकून गुलाबी करा. चिरलेला टोमॅटो टाकून खूप परता. सर्व मसाले व तळलेल्या फणसाचे तुकडे टाकून जवळपास शिजवून घ्या. पालक टाकून परता. व गाळून डाळ ता॑दूळ टाका. त्यात साडेतीन वाट्या पाणी टाकून डाळीच्या पुलाव तयार करा. मेवा, कोथि॑बीर व हिरव्या मिरचीचे सजवून खायला घ्या.
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
(पुण्याची सोनम) राम राम मिपा
9 Dec 2008 - 2:14 pm | सुनील
प्रेशर कूकरच्या पाकृ ही कल्पना तशी चांगली आहे.
माझ्या मते, चिकनसाठी प्रेशर कूकर वापरू नये. तसेच तूर डाळ सोडल्यास अन्य डाळींसाठी (मूग / मसूर) प्रेशर कूकरची गरज नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.