---------प्रश्न --------

अनुप्रिया's picture
अनुप्रिया in जे न देखे रवी...
17 Nov 2009 - 8:40 pm

फुले उमलत नाही
माळ्याला तमा नसावी
काट्यांचा संग करोनी
कळ्यांची खुडणी करावी ??

विणकर विणतो धागा
वस्त्रा गाठ पडावी
शुभ्र वस्त्रे पांघरोनी
रक्तवर्णी होळी व्हावी ??

साज लेवूनी स्वप्नांचा
परी अंगणी यावी
पर तोडले जाऊनी
पायात बेडी यावी ??

वचन जयाने दिधले
त्यानेच इर्शा करावी
आनंद या जीवनी
देऊन घृणाही करावी ??

आरास कुणी मांडली
नयनी चुकार हुंदक्यांची
घाव मनी घुसला
त्याची तमा नसावी ??

अंत नसे दु:खाला
कवटाळे जो अंतरी
ओठाआड मग व्यथा
मुक्या हृदयाने पहावी ??

- सोनाली

कविता

प्रतिक्रिया

प्रभो's picture

17 Nov 2009 - 8:47 pm | प्रभो

अंत नसे दु:खाला
कवटाळे जो अंतरी
ओठाआड मग व्यथा
मुक्या हृदयाने पहावी ??

सुंदर......

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अवलिया's picture

18 Nov 2009 - 10:45 am | अवलिया

छान !

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

पॅपिलॉन's picture

18 Nov 2009 - 10:55 am | पॅपिलॉन

आशय आणि मांडणी छान आहे.

एक सल्लेवजा सुचना - राग मानू नये - कविता छंदात लिहायची तर, मीटरकडे लक्ष द्यावे अन्यथा थेट मुक्तकात लिहावी.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

sneharani's picture

18 Nov 2009 - 1:03 pm | sneharani

अंत नसे दु:खाला
कवटाळे जो अंतरी
ओठाआड मग व्यथा
मुक्या हृदयाने पहावी
??
छान.!

परिकथेतील राजकुमार's picture

18 Nov 2009 - 1:58 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तच एकदम !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मंगेशपावसकर's picture

20 Feb 2010 - 9:05 pm | मंगेशपावसकर

अप्रतिम ............

टारझन's picture

20 Feb 2010 - 9:47 pm | टारझन

कविता गोड आहे :)
प्रकाशकाका घाटपांडे आपले कोण ? :)

- अंधार घाटपांडे

रेवती's picture

20 Feb 2010 - 9:51 pm | रेवती

छान कविता!
बर्‍याच दिवसांनी कविता आवडली.

रेवती

टारझन's picture

20 Feb 2010 - 9:55 pm | टारझन

हॅहॅहॅ ... बाकी कवि/कवियत्रींना टोला देण्याचा प्रकार आवडला :)

ह्या प्रतिक्रीयेत "अंतरजालावरची प्रसिद्ध प्रतिक्रीया " होण्याचा चार्म दिसतो :)

राघव's picture

21 Feb 2010 - 1:26 pm | राघव

मोजक्या शब्दांत खूप काही!! आवडले.

राघव