तुझा शाळेचा पहिला दिवस
प्रेस केलेला शाळेचा युनिफॉर्म
तो टिफिन ती वॉटर बॉट्ल
किती आनंदात होतीस ना तू?
पण मी ? कसं सांगू तुला..
एकीकडे तू आता शाळेत जाणार हा आनंद
तर एकीकडे तुझे घरातून ३ तास का होईना
माझ्यापासुन दूर जाणार....
ह्या कल्पनेनेच मी हळवी होत होते..
तो दिवस आणि आजचा दिवस
आज तुझे लग्न आणि पाठवणी
पुन्हा तू किती आनंदात आहेस
नविन कपडे, नवे दागिने
नविन घर, नवे लोक
वरात येण्याच्या तयारीत
तू गौरीहार पुजण्यात मग्न
पुढच्या जिवनाची स्वप्नं रंगवणं
एकीकडे तुझं मला खरचं दुरावणं
एकीकडे तुझा आनंद एकीकडे माझा एकांत
आणि इकडे पुन्हा मी हळवी होत होते...
प्रसन्ना जीके
प्रतिक्रिया
14 Nov 2009 - 1:52 pm | पर्नल नेने मराठे
सुरेख!!!
चुचु
14 Nov 2009 - 4:03 pm | गणपा
छान आहे. आवडली कविता.
14 Nov 2009 - 4:17 pm | मदनबाण
कविता आवडली... :)
मदनबाण.....
The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.
14 Nov 2009 - 4:25 pm | परिकथेतील राजकुमार
उत्तम काव्य. आवडले.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
14 Nov 2009 - 9:17 pm | प्रभो
मस्त
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
14 Nov 2009 - 11:45 pm | परिणीता
मस्त. :SS .तूला कस सुचतात बुवा अश्या कविता? :?
15 Nov 2009 - 7:07 am | लवंगी
५ वर्षाच्या चिमुरडीला शाळेत सोडल पहिल्या दिवशी तेंव्हा हाच विचार येऊन डोळे पाणावले माझे..
15 Nov 2009 - 7:26 am | भाग्यश्री कुलकर्णी
अगदी मनातलं लिहलस माझी लेक शाळेत गेली तो दिवस समोर आला.
18 Nov 2009 - 7:57 pm | मनीषा
सुरेख कविता !