मनसेने राडा करायला सुरुवात केल्यापासून बरेच जणांचा मराठी नावाचा बाणा जागा झाला आहे. महाराष्ट्रात अनेकजण आपण कसे कडवे मराठी आहोत हे दाखवत असतात. मला जर कोणी आपण कसे कट्टर मराठी आहोत असे सांगायला लागला की मी मान डोलवून म्हणतो, "वा वा ! तुम्ही मराठीप्रेमी आहात हे ऐकून बरे वाटले. मला सांगा -
१) आपल्याला ५ मराठी लेखकांची नावे माहित आहेत का? २) ५ मराठी कविता तोंडपाठ आहेत का? ३) आपली मुले मराठी माध्यमात शिकतात का? (जर ती इंग्रजी माध्यमात शिकत असतील तर त्यांना शाळेत दाखल करताना हा तुमचा मराठी बाणा हिमनिद्रेत होता का?) ४) आपण रोज रेडियोवर एफ एमचे / अस्मिता वाहिनीचे मराठी कार्यक्रम ऐकता का? ५) आपल्याला एखादी मराठी बोली येते का? उदा. वर्हाडी, मालवणी. ६) ती बोली सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपल्याला लाज वाटते का? ७) किमान ५ मराठी म्हणी व ५ मराठी वाक्प्रचार तोंडपाठ आहेत का? ते बोलताना अचुक वापरता येतात का? ८) आपण दिवाळीत "दिवाळी अंक" विकत घेण्याची अस्सल मराठी परंपरा न चुकता जोपासता का? ९) जय जय महाराष्ट्र माझा किंवा मराठी असे आमुची मायबोली किंवा सुरेश दादांचे मराठी गीत "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" तोंडपाठ येते का?
असे विचारतो.
(एकदा हे सर्व निरागस प्रश्न प्रत्यक्ष राजजींना पण विचारण्याची मनात आस आहे)
मंडळी, आपले पण मराठी पणाचे असे काही गंभीर निकष असतीलच. कृपया, आपण ते जर ह्या मंचावर मांडावेत. त्याने आपल्या सर्वांनाच "मराठीपणाची" व्याख्या करता येईल.
प्रतिक्रिया
12 Nov 2009 - 11:05 pm | jaypal
"एकदा हे सर्व निरागस प्रश्न प्रत्यक्ष राजजींना पण विचारण्याची मनात आस आहे"

असे परखड सवाल केल्यावर गुळांबा गोड कसा लागेल?
ताबडतोब बरणीची तोड्फोड होइल काळजी घ्या.
प्रश्न बाकी काही मनातले आणि काही विचार करायाला लावणारे
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
12 Nov 2009 - 11:47 pm | देवदत्त
ह्म्म.....
लोकांचा बाणा केव्हापासून जागा झाला ह्याला महत्व नाही, खरोखरच जागा झाला का ह्याला महत्व आहे.
कट्टर मराठीपण आणि मराठी बोली (उदा. वर्हाडी) ह्यांचा संबंध नाही कळला.
ह्यासोबत आणखी एक प्रश्न विचारा (अर्थात तुमचे उत्तर होकारार्थी असेल तरच.)
मराठी चित्रपट पाहता का?
(मला उत्तरे विचारण्यात येऊ नयेत : ) )
12 Nov 2009 - 11:53 pm | झकासराव
आपल्याला ५ मराठी लेखकांची नावे माहित आहेत का?>>>>>>>
=))
म्हणजे मग माझा मावसभाउ आहे त्याने दहावीतुन शाळा सोडुन शेती करण्याह काम सुरु केल त्यालाहि यायला पाहिजेत का पाच नाव??? मग तो मराठीप्रेमी नाहि का?
५ मराठी कविता तोंडपाठ आहेत का
वरीलप्रमाणेच.
आपली मुले मराठी माध्यमात शिकतात का?>>>
माझा मुलगा अजुन शाळेत जात नाहिये. मी प्राधिकरणातली ज्ञानप्रबोधिनी ही शाळा हेरुन ठेवली आहे. आता जर तिथे अॅडमिशन मिळत नसेल तर (मोठी रांग असते भाउ) आयत्यावेळची बोंब होउ नये म्हणुन एक दुसरी शाळा हेरली आहे जिथे आरामात अॅडमिशन होइल. पण ती इन्ग्रजी माध्यमाची शाळा आहे.
आता ह्या दोन शाळा सोडुन मला बाकीच्या शाळांमध्ये (इन्ग्रजी आणि मराठी) दम वाटत नाही. मग ह्या मुद्द्यांचा विचार का करु नये?
आपण रोज रेडियोवर एफ एमचे / अस्मिता वाहिनीचे मराठी कार्यक्रम ऐकता का?>>>
माझ्याकडे रेडिओच नाही. एक डिव्हीडी प्लेअर आहे ज्यावर एमपीथ्री फॉर्मॅट मधली गाणी ऐकतो. ती मराठी, हिंदी, इन्ग्रजी (ही कमीच) ऐकतो.
त्यात वैयक्तिक आवडनिवड असु नये का? की मी हिंदी गाणी ऐकली म्हणजे मराठी प्रेमी नाहिये. हा एक आहे कधी काळी मित्राच्या मोबाइलवर रेडिओ मिर्चीवरच्या बाष्कळ बडबडीत मराठीचा खुन ऐकुन पार वैतागलो होतो.
मी कोल्हापुरला गेलो की टोमॅटो एफ एम ऐकतो ते ही एकाच कार्यक्रमापुरत. ह्या फुलांच्या गंधकोषी. अप्रतिम मराठी गाणी असतात. :)
एखादी मराठी बोली येते का? उदा. वर्हाडी, मालवणी>>>
मी कोल्हापुरचा आहे मग मला वर्हाडी, मालवणी कशी काय येणार?
कोल्हापुरी येते. ऐकवु काय?? ;)
किमान ५ मराठी म्हणी व ५ मराठी वाक्प्रचार तोंडपाठ आहेत का? ते बोलताना अचुक वापरता येतात का?>>>
हम्म. कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण ताबडतोब आठवली बघा. ;)
ह्याचहि उत्तर प्रशन क्रमांक एकप्रमाणेच.
आठ आणि नऊ क्रमांकाच्या प्रश्नाच उत्तर देखील एक प्रमाणेच असु शकत नाहि काय??
तुम्ही तो वागळेंचा कार्यक्रम बघत असाल आयबीएम लोकमत वर अस वाटतय तुमचे प्रश्न बघुन. :)
12 Nov 2009 - 11:54 pm | रामपुरी
दोनच गोष्टी शक्य आहेत.
१. राज ठाकरेंच्या अनुयायांकरवी तुम्हाला मारहाण होईल. (काय करणार, त्यांची मुले इंग्रजी शाळेत शिकतात असं ऐकतो. अगदी त्यांच्या कुत्र्यांची नावंही इंग्रजी आहेत म्हणे)
२. इथे एक फतवा निघेल "राज ठाकरेंच्या विरोधात वावगा शब्द ऐकून घेतला जाणार नाही. तरिही असे प्रश्न केल्यास आयडी ब्लॉक केला जाईल".
(आमचं स्पष्ट मत: मराठीचा मुद्दा फक्त मतांसाठी. बाकी सगळं गेलं xxxx. मनसे झिंदाबाद!!!)
13 Nov 2009 - 12:13 am | निमीत्त मात्र
रामपुरी तुमच्याशी सहमत आहे. पण आता तुमच्यावरही आगपाखड सुरु होईल हे लक्षात घ्या.
मनसेच्या १३पैकी ८ आमदारांची मुले इंग्लिश मीडीयममध्ये जातात. राज ठाकरेची मुलं "बॉम्बे(!) स्कॉटीश" मधे शिकतात.रमेश वंजाळेंचा मुलगा स्प्रिंग्डेल मध्ये जातो आणि राम कदमांचा मुलगा बांद्राच्या कॉनवेंटमधे. सध्या ज्यांनी मराठी भाषेचा मक्त घेतलेला आहे म्हणून तुम्ही पाठींबा देता त्यांची ही अवस्था.
इंग्रजी पाट्या फोडण्याआधी आणि बसेस जाळण्याआधी स्वत:च्या पोरांना मराठी शाळेत घाला मग शिकवा दुसर्यांना शहाणपण.
13 Nov 2009 - 1:26 am | रामपुरी
जे सत्य आहे ते आगपाखड झाल्याने बदलत नाही. "बॉम्बे(!) स्कॉटीश" तर भारीच.
मला एक कळत नाही, या राजकारण्यांना असं दुटप्पी वागताना लाज कशी वाटत नाही? जनाची नाही तर मनाची तरी.
13 Nov 2009 - 9:18 pm | llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ. दुटप्पीपण जो तो करत असतो. फक्त ज्याचा त्याचा प्रांत वेगळा. :)
राजला सांगितले पाहीजे मारहाणीच्या कारणामुळे का होईना पण निमित्तमात्र तरी कुत्र्याचे नाव रामपुरी ठेव. कसे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
13 Nov 2009 - 10:11 am | विशाल कुलकर्णी
पालथ्या घड्यावर पाणी ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
13 Nov 2009 - 12:04 am | आशिष सुर्वे
"मराठीपणाची" व्याख्या असल्या टुकार निकषांच्या आधारावर निश्चित करणार आहात??
धन्य आहे!!
हे ज्ञानेश्वरा!!
-
कोकणी फणस
13 Nov 2009 - 7:19 am | हर्षद आनंदी
अंमळ करमणुक झाली, धागा आणि प्रतिसाद वाचुन..
एकंदरीत हिंदी <बिहारी> बातमी वाहिन्यांचा प्रभाव जोरात आहे तर,
मराठ्यांशी सहमत..
शिकलेल्यांना शहाणे करणे हीच य देशाची खरी गरज आणी समस्या
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
13 Nov 2009 - 7:19 am | हर्षद आनंदी
अंमळ करमणुक झाली, धागा आणि प्रतिसाद वाचुन..
एकंदरीत हिंदी <बिहारी> बातमी वाहिन्यांचा प्रभाव जोरात आहे तर,
मराठ्यांशी सहमत..
शिकलेल्यांना शहाणे करणे हीच य देशाची खरी गरज आणी समस्या
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
13 Nov 2009 - 7:27 am | शेखर
तुम्ही मराठी प्रेमी असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी येत असतीलच...
13 Nov 2009 - 1:05 pm | विजुभाऊ
) आपल्याला ५ मराठी लेखकांची नावे माहित आहेत का? २) ५ मराठी कविता तोंडपाठ आहेत का? ३) आपली मुले मराठी माध्यमात शिकतात का? (जर ती इंग्रजी माध्यमात शिकत असतील तर त्यांना शाळेत दाखल करताना हा तुमचा मराठी बाणा हिमनिद्रेत होता का?) ४) आपण रोज रेडियोवर एफ एमचे / अस्मिता वाहिनीचे मराठी कार्यक्रम ऐकता का? ५) आपल्याला एखादी मराठी बोली येते का? उदा. वर्हाडी, मालवणी. ६) ती बोली सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपल्याला लाज वाटते का? ७) किमान ५ मराठी म्हणी व ५ मराठी वाक्प्रचार तोंडपाठ आहेत का? ते बोलताना अचुक वापरता येतात का? ८) आपण दिवाळीत "दिवाळी अंक" विकत घेण्याची अस्सल मराठी परंपरा न चुकता जोपासता का? ९) जय जय महाराष्ट्र माझा किंवा मराठी असे आमुची मायबोली किंवा सुरेश दादांचे मराठी गीत "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" तोंडपाठ येते का?
प्रश्न ३ सोडता सर्वांची उत्तरे होकारार्थी आहेत.
माझी मुले इंग्रजी शाळेत जातात कारण माझी आणि माझ्या पत्निची मातृभाषा वेगवेगळी आहे. दोघांच्यात समान दुवा म्हणून इंग्रजी भाषा मुलांच्या शिक्षणाचे माध्यम म्हणून स्वीकारली.
प्रश्न ७ : मला कोकणी /अहिराणी या भाषा समजतात. थोड्या बोलताही येतात.
तुमचे हे सर्व निकष मी पार पाडतो.
माझे आडनाव शाह असे गुजराथी भाषीक आहे. मी मराठी आहे किंवा नाही ते सांगा.
मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो त्याची उत्तरे तुम्ही द्या
१) तुम्हाला भाऊ पाध्ये / भाऊसाहेब खांडेकर / आण्णा भाऊ साठे यांच्या लेखनातील फरक उमजतो?
२) दलीत साहित्यात डॉ यशवंत पाठक यांचे साहित्य कसे काय समाविष्ट होते?
३) ग्रंथाली वाचक चळवळ का थंड झाली
४) गोडसे भटजी या ( सन १८५७ च्या काळात होऊन गेलेल्या) साहित्यीकाने मराठी साहित्यात नक्की कोणते कार्य केले आहे
५) दिलीप चित्रे याना "सेज टुका " ल्हिले त्याना मराठी सहित्यीक मानायचे किंवा नाही?
६) वाडवली ही मराठीची पोट भाषा महाराष्ट्रात कोणत्या भागात बोलली जाते. तीचे वैशिष्ठ्य काय?
७) ताई तेलीणीच्या किल्ल्याचे नाव काय? तो कोठे आहे?
या निकषां वर तुम्ही किती % मराठी ठरता?
13 Nov 2009 - 1:31 pm | गणपा
है शाब्बास विजुभौ. अगदी मनातला प्रतिसाद.
मी पण असच म्हणतो तिसरा मुद्दा सोडला तर सगळ्या प्रश्नांची उत्तर होय आहेत.
आता परदेशात मराठी माध्यमाच्या शाळा नसल्याने मुलांना अशिक्षीत ठेवण्यापेक्षा योग्य पर्याय असलेल्या माध्यमातुन शिकवणे योग्य कि अयोग्य?
काही तरी विचारायच म्हनुन विचारायच झाल तर असे बरेच प्रश्नच विचारता येतील हो कि ज्यांची आधारे तुम्ही १ % मराठी ठरणार नाही.
13 Nov 2009 - 7:50 pm | पिवळा डांबिस
तुमचे हे सर्व निकष मी पार पाडतो.
माझे आडनाव शाह असे गुजराथी भाषीक आहे. मी मराठी आहे किंवा नाही ते सांगा.
जबरदस्त बॅटिंग केली आहे!!! जियो!!
बाकी आमच्यासाठी तुम्ही मराठीच आहांत, विश्वास बाळगा!!!
13 Nov 2009 - 1:10 pm | बाकरवडी
8} 8} 8} 8} 8} 8} 8}
असं असेल तर मी काही पण प्रश्न विचारीन. :D
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
13 Nov 2009 - 1:56 pm | प्रसन्न केसकर
१) आपल्याला ५ मराठी लेखकांची नावे माहित आहेत का?
नाही! मराठी लिहायला वाचायलाच येत नाही मला.
२) ५ मराठी कविता तोंडपाठ आहेत का?
कश्या असतील? लिहायला वाचायला येत नाही तर?
३) आपली मुले मराठी माध्यमात शिकतात का? (जर ती इंग्रजी माध्यमात शिकत असतील तर त्यांना शाळेत दाखल करताना हा तुमचा मराठी बाणा हिमनिद्रेत होता का?)
नाही - माझा मुलगा स्प्रिंगडेलमधे आहे (होय वांजळेंची मुलं आहेत त्याच शाळेत.) फक्त तो इंग्रजीएव्हढंच चांगलं मराठी लिहितो/वाचतो अन आम्ही घरी दारी बोलतो ते मराठीतच.
४) आपण रोज रेडियोवर एफ एमचे / अस्मिता वाहिनीचे मराठी कार्यक्रम ऐकता का?
नाही. आपण या वाहिनीचे जाहीरात प्रतिनिधी का?
५) आपल्याला एखादी मराठी बोली येते का? उदा. वर्हाडी, मालवणी.
मला माझे आई, वडील अन त्यांचे सगळे पुर्वज बोलतात ती भाषा चांगली येते. तिला बोली म्हणतात का माहिती नाही पण बरेच लोक मला आणि माझ्या भाषेला घाटी म्हणतात.
६) ती बोली सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपल्याला लाज वाटते का?
बोली म्हणजे काय असते ते माहीती नाही. आई, वडील अन पुर्वजांचीच भाषा मी कटाक्षानं सगळीकडं बोलतो.
७) किमान ५ मराठी म्हणी व ५ मराठी वाक्प्रचार तोंडपाठ आहेत का? ते बोलताना अचुक वापरता येतात का?
हे काय असतं? शिकलो नाही ना म्हणुन माहिती नाही. अकलेचे दिवाळे, मर्कटचेष्टा, आंधळं दळतं कुत्र पीठ खातं वगैरे गोष्टी कश्याला म्हणतात ते माहिति आहे. म्हणुन दाखवु?
८) आपण दिवाळीत "दिवाळी अंक" विकत घेण्याची अस्सल मराठी परंपरा न चुकता जोपासता का?
इथं खायची मारामार आहे. ज्या गोठ्यात शेण उचलायचो तिथं गेल्या वर्षी बिहारी घेतलेत.
९) जय जय महाराष्ट्र माझा किंवा मराठी असे आमुची मायबोली किंवा सुरेश दादांचे मराठी गीत "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" तोंडपाठ येते का?
गाणी म्हणु की पोट जाळु? पोट भरलं असलं तर कधीतरी पोवाडे, लावण्या, किर्तनं, भजनं, भारुडं, गौळणी गुणगुणतो.
बास करा की राव ही थट्टा. हे असेच निकष हिंदी, मराठी, इंग्रजी कुठल्याही भाषेबाबत बनवा अन अबु आझमी किंवा त्याच्या कुठल्याही समर्थकाला विचारा. जगला वाचलात तर भेटु परत.
पक्का राडेबाज
पुणेरी.
13 Nov 2009 - 2:18 pm | छोटा डॉन
प्रसन्नदा, हा प्रतिसाद कडक म्हणजे लै लै लै क-ड-क !!!
तोडलास कंप्लिट ...!!!
------
( मराठी, बोलीभाषा, प्राकॄतभाषा, ग्रामभाषा वगैरेंच्या शोधातला )छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
13 Nov 2009 - 2:49 pm | विशाल कुलकर्णी
हाण तिच्या मारी...
पुनेरी, विजुभाऊ पटलं ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
13 Nov 2009 - 2:24 pm | आशिष सुर्वे
विजुभाऊ, पुनेरी.. >> तोडलंत!
=^=
-
कोकणी फणस
13 Nov 2009 - 3:17 pm | परिकथेतील राजकुमार
१) आपल्याला ५ मराठी लेखकांची नावे माहित आहेत का?
हो !
१) बिपिन कार्यकर्ते
२) रामदास
३) विसोबा खेचर
४) विनायक प्रभु
५) टारझन
अजुन भरपुर आहेत पण येव्हडे तुम्हाला पुरतील असे वाटते.
२) ५ मराठी कविता तोंडपाठ आहेत का?
हो !
कधी येताय ऐकायला ? अहो कविताच काय आम्हाला पुलंच्या नाट्यछटा, पोवाडे, पुरंदरेंची काही भाषणे सुद्धा पाठ आहेत.
३) आपली मुले मराठी माध्यमात शिकतात का? (जर ती इंग्रजी माध्यमात शिकत असतील तर त्यांना शाळेत दाखल करताना हा तुमचा मराठी बाणा हिमनिद्रेत होता का?)
अजुन लग्न झाले नाहीये.
४) आपण रोज रेडियोवर एफ एमचे / अस्मिता वाहिनीचे मराठी कार्यक्रम ऐकता का?
हो !
रात्री रेडीयोवर आणी दिवसा कॅफेत देखील ऐकतो.
५) आपल्याला एखादी मराठी बोली येते का? उदा. वर्हाडी, मालवणी.
पुणेरी येते.
६) ती बोली सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपल्याला लाज वाटते का?
नाही !
ती बोलतानाच काय त्या बोलीतल्या अस्सल शिव्या द्यायला ही चार चौघात लाज वाटत नाही.
७) किमान ५ मराठी म्हणी व ५ मराठी वाक्प्रचार तोंडपाठ आहेत का?
१) बाझवला भांचोत !
२) हि अमुक तमुक, हिच्यावर आमचा भारी जीव.
३) जियो !
४) वारलो ! खपलो !! ठार झालो !!!
५) भिकारचोट.
ते बोलताना अचुक वापरता येतात का?
बाझवला भांचोत ! ह्या गुळांब्यावर आमचा भारी जीव, काय एक एक भिकारचोट प्रश्न विचारतो. प्रश्न वाचुन पार वारलो ! खपलो !! ठार झालो !! जियो...
८) आपण दिवाळीत "दिवाळी अंक" विकत घेण्याची अस्सल मराठी परंपरा न चुकता जोपासता का?
आनंदाने.
मार्मीक आणी साप्ताहीक सकाळ तर घेतोच घेतो. आधी षटकार देखील घ्यायचो पण तो आता बंद झाला.
९) जय जय महाराष्ट्र माझा किंवा मराठी असे आमुची मायबोली किंवा सुरेश दादांचे मराठी गीत "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" तोंडपाठ येते का?
जय जय महाराष्ट्र यायचे आधी, पण एकदा अवधुत गुप्तेचे 'जय जय महाराष्ट्र' ऐकले आणी आम्ही आमचे गाणे विसरलो.
आणि हो ..
तुम्हाला 'लाँग लिव्ह द क्विन' येते का हो ??
तुम्हाला गुळांबा करण्यायोग्य ५ फळांची माहिती आहे का ?
तुम्हाला गुळांब्याची पाककृती लिहिणार्या ५ सुगरणींची नाव माहित आहेत का ?
आपण रोज गुळांबा खाता का ? तो चारचौघात खायची आपल्याला लाज वाटते का ?
आपल्याला गुळांब्याची पाककृती तोंडपाठ आहे का ?
तुमची मुले शाळेत डब्यातुन गुळांबा नेतात का ?
©º°¨¨°º© परांबा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 Nov 2009 - 3:20 pm | नंदन
अगायायाया =)) =)) =))
मेलो, खपलो, चचलो, हिमनिद्रेत गेलो. बाकी कैरीचा कीस पाडतात हे माहीत होतं. गुळांब्याचा कीस पाडणारे परासेठ तुम्हीच!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
13 Nov 2009 - 3:52 pm | टारझन
पर्या चोच्या .... कसला बेक्कार टाकलाय =))
बरं झालं ठसकाच लागला ..वायू सरला नाही ... नाही तर बाकी लोक हिमनिद्रेत गेले असते =))
-- टारांबा
13 Nov 2009 - 5:25 pm | दिपक
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =))
=))
=))
=)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
13 Nov 2009 - 3:26 pm | अवलिया
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
13 Nov 2009 - 6:33 pm | llपुण्याचे पेशवेll
हसून हसून वारलो आणि ख्रिस्तवासी झालो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
14 Nov 2009 - 12:35 am | पक्या
अरेरे थोडक्यात चुकले. जियो हा हिंदी शब्द आहे, मराठी नाही ;)
- जय महाराष्ट्र , जय मराठी !
15 Nov 2009 - 10:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =)) =))
पर्या, दंडवत रे तुला!! पुनेरी आणि विजाभौंनीही पार विकेट काढली!!
काही काही शब्द मराठी भाषेत इतर भाषांमधून आलेले आहेत, उदा: टेबल, मेज, खुर्ची, सीडी, प्लॅटीपस, इ. इ. 'जियो' ही आणखी एक भर! शब्द न वाढवणारी भाषा आणि साचलेलं पाणी ... एकसारखंच ना! शेवाळ जमणारच!
परासेठना खास विनंती (खास हाही इंपोर्टेड शब्द हो): गुळांब्याचा कीस अशी एक पाकृ त्यांनी लिहावी.
अदिती
16 Nov 2009 - 12:57 pm | llपुण्याचे पेशवेll
गुळांब्याचा कीस अशी एक पाकृ त्यांनी लिहावी
हॅ हॅ हॅ. अहो चिडवत असले तरी परा त्यातला नाही हो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
16 Nov 2009 - 1:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
छे छे छे, पेशवे, भलताच अर्थ काढता हो तुम्ही! शुद्धलेखन महत्त्वाचं आहे फार्फार .... किस नाही कीस लिहीलं मी!!
आणि तुम्हाला बरं माहित हो परा त्यातला नाही ते; तुम्ही उगाच विचारलं नसताना पर्याला क्यार्याक्टर सर्टीफिकेट देताय ... मला भलतीच शंका येते आहे.
अदिती
16 Nov 2009 - 12:59 pm | llपुण्याचे पेशवेll
प्रकाटाआ
14 Nov 2009 - 1:52 am | नाटक्या
विजूभाऊ,
खलास, जबरा, चाबूक इ. इ. इ. वारलो भांचोत आपण तर!!!!
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
13 Nov 2009 - 3:33 pm | विजुभाऊ
१) तुम्हाला भाऊ पाध्ये / भाऊसाहेब खांडेकर / आण्णा भाऊ साठे यांच्या लेखनातील फरक उमजतो?
भाऊ पाध्ये यानी ३.५ % च्या साहित्य विचाराना सुरुंग लावला. त्यांचे वासू नाका सांगोपांग हे पुस्तक. कट्ट्यावर वापरली जाणारी खरीखुरी भाषा हे त्यांचे हुकमी अस्त्र
भाउसाहेब खांडेकरानी ३.५% चे साहित्य लोकप्रिय केले. शैलीदार लेखन हे त्यांचे वैशिष्ठ्य
ययाती आणि देवयानी हे त्यांचे एक पुस्तक
आण्णा भाऊ साठे हे आद्य दलीत साहित्यीक.
त्यानी मातंग समाजातील अनेक विषयांवर मुबलक लेखन केले आहे. त्या समाजाची भाषा त्या काळात साहित्यात आणली.
२) दलीत साहित्यात डॉ यशवंत पाठक यांचे साहित्य कसे काय समाविष्ट होते?
त्यांचे पुस्तक " अंगणातील आभाळ" हे वाचून पहा.
ब्राम्हण समाजातल्या एका कीर्तनकाराची परवड लिहिली आहे.
३) ग्रंथाली वाचक चळवळ का थंड झाली.
वाचक वर्ग हा अभिरुची बदलत असतो. सुरुवातीला या चळवळीला खूपच उत्तम प्रतिसाद मिळाला. पण नन्तर नन्तर वैचारीकदृष्ट्या पक्व झालेल्या वाचकाला ग्रंथाली चळवळ आपलीशी वाटेना. त्यांची पुस्तएक खपेनात आणि पर्यायाने चलवळ थंडावली
४) गोडसे भटजी या ( सन १८५७ च्या काळात होऊन गेलेल्या) साहित्यीकाने मराठी साहित्यात नक्की कोणते कार्य केले आहे
मराठीतले पहिले प्रवासवर्णन लिहिले आहे. ( बखर/ चरीत्र / लीळा या प्रकरापासून संपूर्ण वेगळे असे गद्य वाङ्मय प्रथमच मराठीत आले )
५) दिलीप चित्रे याना "सेज टुका " ल्हिले त्याना मराठी सहित्यीक मानायचे किंवा नाही?
दिलीप पुरुषोत्तम चित्रे
हे बडोद्याला जन्मले पण त्यानी मराठीत आणि गुजराथी मध्ये कविता केल्या . अभिरुची मासीकातून त्यानी कविता प्रथम प्रकाशीत केल्या.
एकूण कविता ( तीन खंड) हे त्यांचे कविता संग्रह
तुकारामांचे अभंग त्यानी "सेज टुका" या नावाने इंग्रजीत नेले.
ज्ञानेश्वरांचे अनुभवामृत हे त्याने इंग्रजीत " इम मॉर्टल एक्सपीरियन्स ऑफ बीईंग" या नावाने आणले.
६) वाडवली ही मराठीची पोट भाषा महाराष्ट्रात कोणत्या भागात बोलली जाते. तीचे वैशिष्ठ्य काय?
ही भाषा ठाणे जिल्ह्यात वसई परिसरात बोलली जाते. कोकणी सदृष या भाषेचे वैशिष्ठ हे की यात बरेच पोर्तुगीज शब्द आहेत. रोमन्कॅथलीक समाज ही भाषा बोलतो.
७) ताई तेलीणीच्या किल्ल्याचे नाव काय? तो कोठे आहे?
वासोटा. सातारा जिल्ह्यात कोयनेच्या जंगलात हा किल्ला आहे. पेशव्यांचा सेनापती बापू गोखले हा किल्ला घेताना असफल ठरला होता.
तेलीण मारी सोटा ;बापू गोखल्या सांभाळ कासोटा अशी म्हण यावरून आली.
ही उत्तरे फारशी अवघड नाहीत. मराठी साहित्य वाचणार्या बहुतेकांस माहीत असतील.
तुम्ही किती % मराठी ठरलात ?
13 Nov 2009 - 3:37 pm | सूहास (not verified)
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
सू हा स...
13 Nov 2009 - 5:13 pm | आशिष सुर्वे
परिकथेतील राजकुमार .. आपल्याला शिर साष्टांग नमस्कार!!
च्यामारी एकदम 'दम'दार लिखाण केलेय हो..
विजुभाऊ .. आपल्याला प्रत्यक्ष भेटायची इच्छा झालीय!!
एकदम अभ्यासपूर्ण लिखाण आहे आपले..
-
कोकणी फणस
13 Nov 2009 - 6:40 pm | प्रशु
हि अशी अबु सारखी लोकं मुद्दाम कळ काडतात आणी मग थोबडवुन घेतात....
परा उत्तर मस्तच....
************************************
मनसे ची माणसे
13 Nov 2009 - 6:53 pm | झकासराव
पर्या
=)) =)) =)) =)) =))
13 Nov 2009 - 9:45 pm | sujay
विजुभाउ, कानफाटात मारणारा प्रतिसाद. १कच नंबर
पराशेठ-
बाझवला भांचोत ! ह्या गुळांब्यावर आमचा भारी जीव, काय एक एक भिकारचोट प्रश्न विचारतो. प्रश्न वाचुन पार वारलो ! खपलो !! ठार झालो !! जियो...
=)) =)) =)) =)) =))
गुळांबा तुम्हाला येतं का- 'लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी ' ???
नसेल येत तर हे शेवटच कडव तरी लक्षात ठेवा-
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरीच हाल सोसते मराठी !
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी !!
पक्का मराठी, अट्टल पुणेरी
सुजय
14 Nov 2009 - 12:44 am | बिपिन कार्यकर्ते
एका टुकार धाग्यावर पुनेरीभौ आणि पराची जोरदार बॅटिंग!!!!!!! जियो मेरे शेर जियो!!!!
विजुभौंचे प्रतिसाद पण जोरदार.
बिपिन कार्यकर्ते
15 Nov 2009 - 8:04 am | यन्ना _रास्कला
ती बोली सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपल्याला लाज वाटते का?
खराच सान्ग्तो. मार्केटामधे, बशीमधे आमच्या बोलन्याला लोक हासतात. (आमी आम्ची बोली घरीच बोल्तो.) येवढ्च नाय त इथ मिसल्पावावर आदितिबाय, आबिज्ञ, टारजन आनी इतर व्हायट कॉलर्वाली लोक त माझ्या मराठी लिहिन्याला पन हासतात :( लई दुख्ख होत पाहा. आत्ता नाय आम्ही त्यांच्यावानी झकपक स्कुलामधे शिक्लो. नाय आमच्या पॅरेन्ट्स पर्वड्ल. त्यात आम्ची काय चुक.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.
15 Nov 2009 - 7:42 pm | घाशीराम कोतवाल १.२
१) आपल्याला ५ मराठी लेखकांची नावे माहित आहेत का?
पु ल देशपांडे
व पु काळे
शिवाजी सावंत
बाबासाहेब पुरंदरे
रत्नाकर मतकरी
२) ५ मराठी कविता तोंडपाठ आहेत का?
होय
नाव सांगु की रेकॉर्डींग देउ बोला
३) आपली मुले मराठी माध्यमात शिकतात का? (जर ती इंग्रजी माध्यमात शिकत असतील तर त्यांना शाळेत दाखल करताना हा तुमचा मराठी बाणा हिमनिद्रेत होता का?)
अजुन मुल झाली नाहीत झल्यावर मराठी शाळेत अॅडमिशन नक्कि
४) आपण रोज रेडियोवर एफ एमचे / अस्मिता वाहिनीचे मराठी कार्यक्रम ऐकता का?
नाही आम्ही मराठी बातम्याचे २४ तास स्टार माझा आयबीन लोकमत पाहतो रेडिओ नाहि एकत
५) आपल्याला एखादी मराठी बोली येते का? उदा. वर्हाडी, मालवणी.
येते
६) ती बोली सार्वजनिक ठिकाणी बोलताना आपल्याला लाज वाटते का?
नाहि ब्या
७) किमान ५ मराठी म्हणी व ५ मराठी वाक्प्रचार तोंडपाठ आहेत का? ते बोलताना अचुक वापरता येतात का?
हो
उदा घेण ना देन उगाच कदिंल लावुन येण
खाईल त्याला खव खवे
८) आपण दिवाळीत "दिवाळी अंक" विकत घेण्याची अस्सल मराठी परंपरा न चुकता जोपासता का?
हो
आवाज ,महाराष्ट्र टाईम्स, सामना ,मार्मिक
९) जय जय महाराष्ट्र माझा किंवा मराठी असे आमुची मायबोली किंवा सुरेश दादांचे मराठी गीत "लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" तोंडपाठ येते का?
येत हो
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
16 Nov 2009 - 11:40 am | jaypal
आधी केले मग सांगीतले
म्हणुन विजुभौ आणि प.रा. तुम्हाला सलाम.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/