गाभा:
मनसेने एकट्या पुण्यात तीसेक बसेस फोडल्या. मिपाकर वेदश्री ह्यांच्या सारख्या मराठी लोकांना दिवसभराच्या कष्टांनंतर अंधारात उपाशी झोपण्याची वेळ आली. विधानसभेत झाले ते झाले त्यावर चर्चा नको पण त्यापायी सामान्य माणसांना वेठीस धरल्याबद्दल मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी लोकांची माफी मागून मालमत्तेचे झालेले नुकसान पार्टीफंडातून भरून द्यावे असे आपल्याला वाटते का?
अबू वाईट त्याची माणसे वाईट हे सगळे कबूल आहे. पण मग "चांगल्या" लोकांनी कसे वागावे ह्याविषयी चर्चा अपेक्षीत आहे.
प्रतिक्रिया
11 Nov 2009 - 12:34 am | शेखर
खटासी खट .. नटखटासी नटखट...
11 Nov 2009 - 12:35 am | निमीत्त मात्र
सामान्य लोक खट आहेत की नटखट? नक्की काय सुचवायचे आहे ह्यातुन?
11 Nov 2009 - 12:38 am | शेखर
सामान्य लोक लोक चांगलेच असतात.. पण दुसरा वाईट वागत असेल तर त्याला तसे वागण्यास मोकळीक द्यावी का?
11 Nov 2009 - 12:40 am | निमीत्त मात्र
विधानसभेत झाले ते झाले त्यावर चर्चा नको पण त्यापायी सामान्य माणसांना वेठीस धरल्याबद्दल मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी लोकांची माफी मागून मालमत्तेचे झालेले नुकसान पार्टीफंडातून भरून द्यावे असे आपल्याला वाटते का?
11 Nov 2009 - 12:42 am | शेखर
अजिबात नाही...
11 Nov 2009 - 12:46 am | भडकमकर मास्तर
होय.. मला वाटते.
पार्टीफंडातून पैसे द्यावेत...
किंवा सरकारने वसूल करावेत.
काल कोथरुडात लहान मुलांच्या बसेसवरही दगडफेक केल्याचे वाचले.
( नाशकात गेल्या वर्षी असाच एक माणूस मनसेच्या दगडफेकीत स्वर्गवसी झाला, त्यावर चालायचंच, असं होतंच असं नेतेमंडळी म्हणाली होती...)
11 Nov 2009 - 11:52 am | विशाल कुलकर्णी
प्रकाटाआ
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
11 Nov 2009 - 11:49 am | विशाल कुलकर्णी
विधानसभेत जे झाले त्याला एकटी मनसेच जबाबदार आहे का?
केवळ फलक धरुन उभ्या असलेल्या शिंदेंना आधी धक्काबुक्की कुणी केली. चॅनेल्सच्या फुटेजवरुन ती अबुने सुरू केल्याचे स्पष्ट दिसते आहे.
मराठीत शपथ घ्या म्हणुन सांगणार्या मनसेच्या आमदारांनी अबुने चप्पल दाखवल्याचेही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते आहे. मग एकटीच मनसेच कशी जबाबदार ठरते?
बरे चला एकवेळ मान्य करु की मनसेचे चुकलेच. पण असे काही होणार याची कल्पना गेल्या काही दिवसातील घडामोडींवरुन काँ तसेच अबु या दोघांनाही होती. अशावेळी काल जन्माला आलेल्या मनसेपेक्षा थोडा वैचारिक प्रगल्भपणा दाखवुन अनुभवी अबुने चार ओळी मराठीत म्हटल्या असत्या तर त्याचे काय मोठे बिघडणार होते?
हे असे होणार हे माहीत असुनही सरकारने त्याला अटकाव करायची काहीही सिद्धता केली नव्हती. याचा अर्थ सरकार हे असे काही व्हावे आणि मनसेला अडकावता यावे याची वाटच पाहात होते असा होतो का?
मग असे असेल तर नुकसान भरपायी एकट्या मनसेनेच का द्यावी? अबु आणि काँ सरकारही तेवढेच जबाबदार आहेत या घटनेला. अबू च्या माणसांनी भिवंडी, मुंब्रा इथे जे राडे केले त्याबद्दल काय म्हणणार आहात तुम्ही? त्याची नुकसानभरपायी कोण देणार? हा तमाशा अबूच्या मुजोरी मुळेच झाला ना? मग त्याच्याकडे मागा की नुकसान भरपायी?
राहता राहीला माफी मागण्याचा तर त्याची तयारी मनसेने दाखवली आहे. पन अबुची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. संबंधित बातमी
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
11 Nov 2009 - 1:23 am | वेदश्री
मला राजकारणाचा बिल्कुल गंध नाही आणि त्यात रस तर बिल्कुलच नाही त्यामुळे कोणी माफी मागावी आणि किती दंड द्यावा वगैरेबद्दल मी काहीच बोलू शकत/इच्छित नाही. माझी किमान अपेक्षा ही आहे की इथून पुढेतरी सुधरा.. तेवढे झाले तरी बख्खळ झाले म्हणेन मी!
11 Nov 2009 - 1:27 am | रेवती
अबूच्या वागण्याची शिक्षा त्याला दिल्यानंतर पुन्हा बाहेर असले दंगे करायचं काय कारण? मनसे किंवा कुणाचाच तो अधिकार नाही. राज ठाकरे यांच्या आदेशावर हे सगळे थांबले पाहिजे (होते). आपल्या कार्यकर्त्यांकडून (मिपाचे सदस्य नव्हेत) भावनेच्या भरात झालेल्या कृत्याची जबाबदारी नेत्याने घेतली पाहिजे. खर्चाचा आकडा समजला म्हणजे पुढच्यावेळी असलं काहि करण्याआधी विचार करायची बुद्धी होइल. वेदश्री आणि अनेकांवर आलेल्या विचित्र प्रसंगाचे वाईट वाटते. मनसेच्या कृत्याची शिक्षा त्यांना झाली असे वाटते.:(
रेवती
11 Nov 2009 - 12:54 pm | यशोधरा
रेवतीशी सहमत. हे प्रकार केले नसते, त्याऐवजी जरा हुशारीने वागून जनमत अधिकाधिक आपल्या पारड्यात कसे आणता येईल ह्याचा विचार मनसेच्या कार्यकर्त्यांनी करायला हवा होता असे वाटते. मनसेला अश्या कृत्यांमुळे जनमानसात मारच खावा लागेल, आणि पर्यायाने त्यांचे नुकसानच होईल, हे कोणा संबंधितांच्या लक्षात येऊ नये ह्याचेच वाईट वाटते.
11 Nov 2009 - 11:02 pm | संदीप चित्रे
अबु आणि मनसे -- दोघांनी विधानसभेत केले तेवढे तमाशे पुरे नव्हते का? दगडफेक करून नक्की काय साधलं ? अशा दगडफेकीने वगैरे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून म्हणजे पर्यायाने स्वत:चेच नुकसान करून घेत आहोत ही अतिशय साधी गोष्ट कळत नाही का?
11 Nov 2009 - 1:41 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री मात्र, हा चर्चाप्रस्ताव हास्यास्पद आहे. मराठी माणसाच्या कल्याणाचे काम करतांना सामान्य माणसाचे थोडेफार हाल झाले आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले तर एवढे बिथरण्याचे कारण काय? असल्या क्षुल्लक तक्रारींमुळेच मराठी माणुस मागे राहीला आहे. श्री राज ठाकरे यांचा विजय असो.
11 Nov 2009 - 1:48 am | शाहरुख
जर मुंबईत मराठी बोलली जाणार असेल तर त्यासाठी आम्ही राज्यभरातील बसेस फोडून घ्यायला तयार आहोत :-D
मी मराठी झी मराठी !!
11 Nov 2009 - 2:05 am | अनामिक
मराठी माणसाच्या कल्याणाचे काम करतांना सामान्य माणसांचे हाल/नुकसान होणे आणि करणे यात खूप फरक असतो, नाही का? सामान्य माणसाचे हाल्/नुकसान टाळता येऊ शकले असते असे वाटते.
-अनामिक
11 Nov 2009 - 2:10 am | अक्षय पुर्णपात्रे
सामान्य माणसाचे हाल टाळून कसे चालेल? त्यालाच तर जागे करण्यासाठी सर्व उठाठेव चालली आहे ना? सगळे कसे पेटलेच पाहीजे. मग ते मिपासारखे संकेतस्थळ का असेना. तात्यांचा हा धागा तुम्ही वाचला नाही का?
11 Nov 2009 - 6:34 am | सुनील
ह्याला बुश-चेनी मंडळींनी एक गोंडस शब्द शोधून काढला होता - कोलॅटरल डॅमेज!!
तेव्हा मराठीसाठी एवढं सहन कराच!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
11 Nov 2009 - 10:19 am | विजुभाऊ
हे नुकसान अमरसिंग आणि लालु यादव पासवान व इतर यू पी बीहार च्या सरकारांकडून वसूल करावे. त्यांच्या नाकर्तेपणाचा फटका महाराष्ट्राला बसतो.
आणि आपल्या लोकानी इथल्या स्थानीकांच्या हक्कांच्या बाबतीत संपूर्ण राष्ट्राचा विचार करून काहीही न बोलता षंढपणे बसून रहावे असे सर्व लोक म्हणतात.
मराठीत बोला म्हंटले की आम्ही संकुचित आणि तमीळ /कन्नडी /बंगाली बोला म्हंटले की ते भाषा प्रेम.
GO ( हे जीओ असे वाचावे) जीओ .
11 Nov 2009 - 10:43 am | पाषाणभेद
याला म्हनत्यात चांगल उत्तर.
आव लढाई जर आपल्या हद्दीत व्हवू लागली आन दोन चार बाँब आपल्याच गावात पल्डे तर लूसकान कोनाचं व्हईल? आपलच ना? आन ती लढाई जितली तर आनंद कोन्हाला व्हईल आपल्यालाच ना? मंग नाचू ढिंगच्यांग ढिच्यांगवानी.
आन काय ओ, ठाकरे सायबांनी सागेले का की जा आन गाड्या फोडा त्ये? आँ?
तुमच्या अबू च्या मानसांनी भिवंडी, मालेगाव, मुंब्रा ला काय राडे केले ते गेले कुठं. हा तमाशा अबू मुळे झाला ना? मंग धरा ना त्याला.
म्या बगतूया, मराठीला आधारा द्येन्याऐवजी आसले विचार करूनशान तुमी लोकं ज्ये मराठीला आधार देवूं र्हायलेय ना त्यांचा अपमान करुं र्हायलेत.
विजूभौ, तुम तो GO ( हे जीओ असे वाचावे).
जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
11 Nov 2009 - 10:26 am | चिरोटा
राडा कधी आणि किती प्रमाणात करायचा हे राजकिय पक्षांचे पुढारी आधी ठरवतात आणि मग 'धडाडीच्या' कार्यकर्त्यांना तसा आदेश देतात.ह्या नुकसानीचे स्पष्टीकरण विचारले तर कदाचीत शिवसेनेने नुकसान पुर्वी केले त्यावेळी तुम्ही काय करत होतात? असा प्रश्न मनसे विचारेल्.
भेंडी
P = NP
12 Nov 2009 - 2:49 am | रेवती
म्हणजे काय.......तर नुकसान होणे महत्वाचे. आधी एकाने केले म्हणून आता दुसर्याने. ते सक्तीने सोसायची वेळ आली की बघूया काय होतय. अर्थात तशी वेळ येणार नाही हे दिसतच आहे. जे काय करायचं ते जनतेच्या पैश्यावर्.....स्वतःच्या घरातला एक बाऊल फुटलेला चालणार नाही मेल्यांना!
रेवती
12 Nov 2009 - 3:03 am | निमीत्त मात्र
रेवती काकू,
हा प्रतिसाद वाचावा.
आणि पाहा आणखी काही मुक्ताफळं..
किती गुणी बाळं हो हे हुल्लडबाज म्हणजे! सामान्य माणसाची किती पर्वा आहे पाहा त्यांना.. तुम्ही आम्ही उगीचच नावे ठेवतो ह्या पुंडांना, सॉरी धडाडीच्या कार्यकर्त्यांना..
12 Nov 2009 - 3:38 am | रेवती
खरच!
मी उगीच नावं ठेवत होते धडाडीच्या कार्यकर्त्यांना......बिच्चारे!
रेवती
12 Nov 2009 - 7:33 am | छोटा डॉन
प्रकाटाआ.
बाकी चालु द्यात... ;)
12 Nov 2009 - 8:35 am | llपुण्याचे पेशवेll
+१. डाणरावांशी डिफाल्ट सहमत.
प्रकाटाआ.
बाकी चालूद्यात.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
12 Nov 2009 - 8:35 am | llपुण्याचे पेशवेll
+१. डाणरावांशी डिफाल्ट सहमत.
प्रकाटाआ.
बाकी चालूद्यात.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
12 Nov 2009 - 3:01 pm | धमाल मुलगा
;)
आपल्या समाजात असा मोठा निष्क्रीय वर्ग आहे अन तो स्वतःला बुद्धीवादी समजुन इतराना निष्क्रीय बनवतो, कळत न कळत. ते पाप मी पण पुर्वी केलंय. अश्या निष्क्रीयतेपेक्षा कुणी चुकीच्या मार्गानं का होईना सक्रीय राहत असेल तर ते अधिक स्वीकारार्ह वाटतं मला. (सौजन्यःआमचे जीवलग पत्रकार मित्र.)
-पक्का राडेबाज
ध.
12 Nov 2009 - 4:17 pm | सूहास (not verified)
मनसेने एकट्या पुण्यात तीसेक बसेस फोडल्या.>>>
चुकीची माहीती ....३० एकट्या खडकवासल्यात ...एकुन ४४ बसेस ... ड्रायव्हर समोरच्या काचा फुटलेल्या बसेस खर्च ५००/-रु पर हेड....१४ बसेस च्या पॅसेंजर बसतात त्या खर्च २००/- पर हेड ...एक बस येरवड्याच्या चौकात जाळली....जुन्या घाटणीची ..दोन महिन्यानी बंद करणार होते....खर्च १.५० लाख....हि बस तीन तास जळत होती...आणी ट्रॅफिक चालु होती...कुणीही दखल घेतली नाही...
..एकही मनुष्यहानी नाही.....पिएमटी च्या खाली मृत झालेल्यांची संख्या गेल्या दहा वर्षात ११३ ....९६ जण वय वर्षे ५० आणी वय वर्षे १८ च्या खाली....काल ह्या नुकसानीसाठी स्थायी समितीने नुकसान भरपाई साठी २६ लाख वसुल केले ...११३ जणांपैकी केवळ २ जणांना पीएमटी तर्फे आजवर नुकसान भरपाई दिली गेली आहे. ४० हजार दोघांना मिळुन . ही देखील फुलकरांची कृपा (कोण फुलकर माहीत आहेत का ? पुण्यातले एक सुप्रसिध्द वकील ..मागील वर्षी निधन झाले..)
चालक तीन महिने सस्पेंड आणी आता पेन्शनधारी....
मिपाकर वेदश्री ह्यांच्या सारख्या मराठी लोकांना दिवसभराच्या कष्टांनंतर अंधारात उपाशी झोपण्याची वेळ आली.>>>>
निमीत्त-मात्र , महाराष्टात गेली १५ वर्षे ३०% (शेतकरी आणी कष्टकरी) जनता दररोज रात्री उपाशी झोपते..त्याबद्दल आपण काहीही लिहिलेले आठवत नाही...त्याकरिता बर्याच वेळा शांततेच्या मार्गाने आंदोलने झालेली आहेत. आणी तरीही हिच परिस्थिती आहे...
उदा ...विनायक निम्हण ह्यांनी सपकाळांची ३ कोटीची जमीन परस्पर विकली म्हणुन सकपाळ जि.प. कार्यालयासमोर गेला दिड महिना उपोषणाला बसले आहेत......निम्हण निवडुन आले आणी सकपाळांच्या मुलाला साधी नोकरी ही नाही....
असो...राहता राहिली गोष्ट बाकी सामान्य माणसांची ..आंदोलन करणारे काय आकाशातुन पडलेत काय ? सामान्य माणुस हा विचार कधी करणार की...तो जे बटाटे घरात खातो आणी पाणी पितो त्याचादेखील राजकारणाशी थेट संबध असतो...
विधानसभेत झाले ते झाले त्यावर चर्चा नको पण त्यापायी सामान्य माणसांना वेठीस धरल्याबद्दल मनसे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी लोकांची माफी मागून मालमत्तेचे झालेले नुकसान पार्टीफंडातून भरून द्यावे असे आपल्याला वाटते का? >>>
जे मालमत्तेचे नुकसान झाले त्याच्या तुम्ही एक्झॅक्ट काउंट देउ शकाल ??बाकी विधानसभेत जे झाले त्याची चर्चा का नको ईथे ? जे झाल ते त्यामुळेच झाले ना !!! हा विचारवंत पाणचटपणा बंद करा आता एक साध उदाहरण देतो ...घरात आपल कोणी एकत नसेल तर आपण आदळ-आपट घरातच करतो...दगड घेउन शेजार्याच्या घरात मारायला जात नाही...आधी उद्रेक का झाला हे समजावुन घ्यायला हवा...
अबू वाईट त्याची माणसे वाईट हे सगळे कबूल आहे. पण मग "चांगल्या" लोकांनी कसे वागावे ह्याविषयी चर्चा अपेक्षीत आहे.>>>
धन्यवाद !! हिंदुपासुन बौध्द धर्मापर्यंत "जर ढेकुण आपल्याला चावत असेल तर त्याला मारुन टाकावे,त्याच्यासमोर उपोषणाला बसु नये " हे शिकविले जाते ..आहात कुठे...
काही खुलासे ::: १) बस तोडफोड खडकवासला परिसरात सुरु झाली...ती चालली साधारण ६.०० वाजेपर्यत ..प्रस्ताव दु , ४ वाजता मंजुर झाला ..त्या नंतर मेसेज आला की राडा करायचा नाही...तोवर ४४ बसेस फोडुन झालत्या ..
२ ) कोथरुड मधल्या लहान मुलांच्या बसेस वर दगडफेक झाली अशी अफवा उठली म्हणुन चौकशी केली....कळले की एक विद्या-निकेतन ची बस कर्वे रोडवर पंचर झालती...दुसर्या बसची सोय करण्यासाठी त्या चालकाने आगारात फोन लावला आणी दुसरी बस मागिवली ..त्या वेळेत बाकी बसेस फोडल्या आणी हि अफवा पसरली...
३ )तोड-फोडीचे तुरळक प्रकार झाले..आणी अबु आजमीचा पुतळा जाळणे वगैरै झाले...ते ही केवळ दोन तास . संध्याकाळी सर्वकाही सुरळीत होते...विश्वास नसेल तर कुठलाही रेस्टॉरंट चा त्या दिवशीचा संध्याकाळचा बिझनेस बघा.....
खर-तर मनसेला हवे असते तर ह्यापेक्षा मोठा ईश्श्यु करता आला असता ...पण केला नाही..कदाचित आपल्याला केवळ चार ओळींचा धागा काढता यावा म्हणुन...
(सखोल विचारी)
सू हा स...
12 Nov 2009 - 4:33 pm | llपुण्याचे पेशवेll
सुहाशा,
फोडलंस बघ. हे बादरायण संबंध जोडला म्हणणार्यानो लक्षात ठेवा. म्हटले तर सगळ्याच गोष्टी स्वतंत्र असतात आणि म्हटले तर सगळ्याच कुठेतरी एकमेकींवर अवलंबून असतात.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
12 Nov 2009 - 4:35 pm | धमाल मुलगा
हे आस्सं डेटा फेकायला पायजे तोंडावर...मी माहिती गोळाच करत होतो, तोवर तुझा हा प्रतिसाद आला.
सर्वात महत्वाचे:
अश्या अफवांची शहानिशा न करता सरळ दोषारोप ठेवणे तेही विचारवंताकडुन हे वैचारिकतेला कसं शोभतं कोण जाणे! हे नाही वाटतं समाजाच्या भावना भडकवणारं?
सहमत!
हिंजवडी/बोपोडी इथुन हापिसातुन घरी येणार्यांनी विचारणा केल्यावर 'काही नाही, नेहमीसारखं सरळ घरी पोचलो..कोणताही राडा-त्याचा त्रास झाला नाही' असं स्पष्ट सांगितलं.
असो,
उत्तम प्रतिसाद!
12 Nov 2009 - 4:48 pm | निखिल देशपांडे
ह्याचीच वाट बघत होतो...
बरे झाले सगळा डेटा दिलास ते....
आणि हो ते स्कुल बस प्रकरण पण निकालात निघाले तर शेवटी अफवाच ठरली तर.
असो आता कुठे कुठे बस न फोडता फक्त अबुचा पुतळा जाळुन निदर्शने झाली ते पण सांग बरे (हिंसा न करता)... विचारवंताच्या दृष्टीने कदाचीत तो योग्य मार्ग असेल... करदात्याला कदाचीत त्यामुळे जमावाची भीती वाटणार नाही. पण शेवटी ट्राफिक जाम होवुन घरी जायला उशीर झाला असणारच त्याचीच चिंता
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
12 Nov 2009 - 5:01 pm | समंजस
सूहाससाहेब!
ऐकीव माहितीवर आधारीत निषेध करणार्यांनी आणि अपुर्ण माहिती घेउन धागा काढणार्यांनी, कृपया आता स्वतः माहिती गोळा करून सत्य स्थिती समोर आणावी, अथवा सूहाससाहेबांची माहिती हीच खरी असे तरी मानावे.
(तो पर्यंत, मी तरी सूहाससाहेबांची माहिती खरी हेच मानणार)
सूहाससाहेब, शेतकर्यांच्या उपासमारीचं/आत्महत्त्येचं जाउ द्या. या राज्यात काय, आणि देशात काय, त्यांना माणूसच समजण्यात येत नाही. ते उपाशी राहीले काय/मेले काय, काही फरक नाही पडत.
12 Nov 2009 - 5:32 pm | विशाल कुलकर्णी
ये मारा पापडवालेको ! ;-)
धन्स सुहासदा ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
12 Nov 2009 - 6:12 pm | निमीत्त मात्र
पीएमटीखाली तसेही लोक मरतात, शेतकरी उपाशी झोपतच आहेत की म्हणून आम्ही केली थोडी दगडफेक आणि जाळपोळ तर तेच दिसते का तुम्हाला? असा युक्तिवाद असेल तर विषयच मिटला.
विशीष्ठ कंपूसोडून बाकीच्यांनी ह्यावर पाळलेले मौन बरेच सांगून गेले.
12 Nov 2009 - 6:26 pm | धमाल मुलगा
सद्यपरिस्थितीमध्येतरी तसेच दिसते आहे,कोण जाणे बाकीचे समविचारी इतर कामांमध्ये व्यग्र असु शकतील किंवा 'हे चार शिलेदार बोलताहेत, तेच पुरेसे आहेत' असा विचार करुन तुर्त शांतही असु शकतील....
परंतु दोषारोप करणार्या कंपुनेही वस्तुस्थिती सामोरी आल्यानंतर त्यांच्याबद्दल बोलण्याऐवजी खुष्कीचा मार्ग चोखंदळलेला पाहुन अंमळ मौज वाटली.
अवांतर: स्वतःच्या सोईची वाक्यं निवडुन त्यांचा मागचापुढचा संदर्भ तोडुन ती उचलुन त्यांचा अर्थ सोईप्रमाणॅ वळवण्याची ही पध्दत आवडली! हे करताना सोईस्कररित्या दिलेल्या माहितीकडे डोळेझाक करणंही वादातीतच :)
-(पक्का राडेबाज) ध.
12 Nov 2009 - 6:31 pm | निमीत्त मात्र
जिंकलास.. हाण.. मस्तच.. सडेतोड असे चार प्रतिसाद ह्यावरही का आता?
चालू द्या... :)
12 Nov 2009 - 6:44 pm | धमाल मुलगा
>>जिंकलास..
जिंकणारच! आमच्या रक्तातच आहे ते!
>>हाण..
र्हाऊ द्या हो...सध्या नको! नंतर पाहु कधीतरी तब्येतीनं जमवु कार्यक्रम :D
>>मस्तच..
पुन्हाएकदा धन्यवाद!
>>सडेतोड असे चार प्रतिसाद ह्यावरही का आता?
कल्पना नाही बॉ! कदाचित मी एकटाच पुरे म्हणुन बाकीचे शिलेदार शांतही राहु शकतील...
>>चालू द्या...
धन्यवाद! आणी नाही म्हणलं तरी कुणाचा बा ला ऐकणार्यातले हौत काय आम्ही?
-(पक्का राडेबाज) कैवल्य देशमुख.
12 Nov 2009 - 7:01 pm | छोटा डॉन
प्रकाटाआ
( लै झालं की हो एवढं, अजुन कशाला लिहायचं ? ) ;)
------
(सुज्ञ राडेबाज)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
13 Nov 2009 - 1:29 am | पाषाणभेद
सुहासशी १००००% सहमत.
जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
12 Nov 2009 - 7:47 pm | सूहास (not verified)
निमीत्तमात्र , आपल्या भावना ? मला समजु शकल्या नाहीत ......
आपल्या कपुंबाजीच्या उत्तरादाखल ....
सहानुभुती घेण्यासाठी लेख लिहीणार्यासांठी केवळ "आम्ही आपलेच आहोत" हे दाखविण्यासाठी ,चार ओळींचे विचारप्रवर्तक? धागे काढणार्या केविलवाणे वैचारिक नपुसंकत्व मला आलेले नाही ....
सत्य परिस्थिती केवळ पेपर वाचुन समजत असती तर किती बरे झाले असते नाही
केवळ फालतुचे स्त्रि-दाक्षिण्य दाखविणार्या परदेशींना वैतागलेला
सू हा स...
12 Nov 2009 - 6:38 pm | प्रसन्न केसकर
आणी दुसरीकडं खोटी, चुकीची, अपुरी माहीती देतात अन त्यावरुन एकांगी लिहितात ते?
असो आपला तो बाब्या यालाच म्हणत असावेत बहुधा.
विचारवंत वगैरे नसलेला राडेबाज
पुणेरी
12 Nov 2009 - 10:56 pm | एक
मी कुठल्याच कंपूचा कधीच सभासद नव्हतो. पण मौन बाळगल्याचा वेगळाच अर्थ निघतो आहे म्हणून हा प्रतिसाद...
अबू ला झोडलं याचा मला तुफान आनंद झाला. बसेस फोडणं, दगडफेक या रिअॅक्शनस या आधीही बर्याच झाल्या आहेत त्याबद्द्ल याच धाग्यावर एवढी चिखलफेक का? (मला याचं कारण माहिती आहे.. पण ते इथे लिहिणं सयुक्तिक होणार नाही.) सुहास यांनी नुकताच नुकसानीचा डेटा दिलेला आहे तो खरा धरून चालला तर कुठलीच मनुष्यहानी दिसत नाही आहे.
मुळात एकांगी टीकेसाठी उघडलेल्या या धाग्यात प्रतिसाद टाकायची पण इच्छा नव्हती. पण हे लोक मौनाचा अर्थ "सहमती" असा सोयिस्करपणे लावायला लागले म्हणून हा प्रतिसाद.
बाकी, माझे आई वडील दिवसभर सदाशिवपेठेत फिरून रात्री बसने सिंहगडला निंवातपणे पोचले. कसलाच त्रास झाला नाही.. पाऊस तुफान होता आणि घरासमोरची २ झाडं पडल्यामुळे वीज नव्हती. (एक कौतूक अतिशय सिन्सिअरली. भरपावसात झाडं बाजुला करून ८ तासात वीज कर्मचार्यांनी पुरवठा चालू केला.) पण जेवून झोपू शकले.
(मुळात रात्री उपाशी झोपणं आणि मोबाईल च्या प्रकाशात डायरी लिहिण्म हे थोडं फिल्मी आणि अतिरंजीत वाटलं..पण असू दे.. ते माझं वैयक्तिक स्पष्टं मत आहे)
13 Nov 2009 - 12:16 am | निमीत्त मात्र
वा! ह्याला म्हणतात सेटिंग द बार!!
13 Nov 2009 - 4:27 pm | समंजस
धन्यवाद निमीत्त मात्र साहेब...विषय सपंवल्या बद्दल. एक शेवटचा म्हणून सविस्तर प्रतिसाद देत आहे. आशा आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळतील आणि मला माझ्या.
पीएमटीखाली तसेही लोक मरतात, शेतकरी उपाशी झोपतच आहेत की
म्हणून आम्ही केली थोडी दगडफेक आणि जाळपोळ तर तेच दिसते का
तुम्हाला? असा युक्तिवाद असेल तर विषयच मिटला.
असा युक्तिवाद निर्माण होतो तो का म्हणून? तर काही लोकांना फक्त दगडफेक/तोडफोड तेव्हढी दिसते आणि हे करणारे पक्ष/कार्यकर्ते तेव्हढे दिसतात (पुर्वी शिवसेना, आता मनसे). आणि पटकन मग त्यांच्यावर टिका करायला, त्यांना समाजकंटक ठरवायला सोपं जातं. मग त्यानी केलेलं सार्वजनीक मालमत्तेचं नुकसान पटकन डोळ्यात येतं. काहीजण अश्या संधीची वाटच बघत असतात(समाजाला अश्या दगडफेक/तोडफोड करण्यार्यांची भीती दाखवून आपल्या पोळीवर, सत्तेचं तुप घ्यायला उपयोगी पडतं :) ).
माझा स्वतः चा तरी सहभाग या चर्चेत फक्त एका विशीष्ट पक्षालाच समाजकंटक ठरवणे, सार्वजनीक मालमत्तेचं नुकसान करणारे असं ठरवणे या वृत्ती विरोधात होता.
दगडफेक/तोडफोड ह्यानी झालेली जखम/नुकसान, मालमत्तेच नुकसान हे सहज दिसतं आणि हे करणारे लोकं सुद्धा सहज दिसतात आणि अश्या लोकांना दोष देणे, टिका करणे सोप आहे. पण त्या पक्षांचं/लोकांचं काय जे असं काही वाईट करत नाही मात्र सत्तेत राहून, भष्ट्राचाररूपी कर्करोग समाजात पसरवतात. लाखो कुटुंबांच्या पिढ्यान पिढ्या कश्या पकारे गरीबीत राहतील, झोपडपट्टीत राहतील, कर्जबाजारी राहतील(काहींच्या पतपेढ्या/सहकारी बॅंक चालणे आवश्यक आहे), आत्महत्या करावी लागून कुटूंब उघड्यावर कसे पडतील हे बघायचं आणि मग अश्याना निवडणूकी च्या वेळेस ५००-१००० रुपये देउन त्यांची मतं विकत घ्यायची आणि ज्यांच्या बाबतीत असे शक्य नाही त्या मध्यम वर्गीयांना असल्या दगडफेक/तोडफोड करण्यार्यांची भिती दाखवायची आणि त्यांची मतं मिळवायची म्हणजे परत सत्तेत राहून आपण आणि आपल्या पुढील पिढ्या जास्तीत जास्त श्रीमंत कशा होतील हे बघायचं. अश्या लोकांकडे/पक्षांकडे, त्यांच्या अश्या कामगीरी कडे दुर्लक्ष का करायचं? असल्या गोष्टी चालवून का घ्यायच्या? अश्या वेळेस त्या गरीब, कर्जबाजारी, दोन वेळचं अन्न सुद्धा मिळायची मारामार असलेल्या भावंडांची काहीच काळजी का वाटत नाही? त्यावेळेस कर का म्हणून भरायचा हा प्रश्न पडत नाही? सत्तेत वर्षानूवर्षे असलेली ती चांगली(दगडफेक/तोडफोड न करणारी म्हणून)) लोकं जेव्हा फुकटच्या बंगल्यात राहतात, फुकटची वीज वापरतात, फुकटचं जेवण खातात, फुकटच्या एसी आलिशान गाड्यांमधे फिरतात, फुकटचे फोन वापरतात, फुकट चे परदेशी दौरे करतात(बिझीनेस क्लास मधे), फुकटचे भत्ते मिळवतात, सरकारी/सहकारी बँकेतून नातेवाईकांना कर्ज वाटतात, ते कर्ज बुडवली जातात, रिलीफ पॅकेज जाहीर केली जातात ह्या सगळ्यांकरींता लागणारा पैसा येतो कोठून? कोण देतं? त्यांच्या पक्ष निधीतून? पक्ष तिजोरीतून? की त्या चांगल्या लोकांच्या घरातून? हा पैसा येतो तो, माझ्या-तुमच्या सारख्यांनी भरलेल्या करा तून. अश्या वेळेस कर भरावा की नाही? हा प्रश्न कित्येकांना पडतो ?
ह्या राज्याच्या मेळघाट या आदिवासी बहूल भागात बालमृत्यूंच प्रमाण हे उर्वरीत देशापेक्षा खुप जास्त आहे. ह्याला कारण उपासमार. लहान मुलांची, मुल होण्यार्या आईंची. करा तून गोळा होणारा पैसा कोठे जातो ? तो इथे का खर्च होत नाही ?
अश्या वेळेस कर भरावा की नाही ? हा प्रश्न पडतो का ? (ह्या शिवाय ही बरीच उदाहरणे आहेत. हवी असतील तर देण्यात येतील).
हे सगळं लिहीण्याचा प्रपंच हाच की, काही लोकांचा असलेला वैचारीक दुटप्पीपणा. ह्या वर दिलेल्या घटना घडतांना निषेध करावसा वाटत नाही? धागा काढावा वाटत नाही ? असल्या गोष्टी करीता जबाबदार असलेल्या, लोकपयोगी कामे करण्याकरीता, समाजातील सर्वच घटकांचं आर्थिक, सामाजीक,शैक्षणीक सर्व प्रकारे भलं करणं याकरीता सुजाण मतदारांनी निवडून दिलेल्या, आणि हातात सत्ता दिलेल्या चांगल्या लोकांना हे न करताना बघून, इतर चांगल्या लोकांना विरोध करावासा वाटत नाही?? कर का भरावा हा प्रश्न पडत नाही?? जनतेच्या होण्यार्या पैशांची सरकारी उधळणूक/गैरवापर बघून नुकसान भरपाई मागावीशी वाटत नाही?? नसेल वाटत तर हा दुटप्पीपणा नाही तर काय?
ह्या असल्या दुटप्पीपणामुळेच नुकसान भरपाई मागणे, कर भरणे/न भरणे, कोणी कसं नाही वागावं हे मुद्दे एकाच पक्षा बाबत उभे राहतात.
मनसे नुकसान भरपाई करणार की नाही, ही काळजी करण्यार्यां साठी एक विशेष बातमी, मनसे ने ५७,००० रुपये मुम्बई विद्यापिठा ला नुकसान भरपाई म्हणून दिलेत. हि नुकसान भरपाई जानेवारीत केलेल्या तोडफोडी बद्दल होती.
निमीत्त साहेब, एखाद्या व्यक्ती चा संदर्भ देण्या आधी, त्या व्यक्ती कडून थोडीफार शहानिशा करून घ्यावी. वीज जाउन काळोख होणे ही समजण्या सारखी गोष्ट आहे मात्र बसवर झालेल्या दगडफेकी मुळे, एखाद्या भागातील वीज कशी काय जाउ शकते हे मला समजले नाही.
तुमच्या कडे जास्त माहीती असल्यास कृपया देण्यात यावी(माझ्या माहीती प्रमाणे, वीज कपातीमुळे/ट्रान्सफॉर्मर बिघाडा मुळे/वादळ/जोरदार पावसामुळे ई.ई. कारणामुळे वीज जाते)
तसेच आणखी एक शंका आहे, वीज नसल्यामुळे/काळोख असल्यामुळे, उपाशी का राहावं लागतं ?? सामान्य लोकांकडे एलपीजी / केरोसीन वर चालणारे स्टोव असतात. माझ्या घरी आहे, माझ्या शेजार्यांकडे सुद्धा आहे. वीज गेल्यावर आम्ही मेणबत्ती पेटवून नाहीतर छोटासा ईमरजन्सी लाईट वापरून, जेवण तयार करतो आणि जेवतो. माझे शेजारी सुद्धा असंच करतात. माझ्या गावाला, आई सुद्धा असंच करते(वीज कपात-४ तास. पहा कर भरून सुद्धा ही परीस्थीती :? ). पुण्यात हे का शक्य नाही???
आणखी एक शेवटचा प्रश्न, चांगल्या लोकांनी कसे वागावे या बद्दल तुमच्या कडून एकही सल्ला/उदाहरण आतापर्यंत आलेलं नाही. तुमच्या कडे मी तशी विनंती केली होती या आधीच्या प्रतिसादात. उत्तराची वाट बघतोय.
12 Nov 2009 - 11:00 pm | टुकुल
सुहास, जबरदस्त आणी मुद्देसुद प्रतिसाद..
तोडलस दोस्ता !!
अवांतरः आता म्हणा कि मि पण कंपुत आहे म्हणुन सहमत आहे
--टुकुल
12 Nov 2009 - 11:58 pm | शाहरुख
श्री सुहास, उत्सुकतेपोटी विचारतोय, राडा सुरू करण्याबद्दल ही मेसेज आला होता काय ?
13 Nov 2009 - 3:21 pm | सूहास (not verified)
श्री सुहास, उत्सुकतेपोटी विचारतोय, राडा सुरू करण्याबद्दल ही मेसेज आला होता काय ? >>>
असा मेसेज कसा येईल मालक ?? जे काही होते ते बर्याच वेळा उस्फुर्तपणे होते ...पण लिहीन कधीतरी सविस्तर..
सू हा स...
13 Nov 2009 - 4:12 pm | प्रसन्न केसकर
मला वाटते की तुम्ही राजकीय पक्ष, कार्यकर्ते, त्यांची कार्यपद्धती यावर जरा अधिक माहिती घ्यावी.
असे एसएमएस कधीच जात नसतात. अन इथ तर एसएमएस कुणाला करायचे हाच प्रश्न होता. कारण इथं पक्षाचं अस्तित्वच तुरळक आहे. जेव्हा लोकांना (विषेशतः तरुणांना) कळलं की त्यांच्या आमदाराला तब्बल चार वर्ष निलंबित केलंय, विधानसभेत चार वर्ष त्यांचा प्रतिनिधी नसणार आहे तेव्हा निदर्शनं सुरु झाली. त्यासाठी पक्षाच्या आदेशाची गरजच नव्हती.
खडकवासला परिसरातली निदर्शनं सगळी मिळुन चालली जेमतेम अर्धा तास. तोवर इतर ठिकाणी निदर्शनं सुरु झाली होती. उद्या बंद होईल का अशी चर्चा पण सुरु झाली होती अन त्यात हळूहळू पक्षाशी संबंधित लोक सामील होत होते. हे सुरु झाल्यावर पक्षानं त्याच्या कार्यकर्त्यांना सांगीतलं की तुम्ही रस्त्यावर कोणतेही आंदोलन, बंद वगैरे करु नका.
13 Nov 2009 - 11:32 pm | शाहरुख
श्री पुनेरी, राजकीय पक्ष आणि त्यांची कार्यपद्धती याबद्दल मला शुन्य माहिती आहे हे मी कबुल करतो आणि माहिती करुन घेण्यासाठीच प्रश्न विचारला होता.
जर 'राडा थांबवा' असा मेसेज गेला असेल (मेसेज म्हणजे एसएमएस च नाही), तर त्याच पद्धतीने 'राडा चालू करा' असा मेसेजही पाठवता येणे का बरे शक्य नाही ?
आपण आणि सुहासने सांगितल्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्यानेच त्यांनी दगडफेक केली यावर मी विश्वास ठेवतो.
11 Nov 2009 - 10:53 am | समंजस
छान प्रस्ताव मांडला आहे. मात्र ह्या भांडणात नेहमी प्रमाणे दोन गट आहेत. मनसे आणि सपा. नुकसान भरपाई ची अपेक्षा फक्त मनसे कडुनच का?? मनसेशी राजकीय वैर आहे म्हणून?? की आणखी इतर काही कारण??
12 Nov 2009 - 3:08 am | निमीत्त मात्र
धन्यवाद!
अबू वाईट त्याची माणसे वाईट हे सगळे कबूल आहे. पण मग "चांगल्या" लोकांनी कसे वागावे ह्याविषयी चर्चा अपेक्षीत आहे.
12 Nov 2009 - 10:24 am | विशाल कुलकर्णी
अबू वाईट त्याची माणसे वाईट हे सगळे कबूल आहे. पण मग "चांगल्या" लोकांनी कसे वागावे ह्याविषयी चर्चा अपेक्षीत आहे.>>>
इथे मुड चर्चेचा कमी एखाद्याला शिक्षा करण्याचा जास्त वाटतोय. बरं असं म्हणायचाय का? तो तर वाईटच आहे, त्याच्या कशाला नादी लागताय, त्याला घालायची ती काशी घालु द्या. ह्या चांगल्याने त्या वाईटपणाला जशास तसे प्रत्युत्तर दिलेय तर त्याबद्दल चांगल्याला मात्र शिक्षा व्हायलाच हवी. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
12 Nov 2009 - 10:44 am | निमीत्त मात्र
पुण्यात ३० बसेस फोडल्या.कोथरुडात लहान मुलांच्या बसेसवरही दगडफेक केल्याचे वाचले. हे अगदी जशास तसे प्रत्युत्तर आहे नाही? तसेही तुमचे आजवरचे प्रतिसाद बघता असल्या गोष्टींना तुमचे समर्थन असणे स्वाभाविकच आहे. चालू द्या..
12 Nov 2009 - 10:50 am | विशाल कुलकर्णी
३० बसेस?
पण त्या फ़ोडणारे फ़क्त मनसेचेच लोक होते याला काही पुरावा आहे. त्यात मनसेचे अधिकृत कार्यकर्ते किती होते. आणि वाहत्या गंगेत हात धुवुन घेणारे किती होते?
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
12 Nov 2009 - 11:53 am | समंजस
दगडफेक, जाळपोळ हे प्रकार चांगली लोकं करत नाही असं तुमचं म्हणणं आहे तर :?
मी तरी लहाणपणा(माझ्या) पासुन हे असेच प्रकार पाहत आलो आहे. सर्वच पक्षांना/लोकांना असले प्रकार करताना बघत आलोय. म्हणजे जसे की,
१.पुतळ्याची विटंबना झाली म्हणून, दगडफेक, जाळपोळ
२.एकाच पक्षातल्या, एका नेत्यानी दुसर्या नेत्यावर आरोप केल्यामुळे, दगडफेक, जाळपोळ.
३.विधानसभेचं/लोकसभेचं तिकीट नाही मिळालं म्हणून, दगडफेक, जाळपोळ
४.नेत्याला हत्येच्या आरोपाखाली अटक झाली म्हणून, दगडफेक, जाळपोळ.
५.नेत्याची हत्या झाली म्हणून, दगडफेक, जाळपोळ. आणि इतर.
अश्या प्रकारच्या घटना बघत आल्या मुळे मला वाटायचं की, फक्त हेच प्रकार योग्य आणि समाज मान्य आहेत विरोध/निषेध व्यक्त करण्याकरीता.
मात्र तुम्ही म्हणत आहात तर, असतील काही वेगळे आणि चांगले प्रकार विरोध/निषेध व्यक्त करण्याकरीता आणि काम करवून घेण्या करीता. मी तरी त्याबाबतीत अज्ञाणी आहे.
तरीही, आपण चर्चा प्रस्तावक म्हणून विनंती करू इच्छीतो की आपणांस माहित असण्यार्या काही चांगल्या क्रुती (विरोध/निषेध व्यक्त करून, तसेच मागणी मान्य करून घेण्याकरीता), चांगल्या लोकांकरीता सांगाव्यात.
12 Nov 2009 - 12:08 pm | विशाल कुलकर्णी
अगदी सहमत !
तसे असेल तर गेली चाळीस वर्षे बंगालमध्ये कम्युनिस्टांनी जे केलय ते नक्की कशात मोडतं?
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
11 Nov 2009 - 11:05 am | आशिष सुर्वे
इथे मला 'फास्ट अॅन्ड फ्युरीयस-टोकियो ड्रिफ्ट' चित्रपटातला एक संवाद उध्दॄत करावासा वाटतो..
There's an old saying -
''For want of a nail...the horseshoe was lost.
For want of a horseshoe, the steed was lost.
For want of a steed...the message was not delivered.
For want of an undelivered message.....the war was lost.''
मतितार्थ असा की कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात छोट्या छोट्या
घटनांपासून होते आणि असल्या छोट्या छोट्या घटना, छोट्या छोट्या गोष्टी, मोठ्या बदलांची नांदी असतात..
शिवरायांचे स्वराज्य मावळ्याच्या बलिदानांवर उभे राहिले होते हे विसरता कामा नये!
असो, तरीही,
ह्या घटनेचे समर्थन मी मुळीच करणार नाही.
-
कोकणी फणस
11 Nov 2009 - 10:30 pm | दिलीप वसंत सामंत
मराठी संतांनी पूर्वीच सांगितले आहे कसे वागावे ते.
"भले तरी देऊ कासेची लंगोटी || नाठाळाचे काठी हाणूं माथा ||"
" तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा"
का हो हे भरपाई वगैरे सारे मराठी माणसाच्या बाबतीतच का??? यापूर्वीच्या आंदोलनांचे काय ? यापुढे होणार्या आंदोलनांचे काय ?
12 Nov 2009 - 9:53 am | कुंदन
कधीपासुन?
12 Nov 2009 - 11:58 am | अवलिया
मनसेच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करता यावी म्हणुन स्पेशल सोडल्या होत्या.. सोलापुर डेपोमधुन!
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
12 Nov 2009 - 9:53 am | कुंदन
कधीपासुन?
12 Nov 2009 - 5:08 pm | प्रशु
सुहास ने जे स्पष्टीकरण दिले आहे ते पुरेसे बोलके आहे. स्वतः काहि करायचे नाहि आणी इतरांनी काहि केले कि म फालतु तत्व चिवडत बासायची हा. कालच्या लोकसत्त्तात पण टाकसाळ नामक कुणी तरी असलचं काहि तरी लिहिलं होतं
लहान मुलांच्या बस बद्द्ल काहिहि शहानिशा न करता सरळ मनसे वर आरोप केल्या बद्द्ल माफी मागा...
जय महाराष्ट्र....