डोकेफिरु सैनिकाचा धिंगाणा (शीर्षक संपादित)

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
6 Nov 2009 - 10:35 pm
गाभा: 

तथाकथित शांतताप्रेमी धर्माचा एक कट्टर अनुयायी कसे आत्ततायी कृत्य करता झाला आहे पहा.

अमेरिकेत टेक्सस प्रांतात फोर्ट हूड ह्या सैनिकी तळावर काम करणारा निदाल मलिक नामक एक ज्येष्ट मुस्लिम सैनिकी अधिकारी. काल कुठल्याशा कारणाने त्याचे टाळके सरकले आणि अल्ला हु अकबर च्या आरोळ्या ठोकत त्याने गोळीबार सुरु केला आणि डझनभर लोकांना ठार केले आणि कित्येकांना जखमी केले. अजून सगळ्या का आणि कसे ह्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. पण गंमत अशी की इथली तमाम बातम्या देणारी चॅनले ह्यात इस्लामचा कसा काहीच दोष नाही हे दाखवण्यात मग्न आहेत. कुणी त्या नराधमाची माहिती फारशी देत नाही. एक बातमी ओझरती कळली की ह्या प्राण्याला लवकरच इराक किंवा अफगाणिस्तानला पाठवणार होते आणि अन्य मुस्लिमांना मारायचे ह्या कल्पनेने तो बिथरला होता. सदर मुस्लिमाच्या शिक्षणाकरता अमेरिकन सैन्यदलाने पाच एक लाख डॉलर खर्च केले होते आणि त्या बदल्यात तो भरती झाला होता. थोडक्यात ह्या हलकटाला त्याचे पालनपोषण करणारे सैन्य, आपले सैनिक सहकारी ह्यापेक्षा परदेशी, अनोळखी पण धर्माने मुस्लिम लोक जास्त जवळचे वाटतात असे दिसते आहे. सुदैवाने किंवा दुर्दैवाने हा इसम जिवंत आहे. आता त्याला लवकर फाशी देतात का डोके ठिकाणावर नाही म्हणून सरकारी इतमामाने जिवंत ठेवतात ते बघायचे.
अमेरिकन सैन्यदल इतके ढिसाळ असेल असे वाटले नव्हते. असल्या नालायक माणसाला नोकरी देऊन आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घ्यायची काय गरज होती? सैनिकांच्या वागण्यावर, विचारांवर लक्ष ठेवत नाहीत का? म्हणजे ह्याच्या शिक्षणावर घालवलेले पैसे पाण्यात शिवाय मेलेल्या, जखमी सैनिकांची भरपाई, गुन्ह्याचा तपास ही विकतची डोकेदुखी आहेच.
असे काही भारतातही होणे अशक्य नाही. उलट अशा बातम्यांनी कुठल्या डोकेफिरूला स्फूर्ती मिळणेही अशक्य नाही.
एक विरोधाभास म्हणजे जेव्हा कुणी वर्णद्वेषी, ख्रिश्चन माणूस असा आततायीपणा करतो तेव्हा त्याची सगळी अंडीपिल्ली, कुंडली तमाम माध्यमे मोठ्या चवीने चघळतात. पण मुस्लिम धर्मीय अतिरेकी असले की ह्यांची दातखीळ बसलीच समजा.

प्रतिक्रिया

लबाड लांडगा's picture

6 Nov 2009 - 11:24 pm | लबाड लांडगा

अशा प्रकारचा धिंगाणा पूर्वी अमेरिकेत अनेकांनी घातला आहे. मलिक माथेफिरु आहे ,त्याला शिक्षा झालीच पाहिजे ह्यात दुमत नाही.माथी कुठच्याही कारणावरुन फिरतात. ह्याचे धर्मावरुन फिरले.बाकीच्या अमेरिकनांनी तलवारी काढून अमेरिकेतल्या मुसलमानांना कापत सुटावे अशी तुमची अपेक्षा आहे का?
भारत नाही आहे तो. काय बोलतात अनिवासी भारतिय आमचे?
विनम्र लांडगा

अक्षय पुर्णपात्रे's picture

6 Nov 2009 - 11:53 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री लांडगा यांच्याशी सहमत. अशा घटना नियमीतपणे घडतात. (आजच सकाळी घडलेले हे वाचा.) धर्माचा यात संबंध नसावा. एका माथेफिरु व्यक्तिच्या वर्तणुकीवरून सर्व समाजास दोषी धरणे चूक आहे.

पक्या's picture

7 Nov 2009 - 1:26 am | पक्या

खुनाच्या, गोळी घालून मारल्याच्या घटना भारतात , अमेरिकामेध्ये , जगात सर्वत्र घडतात. त्यावेळी खूनी 'जय हनुमान ' (किंवा इतर देवांची नावे ) किंवा जिझस असे म्हणून आपल्या कृत्यास सुरवात करीत असेल काय?
फोर्ट हुड ची घटना आणी इतर खूनाच्या , गोळीबाराच्या घटना वेगवेगळ्या आहेत.

अक्षय पुर्णपात्रे's picture

7 Nov 2009 - 1:40 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री पक्या, प्रेरणा वेगळ्या असू शकतील पण परिणाम एकच. एखाद्या धर्मातील पवित्र शब्दांचा वापर करून कोणी दुष्कृत्य करत असल्यास त्या धर्मास दोषी धरणे योग्य नाही इतकेच. ग्रॅहॅम स्टेन्स यांना जिवंत जाळण्यात आले याचा विसर पडू देऊ नका. माथेफिरु सर्व धर्मात सापडतात.

पक्या's picture

7 Nov 2009 - 1:55 am | पक्या

धर्म कोणताच वाईट नाही आणि मी कोणत्याही धर्माला दोषी म्हटलेले नाही. पण धर्माचा वापर करून धर्माच्या नावाखाली काही दुष्कृत्य केल्यास तो माणूस नक्कीच दोषी आहे.
मला फक्त एकच सांगायचे आहे की वर उल्लेख झालेल्या दोन्ही घटना (फोर्ट हूड आणी 'हे वाचा ' मधील) वेगवेगळ्या आहेत. एका घटनेत ख्रिस्ती नाव आले म्हणून (माथेफिरू कोणत्याही धर्मात असतात हे दाखवण्यासाठी ) फोर्ट हूड च्या घटनेशी त्याचा संबंध लावू नये.

अक्षय पुर्णपात्रे's picture

7 Nov 2009 - 1:58 am | अक्षय पुर्णपात्रे

दोन्ही घटनांमध्ये अंदाधुंद गोळीबार करून निरपराध लोकांचा बळी गेला आहे, हे समान सूत्र दाखवणे हा उद्देश होता. दोन्ही घटना (फोर्ट हूड आणी 'हे वाचा ' मधील) धर्माच्या नावाखाली केल्या गेल्या असे म्ह्टल्याचे मला दिसले नाही.

पक्या's picture

7 Nov 2009 - 2:03 am | पक्या

>>दोन्ही घटनांमध्ये अंदाधुंद गोळीबार करून निरपराध लोकांचा बळी गेला आहे, हे समान सूत्र दाखवण हा उद्देश होता.

एवढाच उद्देश होता तर तो अनाठायी आहे .
अशी अजूनही काही समान सूत्रे ही घटना आणि इतर गोळीबाराच्या घटनांमध्ये सापडतील. म्हणून घटना समान ठरत नाहीत.

अक्षय पुर्णपात्रे's picture

7 Nov 2009 - 2:06 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री पक्या, आपल्या मताचा आदर आहे. मला या दोन घटनांमध्ये फारसा फरक जाणवत नाही (तपशील वेगळे असले तरीही.) आपण एकाच निष्कर्षावर येणे शक्य वाटत नाही. तेव्हा हा संवाद थांबवत आहे धन्यवाद.

हुप्प्या's picture

10 Nov 2009 - 6:15 am | हुप्प्या

ग्रॅहम स्टेन्सला मारणार्‍या दारासिंगचा सर्वत्र हिंदू अतिरेकी असाच उल्लेख होतो. त्याला त्याची शिक्षाही झाली आहे. कसाब वा अफझलसारखे भिजत घोंगडे पडलेले नाही. दुसरे असे की जगात कुठेही अतिरेकी घटना घडली तर आजच्या घटकेला कुणाविषयी प्रथम शंका येते? रा. स्व संघ? विश्व हिंदू परिषद? दलाई लामाचे अनुयायी? का रोमन कॅथोलिक? पारशी? का ज्यूइश लोक?
अर्थातच मुस्लिम अतिरेकी. आणि त्याला ठोस कारण आहे. गेल्या पन्नास वर्षात, थंड डोक्याने कारस्थान करून, असंख्य निष्पाप लोकांना ठार मारण्यात कुणाचा हातखंडा आहे? अर्थातच मुसलमान अतिरेक्यांचा.
हिंमत असेल तर हिशेब करुन बघा.
तेव्हा त्या धर्माला असल्या कृत्यांचे श्रेय दिलेच पाहिजे.
१४०० वर्षे जुन्या तत्त्वज्ञानात काडीचाही बदल करायचा नाही अशी भूमिका कोणता धर्म घेतो? केवळ मुस्लिम धर्म. बाकी सगळ्या धर्मात सुधारणा घडल्या आहेत. संघर्ष होऊन का होईना, सगळ्यांनी नव्या युगात जगण्याकरता कात टाकली आहे. फक्त हाच धर्म तसे करायला नकार देतो आहे. हे आपल्या लक्षात का येत नाही? का शहामृगाप्रमाणे वाळूत मान खुपसून शत्रू अस्तित्वात नाही असे मानण्यात आपल्याला धन्यता वाटते?

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Nov 2009 - 8:58 am | llपुण्याचे पेशवेll

१४०० वर्षे जुन्या तत्त्वज्ञानात काडीचाही बदल करायचा नाही अशी भूमिका कोणता धर्म घेतो? केवळ मुस्लिम धर्म. बाकी सगळ्या धर्मात सुधारणा घडल्या आहेत. संघर्ष होऊन का होईना, सगळ्यांनी नव्या युगात जगण्याकरता कात टाकली आहे. फक्त हाच धर्म तसे करायला नकार देतो आहे. हे आपल्या लक्षात का येत नाही? का शहामृगाप्रमाणे वाळूत मान खुपसून शत्रू अस्तित्वात नाही असे मानण्यात आपल्याला धन्यता वाटते?
१००० टक्के सहमत. इस्लाम शांती शिकवणारा धर्म आहे असली हास्यास्पद विधाने राजकारणी लोक करताना पाहून अंमळ मौज वाटते.

पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

arunjoshi123's picture

31 Aug 2013 - 4:39 pm | arunjoshi123

श्री अक्षय,
'सर्व समाजास दोषी धरणे' हा शब्दप्रयोग आपण का केला आहे? कोणी अमेरिकेतल्या (किंवा जगातल्या) सगळ्या मुसलमानांना सबब खटल्यात शिक्षा व्हावी अशी अपेक्षा केलेली दिसली का आपल्याला?

शिवाय दाळीत प्रथिने असतात म्हणणारास तांदळात देखिल प्रथिने असतातच कि म्हणणे औचित्यपूर्ण आहे का? हाच एकमेव आपले पुरोगामीत्व आणि धर्मनिरपेक्षत्व सिद्ध करण्याचा मार्ग आहे?

सामान्य मुस्लिमाला दुखवण्याची कुणाची इच्छा नसते (हे दरवेळी टाईप करून प्राण कंठाशी येतात.) परंतु दहशतवादाच्या इस्लामिक स्रोतास कसे हातावे हा वाजवी, मोठा , महत्त्वाचा प्रश्न आहे.

सायबा's picture

7 Nov 2009 - 7:38 am | सायबा

धर्म श्रेष्ठ कीं राष्ट्र या प्रश्नाला येणार्‍या responseवरून नागरिकाची परिक्षा होते.
२ किंवा ३ वर्षापूर्वी क्रिस्तियान अमनपूर या सीएनएनच्या पत्रकारबाईंनी "Killing in the name of God" या विषयावर एक मालिका बनविली होती त्यात मुस्लिम व ख्रिश्चन या दोनही धर्माची उदाहरणे होती.
असेही वाचले होते की जेरुसलेममध्ये उगम पावलेल्या तीनही धर्मात 'एकच देव' ही भुमीका असते (ज्यू, ख्रिस्चन व मुस्लिम). अशा धर्मात अशा भावना खोलात रुजल्या असतात असे conclusion होते.
२००० सालाच्या आसपास आणखी एका ठिकाणी अमेरिकेतील मुस्लिमांच्या मतचाचपणीत (poll) बहुसंख्य अमेरिकन मुस्लिम नागरिक (७० टक्के) धर्माला जास्त priority देतात असेही वाचले होते. पण त्याला दहा वर्षे झाली व conclusion नीट आठवत नाही.
याबद्दल इतर लोकांच्या वाचण्यात काही आले असेल तर लिहावे.
सायबा

हुप्प्या's picture

7 Nov 2009 - 7:54 am | हुप्प्या

१. अमेरिकेतील मुस्लिम संघटनांनी बळींना मोठ्या घसघशीत रकमेची मदत करावी. अगदी पदराला खार लावून.
२. आपल्या अनुयायांना जाहीरपणे आणि खाजगीतही जोरदार ताकीद द्यावी की असल्या धोक्याच्या घंटा वाजताना ऐकू आल्या तर संबंधित मुस्लिम बांधवाची माहिती तत्काळ पोलिस व अन्य अधिकारी संस्थेला द्या. मशिदीत वा अन्य जागी असला आगलाऊपणा करत असेल तर त्याला कडवा विरोध आणि योग्य त्या सरकारी यंत्रणेला त्याची माहिती द्या.
३. सर्वशक्ती एकवटून मोठ्या संख्येने (महंमदाचे कार्टुन काढल्याच्या निषेधात जेवढा मोठा मोर्चा निघाला तेवढा किंवा त्याहून मोठा!) ह्या घटनेचा निषेध करण्याकरता मोर्चा काढा. नुसता तोंडदेखला निषेध नाही. जर अमेरिका अशी वागली नसती तर असे घडलेच नसते अशा छापाची पुस्तीही नको.

अर्थातच ह्यातले काही घडणार नाही. पण मुस्लिम संघटना खरोखरच प्रामाणिक असतील तर असे काही तरी केलेच पाहिजे.

सुहास's picture

7 Nov 2009 - 5:15 am | सुहास

हा माणूस आर्मी सायकिएट्रिस्ट होता असे मी सक्काळी रेडिफ वर वाचले.. पण तो सायको होता का ते माहीत नाही...

थोडक्यात ह्या हलकटाला त्याचे पालनपोषण करणारे सैन्य, आपले सैनिक सहकारी ह्यापेक्षा परदेशी, अनोळखी पण धर्माने मुस्लिम लोक जास्त जवळचे वाटतात असे दिसते आहे.

आपण खूप लवकर निष्कर्ष काढायचा प्रयत्न करताय.. सामान्य अमेरिकनांचा इराक आणि अफगाणिस्थानातल्या कारवायांना सध्यातरी विरोध आहे.. इराक आणि अफगाणिस्थानातून परत येउन डिप्रेशनच्या शिकार झालेल्या सैनिकांच्या कथा मी ऐकलेल्या आहेत.. एक व्यावसायिक म्हणून त्याला या गोष्टी माहीतही असतील आणि त्यामुळे त्याला डिप्रेशन आले असेल... त्याने फक्त मूर्खपणाच केलाय, यात धर्मा-बिर्माचा काहीही संबंध नाही असे मला वाटते..

बाय द वे, कुणी तुम्हाला नोकरीसाठी काबूल किंवा कंदाहार किंवा बगदाद ला पाठवत असेल तर तुम्ही जाल काय? ;)

आता त्याला लवकर फाशी देतात का डोके ठिकाणावर नाही म्हणून सरकारी इतमामाने जिवंत ठेवतात ते बघायचे.

त्याचे कोर्ट मार्शल होईल...

हा विडिओ पहा..

http://www.youtube.com/watch?v=f4B5RTS9d8E

--सुहास

हुप्प्या's picture

7 Nov 2009 - 7:48 am | हुप्प्या

>>
आपण खूप लवकर निष्कर्ष काढायचा प्रयत्न करताय.. सामान्य अमेरिकनांचा इराक आणि अफगाणिस्थानातल्या कारवायांना सध्यातरी विरोध आहे.. इराक आणि अफगाणिस्थानातून परत येउन डिप्रेशनच्या शिकार झालेल्या सैनिकांच्या कथा मी ऐकलेल्या आहेत.
<<
हा इसम एक दिवस देखील युद्धावर गेला नव्हता. ह्याचा पेशा हा सायकियाट्रिकचा होता लढाऊ सैनिकाचा नाही. तेव्हा डिप्रेशन वगैरे दावे साफ फोल आहेत. ह्याला त्याच्या धर्माचा अनाठाई उमाळा होता आणि त्याकरता त्याने हे केले. धर्माचा संबंध आहे एवढेच नव्हे तर धर्म ही हे कृत्य करण्यामागची प्रेरणा आहे.

पक्या's picture

6 Nov 2009 - 11:54 pm | पक्या

निदाल मलिक हसन असे पूर्ण नाव आहे. अल्लाहू अकबर अशी आरोळी ठोकत त्याने फायरिंग सुरू केले .

अडाणि's picture

7 Nov 2009 - 12:51 am | अडाणि

ह्या घटनेतून माहित नाही पण तुमचा लेख वाचून बर्‍याच लोकांना स्फूर्ती मिळेल असे वाटते ....

अजून सगळ्या का आणि कसे ह्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत

असे असताना,

अल्ला हु अकबर च्या आरोळ्या ठोकत त्याने गोळीबार सुरु केला

अन्य मुस्लिमांना मारायचे ह्या कल्पनेने तो बिथरला होता

हि माहिती आपल्याला कुठे मिळाली? मि काल पासून हि बातमी फॉलो करतोय, मला कुठेही अशी माहिती मिळाली नाही....

बिबिसी वर दिलेली माहिती अशी आहे -
he had faced harassment over his "Middle Eastern ethnicity" and had been trying to leave the army. - अधीक

-
अफाट जगातील एक अडाणि.

पक्या's picture

7 Nov 2009 - 1:04 am | पक्या

>>अल्ला हु अकबर च्या आरोळ्या ठोकत त्याने गोळीबार सुरु केला - >>हि माहिती आपल्याला कुठे मिळाली?

येथे वाचा
http://news.yahoo.com/s/ap/20091106/ap_on_re_us/us_fort_hood_shooting

त्यात अशा ओळी आहेत - Soldiers reported that the gunman shouted "Allahu Akbar!" — an Arabic phrase for "God is great!" — before opening fire, said Lt. Gen. Robert Cone, the base commander. He said officials had not confirmed that Hasan made the comment.

अडाणि's picture

7 Nov 2009 - 1:44 am | अडाणि

A.P. चि बातमी असल्याने विश्वासार्ह वाटते आहे. एका प्रश्नाचा संदर्भ मिळाला आहे, दुसर्‍याची वाट बघतो आहे.

संदर्भ नसल्यास विनाकारण भडकावू विधान काढून टाकावे हि संपादकांना विनंती.
-
अफाट जगातील एक अडाणि.

http://news.yahoo.com/s/ap/20091106/ap_on_re_us/us_fort_hood_shooting
इथे वाचा.
हे वाक्य
A recent classmate said Hasan once gave a jarring presentation to students in which he argued the war on terrorism was a war against Islam

आणि हेही
http://www.foxnews.com/story/0,2933,572827,00.html
"He obviously didn’t want to go," said Duane Reasoner, 18, who looked up to Hasan as a sort of religious mentor. "He said he shouldn’t be going to Iraq, and Muslims shouldn’t be in the military — it was an obvious conflict of interest. Muslims shouldn’t be killing Muslims. He told me not to join the military."

हे सगळे सैन्यदळात भरती व्हायच्या आधी करायला हवे होते. सगळे फायदे उकळून झाल्यावर अशी उपरती होणे योग्य नाही.
आणि हे सगळे बाहेर आलेच पाहिजे. ह्यावर चर्चा झालीच पाहिजे. नाहीतर पुन्हा कधीतरी कुठेतरी अजून एक निदाल हसन मलिक असेच भयानक काहीतरी करायचा.

चित्रा's picture

7 Nov 2009 - 1:23 am | चित्रा

माणूस माथेफिरू झाला होता का त्याने समजून-उमजून वरील कृत्य केले याबद्दल तपास बहुदा केला जाईलच. पण एक-दोन प्रश्न पडले.

अमेरिकन सैन्यदल इतके ढिसाळ असेल असे वाटले नव्हते.
ढिसाळ म्हणजे काय? ज्यांना बंदुका धरण्याचे परवाने आहेत आणि जे लष्करी तळावरच आहेत त्यांच्यापैकी एकाने त्या बंदुकीचा वापर क्षणिक रागाच्या भरात सूड घेण्यासाठी किंवा समजा छुपा अतिरेकी असल्याने केला तर त्यात संपूर्ण अमेरिकन सैन्यदल ढिसाळ कसे काय ठरते?

असल्या नालायक माणसाला नोकरी देऊन आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घ्यायची काय गरज होती?

तो सुरूवातीपासून नोकरी देण्यास नालायक होता हे सिद्ध झालेले आहे का? त्याचा धर्म अमूक आहे म्हणून नोकरीसाठी तो नालायक ठरत नाही हे कृपया लक्षात घ्यावे. लोकशाही देशात सर्वांना धर्मनिरपेक्ष संधी उपलब्ध असाव्यात असे वाटत नाही का? त्यात एखाद्यावर केवळ तो एका धर्माचा आहे म्हणून संधी नाकारणे हे चुकीचे आहे.

बाकी ल. लां. म्हणतात,
"बाकीच्या अमेरिकनांनी तलवारी काढून अमेरिकेतल्या मुसलमानांना कापत सुटावे अशी तुमची अपेक्षा आहे का? भारत नाही आहे तो. "

हाही एक आरोपच झाला. २६ नोव्हेंबरनंतर सगळे भारतीय उठून कोणाच्या अंगावर तलवारी घेऊन कापत सुटल्याचे ऐकले नाही.

चतुरंग's picture

7 Nov 2009 - 1:25 am | चतुरंग

भावनेच्या भरात केलेली अशी टोकाची विधाने चर्चा घसरवतात.

चतुरंग

अक्षय पुर्णपात्रे's picture

7 Nov 2009 - 1:30 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री लांडगा यांच्या प्रतिसादाशी सहमत असल्याने चित्रातैंच्या प्रतिसादातील असहमतीच्या मुद्द्यावर मत मांडत आहे. त्यांच्या बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.

२६ नोव्हेंबरनंतर सगळे भारतीय उठून कोणाच्या अंगावर तलवारी घेऊन कापत सुटल्याचे ऐकले नाही.

२६ नोव्हेंबर मध्ये असे घडले नाही, हे भारतीय समाजाच्या प्रगल्भतेचे लक्षण आहे. (अर्थात तशी रास्त भिती व्यक्त होत होती.) परंतु गोध्रानंतर गुजरातेत जे घडले त्यानंतर 'भारतात असे घडू शकत नाही' या समजास तडा गेला. तेव्हा या आरोपात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही.

चित्रा's picture

7 Nov 2009 - 2:27 am | चित्रा

अमेरिकेत एक अशीच गोष्ट घडली आहे - त्यामुळे सर्व अमेरिकनांना ते कापत सुटतात असे म्हणणार का?

१९९२ च्या रॉडनी किंगला मारहाण केल्यानंतर झालेल्या दंगली - तात्कालिक कारण पुढीलप्रमाणे सांगितले गेले.

http://en.wikipedia.org/wiki/Los_Angeles_riots_of_1992

In addition to the immediate trigger of the Rodney King verdicts, a range of other factors were cited as reasons for the unrest. Specific anger over the sentence given to a Korean American shop-owner for the shooting and killing of Latasha Harlins, an African American girl, was pointed to as a potential reason for the riots, particularly for the African-American/Korean-American tensions witnessed during the disturbances. Publications such as Newsweek and Time suggested that the source of these racial antagonisms was derived from cultural differences, and from perceptions amongst blacks that Korean-American merchants were taking money out of their community and refusing to hire blacks to work in their shops. According to this view, these tensions were intensified when the Korean-American shop owner, Soon Ja Du, was sentenced to five years probation for the killing of Harlins

वरील ठिकाणी झालेल्या हानीचे प्रमाण खालीलप्रमाणे होते असे सांगण्यात येते.
By the time the police, the US Army, the Marines and the National Guard restored order, the casualties included 53 deaths, 2,383 injuries, more than 7,000 fires, damages to 3,100 businesses, and nearly $1 billion in financial losses.

http://en.wikipedia.org/wiki/Rodney_King

अक्षय पुर्णपात्रे's picture

7 Nov 2009 - 3:00 am | अक्षय पुर्णपात्रे

चित्रातै, श्री लांडगा यांनी 'सर्व भारतीय (एका समाजातील ) कापत सूटले' असे विधान केलेले नाही. त्यांच्या मताचा मला समजलेला मतितार्थ असा: भारतात एखाद्या क्रियेची प्रतिक्रिया म्हणून ज्या घटनांचे समर्थन केले जाऊ शकते अथवा तशी प्रतिक्रिया व्हावी म्हणून आवाहने केली जातात. (उदाहरण वर दिले आहे. तसेच इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीखांविरुद्ध दंगली. या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी बघ्याची भुमिका घेतली असे म्हणण्यास जागा आहे.) तसे अमेरिकेत घडू शकणार नाही. भारतात जमावास भडकावणे अमेरिकेच्या तुलनेत सोपे आहे, असे वाटले.

आपल्याला त्यांच्या विधानाचा कसा अर्थ जाणवला याची कल्पना नाही. पण आपल्या प्रतिसादावरून 'भारतात लोक रस्त्यावर येऊन सरसकट इतरांना कापत सुटतात' असे काहीसे असावे. श्री लांडगा यांना नेमके काय म्हणायचे आहे ते तेच स्पष्ट करू शकतील. पण आपण म्हणता तसा अर्थ त्यांना अभिप्रेत असल्यास आपल्या आक्षेपाशी मी सहमत आहे.

चित्रा's picture

7 Nov 2009 - 7:57 pm | चित्रा

ल. लां. यांनी असे जे म्हटले आहे ते त्यांना तसेच म्हणायचे आहे असे मलाही वाटत नाही.

हे काही लोकांच्या (कदाचित मॉब/जमावाच्या) बेताल वागणुकीचे सार्वत्रिकीकरण जाते आहे त्याला माझा विरोध आहे. पोलिसांनी काय करायला हवे त्याचे आदेश बहुदा सरकार काढते. इथे म्हटल्याप्रमाणे
http://books.google.com/books?id=TprnBctKCE4C&pg=PA105&lpg=PA105&dq=poli...
दंगली होण्याच्या सुरूवातीला पोलिसांनी फारसे काही नियंत्रण केलेले दिसत नाही. याचा अर्थ हे अमेरिकेत घडले, म्हणून भारतातही चालावे असा नाही. फक्त ते अमेरिका म्हणजे काही भारत नाही, या वाक्याला छेद देऊन जाते असे मला वाटते.

जरी दोन्ही देशांत भरपूर फरक असले तरी वरील गोष्ट एवढेच दाखवते की जेव्हा भावना भडकलेल्या असतात तेव्हा अशा कुठच्याही देशातील माणसांच्या जमावांचे वागणे हे जुन्या रागद्वेषांवरून "सूड घेण्यात" बदलू शकते. यासाठी जर काही हवे असले तर ते एरवीच्या वेळी अतिरेकी बोलणे किंवा वागणे टाळणे.

आणि तो अतिरेकीपणा दोन्ही बाजूंचे लोक करीत असतात, आमच्यासारखे दोन्ही बाजू घेऊ न शकणारे मात्र एकदा याचे, आणि एकदा त्याचे, असे टोले परतवत राहतात. असो.

दोन-तीन दंगलींच्या नावे सगळ्या भारताला कायमस्वरूपी वेठीला धरले जाऊ नये; मात्र अशा दंगली परत होऊ नयेत म्हणून लोकशिक्षण व्हावे, इ. इ. मला वाटते.

मनिष's picture

7 Nov 2009 - 10:57 pm | मनिष

आणि तो अतिरेकीपणा दोन्ही बाजूंचे लोक करीत असतात, आमच्यासारखे दोन्ही बाजू घेऊ न शकणारे मात्र एकदा याचे, आणि एकदा त्याचे, असे टोले परतवत राहतात. असो.

१०००००००००००००००००००००००००००००००००००००००००% सहमत!!! अगदी मनातले बोललात.

लबाड लांडगा's picture

7 Nov 2009 - 11:43 pm | लबाड लांडगा

दोन-तीन दंगलींच्या नावे सगळ्या भारताला कायमस्वरूपी वेठीला धरले जाऊ नये

भारतिय उपखंडाचा विचार केलात तर दंगली आपल्याला नव्या नाहीत चित्राताई. ह्यात धर्माचा संबंध नाही हे पुन्हा एकदा नमूद करतो. १९४७ पासुन बघा. फाळणीच्या वेळच्या दंगलीचा ईतिहास वाचलात तर अंगावर काटा येतो."त्यांनी" प्रेतांनी भरलेली ट्रेन पाठवणे.त्याला प्रत्युत्तर म्हणून इकडून तशीच ट्रेन पाठवणे.कलकत्त्यात ट्राम्सची तिकिटे महाग झाली की पेटवा गाड्या.कुठल्यातरी जातीला आरक्षण दिले की पेटवा परत गाड्या,सरकारी बसेस्.कुठल्यातरी पुतळ्याला कोणी भोंदु चपलांचा हार घालतो,दुकाने जाळा. कुठल्यातरी राजकिय नेत्याला अटक होते,जबरदस्तीने दुकाने बंद करा.कुठल्या तरी राजकिय नेत्याची हत्या होते-अमुक राज्य बंद्,लोकांना मारहाण्.दुसर्‍या राज्यातले लोक नोकरीला येतात्-कानाखाली आवाज काढा त्यांच्या.प्रत्येक ठिकाणी हिंसा आहे. बरोबर? अमेरिकेत अशा घटना घडतात का वारंवार? आपण बाहेर राहूनही भारताची बाजु घेता हे कौतुकास्पद आहे. पण एखादी गोष्ट वाईट असेल तर ते मान्य करायला काय हरकत आहे?भारतात अशा गोष्टींना राजकिय वरदहस्त असतो,बर्‍याचवेळा लोकांचा पाठींबा असतो हे मान्य आहे की नाही? अमेरिकेत ह्या गोष्टींना थारा दिला जात नाही.
एखादी गोष्ट चांगली असेल तर ती खुल्या दिलाने मान्य करावी. भारतातल्या लोकांच्या वाईट प्रवुत्तींवर टिका म्हणजे काही तुम्ही भारतविरोधी आहात असा अर्थ नाही होत.
लबाड लांडगा

Nile's picture

8 Nov 2009 - 10:32 am | Nile

आपला मुद्दा जरी बरोबर असला तरी यावर 'सामान्य लोक' ही कृत्ये करतात का? हा प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे. गोध्रा सारख्या घटनांव्यतीरिक्त इतर दंगेखोर(इथे नक्की काय हे अजुनतरी गुलदस्त्यात आहे) हे 'लोक' नसुन राजकीय भाडोत्री गुंड, ज्याला ते युवा कार्यकर्ते म्हणतात, असतात असे मला वाटते, अर्थात मी हे सिद्ध करु शकत नाही पण आजतागायत माझ्या ओळखीतला/ऐकण्यात एकही निरपेक्ष(मतदान सोडुन इतर वेळेस) मतदार म्हणता येईल असा तरुण अशी गुंडगीरी करेल असे वाटत नाही.

चित्रा's picture

9 Nov 2009 - 12:34 am | चित्रा

ह्याच बाबतीत सार्वत्रिकीकरण करू नये असे म्हणते.
काम नसलेल्या लोकांना असे गुंडगिरीसाठी गोळा करणे सोपे असावे.(भारतातही आणि अमेरिकेतही).

हुप्प्या's picture

7 Nov 2009 - 7:45 am | हुप्प्या

सर्वप्रथम संपादकांचे अभिनंदन, शीर्षक संपादित करून आपले "निधर्मी" नाणे खणखणीत वाजवून दाखवल्याबद्दल!
>>
ढिसाळ म्हणजे काय? ज्यांना बंदुका धरण्याचे परवाने आहेत आणि जे लष्करी तळावरच आहेत त्यांच्यापैकी एकाने त्या बंदुकीचा वापर क्षणिक रागाच्या भरात सूड घेण्यासाठी किंवा समजा छुपा अतिरेकी असल्याने केला तर त्यात संपूर्ण अमेरिकन सैन्यदल ढिसाळ कसे काय ठरते?
<<
हा इसम त्याच्या सहकारी व अन्य लोकांशी इराक युद्धाविरुद्ध मते मांडत असे. अमेरिकेने सुरु केलेली युद्धे ही इस्लामविरोधी आहेत असे तारे तोडले होते. हे सगळे मॉनिटर करता येत नाही का सैन्याला? नसले तर ते घातक आहे. इतक्या धोक्याच्या घंटा वाजून त्याच्या विरुद्ध कडक कारवाई का नाही केली गेली? सैन्याकडून शिक्षणाची सुविधा घेऊन सैन्याची सेवा करण्याच्या करारावर सही केल्यानंतर असले काही विरोधी बोलण्याचा ह्या नालायकाला अधिकार नव्हता. आणि तरीही तो तसे करत असेल तर त्याला कडक समज वा अन्य कारवाई करणे आवश्यक होते.

चित्रा's picture

7 Nov 2009 - 10:06 am | चित्रा

हे सगळे मॉनिटर करता येत नाही का सैन्याला? नसले तर ते घातक आहे.

अहो, साधे इथे काहींना संपादक असून सगळे समजत असूनही काही नेट(नत) द्रष्टांना 'मॉनिटर करणे' अवघड जाते तसेच हे समजा ना. ;)

कधी निरूपद्रवी तोंडाला येईल ते बोलणे आणि खरोखरचे अतिरेकी विचार यातील सीमारेषा पुसट असते, त्यामुळे कधी कायद्यांच्या भितीमुळे, अधिकारांच्या कमतरतेमुळे, कधी योग्य मार्गदर्शनाअभावी काही करता येत नाही, असेही सैन्यातील लोकांचे होत असावे.

(बाकी मी जर माझ्या ऑफिसच्या निर्णयाबद्दल मला तो पटत नाही, अमूक एका कारणासाठी पटत नाही, असे म्हटले, तर लगेच वरिष्ठांनी रेड फ्लॅग लावून माझ्यावर कॅमेरे बसवावे, जाता येता माझे बोलणे ध्वनीमुद्रित करावे असे केले तर मला काम करणे नकोसे होईल हो. अर्थात सैन्यात विरोधी बोलणे चालते, का करायचे नसते, हे मी सैनिक नसल्याने मला माहिती नाही. )

हुप्प्या's picture

10 Nov 2009 - 5:59 am | हुप्प्या

आपण मिसळपाववरील सदस्यांचे लेखन मॉनिटर करणे आणि सैन्यात भरती झालेल्या सैनिकाचे वागणे मॉनिटर करणे ह्याची तुलना करत असाल तर आपली कीव करावीशी वाटते.
सैन्यात एकदिलाने काम करणे हे इतके महत्त्वाचे असते की त्यात कुचराई झाल्यास जीवनमरणाचा फरक होऊ शकतो. फंदफितुरीचा फटका फौजेइतका दुसर्‍या कुठल्या व्यवसायात होत असेल असे वाटत नाही. अगदी डॉक्टर असला तरी तो वेळप्रसंगी युद्धात सामील व्हायला योग्य असावा लागतो.
अमेरिकेविरुद्ध सतत बोलणारा, अतिरेकाविरुद्ध पुकारलेले युद्ध म्हणजे इस्लामविरुद्ध युद्ध असे म्हणणारा असला इसम युद्धभूमीवर पाठवणे म्हणजे ढिसाळपणाचा एक नमुना आहे.
करदात्यांचा अमाप पैसा खर्च करून असल्या अवलादीला नोकरीला लावणे म्हणजे त्या पैशाचा अपमान आहे.
ऑफिसातले काम आणि सैनिकाचे काम ह्यात खूप फरक आहे हो. तुम्हाला खरेच कळत नाही का तुम्ही वेड पांघरून पेडगावला जात आहात? सैन्यात भरती होताना व्यक्तीस्वातंत्र्यावर खूप खूप बंधने घातली जातात. आणि ती सुरक्षितता, सैनिकांच्या हिताकरता ह्या कारणाकरताच. हे सगळे पटत नसल्यास सैन्यात भरती होऊ नये हे उत्तम. त्याच्या सगळ्या सवलती लाटून युद्धाला पाठवायची वेळ आल्यावर अल्लाहु अकबर म्हणून बेछूट गोळीबार करणे हा हलकटपणा आहे.

चित्रा's picture

10 Nov 2009 - 8:49 am | चित्रा

हरकत नाही माझी कीव केलीत म्हणून. माझी बुद्धी सध्या पेंडच खाते आहे, नाहीतरी.

करदात्यांचा अमाप पैसा खर्च करून असल्या अवलादीला नोकरीला लावणे म्हणजे त्या पैशाचा अपमान आहे.
ठीक. आधी मुळात नको त्या ठिकाणी युद्धे सुरू करणे यातच करदात्यांच्या पैशाचा अपमान झालेला आहे ते आपण सध्या बाजूला ठेवू.

मी आधीच सांगितले आहे, मी सैनिक नसल्याने नक्की कुठचे बोलणे हे योग्य आहे आणि सीमारेषेबाहेरचे आहे, (शिवाय त्याची शिक्षा काय असावी/असते) हे मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असल्यास (विशेषतः लष्करी कॉलेजमधून शिक्षण झाल्यास अशा लोकांना शिक्षण संपल्यावर लष्करी कामकाज मिळण्याआधी काही अटींची पूर्तता करावी लागते का, हे मला तरी माहिती नाही) जरूर सांगा.

मी परत एकदा सांगते - (हे माझ्या अनुभवावरून) एखाद्या बाबतीत नुसतेच विरोधी बोलणे आणि ती सीमारेषा ओलांडून पलिकडे जाणे ह्यातला फरक समजणे कठीण असते, समजला तरी नियंत्रण करणे कठीण असते. कायदे किचकट असतात. एखाद्या माणसाच्या वेडसरपणाची नुसती शंका आल्यावर त्या माणसाला प्रवेश बंद होत नाही, त्यासाठी इतर काही चिकित्सा लागतात.

डॉक्टराने मेडिकल कॉलेजमधील त्याचा निदालबरोबरचा अनुभव सांगितला आहे त्यावरून कळावे की तो असे काही करेल याची शंका त्याच्या टीकाकारांनाही सुरूवातीस आली नव्हती. -http://abclocal.go.com/kabc/story?section=news/local/los_angeles&id=7106859

Finnell said Hasan would become visibly upset when people challenged him about his beliefs, but no one ever thought he would resort to such violence.

"My reaction was first I was shocked. But then knowing the extreme beliefs that Maj. Hasan had, I was not surprised," said Finnell.

प्राध्यापक's picture

30 Aug 2013 - 7:53 pm | प्राध्यापक

एखाद्या बाबतीत नुसतेच विरोधी बोलणे आणि ती सीमारेषा ओलांडून पलिकडे जाणे ह्यातला फरक समजणे कठीण असते, समजला तरी नियंत्रण करणे कठीण असते. कायदे किचकट असतात. एखाद्या माणसाच्या वेडसरपणाची नुसती शंका आल्यावर त्या माणसाला प्रवेश बंद होत नाही, त्यासाठी इतर काही चिकित्सा लागतात.

१००% सहमत

प्रदीप's picture

7 Nov 2009 - 8:28 am | प्रदीप

'हे एका दुष्ट धर्माचे कृत्य आहे ' इथपासून 'ह्याचा धर्माशी अजिबात संबंध नाही, हे एका माथेफिरू व्यक्तिचे काम आहे' -- अजून फारशी बातमी हाती आली नसतांना ह्या दोन्ही टोकाच्या भूमिका लोक कसे घेऊ शकतात, हे कळत नाही.

सी. एन. एन. ने आताच ही बातमी दिली आहे:

http://edition.cnn.com/2009/CRIME/11/06/fort.hood.suspect.muslim/index.html

पक्या's picture

7 Nov 2009 - 8:45 am | पक्या

>>'हे एका दुष्ट धर्माचे कृत्य आहे '
दुष्ट धर्म - :O
असा शब्दप्रयोग आपल्याशिवाय कोणीही केलेला दिसत नाहिये.

अखिल विश्वात अमेरिकन समाज सर्वात सभ्य समाज आहे.भारतात कामचुकार,टुकार,साध्या साध्या गोष्टीत भड़कणारे लोक राहतात.
हे मला माहितच नव्हते.
अमेरिकन लोकांचे कौतुक वाटते मला किती सहनशील व सभ्य समाज आहे.

वेताळ

अवलिया's picture

7 Nov 2009 - 10:49 am | अवलिया

अगदी अगदी !

सहमत आहे. अमेरिकन म्हणजे अगदी सकाळ संध्याकाळ आरती केली तरी कमीच.. !
आता अमेरिकनांमधे आरती करत नसावेत.. ते काम दगडाला पूजणा-या बिनडोक, बेअक्कल, अर्धवट, अशिक्षित निवासी हिंदूचे.. ! :)

अमेरिकेने पाच पन्नास अणूध्वम टाकुन असल्या जगायला नालायक हिंदूना मारुन टाकावे अशी आमची ओबामाचरणी विनम्र प्रार्थना !
सगळयात पहिला आमच्या डोक्यावरच टाकावा.. !

जय हो अमेरिकन ! जय हो अमेरिकन !!
तुम्ही आहात म्हणुन मानवता टिकुन आहे हो.. !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

नव्हे, नव्हे, अवलियासाहेब!
<<जय हो अमेरिकन ! जय हो अमेरिकन !!
तुम्ही आहात म्हणुन मानवता टिकुन आहे हो.. ! >>
या ऐवजी
"तुम्ही आहात म्हणून पाकिस्तान (टिकून) आहे
व पाकिस्तान टिकून आहे म्हणून भारत अजून सुपरपॉवर झालेला नाही"
किती हे उपकार !
जय अमेरिका !!
------------------------
असेल हिंमत व आवड, तर ऐका हे मुळात पंकज उधासने गायलेले गीत! http://www.youtube.com/watch?v=4HUwuNk0Tc4

हा दुवा उघडा व निदाल मलिक हसनबद्दल सध्या काय चर्चा चालू आहे ते वाचा!
http://tinyurl.com/yjelba8
नकाशात पाकिस्तानचा किती मोठा भाग अतिरेक्यांच्या (पाकिस्तानी तालीबान व पाकिस्तानी अल-कायदा) ताब्यात आहे हेही पाहू शकाल.
पाकिस्तानी सेनेची जर अशीच पीछेहाट होत राहिली तर तो देश लवकरच अतिरेक्यांच्या/कर्मठ लोकांच्या हाती जाण्याची जबरदस्त शक्यता आहे. (कारण पैसेखाऊ अधिकार्‍यांच्याबद्दल सैन्यातील जवानांना काय आदर असणार?)
पाकिस्तान असे चुकीच्या लोकांच्या हाती पडले तर मात्र काय होईल ते सांगणे कठिण आहे!
वरील लेखावरच्या वाचकाच्या (बर्‍याच प्रमाणावर समतोल) प्रतिक्रिया वाचा या खालील दुव्यावर!
http://tinyurl.com/yk32u4o
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­

हुप्प्या's picture

10 Nov 2009 - 6:05 am | हुप्प्या

इथल्या संपादक मंडळाप्रमाणे उर्वरित मिडियाही हळूवार मनाचे दिसत आहेत. ह्या नराधमाविषयी फारशा बातम्या ऐकू येत नाहीत. त्याच्या धर्माचा तर उल्लेखही होत नाही.
बहुधा कोंबडे झाकल्याने सूर्य उगवायचा थांबत नाही ही म्हण खोटी असावी. तमाम कोंबडेमालकांनी आपापली कोंबडी झाकली तर सूर्य उगवायचा थांबेलही कदाचित. बघू या पुढच्या हाहाकारापर्यंत वाट बघू या!

नरेश धाल's picture

17 Nov 2010 - 10:49 am | नरेश धाल

म्हन खरि आहे,
तुम्हि वाट बघु नका. सुर्य ओलरेडि बघा बाहेर तळपत आहे,रोज.
http://www.thehindu.com/news/national/article888417.ece

गवि's picture

17 Nov 2010 - 11:28 am | गवि

पूर्वी इजिप्त एअरच्या एका को-पायलटने मेन पायलट बाथरूमला गेलेला असताना असेच अचानक अल्लाह चे नाव घेत विमानाची इंजिने बंद करुन आणि कंट्रोल खाली दाबून धरून विमान क्रॅश केलं आणि सर्व २१७ लोक मारले गेले.

बाथरूमहून परत आलेला मेन पायलट हे पाहून शॉक झाला त्याने विमानाचे नाक वर घेण्यासाठी खूप झगडा केला पण काही करू शकला नाही कारण को पायलटने आपलं प्रेशर कॉलमवर धरुन ठेवलं. मग विमान ऑलरेडी रिकव्हर होण्यापलिकडे डाईव्ह मधे गेलं.

फ्लाईट डाता रेकॉर्डरमधे दोघांच्या विरुद्ध दिशेच्या खेचाखेचीचं धक्कदयक चित्रण आहे.

विमान पाडता पाडता. तो सतत Tawakkalt ala Allah असे म्हणत होता.

अधिक माहिती हवी असल्यासः

http://en.wikipedia.org/wiki/EgyptAir_Flight_990

त्याने हे कृत्य हॅरॅशमेंटमुळे केले म्हणतात. आता यात धर्माचा संबंध किती माहीत नाही. पण माथेफिरुपणा मात्र होता.

शिवायः

http://www.independent.co.uk/news/world/americas/egyptair-crash-was-copi...

हुप्प्या's picture

29 Aug 2013 - 7:06 am | हुप्प्या

ह्या हरामी, कृतघ्न निदाल हसनला एकदाची मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली. हलकटाने अनेक युक्त्या प्रयुक्त्या वापरुन खटला पुढे ढकलायचा प्रयत्न केला. दाढी वाढवू द्यायची का नाही ह्या निरर्थक मुद्द्यावर अनेकदा खल केला गेला.
पण अमेरिका असल्यामुळे खटला सुरु झाल्यावर फार आढेवेढे न घेता शिक्षा सुनावली गेली. आता सदर महात्मा ७२ कुमारिका मनःपूत भोगण्याकरता कधी रवाना होतो ते बघायचे! इतक्या काफिरांना निर्घृणपणे मारले असल्यामुळे निदान डझनभर तरी मिळाव्यात!

http://www.foxnews.com/us/2013/08/28/fort-hood-gunman-maj-nidal-hasan-se...

राजेश घासकडवी's picture

29 Aug 2013 - 7:37 am | राजेश घासकडवी

मंगल पांडेने १८५७ साली जे केलं तेच यानेही केलं - आपल्या धार्मिक भावना सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या मानल्या. दोघांनाही तीच शिक्षा झाली. मंगल पांडेविषयी तुम्ही अशीच तुच्छतेची भूमिका घेत आहात असं गृहित धरतो.

हुप्प्या's picture

29 Aug 2013 - 8:58 am | हुप्प्या

तुलना करुन बघू या का?
मंगल पांडे

  1. स्थळःस्वतःचा देश जो इंग्रजांनी बळकावला होता.
  2. कुणावर हल्ला केला: सशस्त्र ब्रिटिश सैनिकांवर. मंगल पांडेवर गोळ्या झाडल्या गेल्या पण तो वाचला.
  3. मंगल पांडेचे सैन्यातील स्थानः एक सामान्य शिपाई. १८५७ मधे गोर्‍या सैनिकांचे स्थान हे काळ्यांच्या कायम वरती असायचे. आपल्या देशात आपल्या रंगामुळे दुय्यम स्थान मिळणे हे खचितच आनंददायक नसावे.
  4. हिंसक व्हायचे कारणः गाईच्या चरबीत बुडवलेल्या बंदुकीच्या गोळ्या तोंडाने उघडणे एक धार्मिक हिंदू म्हणून अपमानकारक वाटले आणि त्यावर दाद मागून काही उपयोग झाला नाही.
  5. किती लोक मारले: १

निदाल हसन

  1. स्थळः अमेरिकेचा अमेरिकेतील लष्करी तळ.
  2. कुणावर हल्ला केला: नि:शस्त्र कर्मचारी. त्यात एक गर्भवती स्त्रीही होती जी मारली गेली
  3. निदाल हसनचे सैन्यातील स्थानः त्याला डॉक्टर बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पूर्णपणे सैन्याच्या खर्चाने. त्याला कुठल्याही प्रकारचा भेदभाव सहन करायला लागल्याची नोंद नाही. अमेरिकेत डॉक्टर बनणे हे महाखर्चिक प्रकरण आहे. अनेक अमेरिकन गोर्‍यांच्याही आवाक्याबाहेरचे आहे. ते उच्चशिक्षण ह्या इसमाला दिले गेले. ते घेताना अमेरिकेचे इस्लामविरोधी वागणे विचारात घेऊन ते नाकारण्याचा मोठेपणा दाखवला नाही. उलट हा इसम अनेक प्रसंगी अमेरिकेविरुद्ध गरळ ओकला होता त्याकडे काणाडोळा करण्यात आला.
  4. हिंसक व्हायचे कारणः हा इसम अमेरिकेत जन्मलेला. आईबाप पॅलिस्टिनी. अमेरिकेने पॅलिस्टीनवर हल्ला केलेला नव्हता. निव्वळ अमेरिकेने काही मुस्लिम देशांवर हल्ला केला म्हणून सदर इसम बिथरला आणि त्याने बेछूट गोळीबार केला.
  5. किती लोक मेले: १३ मृत, ३० जखमी

हे फरक वाचून आपले दोन्ही सारखेच हे बिनडोक मत बदलले असेल अशी एक अंधुक आशा.
कदाचित आपण निदाल हसनला शिरसावंद्य हुतात्मा मानत असाल. पण अन्य कुठल्या देशाचे लोक त्याला हुतात्मा मानतील? अफगाणिस्तान? पाकिस्तान? सौदी अरेबिया? येमेन?

राजेश घासकडवी's picture

29 Aug 2013 - 10:27 am | राजेश घासकडवी

तुमचं लंबंचवडं उत्तर वाचून धार्मिक हिंदू लोक कधीच डोकेफिरूपणा करत नाहीत हे तुमचं मत आहे असं लक्षात आलं. तसं असेल नाहीतर मंगल पांडे डॉक्टर नसल्यामुळे त्याने जे काही केलं ते डोकेफिरूपणा नसेल असं कदाचित असेल.

पण एक कळलं नाही, मंगल पांडेला जर आपला देश परक्यांनी बळकावल्याचं इतकं वाईट वाटत होतं, तर प्रसंगी आपल्याच देशातल्या इतरांवर गोळ्या झाडायला भाग पडेल अशा प्रकारची परक्यांच्या सैन्यातच नोकरी का केली असावी?

इस्पिक राजा's picture

29 Aug 2013 - 11:13 am | इस्पिक राजा

महादेव गोविंद रानडे आख्खी हयात ब्रिटिश सरकारच्या सेवेत होते. त्यांनाही हाच नियम लागू होतो का? संभाजी महाराज औरंगजेबाचे मनसबदार होते. त्यांनाही हाच नियम लागू होतो का?

मंगल पांडेचा उद्रेक आणि मलिकचा धिंगाणा यात काहीच फरक नाही असे तुम्ही कसे काय म्हणु शकता?

मलिकने धिंगाणा घातला तो त्याला इराक अफ्गाणिस्तानात जाऊन मुसलमानांना मारायला लागणार म्हणुन. थोडक्यात अल कायदा याला भावासारखे पण याला पोसणारा, संपन्न करणारा देश आणी त्यातील निरपराध नागरिक याचे दुष्मन.

मंगल पांडे बिथरला कारण सैन्यातील अधिकारी त्याच्यावर गोमांसाचे आवरण असलेल्या काडतुसा तोडण्याची जबरदस्ती करत होते. जे त्याला नामंजूर होते. सशस्त्र उठाव असाही उंबरठ्यावर होता आणि हे त्याला माहिती होते. अश्या परिस्थितीत त्याने माथेफिरुपणाने त्याला थोडी लवकर सुरुवात केली. ज्यामुळे उठावाचे नुकसान झाले हे मान्य आहे पण त्यामुळे तो मलिकच्या रांगेत जाउन बसत नाही. कारण तो एका परकीय सत्ते विरुद्धच्या सशस्त्र लढ्याचा भाग होता. मंगल पांडे ब्रिटन मध्ये जाउन, त्यांचेच अन्न खाउन, त्यांच्याच संपत्तीवर पोसला जाउन, त्यांच्याच निरपराध नागरिकांना मारत नव्हता.

रस्त्यावर बेछूट गोळीबार करणारा माथेफिरु आणि एका परकीय सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा देणारा सैनिका यामध्ये काहितरी फरक असतो की नाही?

सौंदाळा's picture

29 Aug 2013 - 11:23 am | सौंदाळा

बेशर्त सहमती

क्लिंटन's picture

29 Aug 2013 - 1:21 pm | क्लिंटन

१००% मान्य. मलिक आणि मंगल पांडेची तुलना अत्यंत अप्रस्तुत वाटली.

राजेश घासकडवी's picture

29 Aug 2013 - 4:12 pm | राजेश घासकडवी

इंग्रजांच्या सैन्यातल्या नोकरीचा उल्लेख केला कारण हुप्प्या यांनी तो एक 'महत्त्वाचा फरक' म्हणून सांगितलं आहे. (बाकी त्या काळी आपला देश, इंग्रज परके वगैरे भावना फारशी प्रबळ नव्हती असं मला वाटतं.) डॉक्टरकीच्या निरर्थक मुद्द्याबद्दलही हेच, या फरकाला काही अर्थ नाही.

साम्य असं आहे की धार्मिक निष्ठा सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या ठरून सैनिक बिथरला आणि त्याने गोळीबार केला. असं होणं योग्य की नाही हे सर्वांसाठी सारख्याच पद्धतीने ठरावं, म्हणून तुलना केली. तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुमचं स्वतःचं मत राखण्याच्या अधिकाराचा मान आहेच.

जे.जे.'s picture

30 Aug 2013 - 12:17 am | जे.जे.

मुळात तुम्ही बादरायणि सम्बन्ध जोडुन तुलना चुकिच्या व्यक्ति बरोबर केलिये - आणि हेच हुप्प्या यांनी वरती सान्गितलय.

आता तुम्ही मुद्दा सोडत नसाल तर मग आम्ही तुमचि तुलना अध्यात्म-महर्षीन्शी केली आणि तुम्हाला ते योग्य वाटत नसेल तर स्वतःचं मत राखण्याच्या अधिकाराचा मान तुम्हाला आहेच.

अग्निकोल्हा's picture

30 Aug 2013 - 1:12 am | अग्निकोल्हा

साम्य असं आहे की धार्मिक निष्ठा सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या ठरून सैनिक बिथरला आणि त्याने गोळीबार केला. असं होणं योग्य की नाही हे सर्वांसाठी सारख्याच पद्धतीने ठरावं, म्हणून तुलना केली.

मला वाटते धार्मिक भावना दुखावलि जाउन एक भारतिय म्हणुन भोगाला आलेल्या सक्तिच्या जुलमी, गुलामि शुद्रतेविषयी तिरस्काराच्या उद्रेकाचे रुपांतर म्हणजे मंगल पांडे होय. अन्यथा बहुतांश प्रसंगि धर्मबांधवांच्या विरोधातही जाण्याचे काम स्विकारणे यातच त्याचि सैनिकी निष्ठा धार्मिक कर्तव्यापेक्षा जास्त तिव्र होती हे स्पश्ट होतेच. म्हणु ही तुलना अतिशय अप्रस्तुत व कमालिच्या असमंजसपणाची आहे.

राजेश घासकडवी's picture

30 Aug 2013 - 6:00 am | राजेश घासकडवी

एक भारतिय म्हणुन भोगाला आलेल्या सक्तिच्या जुलमी, गुलामि शुद्रतेविषयी तिरस्काराच्या उद्रेकाचे रुपांतर म्हणजे मंगल पांडे होय.

छे हो. पांडे नावावरून तथाकथित उच्चवर्णीय वाटतात. भारतीय म्हणून भोगाला आलेल्या सक्तीची जुलमी, गुलामी शूद्रता म्हणजे नक्की काय हे तथाकथित हिंदूंमधल्याच तथाकथित शूद्र जातीयांना विचारावं ही विनंती.

इस्पिक राजा's picture

30 Aug 2013 - 10:53 am | इस्पिक राजा

शूद्रांव्यतिरिक्त इतर भारतीय गुलामीत नव्हते असे काही तुमचे म्हणणे झाले असेल तर तुमच्या विनोदाची पातळी खुपच उच्च दर्जाची आहे असे नमूद करु इच्छितो.

कृपया दलित सवर्ण असा नविन वाद निर्माण करुन मूळ मुद्द्यावरुन विषय भरकटवु नका. सर्वच एतद्देशीय जनता पारतंत्र्यात होती. त्रास सर्वांनाच होत होता. दलितांना सवर्णांपेक्षा जास्त होत असेल कदाचित. पण तो या लेखाचा विषय नाही. दलितांना होत होता म्हणजे सवर्णांना होत नव्हता असे नाही. मुद्दे संपले की असे विषय भरकटवण्याचे खेळ सुरु होतात. असो. तुमच्या विचारस्वातंत्र्याचा आदर करायलाच हवा म्हणा.

बॅटमॅन's picture

30 Aug 2013 - 12:12 pm | बॅटमॅन

विषय भरकटवण्याचे एक उत्तम उदाहरण!

राजेश घासकडवी's picture

30 Aug 2013 - 7:15 pm | राजेश घासकडवी

विषय भरकटवण्याचे एक उत्तम उदाहरण!

शूद्र हा शब्द प्रथम मी वापरला नाही. शूद्रतेचा उल्लेख प्रतिसादात झाला म्हणून मी चूक दाखवून दिली इतकंच. बाकी एकंदरीतच कोणाला मी मंगल पांडेने धार्मिक निष्ठांना सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाचं मानलं हे पटलेलं किंवा आवडलेलं दिसत नाही. कदाचित मी माझा मुद्दा मांडण्यात कमी पडलो असेन. कदाचित 'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्टा' हेच खरं असेल. काही का असेना, आलेले युक्तिवाद हे भावनिक अधिक असल्यामुळे अजून प्रयत्न करूनही फरक पडेल असं वाटत नाही. तेव्हा इथेच थांबतो.

निव्वळ त्या निकषावर तुलना कितपत बरोबर आहे हे मांडण्यात तुम्ही नक्कीच कमी पडला आहात. तसे पाहिले तर आत्मसंरक्षण म्हणून कुणावर शस्त्र उगारणे आणि कॉन्सण्ट्रेशन कँपात किड्यामुंगीगत माणसे मारण्यात पण हिंसेपुरते साम्य आहेच की. तेवढ्यावरून त्यांची तुलना करणे हास्यास्पद आहे.

दोन्ही घटनांमागे नक्की काय कार्यकारणपरंपरा होती याची तुलनात्मक बैठक न करता एक शब्द आऊट ऑफ कॉण्टेक्स्ट उचलून विषय भरकटविला आहेच. हे करून त्यावरच्या प्रतिसादांना भावनिक म्हणण्याने तुमच्या प्रतिपादनातील तर्कदुष्टता कमी होत नाही.

त्यामुळे, "भावनिक झुंडहल्ल्यांपुढे माझे काही चालत नाही" असा फसवा युक्तिवाद करण्याऐवजी मूळ मुद्दा विस्तृतपणे मांडला तर बरे होईल. तुमच्या लौकिकाला ते अजून साजेसे होईल हे अलाहिदा. अर्थात परत, तुम्ही काय करावे हे सांगणारा मी कोण? पण तर्कविसंगती दाखवल्यास तिचे निराकरण करणे हे श्रेयस्कर असते अशी माझी समजूत आहे. असो.

मोदक's picture

30 Aug 2013 - 11:13 pm | मोदक

सहमत!!

राजेश घासकडवी's picture

31 Aug 2013 - 12:11 am | राजेश घासकडवी

मूळ मुद्दा विस्तृतपणे मांडला तर बरे होईल.

३१ ऑगस्टच्या सुमाराला मी व्यस्त असणार आहे ;) फिर कभी.

मुद्दा वेगळ्या धाग्यावर मांडला तर आणखी चांगले!

अग्निकोल्हा's picture

31 Aug 2013 - 7:30 pm | अग्निकोल्हा

३१ ऑगस्टच्या सुमाराला मी व्यस्त असणार आहे smiley फिर कभी.

वाह! ही लागण तुम्हाला झालि यातच तुमचे भाष्य सामावले आहे. असो,

मंगल पांडेना समान नियम लागु करण्यापुर्वी लक्षातघेण्याजोग्या महत्वाच्याबाबि या आहेत

१) तो अनिवासि हिंदु न्हवता.
२) धार्मिक जाच हे संतापाचे प्रमुख कारण न्हवे, तर बहुसंख्य भुमिपुत्रांच्या (जनतेच्या) मनातिल सामुदायिक रोषाची प्रकटता आहे.
३) हिंदुवर गोळ्या चालवाव्या लागतिल(लागतात) हे ही प्रमुख कारण न्हवे.
४) इंग्रजांकडून भारतिय व अभारतिय हा भेदाभेद पाळताना होणारी भारतियांची पध्दतशिर मुस्कटदाबी

यां गोष्टिंचि डोकेफिरु सैनिकाच्या वागणूकिसोबत तुलना कराविशी वाटणे हेच मुळात हेकेखोर प्रवृत्तिचे उद्दाम प्रदर्शन होय.

राजेश घासकडवी's picture

31 Aug 2013 - 8:02 pm | राजेश घासकडवी

वाह! ही लागण तुम्हाला झालि यातच तुमचे भाष्य सामावले आहे.

काय राव, स्मायली नाही दिसली का?

तेव्हां सर्व जाति धर्म लिंगाचे व्यक्ति जे भारतिय तर आहेत पण त्यांना आणि कुत्र्यांना प्रवेश नाही असा त्याचा अर्थ असायचा. म्हणूनच ना इंग्रजांची गुलामि धर्मा/वर्णाधिष्टित होती ना त्याच्या विरुध्दचा लढा तसा होता. म्हणूनच मंगल पांडे अन मलिक यांची तुलना होउ शकत नाही.

बाकी त्या काळी आपला देश, इंग्रज परके वगैरे भावना फारशी प्रबळ नव्हती असं आपल्याला जे वाटतं ते कशावर आधारित आहे याचे विस्त्रुत स्पश्टिकरण हवे आहे म्हणजे आपला मुद्दा जास्त व्यवस्थित्पणे समजुन घ्यायला मदत होइल.

काळा पहाड's picture

30 Aug 2013 - 3:57 pm | काळा पहाड

छे हो. पांडे नावावरून तथाकथित उच्चवर्णीय वाटतात.

अच्छा! म्हणून ही जळजळ होय?

इस्पिक राजा's picture

30 Aug 2013 - 12:12 pm | इस्पिक राजा

इंग्रजांच्या सैन्यातल्या नोकरीचा उल्लेख केला कारण हुप्प्या यांनी तो एक 'महत्त्वाचा फरक' म्हणून सांगितलं आहे.

अमान्य. तुमचा प्रतिवास साफ फसला आहे. मलिक आणी मंगल पांडे यांचा संबंध तुम्ही प्रथम लावलात. त्यानंतर हुप्प्या यांनी त्याचा प्रतिवाद करताना मंगल पांडे यांच्या सैनिक असण्याबद्दल विधान केले. अर्थात हुप्प्या असा प्रतिवाद करणार असे तुम्हाला स्वप्न पडले असेल किंवा तुम्ही तुमच्या असामान्य बुद्धीसामर्थ्याच्या बळावर ते आधीच्च जाणले असेल तर गोष्ट वेगळी.

(बाकी त्या काळी आपला देश, इंग्रज परके वगैरे भावना फारशी प्रबळ नव्हती असं मला वाटतं.)

अपल्या वैचारिक स्वातंत्र्याचा आदर आहे. पण पारतंत्र्याची आणि इंग्रज परके असल्याची जाणीव त्याकाळीही होती असे मला वाटते.

डॉक्टरकीच्या निरर्थक मुद्द्याबद्दलही हेच, या फरकाला काही अर्थ नाही.

डॉक्टरकीच्या मुद्द्याला फारसा अर्थ नाही हे मान्य. पण तो डॉक्टर असल्यानेच शस्त्र त्याला फारसे उचलायला लागणार नव्हते हे ही खरेच. असे असतानाही त्याने असे माथेफिरुपणाचे कृत्य केले म्हणजे त्याची भावना किती प्रबळ होती ते बघा. शिवाय डॉक्टर तो अमेरिकेच्या पैशानेच झाला होता हे महत्वाचे आहेच.


साम्य असं आहे की धार्मिक निष्ठा सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या ठरून सैनिक बिथरला आणि त्याने गोळीबार केला.

फरक आहे. मंगल पांडे साठी केवळ धार्मिक निष्ठा महत्वाची ठरली असे नाही तर उठावाची पर्श्वभूमीदेखील त्याला आहेच. शिवाय जबरदस्तीने अथवा फसवणुकीने गोमांसग्रहण करण्याचे धर्मबाह्य आणि निंद्य कृत्य करायला लावणे आणि देशासाठी आणि देशाच्या भल्यासाठी सैन्याची सेवा करण्या ऐवजी शत्रू केवळ स्वधर्मीय आहे म्हणुन निरपराध लोकाची हत्या करणे यात खुप फरक आहे. सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक आणि धार्मिक दहशतवादी यामध्ये जेवढा फरक आहे तेवढाच. स्वदेशीय जवानांची वैद्यकीय देखभाल करणे हे धर्मविरोधी कृत्य ठरत नाही.


असं होणं योग्य की नाही हे सर्वांसाठी सारख्याच पद्धतीने ठरावं, म्हणून तुलना केली. तुम्हाला योग्य वाटत नसेल तर तुमचं स्वतःचं मत राखण्याच्या अधिकाराचा मान आहेच.

दगडांची तुलना आंब्यांशी करता येत नाही. पुढच्यावेळेस कृपया जरा बरे उदाहरण द्यावे. तुमचं स्वतःचं मत राखण्याच्या अधिकार तुम्हाला आहेच.

क्लिंटन's picture

31 Aug 2013 - 4:59 am | क्लिंटन

साम्य असं आहे की धार्मिक निष्ठा सैनिकी कर्तव्यापेक्षा महत्त्वाच्या ठरून सैनिक बिथरला आणि त्याने गोळीबार केला.

इतर अनेकांनी मंगल पांडे आणि मलिकमध्ये नक्की काय फरक आहे हे स्पष्ट केले आहेच.या मुद्द्यांव्यतिरिक्त या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे?

१. मंगल पांडेने इंग्रज अधिकाऱ्याला मारले त्यामागे केवळ धर्मभावनाच होती हे गृहितक आहे त्याला आधार काय?त्यावेळी इंग्रजांनी ज्या पध्दतीने राज्य चालविले होते त्यामुळे सामान्य लोकांमध्ये इंग्रज राज्याविरोधी असंतोष वाढत होता.गाय आणि डुकरांचे मास लावलेली काडतूसे हे फार तर तात्कालिक कारण म्हणता येईल पण तेच एक कारण होते या म्हणण्याला आधार काय? १८५७ च्या उठावाची तयारी आधीपासून चालू होती.उत्तर भारतात सैनिकी तुकड्यांमध्ये कमळाच्या फुलाचा वापर करून तर गावांमध्ये रोटीचा वापर करून नक्की किती सैनिक/सामान्य लोक उठावाच्या बाजूने आहेत याची चाचपणी केली जात होती.अगदी पेशावरपासून बंगालपर्यंत अक्षरश: हजारो ठिकाणी ही चाचपणी केली गेली.गावांमधल्या किती लोकांना या काडतूसांचा वापर करावा लागणार होता?तरीही या गावांमधील लोकही इंग्रजांच्या विरोधात होतेच ना? आणि सैनिक तरी वेगळे कोण होते?ते पण अशाच गावांमधील सामान्य घरांमधून पुढे आले होते ना?मग एकूण परिस्थिती जर इंग्रजांविरोधी होती तर ते या परिस्थितीपासून पूर्णपणे आलिप्त कसे राहतील?तेव्हा मंगल पांडेने इंग्रज अधिकाऱ्याला मारले ही गोष्ट या पार्श्वभूमीवर बघायला हवी.त्याने जे काही केले त्यामागे केवळ धर्मभावना होती की धर्मभावना हे एकूण कारणांपैकी एक होते?

समजा इंग्रजांनी दडपशाही केलीच नसती किंवा इंग्रज राज्य अगदी रामराज्य असते तरीही मंगल पांडेने काडतूस या कारणावरून इंग्रज अधिकाऱ्याला मारले असते का? अर्थात ही जर-तरची गोष्ट झाली पण इंग्रज राज्य हे रामराज्य असते तर मुळात १८५७ चा उठाव झालाच नसता हे माझे मत झाले.जर कोणी म्हणत असेल की त्यावेळी आपण सगळे भारतीय आहोत ही भावना नव्हती आणि कदाचित त्यावेळी इंग्रज हे परके आहेत ही भावना तितकी प्रबळ नव्हती तर ते मला मान्य आहेच.क्रांतिकारक म्हटले की वाहवून जाणाऱ्यांपैकी मी नक्कीच नाही.पण तरीही त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करता आपण परक्यांच्या अंमलाखाली आहोत यापेक्षा आपण एका जुलमी राजवटीच्या अंमलाखाली आहोत ही भावना १८५७ च्या उठावामागे होती असे वाटते. यावर जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा ही विनंती.

मलिकच्या प्रकरणात एकूणच अमेरिकन सरकार/सैन्याविरूध्दच्या असंतोषामागच्या कारणांमागे धर्मभावना हे एक कारण होते का?

२. जर कोणाही दोन घटनांशी संबंधित असलेल्या व्यक्तींची तुलना करायची असेल तर त्या व्यक्तींचा त्या कृतीमागे असलेला विचार, ती कृती करायची पध्दत आणि त्या कृतीचे परिणाम यात सारखेपणा असेल तरच अशा दोन व्यक्तींची तुलना करता येईल.या दोन घटनांमध्ये फार तर कृती करायची पध्दत सारखी होती हे एकवेळ म्हणता येईल कारण दोघांनीही गोळीबार केला.अर्थात मंगल पांडेने बेछूट गोळीबार केला नाही आणि उगीचच परिस्थितीशी घेणेदेणे नसलेल्या कोणालाही मारले नाही (जे मलिकने केले).जरी मंगल पांडेकडे आधुनिक रायफल असती तरी त्याने बेछूट गोळीबार केला असता आणि उगीच कोणालाही मारले असते असे मला तरी वाटत नाही.याविषयी इतरांचे मत वेगळे असू शकेल.

आता दोन घटनांशी संबंधित असलेल्या व्यक्तींची तुलना करायची असेल तर कर्झन वायलीला मारणारा मदनलाल धिंग्रा, गांधीजींना मारणारा नथुराम गोडसे, इंदिरा गांधींचे मारेकरी बियंतसिंह-सतवंतसिंह आणि इस्राएलचे पंतप्रधान यित्झॅक राबीन यांचा मारेकरी यिगाल आमीर यांची तुलना करता येऊ शकेल.या चारही हत्यांमागे असलेली समान सूत्रे म्हणजे मारेकऱ्याच्या मते समोरचा मनुष्य त्यांच्या "राष्ट्राचे" नुकसान करत होता आणि त्याला मारणे गरजेचे होते, मारेकऱ्यांनी उगीच बेछूट गोळीबार करून संबंध नसलेल्यांना मारले नाही आणि आपल्या कृत्याच्या परिणामांची त्यांना पूर्ण जाणीव होती आणि त्यांनी पळून जायचा प्रयत्न न करता दिलेली शिक्षा विनातक्रार भोगली.या घटनांमधील व्यक्ती दहशतवादी आहेत की क्रांतिकारक हे आपण नक्की कोणत्या बाजूला आहोत यावर अवलंबून असते हे मी पूर्वीच स्पष्ट केले आहे.

मंगल पांडे आणि मलिकच्या कृत्यांमध्ये मला तरी अशी समान सुत्रे आढळली नाहीत की ज्या आधारावर त्यांची तुलना करता यावी.

मालोजीराव's picture

30 Aug 2013 - 8:27 pm | मालोजीराव

संभाजी महाराज औरंगजेबाचे मनसबदार होते. त्यांनाही हाच नियम लागू होतो का?

संभाजी महाराज स्वतंत्र राज्याचे छत्रपति होते

हुप्प्या's picture

30 Aug 2013 - 9:38 pm | हुप्प्या

आपले प्रतिसाद वाचून गाढ झोपलेल्याला उठवणे अवघड असते पण झोपेचे सोंग केलेल्याला उठवणे अशक्य असते ह्याची नव्याने प्रचिती आली. असो.

एका मंगल पांडेवरून तमाम धार्मिक हिंदूंवर उडी कशी घेतली ते जरा उलगडून तपशिलात सांगा.

निदाल हसनच्या डॉक्टरकीचा उल्लेख अशासाठी की मंगल पांडे प्रमाणे तो एक सामान्य शिपाई नव्हता. मंगल पांडे हा इंग्रजांच्या लेखी परक्या संस्कृतीचा तसाच निदाल हसन हाही अमेरिकनांच्या (ज्यात प्रामुख्याने श्वेतवर्णीय ख्रिस्ती असतात) लेखी परक्या संस्कृतीचा सदस्य परंतु काळाचा महिमा किंवा अन्य काही असेल, ह्या इसमाला तुच्छ वागणूक मिळाली नाही. उलट डॉक्टरीसारखे उच्च शिक्षण दिले गेले. त्यामुळे गोर्‍यांनी केलेल्या अपमानकारक वागणुकीचा राग खदखदत होता असे काही कारण समोर आलेले नाही. उलट इंग्रज देशी सैनिकांना तुच्छतेने वागवायचे ह्याचे अनेक मासले आहेत. आणि त्याचा राग हेही मंगल पांडेच्या उठावामागचे कारण असेल असे मानायला जागा आहे.
तर मग मंगल पांडे सैन्यात भरती का झाला वगैरे प्रश्न खरे तर अप्रस्तुत आहेत. पण कदाचित गरिबीमुळे असेल. तमाम देशी लोकांवर गोळ्या चालवणे वाईटच असेल असे का? लुटारू, ठग, पेंढारी हे लोक त्या काळी धुमाकूळ घालतच होते. वेळ पडल्यास अशा लोकांवर गोळ्या चालवणे इतके वेदनादायक नसेल. इंग्रज इतक्या राजेरोसपणे सामान्य, निरपराध, नि:शस्त्र भारतीयांना आपल्या भारतीय फौजफाट्याकरवी गोळ्या घालत नसावेत असे वाटते (जालियानवाला बाग हा एक अपवाद). नाहीतर त्यांचीही सुरक्षितता धोक्यात आली असती.

सुनील's picture

30 Aug 2013 - 8:51 am | सुनील

उत्तरेत जेव्हा १८५७ ची धामधूम सुरू होती त्याच सुमारास गोडसे भटजी वरसईकर उत्तरेच्या प्रवासात होते. परतल्यावर त्यांनी "माझा प्रवास" हे पुस्तक लिहिले. इतिहासाचे साधन म्हणून त्या पुस्तकाचे महत्त्व फारसे नसले तरी एक त्रयस्थ त्या सगळ्या उठावाकडे कुठल्या नजरेने पाहत होता हे पाहणे उद्बोधक ठरावे.

भारत म्हणून एक राष्ट्र आहे आणि इंग्रज ह्या परकीय सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा पुकारला जात आहे, असा अभिर्भाव त्या पुस्तकात चुकुनही आढळत नाही.

आजचे चष्मे वापरून दिडशे वर्षांपूर्वीच्या घटनांकडे पाहणे चुकीचे ठरू शकते.

इस्पिक राजा's picture

30 Aug 2013 - 10:47 am | इस्पिक राजा

दिडशे वर्षापुर्वीचा चष्मा कुठे मिळेल ते कृपया सांगावे.

माझा प्रवास इतिहासाच्या दृष्टीने निरुपयोगी असुनही तो बघावा असे सांगता मग सावरकरांचे १८५७ चा उठाव का वाचु नये? की फक्त शेषराव मोरे वाचुन बाकी सगळे गुंडाळुन ठेवावे म्हणजे दिडशे वर्षापुर्वीचा इतिहास स्प्ष्टपणे वाचता येइल? दिड दोनशे पानी गोडसे भटजींच्या पुस्तकात नसलेल्या गोष्टींनी कपाटे भरतील. ते एक प्रवासवर्णनच होते आणि तसेच राहिले तर बरे होइल. त्यात इतिहासाची मीमांसाही नाही आणि तसा उद्देशही नाही. गोडसे भटजींना काही राजकीय पार्श्वभूमी लाभलेली होती असेही नाही.

१८५७ मध्ये जो काही उठाव / बंड / क्रांती झाली त्याला कदाचित " स्वतंत्र भारत" असे वैचारिक व्यासपीठ नसेलही. पण तो एका सत्तेने किंवा अनेक सत्तांनी मिळुन एका परकीय सत्तेला केलेला विरोध होता हे नाकारता येणार नाही. त्याला इंग्रजांच्या सेवेत असलेल्या सैन्याचेही मोठा प्रमाणावर पाठबळा लाभले हे विसरता येणार नाही. इथे परत काही विशिष्ट समाज वैयक्तिक आकस अथवा हेव्यादाव्यांपोटी ब्रिटिशांच्या कच्छपी लागला हे विसरता येणार नाही. पण इथे मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश राजवटीविरुद्ध एकमत झाले होते. ब्रिटिश सत्ता उलथवल्यानंतर लोकशाही आणण्याचा कुठलाही विचार नव्हता या एकमेव कारणास्तव तो एका सत्तेविरुद्ध उठाव नव्हता असे म्हणता येणार नाही.

केवळ विरोधासाठी विरोध आणि वैचारिक मैथुन नको असे वाटते. बाकी आपल्या वैयक्तिक वैचारिक स्वातंत्र्याचा आदर आहेच.

हुप्प्या's picture

30 Aug 2013 - 11:43 pm | हुप्प्या

हे एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचे एका सामान्य व्यक्तीने केलेले वर्णन माहितीपूर्ण आणि रोचक आहे.
परंतु घरच्या गरीबीमुळे त्रासून गोडसे भटजी मोठी दक्षिणा मिळण्याच्या आशेने आजच्या मध्य प्रदेशाकडे निघाले. एक भिक्षुक मोठ्या दक्षिणेच्या आशेने प्रवासाला निघाला आणि त्याच वेळेस १८५७ चा उठाव झाला.
गोडसे भटजींचा अनुभव १००% अस्सल असला तरी तो एक सामान्य व्यक्ती म्हणूनच. त्यांना राजकीय परिस्थितीची जाण असण्याची शक्यता नाही. लोकांकडून जे कळेल तितपतच. त्यांनी तसा दावाही केलेला नाही. तेव्हा त्यावरून १८५७ चा उठाव कितपत राजकीय दृष्ट्या संघटित होता हे कळण्याची शक्यता नाही.

इस्पिक राजा's picture

29 Aug 2013 - 10:05 am | इस्पिक राजा

गुर्जी कधीकधी खुपच मजेशीर लिहितात ब्वॉ.

अत्यंत मूर्खपणाचा प्रतिसाद.

मलिक आणि मंगल पांडेची तुलना पाहून "श्वानं युवानं मघवानमाह" आठवले.

बाळ सप्रे's picture

29 Aug 2013 - 12:37 pm | बाळ सप्रे

श्वानं युवानं मघवानमाह

यावर जरा निरुपण करा बुवा..

श्वान्=कुत्रा, युवान्=तरुण, मघवान्=इंद्र. या तीनही शब्दांचा एकमेकांशी अर्थदृष्ट्या काहीच संबंध नाही, पण फक्त त्या सर्वांचे एंडिंग -आन् प्रत्ययान्त असल्याने त्यांच्या विभक्तीची रूपे सारख्याच प्रकाराने होतात.

एकमेकांशी अत्यंत विजोड, कशाचा काहीच संबंध नसलेल्या गोष्टींना एकाच सूत्रात बसवण्याचा कोणी प्रयत्न करू पाहत असेल तर त्यासाठी ही संज्ञा वापरतात. मूळ श्लोक असा:

"काचं मणि: काञ्चनमेकसूत्रे मुग्धा निबध्नाति किमत्र चित्रम् |
विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह ||"

"काच, मणी आणि सोने या विजोड गोष्टींना एकाच सूत्रात (दोर्‍यात) ओवणार्‍या मुग्ध मुलीलाच दोष देऊन काय फायदा? इतका विचारवान पाणिनी, त्यानेही श्वान, युवान आणि मघवान यांना एकाच सूत्रात(नियमात) गोवले आहे."

सौंदाळा's picture

29 Aug 2013 - 2:06 pm | सौंदाळा

मस्त
ते शेर ऐकवायच्या आधी इर्शाद का काय म्हणतात तसे संस्क्रुत श्लोकाच्या बाबतीत काय म्हणता येईल?
तोच शब्द मी म्हणालो असे समजावे ;)

वाहवा, सुभानल्ला च्या जागी संस्कृतवाले "साधु!साधु!" करतात, पण इर्शाद ला पर्यायी शब्द माहिती नै बॉ.

बाळ सप्रे's picture

29 Aug 2013 - 2:07 pm | बाळ सप्रे

धन्यवाद!!

वामन देशमुख's picture

31 Aug 2013 - 4:58 pm | वामन देशमुख

अस्माकम् बद्रीचक्रम्, युष्माकम् बद्रीतरः,
बादरायण् संबंधात् यूयं यूयम् वयं वयम्।

बॅटमॅन's picture

31 Aug 2013 - 6:28 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!!!

भम्पक's picture

29 Aug 2013 - 2:27 pm | भम्पक

अल्ला हू अकबर
यातला अकबर म्हणजे तोच अकबर बादशहा का...?

नाही. अकबर म्हंजे "द ग्रेट". ती एक पदवी आहे. अकबर बादशहाचे नाव "जलालुद्दीन महम्मद" होते हे माहिती असेलच.

बॅटमॅन's picture

30 Aug 2013 - 4:11 pm | बॅटमॅन

संवेदनांच्या अस्सलतेची क्रमवारी लावायची पद्धत सापडली हो एकदाची. आता फक्त आणि फक्त विशिष्ट समाजातल्यांच्या संवेदनाच विचारात घेऊ. बाकीची काय माणसं होती? जातपात न पाहता कुणी त्यांना एकाच साच्यात बसवणार असेल तर त्याचा निषेध आजपासून केलाच पाहिजे. मिपाच्या पानावरती ज्ञानेश्वरांचा फोटो तरी का लावलाय कोण जाणे. तथाकथित उच्चवर्णीयच होते ना ते? त्यांना कसल्या आल्यात व्यथा आणि वेदना. काय तर म्हणे मुंज करून ब्राह्मण घ्या. इकडे दलितांच्या अमानुष जिण्याकडे बघावे की या साडेतीन टक्केवाल्यांच्या आपापसातील कुरबुरीकडे.

अनिरुद्ध प's picture

30 Aug 2013 - 7:47 pm | अनिरुद्ध प

काय झाले? हि अचानक अशी प्रतिक्रिया कशासाठी?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Aug 2013 - 8:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
देव, देश* अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती॥

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
बंदूकांशी लगीन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलून घेईल अशी पहाडी छाती
देव, देश* अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती॥

जिंकावेवा व कटून मारावा हेच आम्हाला ठावं
लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं
देशा*पायी सारी इसरू माया ममता नाती
देव, देश* अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती॥

*देश = दार-उल-अमुकतमुक

आशु जोग's picture

30 Aug 2013 - 11:00 pm | आशु जोग

छान कविता-
(अमुकतमुक)

शिल्पा ब's picture

30 Aug 2013 - 11:06 pm | शिल्पा ब

This is getting ridiculous. (or it always was)

मराठे तुर्कस्थानात किंवा इंग्लंडात गेले नव्हते… ते लोक इथे येउन इथल्या जनतेला त्रास देत होते. अर्थात झोपेचं सोंग घ्यायचं असेल तर तो ज्याचा त्याचा निर्णय.

अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते गाव*
अमुक तमुक देवा अमुक तमुक सोडून धाव

तुझ्या शिवारी जगले हसले** कडी कपारी अमृत प्याले***
आता परि हे सारे सरले उरले मागे नाव

*गाव = मिसळपाव
**अमृत= जाऊ द्या, आपला आपणच अर्थ ओळखा.

बॅटमॅन's picture

31 Aug 2013 - 1:09 am | बॅटमॅन

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?
मार्क्स, माओ अन् निधर्मापायी प्राण घेतलं हाती॥

लालांच्या अड्ड्यात उमगली कॉम्रेडाची रीत
इंटुकांशी लगीन लागलं जडली येडी प्रीत
लाख "उजवे" झेलून घेईल अशी पहाडी छाती
सेकुलर लिब्रल होण्यापायी प्राण घेतलं हाती॥

ओरडावे वा ढुंकून न पहावं हेच आम्हाला ठावं
नेहमी स्वतःची करणे लाल हेच आम्हाला ठावं
हट्टापायी सारी इसरू माया ममता नाती
वाद, वितंड अन् मौजेपायी प्राण घेतलं हाती॥

ब्याम्या ब्याम्या.. जिकलंस रे भावड्या!!! :-))

इस्पिक राजा's picture

31 Aug 2013 - 10:11 am | इस्पिक राजा

+ १००१

दादा कोंडके's picture

31 Aug 2013 - 11:47 am | दादा कोंडके

:)) :)) :))

हट्टापायी सारी इसरू माया ममता नाती
वाद, वितंड अन् मौजेपायी प्राण घेतलं हाती॥

हे ब्येष्टच

क्लिंटन's picture

31 Aug 2013 - 3:21 pm | क्लिंटन

प्रचंड आवडल्या गेले आहे :) डाव्यांना असेच फटकारायला हवे.

काळा पहाड's picture

31 Aug 2013 - 12:01 am | काळा पहाड

Samjawadi Party leader Kamaal Farooqi today kicked up a controversy over the arrest of Indian Mujahideen co-founder Yasin Bhatkal, asking whether it is based on the grounds of crime or religion.

Congress and BJP slammed Farooqui for his comment calling it "ridiculous' and 'regrettable'. "If he is a terrorist then he should not be spared but if he has been arrested just because he is a Muslim, then caution should be exercised as we don't want to send a wrong message to an entire community that we are trying to malign the community's image without a thorough investigation," he said on the arrest of 30-year-old Bhatkal who is wanted in several blast cases.

हे लोक सुधारणार नाहीत.

उद्दाम's picture

31 Aug 2013 - 9:12 am | उद्दाम

रोचक धागा

आशु जोग's picture

31 Aug 2013 - 1:36 pm | आशु जोग

>> प्रसंगी आपल्याच देशातल्या इतरांवर गोळ्या झाडायला भाग पडेल अशा प्रकारची परक्यांच्या सैन्यातच नोकरी का केली असावी?

हे एकच उदाहरण नाही. आझाद हिंद सेना, वा ब फडके अशी अनेक उदाहरणे आहेत.

arunjoshi123's picture

31 Aug 2013 - 7:25 pm | arunjoshi123

घासकडवींच्या युक्तिवादात चूक असं काहीच नाही. मात्र बर्‍याच लोकांना वाटू शकतं कि त्यांच्या चिमटीत 'मंगल पांडे'च कसा आला? हा प्रश्न मात्र सयुक्तिक आहे. अगदी इंद्र, राम, कृष्ण यांना पण धर्मायुद्धात सहभाग घेतल्याचे पातक लागले नसेल काय? उ.प्र.चा विरोध करणारे मनसेवादी मिसळपावकर आणि ते स्वतः अशी एक बहारदार जोडी त्यांना बनवायची असावी. पण राजकारण ते राजकारण आणि शेवटी ते एकटे पडले. एकटे पडले म्हणून काय झाले? काळाच्या पुढे असलेली सगळी माणसे एकटीच पडतात हा जगाचा अनुभव आहे.

भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार, काळ जर खराच असेल तर, आणि आपण त्यापुढे गेला असाल तर, आपण ज्या दिशेने त्याच्यापुढे गेला आहात तिकडे आपण एकटेच गेले असण्याची शक्यता फारच जास्त असते असे मी ऐकले आहे. मी असंही ऐकलं आहे कि बिग बँगच्या त्या 'आपल्या*' विश्वाच्या पार्टीकलामधे मंगल पांडे आणि निदाल शेजारीच बसले होते. तेव्हा म्हणे कोणत्याही धर्माची आणि देशाची स्थापना झाली नव्हती. घासकडवी साहेबही तिथेच चार खुर्च्यांची जागा सोडून त्यांचे बोलणे ऐकत होते. हुप्प्या मात्र पाठमोरा बसलेला. त्यांचा विषय होता -'किती साम्य म्हणजे ओव्हरऑल साम्य?'. विषय रंगला पण निष्कर्श काही निघेना. दोन विद्वान आपल्या चर्चेत तिसर्‍याला 'खरे कि नाही?', 'काय म्हणता?' असे प्रश्न विचारून मान हलवायला लावतात. घासकडवींना चक्क ती भूमिका घ्यायला लागली. तितक्यात तिथे बिग बॅंगेच्या पार्टीकलाचा चालक आला आणि म्हणाला, "आपापले बेल्ट बांधा. आपल्यापैकी काहीजण मॅटर, काहीजण डार्क मॅटर, अँटीमॅटर, इ इ बनणार आहेत. सावधान." तो केबिनमधे परत गेल्यावर पार्टीकलाची शकले झाली आणि कितीतरी 'जण' irretrievably (कि कसे) दूर गेले. अगदी त्या नाजूक काळी पण घासकडवी काळाच्या थोडे पुढेच होते. त्यांना अचानक साक्षात्कार झाला. "श्रीसाम्यवैषम्य शिरोमणि:" असा ग्रंथ सुचला म्हणे! 'माता, गौ, त्यांचे दूध आणि त्यांची तुलनात्मक उपयुक्तता (दूधांची नव्हे)' हा त्यातील पहिला चरण म्हणे.

* मी असे ऐकले आहे कि आपले जसे एक विश्व आहे तशी कितीतरी विश्वे या जगात उ़कळत्या पाण्याच्या भांड्यातून बुडबुडे निघावेत तसे निघतात. पण ते भांडे, त्याचा स्टोव्ह, किचन जिथे आहे ते विश्वही कोण्याना कोण्या बिग बँगेपासून आले असावे. म्हणून साम्य वैषम्य यांवर भाष्य करतात वरचा संदर्भ ग्रंथच वापरावा.
** सबब प्रतिसाद विनोदी बनण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आपले सर्व ज्ञान अगोदर मांडून नंतर असहमती दाखवणे योग्य नाही. आपण केव्हा सहमती दाखवणार आहोत हे अगोदर सांगून मग त्यादिशेने आपापले मुद्दे मांडावेत.
*** समाजाची आदरस्थाने कशी परिक्षावी? त्यांना कुणाशी तोलावे? याची एक मर्यादा असते. दांडीयात्रेत महात्मा गांधींनी 'आयोडीन' नसलेले मीठ उचलले म्हणून त्यांना झाप झाप झापणे अप्रस्तुत आहे. सबब प्रतिसादाचा उद्देश 'बाब्या आणि कार्टं' मधील फरकांचे निकष आणि निकषांची मात्रा जाणणे असा तात्विक आणि तांत्रिक आहे. घासकडवींचे युक्तिवाद मला आवडतात पण त्यांनी इथे जो युक्तिवाद मांडला आहे त्याने माझी थेट आणि अप्रत्यक्ष सारीच आदरस्थाने पुसली आहेत.

आशु जोग's picture

31 Aug 2013 - 10:19 pm | आशु जोग

पण राजकारण ते राजकारण आणि शेवटी ते एकटे पडले. एकटे पडले म्हणून काय झाले? काळाच्या पुढे असलेली सगळी माणसे एकटीच पडतात हा जगाचा अनुभव आहे

ते एकटे नाहीत त्यांना काळाच्या पुढे असणार्‍या (प्रकाशाकणांपेक्षा वेगाने धावणार्‍या) देवतांचा आशीर्वाद आहे. असा अंदाज आहे.

arunjoshi123's picture

1 Sep 2013 - 9:30 am | arunjoshi123

माझ्या प्रतिसादात मी तसे व्हायला चान्स सोडलेला नाही. संपूर्ण ब्रह्मांड संपूर्णतः एकजीव असतानाची पार्श्वभूमी आहे. सबब वेळी प्रकाशाचा जन्म झालाच नव्हता. अशी पुरोगामी दृष्टी अशावेळीच प्राप्त होऊ शकते.

बाय द वे आपण उपरोल्लिखित 'श्रीसाम्यवैषम्य शिरोमणि:' ग्रंथातील श्रीमती इदिरा गांधी आणि मोहम्मद गझनी यांची तुलनात्मक अभ्यास वाचला आहे काय? याच अध्यायात श्री लालकृष्ण आडवाणी, औरंगजेब आणि पुनर्बांधणीसाठी घर पाडणारा माझा दिल्लीतला शेजारी यांचेही रोचक साम्य वर्णिले आहे. अगदी घरातल्या दिमकाचे वारुळ पाडताना सामान्य माणसाला थरथरे कापावे इतक्या प्रभावीपणे सबब साम्य वर्णिले आहे.

आशु जोग's picture

1 Sep 2013 - 12:03 pm | आशु जोग

हा ग्रंथ अद्याप पूरता वाचलेला नाही. समजून घ्या आमचा वाचनाचा स्पीड जरा कमी आहे. प्रकाशकणांच्या खूप मागे आहोत.

arunjoshi123's picture

1 Sep 2013 - 1:58 pm | arunjoshi123

आशुजी,
मी ही काही कोणी दिग्गज लागून गेलो नाही. मला देखिल आजकालच्या प्रतिगाम्यांसारख्या बौद्धिक आणि वैचारिक मर्यादा आहेत. आता हेच पाहा ना, बिग बँगेच्या पार्टीकलातली ती घटना जेव्हा मी कळून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला ती कशी कळून घ्यावी आणि कशी मांडावी हेच कळेना. वास्तविक भौतिकशास्त्रात शिकवलेल्या काळाच्याही जन्माअगोदर (जसा प्रकाशाचा जन्म चर्चिला आहे) सबब लोक काळाच्या पुढे होते. आता हे कसे ते चमकेना. म्हणून माझ्या विषयाच्या आकलनाच्या मर्यादा आणि मांडणीच्या मर्यादा सबब वर्णनात चिकार आहेत.

हुप्प्या's picture

1 Sep 2013 - 2:48 am | हुप्प्या

मंगल पांडे : ह्याच्या धर्मभावना दुखावणारे, त्याला त्या गाईच्या चरबीत बुडलेल्या गोळ्या तोंडाने तोडायचे आदेश देणारे त्या सैनिकी तळावरचे अधिकारीच होते. त्यामुळे तो राग मंगल पांडेने त्या अधिकार्‍यांवर थेट व्यक्त केला तर समजण्यासारखे आहे.

हसन निसारः त्या टेक्ससमधी फोर्ट हूडमधील किती लोकांनी अमेरिकेच्या युद्ध घोषित करण्याच्या निर्णयात भाग घेतला? शून्य. राष्ट्राध्यक्ष, संरक्षण मंत्री, सुरक्षा सल्लागार, सेनापती असा कुठलाही उच्चपदस्थ त्या सैनिकी तळावर उपस्थित नव्हता. अमेरिकेने मुस्लिम देशांविरुद्ध घोषित केलेले युद्ध हा असंतोषाचा विषय असता तर अशा लोकांवर हल्ला करून आपला राग व्यक्त करणे एक समजू शकतो. पण कुठल्याही अमेरिकनाला त्याकरता मारणे कशाबद्दल?

उद्दाम's picture

1 Sep 2013 - 10:58 am | उद्दाम

पण त्या चरबी प्रकारावरुन हिंदु मुस्लिमानी भांडायचं कशाला? गोळ्या आपापसात बदलल्या असत्या तर चालणार नव्हते का? म्हणजे हिंदुना डुकराची चरबी, आणि त्याना गाईची चरबीची गोळी... म्हणजे भांडणाचे कारणच नव्हते नै का? उगाचच उठाव बिठाव कशाला?

इंग्रजानी देश गिळला, मुघलानी गिळला वगैरे इतिहास रोजच काही लोक कोलकत असतात. पण मुघलानी पराक्रम करुन देश मिळवला.

आणि इंग्रजानी व्यापारी मार्गाने. बहुतांश संस्थानिकानी इंग्रजांकडून कवायती सैन्य आउटसोर्स केले होते. त्याच्या मोबदल्यात इंग्रजाना क्याश, कर वसुली किंवा संस्थानिकाकडून कर्जवसुली असे अधिकार मिळालेले होते. खुद्द झाशी संस्थानचीही अवस्था तीच होती.

काही कारणानी बोलं तटली, तर इंग्रजाना ते प्रदेश करारानुसार ताब्यात मिळाले.

मग सगळा प्रांत गेल्यावर आता तसेही भुकेनं मरणारच होते, ते लागले पराक्रम करायला.

एकंदर, कर्ज बुडवण्याची भारताला मोठी परंपरा आहे.

उद्दाम's picture

1 Sep 2013 - 11:00 am | उद्दाम

ते बिलं तटली असे वाचावे.