डोकेफिरु सैनिकाचा धिंगाणा (शीर्षक संपादित)
तथाकथित शांतताप्रेमी धर्माचा एक कट्टर अनुयायी कसे आत्ततायी कृत्य करता झाला आहे पहा.
अमेरिकेत टेक्सस प्रांतात फोर्ट हूड ह्या सैनिकी तळावर काम करणारा निदाल मलिक नामक एक ज्येष्ट मुस्लिम सैनिकी अधिकारी. काल कुठल्याशा कारणाने त्याचे टाळके सरकले आणि अल्ला हु अकबर च्या आरोळ्या ठोकत त्याने गोळीबार सुरु केला आणि डझनभर लोकांना ठार केले आणि कित्येकांना जखमी केले. अजून सगळ्या का आणि कसे ह्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. पण गंमत अशी की इथली तमाम बातम्या देणारी चॅनले ह्यात इस्लामचा कसा काहीच दोष नाही हे दाखवण्यात मग्न आहेत. कुणी त्या नराधमाची माहिती फारशी देत नाही. एक बातमी ओझरती कळली की ह्या प्राण्याला लवकरच इराक किंवा अफगाणिस्तानला पाठवणार होते आणि अन्य मुस्लिमांना मारायचे ह्या कल्पनेने तो बिथरला होता. सदर मुस्लिमाच्या शिक्षणाकरता अमेरिकन सैन्यदलाने पाच एक लाख डॉलर खर्च केले होते आणि त्या बदल्यात तो भरती झाला होता. थोडक्यात ह्या हलकटाला त्याचे पालनपोषण करणारे सैन्य, आपले सैनिक सहकारी ह्यापेक्षा परदेशी, अनोळखी पण धर्माने मुस्लिम लोक जास्त जवळचे वाटतात असे दिसते आहे. सुदैवाने किंवा दुर्दैवाने हा इसम जिवंत आहे. आता त्याला लवकर फाशी देतात का डोके ठिकाणावर नाही म्हणून सरकारी इतमामाने जिवंत ठेवतात ते बघायचे.
अमेरिकन सैन्यदल इतके ढिसाळ असेल असे वाटले नव्हते. असल्या नालायक माणसाला नोकरी देऊन आपल्याच पायावर कुर्हाड मारून घ्यायची काय गरज होती? सैनिकांच्या वागण्यावर, विचारांवर लक्ष ठेवत नाहीत का? म्हणजे ह्याच्या शिक्षणावर घालवलेले पैसे पाण्यात शिवाय मेलेल्या, जखमी सैनिकांची भरपाई, गुन्ह्याचा तपास ही विकतची डोकेदुखी आहेच.
असे काही भारतातही होणे अशक्य नाही. उलट अशा बातम्यांनी कुठल्या डोकेफिरूला स्फूर्ती मिळणेही अशक्य नाही.
एक विरोधाभास म्हणजे जेव्हा कुणी वर्णद्वेषी, ख्रिश्चन माणूस असा आततायीपणा करतो तेव्हा त्याची सगळी अंडीपिल्ली, कुंडली तमाम माध्यमे मोठ्या चवीने चघळतात. पण मुस्लिम धर्मीय अतिरेकी असले की ह्यांची दातखीळ बसलीच समजा.
वाचन
30896
प्रतिक्रिया
109