(तळतळ)

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जे न देखे रवी...
6 Nov 2009 - 10:09 am

तू नेलास, तर आज पाऊचही नाही
बोटास चुन्याचे दर्शनही नाही

हुडकत होतो चघळायला जरा मी
ठेवणीतली पुडीही वळचणीत नाही

वेड्या तोंडा तलफ असे चिमटिची
चावायला काडी जवळ एकही नाही

खास पुडी अजूनही बॅगेत आहे
पण आंत,नेहेमीची चुनापुडी नाही

सांग नेता पाऊच काय करु मी?
"चिमटीविना जगण्याची अजून खाज नाही"

चिमटीची मागणी केल्यावर दिलेला पाऊचच मित्राने नेल्यानंतरची अवस्था.

करुणविडंबन

प्रतिक्रिया

टुकुल's picture

6 Nov 2009 - 10:12 am | टुकुल

हा हा हा हा..
हि बघ बाजुला पुडी पडलेली आहे.. ये घेवुन जा...

मित्र,
टुकुल

विजुभाऊ's picture

6 Nov 2009 - 10:15 am | विजुभाऊ

जळजळ / तळमळ / मळमळ
आता धौती योग असाही एक धागा टाकावा म्हणतो

मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

आंबोळी's picture

6 Nov 2009 - 1:23 pm | आंबोळी

पाऊच ऐवजी जर चंची शब्द कवितेत योजला असता तर एक ऐतिहासिक परिमाण लाभून कविता एका वेगळ्याच उंची (वा ! काय यमक जुळलय...)वर गेली असती असे वाटते.

आंबोळी

गणपा's picture

6 Nov 2009 - 5:06 pm | गणपा

हा हा हा , कंदिलधार्‍याशी सहमत..

अवलिया's picture

6 Nov 2009 - 6:12 pm | अवलिया

हा हा हा
हेच म्हणतो

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Nov 2009 - 11:07 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत !!!

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Nov 2009 - 2:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पेशव्यांचा काव्यफुफाटा पाहून आजकाल माझी मळमळ फार वाढली आहे. त्यामुळे पेशव्याने विडंबन केलं की आपणही एक पाडलंच पाहिजे असं काहीसं वाटतं. तर हे पहा:

तू उठलास, आज पाऊसही नाही
अंगास पाण्याचा स्पर्शही नाही

विचारात होते शुचितेसाठी अंमळ मी
ठेवणीतला साबण जागेवर नाही

अंगास दर्प जरूर असे स्वच्छतेची
दूर पळती सर्व पास कोणी नाही

खास ब्रश अजूनी स्नानगृहात आहे
पण नळात पुन्हा जीवनच नाही

सांग मजला खाज सुटता काय करशी तू
पाणी नसता खाजेशिवाय हाती काही नाही

* होस्टेलमधल्या एका गलिच्छ "इनमेट"ला अर्पण

अवांतरः पेशवे ... चालू द्यात ..

अदिती

परिकथेतील राजकुमार's picture

6 Nov 2009 - 2:55 pm | परिकथेतील राजकुमार

तंबाखु खाणारे (म्हणजे पचापचा थुंकतही असणारच) आणी आंघोळ न करणारे हे सदस्य बघुन आज एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.

ठगवाडीचे फसवे

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Nov 2009 - 4:57 pm | llपुण्याचे पेशवेll

अदिती विडंबन नेहेमीप्रमाणेच छान.
बा द वे (झ लिहीलेला नाहीये हां) हा परा सुद्धा अंमळ वेड*वा आहे. आम्ही पचापच थुंकत नाही. आणि थुंकतो का नाही याचे उत्तर देणे अथवा तद्जन्य पुरावे देण्यास आम्ही कोणत्याही प्रकारे बांधील नाही. म्हणजे पुरावे नाहीत असे नाही पण ते आम्ही कोणाला द्यायचे हे आम्ही ठरवू. पुढे जाऊन आम्ही असे म्हणतो कि हे परिकथेतील राजकुमार मूळात राजकुमार नाहीतच. पण त्याबद्द्ल कोणताही पुरावा त्याना द्यायला आम्ही बांधील नाही. असो.

-पामटॉपवरील टचकुमार

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Nov 2009 - 5:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद पेशवे. खरंतर मला अशा कविता लिहायला नेहेमीच आवडतं, पण मिपावरील लोकांना अशा लेखात फारशी गोडी दिसत नाहीं.

कदाचित विडंबन, पान, थुंकणं, साबण यात मिपाकरांना रस नसेल किंवा त्यांना विडंबनाची शैली आवडत नसेल किंवा आणखीही कांहीं अज्ञात कारण असेल. पण > १५० वेळा वाचूनही कुणा वाचकाला त्यांच्या स्वतःच्या लेखनावरून, अनुभवावरून विडंबनात कांही सुधारणा सुचवावी, चुका काढाव्या किंवा लिहिलंय त्यापेक्षा वेगळे कांहीं त्यांच्या अनुभवाच्या आधारे मांडावे वा कांहीं वेगळे विडंबनन करावे असे वाटत नाहीं असे दिसते.

असो.
अदिती
------------------------
करून करून भागला आणि देवपूजेला लागला! (देवपूजा != देवीपूजा)

गणपा's picture

6 Nov 2009 - 9:37 pm | गणपा

हॅ हॅ हॅ तरी सांगत होतो त्या टार्‍याशी जास्त गफ्फा मारत जाउ नकोस.
शे वटी लागलाच ना तुला पण (ही & हि ) इडंबनाचा नाद. ;)

आंबोळी's picture

6 Nov 2009 - 5:22 pm | आंबोळी

पुढे जाऊन आम्ही असे म्हणतो कि हे परिकथेतील राजकुमार मूळात राजकुमार नाहीतच.
संदर्भाशिवाय असे विधान करणे चुक आहे. आधी संदर्भ द्या. नाहीतर विधान मागे घ्या.

आंबोळी

सूहास's picture

6 Nov 2009 - 3:18 pm | सूहास (not verified)

मस्त रे धन्या....

घे डबल ...

सू हा स...

नंदन's picture

6 Nov 2009 - 3:27 pm | नंदन

हुडकत होतो चघळायला जरा मी
ठेवणीतली पुडीही वळचणीत नाही

--- क्या बात है! अधूनमधून चघळायला म्हणून ठेवणीतल्या पुडीतून ठरलेल्या शब्दरतीबांचे दळण घालणार्‍या बहुप्रसव सर्जनकारांना उद्देशून तर ही द्विपदी लिहिली गेली नसावी ना?

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धमाल मुलगा's picture

6 Nov 2009 - 6:47 pm | धमाल मुलगा

महाराज...महाराज...
_/\_ कोटी कोटी प्रणाम!

पुपे, बुधवारचा हँगओव्हर अजुनही????
एकदम ढिंच्याक रचना आहे हो!

आणी मुख्य म्हणजे ऊन,वारा,पाऊस, प्रेम इ.इ. सारख्या अर्थशुन्य अश्रुपातकी फुलपाखरी कवितांपेक्षा ही जनसामान्यांच्या रोजच्या जिवनाशी निगडीत अशी वास्तवदर्शी आणी त्राग्याच्या भावगर्भातील भावनांचे रोचक चित्रण करणारी अशी ही कविता वाटली.

प्रशु's picture

6 Nov 2009 - 5:28 pm | प्रशु

प्रत्यक्षाहुन विडंबन उत्कट