श्रावण मोडकांची माफी मागून- [मिपावर विडंबन अधिकृत साहित्य प्रकार आहे म्हणून हे धाडस; कृपया राग नसावा]
बेलगाम, फुर्रर्रर्र गेला,
बेभान, प्रसन्न पवार!
पेठांच्या गल्लीबोळात,
गर्दीच्या शनिवारातही
उताराच्या भुसारीत,
चढाच्या कात्रजातही
ठरलेल्या वेळेत,
जायची घाई नसुनही
परवाच घेतलेल्या गाडीत,
पुरती प्रॅक्टीस नसुनही
वन्य प्राणीमात्रात,
बांबूच्या दाट वनातही
त्या गोंगाटाच्या रात्री,
गणेश उत्सवातही
ब्रेक नसलेल्या गाडीत,
प्रसन्न बसतो फुकाचा
कोण त्याचा मुक्तिदाता
माहित असल्यास तुम्ही सांगणार!