आठवतात का ते क्षण तुला?

झंडुबाम's picture
झंडुबाम in जे न देखे रवी...
3 Nov 2009 - 8:05 pm

आठवतात का ते क्षण तुला?
किती सहज विचारले होतेस आवडते का मी तुला?
खूप विश्वासाने दिला होता होकार तुला.....
कारण वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला.

आठवतात का ते क्षण तुला?
किनार्‍यावर वाळूत खेळताना,वाळूत आपली नावे लिहिताना,
आलेल्या लाटेने फक्त माझेच नाव पुसल्याचे जाणवले होते मला.
वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला

आठवतात का ते क्षण तुला?
एकत्र प्रेमाच्या आणाभाका खाताना ,शेवट पर्यंत साथ देण्याचं वचन देताना
का कुणास ठावूक पण आभाळ भरुन आल्याचं आठवय मला.
वाटले नव्ह्ते कधी सोडुन जाशील मधेच मला

आठवतात का ते क्षण तुला?
किती अवघडली होतीस लग्नात माझी ओळख करुन देताना,
पण तेव्हा मात्र धुसर दिसत होतं सगळचं मला....
वाटले नव्ह्ते..............

मिपा वर लिहिण्याची पहिलीच वेळ ,कविता कशी वाटली ते सांगा.

करुणकविता

प्रतिक्रिया

सूहास's picture

3 Nov 2009 - 8:07 pm | सूहास (not verified)

प्रेमभंगाची छान कविता..

(अधिक माहीतीसाठी राजेंना भेटा..)
सू हा स...

टारझन's picture

3 Nov 2009 - 9:08 pm | टारझन

मिपा वर लिहिण्याची पहिलीच वेळ ,कविता कशी वाटली ते सांगा.

आठवतात का ते क्षण तुला ? लिहीलेलं तू छाण आवडतं मला :)

-- आयोडेक्स
सोडून गेलेल्या गोष्टींचं कधीच वाईट वाटून घ्यायचं नसतं , कारण ती गोष्ट कधी आपली नसतेच ,अशावेळेस "आयोडेक्स मलिये , काम पे चलिये"

पर्नल नेने मराठे's picture

4 Nov 2009 - 10:09 am | पर्नल नेने मराठे

सोडून गेलेल्या गोष्टींचं कधीच वाईट वाटून घ्यायचं नसतं , कारण ती गोष्ट कधी आपली नसतेच .

खरे आहे, नव्याने सुरुवात करायची. :D
चुचु

सुहास's picture

3 Nov 2009 - 11:34 pm | सुहास

सोडून गेलेल्या गोष्टींचं कधीच वाईट वाटून घ्यायचं नसतं , कारण ती गोष्ट कधी आपली नसतेच ,अशावेळेस "आयोडेक्स मलिये , काम पे चलिये"

काय बोललात टारझन..! लाखांत एक..!

झंडुबाम, तुम्ही केलेली कविता छान आहे.. :) पण जर खरेच तसे काही असेल तर टारझनांचा सल्ला माना..

--सुहास

पक्या's picture

3 Nov 2009 - 11:39 pm | पक्या

कवितेतील प्रश्नकर्ता नेमका कोण आहे ? स्त्री की पुरूष?
१ल्या कडव्यात 'खूप विश्वासाने दिला होता रे होकार तुला.....' असे लिहीले आहे आणि शेवटी 'किती अवघडली होतीस लग्नात माझी ओळख करुन देताना,' असे लिहिले आहे.

sneharani's picture

4 Nov 2009 - 2:34 pm | sneharani

हाच प्रश्न देखिल मला पडलेला आहे.

झंडुबाम's picture

4 Nov 2009 - 2:58 pm | झंडुबाम

योग्य तो बदल करण्यात आलेला आहे.