गृहमंत्री गरजले अतिरेकी टरकले!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
2 Nov 2009 - 6:07 am
गाभा: 

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5187205.cms

ऐका ऐका ऐका! आपल्या पराक्रमी गृहमंत्र्यांनी पाकला कडक इशारा दिला आहे. पुन्हा हल्ला केलात तर जबरदस्त बदला घेऊ.

आताच मिळालेल्या माहितीनुसार ही गर्जना तमाम अतिरेक्यांनी टीव्हीवर ऐकली आणि ते चळाचळा कापू लागले आहेत. आता ते जेहाद वगैरे न म्हणता अल्लाह करम करना वगैरे गाणी म्हणत आहेत. लवकरच ते ईश्वर अल्ला तेरो नाम म्हणत शस्त्रत्याग करणार आहेत. कित्येकांनी आपापल्या एके४७ वगैरे बंदूका वितळवून त्यांची कुदळी, फावडी आणि नांगर करायचे आणि शेती करायचे बेत आखत आहेत! उरलेले अतिरेकी बंधू पश्चातापाचे अश्रू ढळाढळा गाळत हार आणि फुले घेऊन ते क्षमायाचनेकरता भारतीय दूतावासात धाव घेत आहेत.
अजी सोनियाचा दिनु! सोनिया माउली धन्य हो!
म्हणा
चिदंबरा चिदंबरा आतंकहारक चिदंबरा!

आता भारतीयांना अतिरेकी हल्ल्याचे सुतराम भय नाही.
ही निर्णायक खेळी करून प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीतपट केल्याबद्दल गृहमंत्र्यांचे त्रिवार अभिनंदन, नव्हे त्यांना लोटांगण!

प्रतिक्रिया

सुधीर काळे's picture

2 Nov 2009 - 7:50 am | सुधीर काळे

छान लिहलाय तुम्ही तुमचा शेरा! मला वाटतं कीं श्री. चिदंबरम एकादे वेळी आपली धमकी खरी करून दाखवतीलही!
पण मग राजपुत्राचे काय?
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

हुप्प्या's picture

2 Nov 2009 - 8:18 am | हुप्प्या

गृहमंत्र्यांच्या पौरुषाला असा अचानक पूर यायला भाषणापूर्वी कुठल्याशा द्रव वा घन पदार्थाचे सेवन कारणीभूत आहे का?
जाणकारांनी खुलासा करावा.
अशी वाचावीरश्रीदेखील आपल्या थोर्थोर नेत्यांना नैसर्गिकरित्या स्फुरत असेल ह्याच्यावर म्या पामर विश्वास ठेवू शकत नाही. असो.

सुधीर काळे's picture

2 Nov 2009 - 9:57 am | सुधीर काळे

कदाचित 'एक्स्ट्रा-स्ट्राँग' रसम-वडा पुरत असेल त्यांना!
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

लबाड लांडगा's picture

2 Nov 2009 - 10:15 am | लबाड लांडगा

काळे साहेब.सगळे तसलेच आहेत. आपल्या त्या सिंधी अडवाण्याने काय मोठे दिवे लावले होते?आणि गेल्यावर्षी लाथ मारुन हाकललेला मराठमोळा शिवराज?
लबाड

अहो, अडवाणी तरी बरे! अटल-जींनी त्या परव्याला (परवेझ) आग्र्याला बोलावून २१ तोफांची सलामी देऊन उगीचच इज्जत दिली नाहीं तर त्याला कुणीही मान्यता देत नव्हतं. नको तिथे कनवाळूपणा असा नडतो!
मी सध्या जे पुस्तक वाचतो आहे (Nuclear Deception) त्यात मुशर्रफचे अनेक भारतविरोधी पराक्रम वर्णिलेले आहेत. पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर त्या पुस्तकावर एक छोटीशी लेखमाला लिहायचा विचार आहे.
सुधीर काळे
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

समंजस's picture

2 Nov 2009 - 10:31 am | समंजस

उत्तम!!! =D>
गृहमंत्र्यांनी हे रोज सांगायला हवे म्हणजे केव्हातरी नक्कीच अतिरेकी
घाबरतील. अतिरेकी नाही तर नक्षलवादी तरी घाबरतील? नक्षलवादी नाही तर देशी
गुन्हेगार तरी घाबरतील?

काही नाही हो.. काल सत्यसाईबाबांनी सांगितले असेल/आशीर्वाद दिला असेल, "मैं हूं ना, तुम बोल दो."
गेले वर्षभर कसाबला पकडून ठेवून काय केले/झाले ते दिसतच आहे.

मला वाटतं कीं श्री. चिदंबरम एकादे वेळी आपली धमकी खरी करून दाखवतीलही
काळेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे झाले तर चांगलेच आहे.

प्रशांत उदय मनोहर's picture

2 Nov 2009 - 12:24 pm | प्रशांत उदय मनोहर

=)) =))
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई =D>

सनविवि's picture

2 Nov 2009 - 7:15 pm | सनविवि

हे विधान मदुराईमध्ये स्थानिक मतदारांसमोर तमिळ भाषेत केले आहे. त्यामुळे गंभीरपणे घ्यायची काही गरज नाही!

भडकमकर मास्तर's picture

3 Nov 2009 - 9:09 am | भडकमकर मास्तर

हेच म्हंतो
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

विकास's picture

2 Nov 2009 - 8:07 pm | विकास

मला वाटते गृहमंत्र्यांचे वाक्य वरवर जरी पाकीस्तानी अतिरेक्यांना उद्देशून आहे असे वाटत असले तरी, ते वास्तवात राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रात सत्तावाटपावरून चाललेल्या अतिरेकाला उद्देशून असावे...

अनामिका's picture

2 Nov 2009 - 9:55 pm | अनामिका

=)) याला म्हणतात शालजोडितुन हाणणे!!!!!!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

१.५ शहाणा's picture

2 Nov 2009 - 9:37 pm | १.५ शहाणा

मला वाटतं कीं श्री. चिदंबरम एकादे वेळी आपली धमकी खरी करून दाखवतीलही

सोनीयाच्या दिवसात व शरदाच्या चांद्ण्यात...? ?.......

टारझन's picture

2 Nov 2009 - 10:44 pm | टारझन

सोनीयाच्या दिवसात व शरदाच्या चांद्ण्यात...? ?.......

कधी जाणार हे सोनियाचे दिवस ... कोणास ठाऊक ... :(

-- ( शरदाचे टकले चे प्रायोजक) टारझन दादा पावर

आत्ताच वाचलेल्या बातमीनुसार गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत झालेल्या लखनौ मधील जमैता-उलेमाच्या संमेलनात "वंदे मातरम" या राष्ट्रीय गीताच्या* ("राष्ट्रगीता"च्या नाही) विरुद्धचा २००६ सालपासूनचा फतवा परत संमत केला गेला.

__________________________________
* धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने १९३७ साली त्या गीतात असलेली फक्त पहीली दोनच कडवी ठेवली ज्यात फक्त मातृभूमीचे वर्णन आहे आणि त्याला राष्ट्रीय गीत म्हणले...