गृहमंत्री गरजले अतिरेकी टरकले!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5187205.cms
ऐका ऐका ऐका! आपल्या पराक्रमी गृहमंत्र्यांनी पाकला कडक इशारा दिला आहे. पुन्हा हल्ला केलात तर जबरदस्त बदला घेऊ.
आताच मिळालेल्या माहितीनुसार ही गर्जना तमाम अतिरेक्यांनी टीव्हीवर ऐकली आणि ते चळाचळा कापू लागले आहेत. आता ते जेहाद वगैरे न म्हणता अल्लाह करम करना वगैरे गाणी म्हणत आहेत. लवकरच ते ईश्वर अल्ला तेरो नाम म्हणत शस्त्रत्याग करणार आहेत. कित्येकांनी आपापल्या एके४७ वगैरे बंदूका वितळवून त्यांची कुदळी, फावडी आणि नांगर करायचे आणि शेती करायचे बेत आखत आहेत! उरलेले अतिरेकी बंधू पश्चातापाचे अश्रू ढळाढळा गाळत हार आणि फुले घेऊन ते क्षमायाचनेकरता भारतीय दूतावासात धाव घेत आहेत.
अजी सोनियाचा दिनु! सोनिया माउली धन्य हो!
म्हणा
चिदंबरा चिदंबरा आतंकहारक चिदंबरा!
आता भारतीयांना अतिरेकी हल्ल्याचे सुतराम भय नाही.
ही निर्णायक खेळी करून प्रतिस्पर्ध्याला चारीमुंड्या चीतपट केल्याबद्दल गृहमंत्र्यांचे त्रिवार अभिनंदन, नव्हे त्यांना लोटांगण!
वाचने
3953
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
पण मग राजपुत्राचे काय?
पूर पौरुषाचा?
In reply to पूर पौरुषाचा? by हुप्प्या
सहमत!
In reply to सहमत! by सुधीर काळे
सोडा हो
In reply to सोडा हो by लबाड लांडगा
Nuclear Deception मधील मुशर्रफचे अनेक भारतविरोधी पराक्रम
उत्तम!!!
सत्यसाईबाबांचा आशीर्वाद असेल
आपला, (मिपा
हे विधान
In reply to हे विधान by सनविवि
हेच
वरवरचे
In reply to वरवरचे by विकास
विकास!झक्कास
सोनीयाच्या दिवसात ?
In reply to सोनीयाच्या दिवसात ? by १.५ शहाणा
सोनीयाच्य
आणि गृहमंत्री गप्प बसले...