तू विरलीस पंचमहाभुतात .......
ती वेळ... ती तिथी... मी गोंदलीय माझ्या मनावर.. ठळकपणे.
प्रहराप्रहराला आठवणी शिंपून देते तजेला त्या हिरव्या जखमेला
जिने व्यापलाय तनामनाचा परिघ आणि
ठसठसतेय माझं संपुर्ण अस्तित्व...
....
......
आनंदाची एकही चाहूल मी उंबर्याआत येऊ देत नाही,
सुखाच्या झुळकी कितीदा परतल्यात दरवाज्यावर थाप देऊन...
अजून कुंपणावर थांबलीत फुलपाखरं..
खिडकीत फुललेल्या सदाफुलीला मी कवेत घेईन या अपेक्षेने,
कधी कधी डोकावणारा एखादा कवडसा
डुंबून जातो माझ्या काळोखाच्या डोहात
पुन्हा न परतण्याच्या वचनासह,
पावसाच्या एकाही थेंबाने फुलत नाहीत धुमारे
गोठलेल्या स्वप्नाच्या फांदीला,
अंगणातल्या गुलमोहराने वसंताला केव्हाच झिडकारलयं..
........
तू पुन्हा कितीही आणि कसाही संपर्क साधायचा प्रयत्न केलास तरी
माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीस...
कारण मी झालेय माझ्याच कोषातील आंधळं सुरवंट...
प्रतिक्रिया
1 Nov 2009 - 3:31 pm | ज्ञानेश...
=D>
"Great Power Comes With Great Responsibilities"
1 Nov 2009 - 7:59 pm | प्राजु
येतात उन्हे दाराशी .. हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा, तव गंधावाचून जातो..
या गाण्याची आठवण झाली.
कविता आवडली हे वेगळे सांगायला नको.
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/