मित्रहो,
नमस्कार,
मी मिपा वर प्रथमच काहीतरी लिहित आहे आणि तेही मदत हवी आहे म्हणून
मी दिनांक १४ ते १८ मे असे ५ दिवस केरळमध्ये जात आहे
जाण्याची ठिकाणे
१४ते १५ मे ;- एर्नाकुलम जंक्शन ते मुन्नार
१६ मे थेक्कडी
१७ मे अलेप्पी
१८ मे athirapali व कोची
तरी मला वरील ठिकाणी पाहण्याची ठिकाणे कोणती आहेत यासाठी मदत करावी हि नम्र विनंती
माझ्यसोबत माझी पत्नी व ९ वर्षाचा मुलगा व दुसर्या मित्राची अशीच त्रिकोणी फमिली आहे
प्रतिक्रिया
11 May 2018 - 12:22 pm | dadabhau
"Places to Visit in Munnar ....Thekaddy ...etc " असा सर्च करा ..."Tripadvisor " वर शोधा . Munnar ला Eravikulam /Rajamalai नॅशनल पार्क आणि thekaddy ला boating tour करणार असाल तर आधीच onlline booking करून घ्या ...बराच वेळ वाचेल .
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ड्राइवर जे जे ठिकाण सांगेल ( त्या ठिकाणांची marketing करेल उदा . spice garden ...कोचिन ला boating etc.. )...त्या त्या ठिकाणी मुळीच जाऊ नका.. कारण नसतांना तुम्हाला १०० च्या जागी ५०० रुपये खर्च करायला लावतील... आणि नाही केलात तर तुम्ही जणू भिकारी आहेत असा look मिळेल !!!! कारण अशा पर्यटन स्थळी आजकाल सगळी जनताच "कमीशनखाऊ " झालेली आहे. ठिकाणे स्वतः:च ठरवा आणि तिथेच जा.. (मुन्नार ला eravikulam नॅशनल पार्क, KDHP टी museum अवश्य बघा.. कोची चे "navy museum " ही चुकवू नका.. थेक्कडी ला बोट ride टाळली तरी काही बिघडणार नाही.. (प्राणी ३/४ दिसले तर तुमचं नशीब.. नुसतीच hype करून ठेवलीये ...मात्र kalaripayattu show बघा ( मुन्नार वर thekaddy ला...)
11 May 2018 - 12:29 pm | अनुप ढेरे
मुन्नार भारी आहे. मुन्नार आणि आलेप्पि जरुन जावीत अशी थिकाणं आहेत. ठेकडी स्किप केलत तरी चालेल. त्यापेक्षा कोचीत फिरा एक दिवस. ५ दिवसात ही तीन ठिकाणं रग्गड होतील.
11 May 2018 - 12:47 pm | कंजूस
पण कुठून येणार?
परतणार कुठून?
------
कोची एर्नाकुलम साइडलाच अथिरापल्ली आहे. एवढे १७० किमी परत यावे लागेल. जमल्यास त्रिशुर गावातलेच प्रचंड मोठे वडक्कुनाथन मंदिर पाहा. अकरा ते पाच बंद असते. १३ तारखेला शिवरात्र आहे तेव्हा संध्याकाळी हजारो दिवे लावतात. गर्दी अजिबात नसते. १८ ला दिवे नसणार.
कालडिही अथिरापल्लीपासून दूर नाही.
प्लान अगोदरच ठरल्याने फार काही सांगता येत नाही.
11 May 2018 - 9:00 pm | दुर्गविहारी
नेमका जाण्याचा मार्ग आपण स्प्ष्ट केलेला नाही तरी सांगतो. मुन्नार तिथल्या चहाच्या मळ्यामुळे या दिवसातदेखील हिरवेगार असते. मुन्नारला किमान तीन दिवस आणि दोन रात्री मुक्काम आवश्यक आहे. इथे जवळ सह्याद्रीतील एक उंच शिखर पहायला मिळते. आजुबाजुला टाटा यांची टि-इस्टेट आहे. मात्र शिखरावर जाण्यासाठी परवानगी नाही. एरावीकुलम नॅशनल पार्क जरुर पहा. निलगिरी थार हा बोकडासारखा प्राणी ईथे बघायला मिळतो. मुन्नारमधेच "टि-म्युझियम" आहे. इथे चहा तयार करण्याची प्रकिया पहायला मिळते. एंट्री फि थोडी जास्त आहे. शिवाय एक नर्सरी बघण्यासारखी आहे. माटूपिट्टू डॅममधे बोटींग आणि टॉप स्टेशन या ठिकाणी जरुर जाउन या. चहाच्या मळ्यात एक चक्कर टाकायला हरकत नाही. श्क्य झाल्यास "जो जिता वही सिंकदर" मधील अमीरखानसारखी पोझ घेउन "उडता हि फिरु इन हवांओ मे कही" करता येईल. ;-)
टेकड्डीला पेरीयार नदीवर धरण बांधलेले आहे, त्याच्या बॅकवॉटरमधे बोटीने जाता येते. दोन्ही बाजुला असलेल्या जंगलात प्राणी दिसतात म्हणे. मी सपत्नीक गेलो असता , उशीर झाल्यामुळे हि राइड हुकली. एकप्रकारे बरेच झाले, कारण गेलेल्या कोणालाही प्राणी दिसले नाहीत. फक्त वेळ आणि पैसे वाया जातात. तेव्हा हे करायचे कि नाही ते ठरवा. जवळच एक दोन कि.मी.चा जंगलट्रेक आयोजित करतात. मी गेलो होतो तेव्हा या ट्रेकसाठी ५००/- रु फि होती. सह्याद्रीत असंख्य ट्रेक केलेल्या मला हा प्रकार पटला नाही. मात्र या बोटीच्या ऑफिसच्या परिसरात आम्हाला निलगिरी वानर, शेकरु, नंदननाचण असे बरेच प्राणी , पक्षी दिसले. त्यापेक्षा टेक्कडीत याच रस्त्यावर असलेल्या दुकानात मसाले खरेदी करा. शिवाय संध्याकाळी कलाडी या केरळी युध्दकलेची प्रात्यक्षिक दाखविण्याचा शो असतो, तो चुकवू नका. तिथेच कथ्थकली हे केरळी नृत्य दाखविणारा शो असतो, तो हि बघाच. थेकड्डीला ऑईल मसाज चांगला करतात, त्याचाही न विसरता आनंद घ्या.
थेकड्डीवरुन अलेप्पीला निघाले कि घाटात एका ठिकाणी मसाल्याचा मळा आहे, तिथे भेट द्यायला हरकत नाही. व्हॅनिलाचे झाड बघायला मिळेल हा मुख्य फायदा. बाकी दुतर्फा वेलदोडे, दालचिनी आणि रबर यांची झाडे दिसतात. घाटात मधेच शबरीमालाला जाणारा रस्ता फुटतो. वेळ असेल तर जायला हरकत नाही.
अलेप्पीला एक संध्याकाळ किनार्यावर घालवायला हरकत नाही. या पुर्वेच्या व्हेनिसमधे हाउस बोट राईड मस्टच. दोन फॅमिली एकत्र असतील तर एखादी रात्र हाउसबोटमधे घालवु शकता. अन्यथा आपल्या सोयीनुसार दोन-चार तासाची राईड घेता येईल. अलेप्पीला ईतर खरेदी जसे केरळी वस्तु, हॅमॉक घेता येतील. अलेप्पी-कोची रोडवर बरीच दुकाने आहेत.
अथिरापल्लीला मी गेलेलो नाही त्यामुळे पास. कोचीला वर सांगितल्याप्रमाणे नेवी म्युझीयम, मरीन ड्राईव्ह बघण्यासारखे आहे. केरळी पदार्थ खाउन कंटळला असाल तर इथेच तुम्हाला "दिल्ली चाट" जीभेची बाभळी घालवता येईल. याशिवाय फोर्ट कोची येथे कोची किल्ला आणि त्याच्या शेजारी चायनीज नेस्ट म्हणजे प्रचंड मोठे मासे पकडायचे जाळे पहायला मिळेल.
तुमच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.
11 May 2018 - 9:12 pm | कपिलमुनी
केरळला जायच बुकिंग केल्यावर धागा आला की गंमत वाटते. 5 दिवसाचा 3 माणसांचं बुकिंग केल्यावर काय प्लॅन द्यायचा ? बुकिंग करण्याअगोदर काहीतरी चौकशी केली असेल ना ?
अशा धाग्यावर उत्तरे द्यावी का हा प्रश्न पडतो
12 May 2018 - 6:57 am | कंजूस
"केरळला जायच बुकिंग केल्यावर धागा आला की गंमत वाटते. 5 दिवसाचा 3 माणसांचं बुकिंग केल्यावर काय प्लॅन द्यायचा ? ""
बरोबर.
शिवाय ते टॅक्सीवाले गुंडाळतात. त्यांचा कमिशनचा प्लान सांगून रोजडे ठराविक पैसे काढतात. हे सर्वच राज्यांत लागू आहे.
दुर्गविहारी - खरय.
12 May 2018 - 7:02 am | कंजूस
एकाला तर तिरुवनंतनिरम - कन्याकुमारी रसत्याला फार ट्राफिक आहे काम चालू आहे सांगून वेली रिझॅाटची महती गाऊन कटवलं. ( ८८ किमीऐवजी ८ किमि)
14 May 2018 - 1:52 pm | वैदेहीजी
दुर्ग विहारी नि सांगितल्या प्रमाणे मुन्नार मधेच किमान २ दिवस मुक्काम आवश्यक आहे. एरावीकुलम नॅशनल पार्क बरेच मोठे आहे. पुनर्जनि मधील कथ्थ कली शो आणि तेथीलच कलारीपयट्ट या प्राचीन मार्शल आर्ट चा शो बघण्यासारखा आहे . त्यांच्या चपळ हालचाली आणि पवित्रे विजे सारखे असतात. मी याचे चित्रण हि केले आहे https://youtu.be/Xd1lrzdrGr8 मट्टू पट्टी डॅम मधील बोटिंग ३०० ते ५०० आहे त्यामुळे आवड असल्यासच करावे
टाटा टि-म्युझियम मधील टी इस्टेट ब्रिटिषांच्या काळात कश्या डेव्हलप केल्या गेल्या याची अर्ध्या तासाची फिल्म हि दाखवतात. तिथे वेगवेगळ्या प्रकार चे चहा चाखायला मिळतात. अजून एक महत्वाचे ... टॅक्सी वाले फायनल करण्या आधी हिंदी-इंग्लिश स्पिकिंग आहेत का हे आधी विचारून घ्या नाही तर प्रचंड डोकेदुखी होते