बरेच महीने कोकणची वारी झाली न्हवती, २८,२९,३० एप्रिल अणि १ मे अशी सलग ४ दिवस लागुन सुट्टी आल्याने पुन्हा कोकणचा बेत आखला.
त्याबद्दलचा हा थोडक्यात वृतांत.
सोबतच्या ४ मित्रांना घेउन २८ एप्रिलला सकाळी बरोबर ७.३० वाजता एक्सप्रेस हायवेला लागलो, सलग सुट्ट्या असल्याने ट्राफिक जाम होण्याचा धोका होताच, खालापुर टोल नाक्याला ट्राफिकमुळ पाऊण तास गेला. तिथून पालीमार्गे ९.३० वाजता वाकणला पोहोचलो, १० वाजेपर्यंत नाश्ता आवरला अणि माणगावमार्गे न जाता रोह्यामार्गे जाण्याचे ठरवले. रस्ता खुपच ख़राब होता परंतु ट्राफिकची कटकट न्हवती. दुपारी १२.३० वाजता आगरदांडाला पोहोचलो. आता होडीत गाड़ी घालून पलिकडे दिघीला उतरायचे होते.
आगरदांडा
आगरदांडा सोडल्यावर
दिघीकडून दिवेआगर कड़े जाताना
साधारण २ वाजता इच्छित स्थळी पोहोचलो, ८०० रुपये प्रत्येकी ( २ वेळा मांसाहारी जेवण, सकाळी नाश्ता , २ वेळा चहा, पाण्याच्या बाटल्या, राहण्याची सोय, ) घेउन राहण्याची जी सोय होती ती फारच छान होती. ५- ६ खोल्या असलेल दुमजली घर , अंगणात छोटा झोका , मागे बाग, बागेत नारळ, सुपारी, फणस,आंब्याची झाडे, शेणाने सारवलेली जमीन अणि बागेत मस्तपैकी बसायची सोय. घरात टीवी फ्रिज, अश्या सुविधाही होत्या. अणि संपूर्ण घरात फक्त आम्ही ५ जण
केळीच्या पानावर जेवण वाढले होते, जेवणाचा मेनू- तांद्लाची भाकरी, बांगडा, चिकन , आमसूल ( आधी आम्हाला ते वरण वाटले होते ), भात,सोलकढी.
आयुष्यात पहिल्यांदाच बांगडा खाल्ला. खुप सुंदर. स्वस्त असतो त्यामुळ त्याला चव नसावी असा माझा समज होता , अणि खुप काटे असतात म्हणून आईनेही कधी घरी बनवला न्हवता.
जेवल्यानंतर थोडा आराम करुन ५ वाजता बीचवर निघालो.
आनंदाच्या भरात उड्या मारताना लेखक
असाच एक फसलेला प्रयत्न करताना कोंस्टेबल वाघमारे.
एका निवांत क्षणी इंस्पेक्टर महेश
शांत समुद्र किनारा
संध्याकाळी अंघोळ वेगैरे करुन बसलो.
५ मित्र, समुद्र किनारा, थंडगार बियर, जोडीला खारे शेंगा, चकली, सुरमई,मोबाईलला रेंज नाही, मस्त जेवण, रहायला ६ खोल्यांचे घर, सुख सुख म्हणतात ते आणखी का्य असते?
क्रमशः
प्रतिक्रिया
8 May 2018 - 9:31 pm | पद्मावति
मस्तच. पु.भा.प्र.
9 May 2018 - 11:13 am | दुर्गविहारी
मस्त लिहीलयं. बाकी झेड सिक्युरिटि घेउन गेला असल्यामुळे फार काळजी नव्हतीच. ;-)
पु. भा.प्र.
9 May 2018 - 11:54 am | अभ्या..
अरे मस्तच. मिशा जबरदस्त मेंटेन केल्यात राव. एकच लंबर. तब्येतीला शोभत्यात अगदी.
9 May 2018 - 12:02 pm | अभ्या..
आणि ते राहिलात तिथला नंबर पत्ता आणि लोकेशन द्या की प्लीज.
10 May 2018 - 6:52 pm | पुंबा
++१११
9 May 2018 - 12:18 pm | प्रचेतस
दिवेआगरचा किनारा पूर्वी भुसभुशित पांढर्या/सोनेरी वाळूचा होता, पाच सहा वर्षांपूर्वी कुठलेसे जहाज किनार्यानजीक फुटल्यामुळे किनारा जो बदलला तो बदललाच. आताचा किनारा काळपट चिखलयुक्त झालाय. शिवाय किनार्यावर खाद्यपदार्थांच्या गाड्या असल्याने कचराही भरपूर असतो.
9 May 2018 - 1:16 pm | सतिश पाटील
धन्यवाद पद्मावती, दुर्गविहारी, अभ्याशेट.
प्रचेतस म्हणतायत ते खरे आहे. २०१० पासून वर्षातून २ वेळा तरी दिवेआगर ला जाण होत. सुरुवातीला हा किनारा अगदी स्वच्छ अणि कमी गर्दीचा होता, पण त्यानंतर आज पर्यंत इतका बदलला की विश्वास बसत नाही. त्या तेलाच्या जहाजाच्या अपघाताने किनारा काळवंडला. सोन्याचा गणपती चोरीला गेला ते बरेच झाले नाहीतर उगाच लोक गर्दी करतील असे वाटायचे. तरीपण लोकांमधे हा किनारा प्रसिद्ध झाला अणि पर्यटक टेम्पो ट्रेवलर अणि बस भरून यायला लागले.
किनारयाला वाटर स्पोर्ट्स आले, खाण्याच्या गाड्या लागल्या, कचरा तर इतका की पूर्ण किनारपट्टीच एक कचरा कुंडी झाली. वालुतुन अनवाणी चालण अवघड झाले, जागोजागी फुटलेल्या बाटल्या. पर्यटक दिवसा देखील किनार्यावर बसूनच दारू ढोसत असतात.
आजकल पर्यटन म्हणजे घरापासून दूर जाऊन पाहिजे तशी दारू ढोसने अणि खाण.
आम्ही गेलो ती जागा दिवेआगर नसून त्याच्याजवळची आहे. नाव मुद्दाम सांगत नाही. उगाच लोकांची गर्दी व्हायची.
10 May 2018 - 6:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>आम्ही गेलो ती जागा दिवेआगर नसून त्याच्याजवळची आहे. नाव मुद्दाम सांगत नाही. उगाच लोकांची गर्दी व्हायची.
सांगा ना भो.
-दिलीप बिरुटे
11 May 2018 - 2:52 pm | सतिश पाटील
व्यनी केलय डॉ साहेब.