लवंगी चहा

Primary tabs

खिलजि's picture
खिलजि in पाककृती
8 May 2018 - 4:26 pm

तर मित्रानो , आजपासून मी आपल्यासाठी ( अर्थात पुरुषांसाठी फक्त ) , हा महिना स्पेशल पाकृ आणणार आहे . मी चहाचा शौकीन असल्याने सुरुवात चहापासून करत आहे . पण त्याआधी दोन ओळी ( सवयीप्रमाणे सादर करीत आहे .. ह घ्या )

बायको गेली तिच्या आजोळी

चहा प्यावा वेळीअवेळी

टाकावी थोडीशी लवंगी कापून

रडावं तिच्या नावानं गळा काढून

तर मंडळी असा हा फर्मास चहा मी इथे पाकृ मंचावर आपल्यासाठी घेऊन येत आहे .

लागणारे साहित्य :

एक छोटा टोप, दोन चमचे साखर , एक चमचा चहापावडर आणि थोडं आलं आणि फक्त नि फक्त एक लवंगी मिरची

कृती : सर्वात आधी टोप घ्यावा , दीड कप पाणी घ्यावे . ते मस्त उकळू द्यावे . त्यामध्ये वरील प्रमाणे चहापावडर आणि आले टाकावे . तेही उकळू द्यावे . चहाचा सुगंध जरा दरवळू द्यावा आणि मग त्यामध्ये साखर टाकावी . सर्व उकळी व्यवस्थित आली कि त्यामध्ये वर जी सांगितली आहे " लवंगी मिरची ती घ्यावी . तीच शेंडीकडचा भाग , (भाग नव्हे तुकडा ) कापून त्या उकळणाऱ्या चहामध्ये घालावा . थोडा असा हिरवट लाल रंग येईल मग पटकन गॅस बंद करावा . आणि तो चहा लगेच स्वतः प्यावा .

मित्रानो तर हा कावा , तुम्हीही एकदा घरी करावा , तोंड लाल होण्यासाठी वेळ मिळावा , म्हणून फक्त एखादा रविवार निवडावा ..
उर्वरित पाकृ भाग पुन्हा येईल , तोपर्यंत नमस्ते , जयहिंद जय महाराष्ट्र ... क्रमश:

सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया

लवंग घातलेला चहा असेल असे शिर्षकावरुन वाटले होते पण इकडे तर लवंगी मिरची निघाली.

गोड चहात लवंगी मिरची कितपत आवडेल ठाउक नाही. एखाद्या वेळेस बीनसाखरेच्या काळ्या चहात चांगली लागेल असे वाटते. (करुन पहायला पाहिजे)

पण पांढर्‍या बकार्डीच्या ग्लासात एखादा तुकडा लवंगी मिरची टाकली तर वेगळीच मजा येते.

या वरुन आठवले आद्य मद्यगुरु सोत्री यांनी त्यांच्या कॉकटेल रेसिप्यांमधे पण एक तिखट कॉकटेल रेसिपी दिली होती. (शोधायला पाहिजे)

आजकाल ते इकडे नव्या पाकृ टाकत नाहीत. कुठे गायबलेत कोणास ठाउक?

पैजारबुवा,

खिलजि's picture

8 May 2018 - 4:58 pm | खिलजि

अहो करून बघा एकदा . आजकाल आमचि हि तिच्या आजोळी गेल्यापासून रोज संध्याकाळी नियमित सेवन चालू आहे . तिखट गॉड वाईच बरं वाटतं. एकांतात तर अहाहा , धमाल येते . डोळ्यात पाणी आणल्यावाचून राहत नाही .

चित्रगुप्त's picture

8 May 2018 - 5:12 pm | चित्रगुप्त

आमच्या हिच्या आईचं वय आहे त्र्याणौ वर्षे. आणि आजोळचे सगळे तिच्याआधीच वरती गेलेत, तर ही आता आजोळी कशी जाणार ? तरीपण करून बघावा म्हणतो हा च्या.

खिलजि's picture

9 May 2018 - 2:38 pm | खिलजि

जरूर करून बघा , साहेब आणि कळवावी आम्हाला चव . कशी आहे ते .

अभ्या..'s picture

8 May 2018 - 8:14 pm | अभ्या..

ए चाय गरम

एक मुंगी दुसरीला : अगं ती पातेली धुंडाळायला जाऊ नकोस. माझं तोंड भाजलं.