कमी बजेट मध्ये कुठली गाडी घ्यावी ??

राहुल करंजे's picture
राहुल करंजे in तंत्रजगत
22 Apr 2018 - 1:50 pm

नमस्कार..
मला कुटुंबासाठी म्हणजे चार व्यक्तींसाठी कार घ्यायची आहे , माझे रोजचे फिरणे नाही पण मला लाँग ड्राईव्ह ला जायला आवडते कुटुंबासमवेत , मला सर्वात जास्त पर्यटन आवडते , माझे नाशिक जळगाव कोल्हापूर जाणे होते , कोल्हापूर हे आवडते ठिकाण म्हणून , पण मला सीएनजी कार घ्यावी की नको त्याचे फायदे तोटे तसेच कुठली गाडी घ्यावी कमी बजेट मध्ये ??? याचे मार्गदर्शन झाले तर मला खूप मदत होईल...

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

3 May 2018 - 11:53 am | अभ्या..

कसे?

टवाळ कार्टा's picture

3 May 2018 - 11:10 pm | टवाळ कार्टा

तू कटलास आता....उपयोग नाही तुला

मराठी कथालेखक's picture

3 May 2018 - 2:16 pm | मराठी कथालेखक

काही प्रतिसादांत स्वतःची कार वापरणे अत्यंत खर्चिक पडते म्हणून टॅक्सी /झूमकार सारखी भाड्याची कार वापरणे योग्य असा एक सूर दिसतो , त्या अनुषंगाने मला काही मुद्दे मांडावेसे वाटतात
१) ओला -उबेरची पिक अवर चार्जेस खूप जास्त असू शकतात (दुप्पट /तिप्पट) याचा विचार करावा
२) रात्री अपरात्री , अडीअडचणीच्या वेळी ओला/उबेर वेळेत उपलब्ध होईलच असे नाही. माझी पत्नी माहेरी गेल्यावर विमानाने परत येते ती रात्रीची वेळ असते (१०.३० वा ११:३० ला येणारे विमान) यावेळी टॅक्सी मिळत नाही हा अनुभव आहे. यामुळे मी आता कार घेवूनच पत्नीला आणायला जातो. सणांच्या दिवशीही ओला/उबेर सहजतेने मिळत नाही.
हीच गोष्ट अडीअडचणीच्या वेळेची ..रात्री अपरात्री घरातील कुणाला रुग्णालयात नेण्याची वेळ आल्यास ओला उबेर येण्याची वाट बघत राहणे क्लेशकारक ठरु शकते, अर्थात कार बाळगणार्‍या एखाद्या शेजार्‍याशी आपले स्नेहाचे संबंध असतील तर या अडचणीवर मात करता येईल.
३) ओला/उबेरच्या ड्रायवर्सचा , कारचा अनुभव नेहमीच सुखद असेल असे नाही. काही दिवसापुर्वी मी माझी कार सर्विसिंगला देवून उबेरच्या टॅक्सीने घरी येत असताना एप्रिल महिन्यात सकाळी ११:३० ला तापलेल्या उन्हात त्या कारचे एसी बंद पडलेले असल्याने प्रवास सहन केला !!
४) झालेच तर अधिकाधिक लोकांचे ओला-उबेरवर अवलिंबत्व वाढले तर मागणी /पुरवठाच्या तत्वाप्रमाणे ही सेवा लवकरच महाग होईल.
५) ओला उबेरच्या कॅबमधून दिवसभरात अनेक लोकांनी प्रवास केलेला असल्याने वृद्ध , लहान मुले , रुग्ण यांना आतील हवेने काही बाधा (इन्फेक्शन) होण्याची शक्यताही लक्षात घ्यायला हवी.
६) स्वतःची कार नसेल तर तुम्ही चांगलं ड्रायविंग शिकाल काय , किंवा सरावाशिवाय तुमच्या ड्रायविंगमध्ये सफाई येईल का याचाही विचार करा.

माझ्याकडे एक कार आहे . पण ओला-उबेरने मी बराच प्रवास केला आहे ...भविष्यातही करेन (खास करुन पावसाळ्यात --जेव्हा मी बाईक वापरत नाही.. ), त्यामुळे मी जे काही मुद्दे मांडले ते थेट अनुभवावर आधारलेले आहेत... जर बाईक वापरायचे बंद करुन वर्षभर फक्त कारने प्रवास करायचा असे मी ठरवले तर मात्र वर्षभर ओला-उबेर वापरण्यापेक्षा आणखी एक कार विकत घेवून मी माझी गरज भागवेन
बाहेरगावच्या जास्त दिवसाच्या प्रवासाकरिता झूमकार वा तत्सम पर्याय सुचवला गेला आहे ..या सेवेचा मी अजून अनुभव घेतला नाही म्हणून त्याबद्दल बोलू शकत नाही.

बाकी ट्रॅफिक पोलिसाकडून उगाच दंड, चिरमिरी , मेन्टेनन्सचा प्रचंड खर्च ई भिती अनाठायी वाटतात. माझ्याकडे सहा वर्षापासून इंडिका विस्टा क्वाड्राजेट ही कार आहे.
तिचा वार्षिक सर्विसिंगचा खर्च सहा ते आठ हजाराच्या घरात आहे. बॅटरी साडे पाच वर्षांनतंर बदलली. सुरवातीचे गुड इयरचे टायर्स ट्युबलेस त्रासदायक ठरलेत शिवाय पंक्चरवाल्यांनी अजून त्यांची वाट लावली ..मग ३४ हजार किमी नंतर ते बदललेत. आता ब्रिजस्टोनचे ट्युबलेस टायर्स मस्त चालले आहेत (या टायर्सनी २० हजार किमी ओलांडलेत) . नायट्रोजन भरतो आणि आता क्वचित पंक्चर झालाच तर अगदी खात्रीशीर ठिकाणीच पंक्चर काढून घेतो.
तात्पर्य , तुमचं रनिंग आणि बजेट कमी असेल तर कमी किमतीची नवी (टियागो /इऑन /क्विड/नॅनो हे चांगले पर्याय ठरु शकतील) वा जुनी पण सुस्थितीतील कार घ्यावी. पण एकूणातच कुटूंबाकडे एखादी कार असणं उत्तमच (अगदीच अशक्य असेल तर गोष्ट निराळी). फारच कमी रनिंग असेल आणि जवळपास राहणारा एखादा जवळचा नातेवाईक , मित्र असेल तर गरजेप्रमाणे त्याला योग्य मोबदला देवून त्याची कार चालवण्यासाठी तुम्ही त्याच्याशी काही वाटाघाटी करु शकलात तर मग तुम्ही कार घेण्याची गरज नाही.

पाषाणभेद's picture

10 May 2018 - 9:30 am | पाषाणभेद

निस्सान डाटसन गो आणि रेनॉची क्वीड चा अनूभव कसा आहे? सर्वीस कशी आहे? काही अनूभव?

सतिश पाटील's picture

10 May 2018 - 11:39 am | सतिश पाटील

अंगाने किडमिडित अणि उंचीने ५ फूटा खालचे ४ लोक बसणार असतील तर क्विड बरी आहे. त्यामानाने रेडी-गो चांगली आहे.

असंका's picture

10 May 2018 - 12:19 pm | असंका

प्राइड अँड प्रिज्युडिस:

“I do not believe a word of it, my dear. If he had been so very agreeable, he would have talked to Mrs. Long. But I can guess how it was; every body says that he is ate up with pride, and I dare say he had heard somehow that Mrs. Long does not keep a carriage, and had come to the ball in a hack chaise.”

"Hack chaise" ~ taxi cab today..

लई भारी's picture

10 May 2018 - 12:20 pm | लई भारी

आधी बऱ्याच जणांनी टियागो सांगितली आहे. मी वापरली नाही, पण रिव्ह्यू चांगले आहेत आणि टाटा झेस्ट गेली ३ वर्ष/५५,०००० किमी वापरली आहे, त्यामुळे टाटा गाडी विषयी खात्रीने सांगू शकतो.
हायवे साठी निश्चित पेट्रोल/डिझेल बरी पडेल, रनिंग जास्त असेल तर डिझेल बेस्ट.

ओला/उबर/झूम इ. आणि वैयक्तिक गाडी यातला पर्याय स्वतःच्या आवड/स्वभाव/काय-सहन-करू-शकतो या गोष्टींवर अवलंबून आहे.
गाडी चालवण्याची आवड, convenience या गोष्टींच्या पुढे मी ट्राफिक, पार्किंग, मेंटेनन्स इ. खर्च आणि इतर ताप सहन करू शकतो म्हणून गाडी चालवतो.
बऱ्याच वेळेला आम्ही शहरात गर्दी च्या ठिकाणी जायचं तर मग घेतो ओला वगैरे. किंवा मला लॉन्ग ड्राइव्ह शक्य नाही तर ड्रायव्हर किंवा भाडयाने गाडी घेतली असे करतो.
खूपच वैयक्तिक प्रश्न आहे, generalize नाही करू शकणार :)

राहुल सर ,मारुती च्या प्री ओन्ड कार शोरूम मध्ये जा
साधारण पणे दोन अडीच लाखा पर्यंत छानशी कार मिळून जाईल
हौस होईल, प्रवास होईल आणि एक छोटासा स्टेटस सिम्बॉल पण होऊन जाईल

रोज वापरण्या साठी मात्र तू व्हेलर वापरायची....गाडी महिन्यातून तीन चार वेळाच वापरायची
(हा माझा स्वतःचा अनुभव )

कपिलमुनी's picture

12 Jun 2018 - 8:32 pm | कपिलमुनी

मिपावर मदत धाग्यात मिपाकर वेळ काढून टंकनश्रम करून प्रतिसाद देतात. पण गरज सरो वैद्य मरो नुसार लोक नंतर काय झाले याचा फीडबॅक देत नाहीत.
फार कमी वेळा लोकांनी सल्ल्याचा उपयोग झाला का ? अनुभव कसा आला वगैरे परत येऊन धाग्यावर सांगितले नाही.