चिकन बिर्याणी स्टेप बाय स्टेप....

गणपा's picture
गणपा in पाककृती
8 Mar 2009 - 8:13 pm

आज परत रैवार, कोंबडीचा घातवार . लवंगीतै नी शोनुतैंनी दोन कोंबड्या आधीच कापलेल्या हैत. आम्ची बी एक गोड मानुन घ्या.

कच्चा माल :
१ कोंबडी, ३ कप बासमती तांदुळ (१०-१५ मिनिट भिजवलेला), गरम पाणी (तांदळाच्या दुप्पट).
प्रत्येकी २ चमचे हळद, मससाला/लाल तिखट, आल पेस्ट, लसुण पेस्ट,
२ मोठ्ठे कांदे लांब उभे कापुन.
खडा मसाला, जो मिलळेल तो. (माझ्याकडे दालचीनी , काळीमिरी, चक्रीफुल इतकच होत.)
३ चमचे बिर्यानी मसाला.
१ बटाटा (आवडत आसल्यास) लांब सळ्या (फ्रेंच फ्राइज च्या आकाराच्या उकडुन किंवा तळुन )
२ दही.
४-५ ऊभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या
मीठ, तेल अंदाज पंचे.

स्ट्येप १:
तर लेको सबसे पैले, एक कोंबडी आणा.
तीला नीट हळद, दही, तिखट, १/२ आल लसुण पेस्ट, मीठ लावुन मस्त १/२ तास मुरत ठेवा.

स्ट्येप २:
मोठ्या भांड्यात तेल कडकडीत तापवा. त्यात खडा मसाला टाकुन थोड परतुन घ्या.

स्ट्येप ३:
त्यात कांदा, हिरव्या मिरच्या टाकुन कांदा गुलाबी होइस्तो परता.

स्ट्येप ४:
उरलेली १/२ आल लसुण पेस्ट आणि बिर्यानी मसाला टाकुन परत तेल सुटे पर्यंत परता.

स्ट्येप ५:
दुसर्‍या भांड्यात थोड्या तेलावर मुरवलेली कोंबडी अर्धवट शिजबुन घ्या. (साधारण ५ मिनिट मध्यम आचे वर.)

स्ट्येप ६:
पहिल्या भांड्यात, भिजवालेला तांदुळ टाकुन हलक्या हाताने परता. (जास्त ढवळल तर तांदुळ तुटुन बिर्याणी ऐवजी खिचडी तयार हुइल)
आमी कामात इतके मग्ण झालो की ह्या स्ट्येप नं. ६ चा फोटु काढायचा राहिला राव.

स्ट्येप ७:
तांदळात गरम पाणी टाका. झाकण ठेवुन दणदणीत वाफ येउद्या.

स्ट्येप ८:
भात अर्धवट शिजत आला की त्यात अर्धवट शिजवलेली कोंबडी टाका.

स्ट्येप ९:
हलक्या हातने मिक्स करा. मंद आचे वर तवा ठेवुन बिर्याणीच भांड तव्यावर ठेवा.

स्ट्येप १०:
या हादडायला.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

8 Mar 2009 - 8:15 pm | अवलिया

लै भारी र गणपा... आलुच हादडाया... :)

--अवलिया

भडकमकर मास्तर's picture

8 Mar 2009 - 8:21 pm | भडकमकर मास्तर

:P लाळग्रंथी उद्दिपीत झाल्या.......
छान फोटो...
धन्यवाद=D>
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

गणपा's picture

8 Mar 2009 - 8:27 pm | गणपा

नाना , मास्तर लै सुपर फास्ट प्रतिक्रिया..
ठ्यॉकू हा..
कधी येताय?

-गण्या.

नीलकांत's picture

8 Mar 2009 - 8:23 pm | नीलकांत

भूक लागलीये... आधीच मी आज चिकन खायचं नाही असं ठरवलं होतं....

आता मात्र बिर्याणीशिवाय भागणार नाही असं दिसतंय..

बघतो एफसी रोडवरच्या चैतन्य नॉनव्हेज मध्ये छान बिर्याणी भेटते तेथेच जाऊन येतो...

बाकी तुमची पाककृती फारच छान.

अवांतर : खास पाककृती विभागासाठी तोंडाला पाणीसुटलेल्या स्माईलीज असल्या तर मजा येईल राव !

नीलकांत

वेताळ's picture

8 Mar 2009 - 8:30 pm | वेताळ

कोणता सुड घेताय लेकानो...चिकन मसाला,चिकन रस्सा आणि त्यावर चार चांद गणपाची चिकन बिर्याणी......आलोच हादडाया....एकदम बेस्ट जमलिया.
वेताळ

टारझन's picture

8 Mar 2009 - 9:41 pm | टारझन

लाळ गळून डिहायड्रेशण झालेलं आहे !!! आता घसा सुकला

विसोबा खेचर's picture

9 Mar 2009 - 12:41 am | विसोबा खेचर

जाऊ दे!

तुम्ही सगळ्यांनी मिळून तात्याला छळायचंच, त्याला सुखाने जगू द्यायच नाही असं ठरवलेलंच आहे! तेव्हा आपलं काहीच म्हणणं नाही! :)

तात्या.

सुक्या's picture

9 Mar 2009 - 1:26 am | सुक्या

गणप्या .. गड्या लय झ्याक. आता एका कोंबडीचा बळी दिल्याशिवाय शांती लागणार न्हाय.
बगतो आजच करुन ..

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

लवंगी's picture

9 Mar 2009 - 3:17 am | लवंगी

नुसता फोटोबघुनच १ किलो वजन वाढल माझ

बिपिन's picture

13 Mar 2009 - 6:39 pm | बिपिन

एकदम मस्त मित्रा.
आता हानतो कोमडी दबुन.

संदीप चित्रे's picture

13 Mar 2009 - 7:11 pm | संदीप चित्रे

रेसिपी आणि फोटू झकासच हैत रं..

नाना चेंगट's picture

15 Jun 2012 - 1:17 pm | नाना चेंगट

हल्ली आमच्या गणपाच्या कीबोर्डावर फार धुळ जमली आहे असे आमच्या विश्वसनीय सुत्रांकडून समजते.

असो. बदलीन....

आनंदी गोपाळ's picture

15 Jun 2012 - 10:56 pm | आनंदी गोपाळ

हे अस्ले धागे वर काढून तोंडाला पाणी सोडायचं काम केल्या बद्दल निषेढ!
च्याय्ला! तो कीबोर्ड धुळीसकट खाऊन टाकावा वाट्टोय. तेव्हा किर्पा करा, आन गंपा भौचे धावे वर काढनं थाम्ब्वा!