रांग रांग आणि रांग

मेथांबा's picture
मेथांबा in काथ्याकूट
8 Mar 2009 - 7:36 am
गाभा: 

आपण कुठल्यापण सरकारी कामाला जा, बहुतेक ठीकाणी आपला रांगेत बराच वेळ जातो.
अगदी इलेक्शन कार्ड चं काम असो किंवा पासपोर्ट काढायचा असो किंवा रेल्वेचं टिकिट काढायच
काम असो. सर्वत्र रांगच रांग. त्यामुळे किति ह्युमन वर्किंग अवर्स फुकट जातात त्याची कोणालाच
खंत नाही. आता सिध्दिविनायाकाची रांग म्हणाल तर तिथं उभं राहायचं कि नाही हे आपापल्या
मर्जीवर असतं पण इरत ठीकाणच्या रांगेचं काय?

त्याला अनेक कारणं आहेत. मुख्य म्हणजे अफाट लोकसंख्यावाढ. आता तुम्ही म्हणाल की
मलाच चार मुलं आहेत तर मला याविषयी बोलायचा अधिकार काय पण आमच्या वेळी तीन
चार मुलं असणं काही विशेश नव्हतं. पण तेव्हा ६० च्या दशकात पगार कमी असला तरी सौख्य
होतं. पैसा हातात नसला तरी दिवस आनंदात जायचे. आता सारखा लोकसंख्या विस्फोट झाला
नव्हता. मला तर चीन सारखा "एकच मुल" हा कायदा व्हायला हवा असं वाट्टत.
सगळ्या समस्यांवर ते एक छान उत्तर असेल. तुम्हाला काय वाटत?

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

8 Mar 2009 - 11:39 am | प्रकाश घाटपांडे

रांग वाढते कारण अनियंत्रित लोकसंख्या वाढते. लोकसंख्या वाढते कारण वैज्ञानिक प्रगती मुळे सरासरी आर्युमान ही वाढले आहे. लोकसंख्येचे व्यवस्थापन करणे अवघड जाते आहे. त्यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण करणे आवश्यक आहे.लोकसंख्यावाढीने मूलभूत सुविधांवर खुपच ताण येतो.
रांग कमी करणे सुव्यवस्थापनाने शक्य आहे. इंटरनेट च्या वापराने आता अनेक गोष्टी ऑन लाईन करता येतात. त्यामुळे रांग कमी होण्यास मदत झाली आहे.
मी हे भारत देश ही मध्यवर्ती धरुन लिहिले आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मराठमोळा's picture

8 Mar 2009 - 11:42 am | मराठमोळा

मला वाटत कि आजकाल लोक स्वत:च खुप हुशार झाली आहेत. एका मुलाचा खर्च परवडेनासा झालाय शहरात त्यामुळे दुसर्‍या मुलाचा प्रश्न दुरच. अशिक्षित थरातील लोकांबद्द्ल म्हणाल तर तिथे जागरुकतेची फार गरज आहे. एक किवा दोनच मुले असावीत आणी त्यामुळे आयुष्य कसे सुखी होइल हे पटवून दिले पाहिजे.
खरं पाहता तुम्ही म्हणता ती परिस्थिती फक्त मोठ्या शहरातच जास्त पहायला मिळते आणी सगळीकडे लोकसंख्याच जबाबदार आहे हे खरे नाही. सरकारी यंत्रणा सुद्धा बहुतांशी कारणीभूत आहे. किती सरकारी यंत्रणा संगणीकृत व उत्तम व्यवस्थापन्शास्त्राखाली कार्यान्वीत झाल्या आहेत आजपर्यंत? फार कमी.

आता तुम्ही म्हणाल की मलाच चार मुलं आहेत तर मला याविषयी बोलायचा अधिकार काय पण आमच्या वेळी तीन
चार मुलं असणं काही विशेश नव्हतं

याचा अर्थ एकच की सरकार किवा त्यावेळच्या पुढार्‍यांकडे दुरदृष्टी नव्हती. त्याच काळात जर दोनच मुले असावीत असा कायदा केला असता तर ही वेळच आली नसती.

आपला,
मराठमोळा.

मराठी_माणूस's picture

8 Mar 2009 - 12:14 pm | मराठी_माणूस

हा प्रश्न फक्त शहरापुरता मर्यादीत आहे. दुरदृष्टी न ठेवता एकाच ठीकाणी प्रगती होत राहील्यास हेच होते. छोटी छोटी गावे प्रगती पासुन वंचीत रहतात आणि मग तीकडचे लोक शहराकडे येतात मग शहरातल्या सोयी सवलतीवर ताण येतो.

गंधमादन's picture

8 Mar 2009 - 1:16 pm | गंधमादन

तुम्ही सगळे कम्युनिष्ट मिळुन आत्महत्या का नाही करत ?

भडकमकर मास्तर's picture

8 Mar 2009 - 7:25 pm | भडकमकर मास्तर

=))
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अडाणि's picture

9 Mar 2009 - 12:18 pm | अडाणि

एक नंबर ऊत्तर आणि ऊपाय !!!
-
अफाट जगातील एक अडाणि.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Mar 2009 - 12:35 pm | परिकथेतील राजकुमार

दे धक्का !!
ह्याला म्हणतात उपाय च्यायला ! 'सिधी बात , नो बकवास.'

=)) =))

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

रेवती's picture

8 Mar 2009 - 6:56 pm | रेवती

रांगा आहेत तरी ठीक आहे पण त्यातही बेशिस्त व घुसखोर किती मोठ्या संख्येनं असतात.
अफाट लोकसंख्या असणारा भारत हा काही एकमेव देश नाही. आता ज्या देशांनी तरीही सार्वजनीक ठिकाणी काही उपाययोजना राबवलेल्या आहेत.
त्यांच्याबद्दल विचार करणं दूर , नुसतं लिहून आलं व ते वाचलं गेलं तरी शिव्यांची लाखोली वाहणारे कमी नाहीत.
एका मुलाचा खर्च परवडेनासा झालाय शहरात त्यामुळे दुसर्‍या मुलाचा प्रश्न दुरच

तरीही एकाला दुसरं भावंडं पाहिजे असा अट्टाहास असणारे कमी नाहीत. ते सुशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षितही आहेत असे दिसून येतं.
रेवती

विनायक प्रभू's picture

8 Mar 2009 - 7:01 pm | विनायक प्रभू

पैसा हातात नसला तरी दिवस आनंदात जायचे.
तरीच.........

घाटावरचे भट's picture

8 Mar 2009 - 7:07 pm | घाटावरचे भट

=))

चिरोटा's picture

9 Mar 2009 - 9:28 am | चिरोटा

रेन्गाळत काम करणे,समोरच्या व्यक्तिचा हेतु प्रामाणिक दिसत असुनपण वेळ्काढुपणा करणे अशी काहि वैषिष्टे आपल्या नोकरशाहिचि आहेत.सन्गणकिकरणामुळे त्याला अर्थात काहि प्रमाणात खीळ बसलि आहे परन्तु म्हणावि तशि नाही.
पास्पोर्टचे उदाहरण घ्या- एक्स्पायर झाला असल्यास पुन्हा सगळि कागद्पत्रे द्यावि लागतात्.रेशन्,सोसाय्टिचे बिल्,ब्यान्केचे कागद वगैरे वगैरे ,भलताच पसारा.मात्र हिच नोकरशाही गुन्हेगार मन्डळिना २/३ पास्स्पोर्ट देते.!!