ताज्या घडामोडी - भाग २९

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
15 Apr 2018 - 7:58 pm
गाभा: 

कर्नाटक विधानसभेची निवडणुक १२ मे रोजी आहे. इंडिया टुडे च्या नवीन सर्वेक्षणानुसार निकालानंतर कर्नाटकात अशी परिस्थिती असेल.

भाजप - ७८ ते ८६
कॉन्ग्रेस - ९० ते १०१
निजद - ३४ ते ४३

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2018 - 10:35 pm | श्रीगुरुजी

'टाइम्स नाऊ' च्या नवीन सर्वेक्षणानुसार निकालानंतर कर्नाटकात अशी परिस्थिती असेल.

भाजप - ८९
कॉन्ग्रेस - ९१
निजद + बसप - ४०
इतर - ४

https://m.timesofindia.com/india/times-now-vmr-survey-predicts-photo-fin...

manguu@mail.com's picture

24 Apr 2018 - 12:42 am | manguu@mail.com

रघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे अशी माहिती समोर येते आहे. यु.के. मधील ‘फायनान्शिअल टाइम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बँक ऑफ इंग्लंड च्या गव्हर्नर पदाचे जे संभाव्य उमेदवार आहेत त्या यादीत सर्वात चर्चेत नाव आहे ते रघुराम राजन यांचेच. बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी कुणाला नियुक्त करायचे आहे याची प्रक्रिया ब्रिटनचे चान्सलर फिलीप हॅमंड सुरु करणार आहेत.

मार्मिक गोडसे's picture

24 Apr 2018 - 1:07 am | मार्मिक गोडसे

रघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे अशी माहिती समोर येते आहे.
फारच वाईट बातमी, भारताला डीवचण्याचा डाव आहे.

manguu@mail.com's picture

24 Apr 2018 - 1:45 am | manguu@mail.com

मोदींच्या मागेपुढे इंग्रज झेंडे घेऊन चालत होते ह्याचे फोटो मिरवण्यात भक्त दंग होते. मोदीनी गड जिंकला म्हणे !

गड आला नि सिंह गेला !

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 9:31 am | सुबोध खरे

आपला पगार किती
आपण बोलता किती

manguu@mail.com's picture

25 Apr 2018 - 9:15 am | manguu@mail.com

आपली पेन्शन किती
आपले टेन्शन किती

विशुमित's picture

25 Apr 2018 - 11:48 am | विशुमित

हाहाहा...!!

गामा पैलवान's picture

24 Apr 2018 - 1:49 am | गामा पैलवान

च्यायला तो फिलीप ह्यामंड एक चोर आहे. तो दुसऱ्या चोराला चोरबँकेचा गव्हर्नर करणार! तिहेरी संगम म्हणायचा!

-गा.पै.

मार्मिक गोडसे's picture

24 Apr 2018 - 7:17 am | मार्मिक गोडसे

पाठवा आपला ५६" चौकीदार, मग मजाच मजा. आव जाव घर तुम्हारा.

बिटाकाका's picture

24 Apr 2018 - 7:51 am | बिटाकाका

ते तथाकथित बँक घोटाळे याच महोदयांच्या कार्यकाळात झाले आहेत याबद्दल आपले काही मत नसेलच!!

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2018 - 9:28 am | श्रीगुरुजी

गुड आयडिया. त्यांच्यावर लक्श ठेवण्यासाठी तुम्ही सुद्धा आपला जगप्रसिद्ध पोकळ बांबू घेऊन जा.

manguu@mail.com's picture

24 Apr 2018 - 4:09 pm | manguu@mail.com

*मोदींना लंडन मुलाखतीत प्रश्न विचारणारे भाजपावालेच*

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लंडन दौरा आणि मोदींची वेस्टमिंस्टर हॉल मधील मुलाखत सर्वत्र लाईव्ह वर दाखविण्यात आली होती. मोदींच्या त्याच मुलाखती दरम्यान युवकानी मोदींना प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नांवर मोदींनी दिलेल्या उत्तराने सर्वच वर्तमान पात्रांचे मथळे भरून गेले होते. जणूकाही लंडन स्थित सामान्य युवकांनी पंतप्रधांना प्रश्न विचारला आणि त्यावर पंतप्रधानांनी अप्रतिम मार्मिक उत्तर दिल असा गवगवा करण्यात आला.

परंतु आता त्या प्रश्ना मागचं सत्य बाहेर आलं आहे. मोदींना लंडन मुलाखतीत प्रश्न विचारणारे भाजपावालेच होते हे आता उघडकीस आले आहे. तरणप्रीत सिंह नामक युवकाने नरेंद्र मोदींना एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न असा होता की, मोदीजी तुम्ही २०-२० तास काम करून सुद्धा थकत नाही! तुम्हांला ही ऊर्जा मिळते कुठून ? आम्हाला तुमच्या त्या फिटनेसच रहस्य सांगावं म्हणजे आम्ही सुद्धा आपल्या देशासाठी असं काम करू शकतो ? त्यावर मोदींनी एक उत्तर दिलं जे सर्वत्र बातम्यांमध्ये ठळक पणे दाखविण्यात आलं.

नरेंद्र मोदींनी त्या तरणप्रीत सिंह नामक युवकाच्या प्रश्नाला उत्तर दिल की, ‘मी जवळजवळ २० वर्षापासून रोज जवळजवळ दोन किलो शिव्या खात असतो’. मोदींनी दिलेलं हेच उत्तर सर्वच वर्तमान पत्रात हेडिंगला छापण्यात आला. इतकंच नाही तर मोदींच्या चाहत्यांनी हेच उत्तर समाज माध्यमांवर उदो-उदो जाण्यासाठी पुरेपूर वापरलं आणि व्हायरल सुद्धा केलं. वर्तमान पात्रात मथळे छापून आले की. एका सामान्य युवकाच्या प्रश्नाला नरेंद्र मोदी यांनी एका नव्या अंदाजात उत्तर दिलं. परंतु त्यातील वस्तुस्थिती समोर आली आहे. तरणप्रीत सिंह नामक युवक कोणी सामान्य युवक नव्हता.

मोदींना प्रश्न विचारणारा हा तरणप्रीत सिंह नामक युवक दुसरा तिसरा कोणी नसून भाजपचे झारखंडचे प्रवक्ते अमरप्रीत सिंह काले यांचा मुलगा आहे. अमरप्रीत सिंह काले यांचे नरेंद्र मोदी यांच्या बरोबरचे फोटोसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. आम आदमीच्या नेत्या अलका लांबा यांनी हे सर्व पुराव्यानिशी उघड करून हे सर्व ठरवून करण्यात आलं असा आरोप केला आहे. त्या पोस्ट मध्ये अमरप्रीत सिंह काले हे पोस्टमध्ये स्वतःच्या मुलाची ओळख करून द्यायला गेले आणि स्वतःच त्यात अडकले आणि पक्षाला सुद्धा उघडं पाडल अशी सर्वत्र चर्चा आहे. शिवकुमार पाटील हा सुद्धा भाजपच्या आय टी सेल मध्ये काम करतो व त्यांने कर्नाटक निवडणुका समोर असल्याने हेतूतः महात्मा बसवेश्वरांवर प्रश्न विचारला होता. अशा प्रकारे आधी ठरवून प्रश्न विचारायचे आणि मोदींनी पाठ केलेली उत्तरे द्यायची असा हा इव्हेंट होता असा आरोप अलका लांबा यांनी केला आहे.

भाजप या खुलाशाने चांगलीच तोंडघशी पडली आहे असं एकूण चित्र आहे. देशाबाहेर घडणाऱ्या या गोष्टी म्हणजे ठरवून केलेलं ‘इव्हेंट’ आहेत की काय असच सामान्य भारतीयांना वाटू लागलं आहे

https://www.maharashtranama.com/india/london-interview-exposed-by-aap-pa...

बिटाकाका's picture

24 Apr 2018 - 4:17 pm | बिटाकाका

आचं जालं व्हय, लैच मजाय की! हौर आंदो, लै प्रश्न विचारले गेले होते!

गामा पैलवान's picture

24 Apr 2018 - 5:30 pm | गामा पैलवान

पप्पूप्रमाणे बावळट नसणे हा घोर अपराध मोदी करताहेत. म्हणून सगळी चिडचीड.

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2018 - 5:32 pm | श्रीगुरुजी

+ २० लाख

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2018 - 5:40 pm | श्रीगुरुजी

अलका लांबा म्हणजे तीच महिला ना जिने आपल्या डोक्यावर पट्टी बांधून भाजपच्या नेत्याने दगड मारल्याचा आरोप केला होता व नंतर तासाभरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी पट्टीची जागा बदलल्याचे उघडकीस येऊन तिची थापेबाजी सिद्ध झाली होती.

manguu@mail.com's picture

24 Apr 2018 - 8:11 pm | manguu@mail.com

भाजपाची नोटाबंदीची पट्टीही रोज सरकत होती.

बिटाकाका's picture

24 Apr 2018 - 9:24 pm | बिटाकाका

हो ना,आमचा पण कुलर नेमका उन्हाळ्यात बिघडल्याने उन्हाळ्याचा फार त्रास होतोय हो!!

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 6:02 pm | सुबोध खरे

मोदींना प्रश्न विचारणारा हा तरणप्रीत सिंह नामक युवक दुसरा तिसरा कोणी नसून भाजपचे झारखंडचे प्रवक्ते अमरप्रीत सिंह काले यांचा मुलगा आहे. अमरप्रीत सिंह काले यांचे नरेंद्र मोदी यांच्या बरोबरचे फोटोसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत.

हे आपल्या प्रतिसादातील वाक्य आहे

आणि

मोदींना प्रश्न विचारणारा हा तरणप्रीत सिंह नामक युवक दुसरा तिसरा कोणी नसून भाजपचे झारखंडचे प्रवक्ते अमरप्रीत सिंह काले यांचा मुलगा असून तो लंडन स्थित ‘University of Warwick’ येथे शिक्षण घेत आहे अमरप्रीत सिंह काले यांचे नरेंद्र मोदी यांच्या बरोबरचे फोटोसुद्धा प्रसिद्ध झाले आहेत.

हे मूळ लेखातील वाक्य आहे.

तो लंडन स्थित ‘University of Warwick’ येथे शिक्षण घेत आहे

हे वाक्य मोगा तुम्ही जाणीवपूर्वक गाळलंय.

याचा अर्थ साधा आणि सरळ आहे

असा दळभद्रीपणा केल्यामुळे तुमची विश्वासार्हता संशयास्पद होते असे वाटत नाही का तुम्हाला

सूज्ञांस सांगणे न लगे

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 6:03 pm | सुबोध खरे

हा प्रतिसाद मंगू उर्फ मोगा उर्फ जामोप्या उर्फ हितेश उर्फ चंपाबाई याना आहे.

manguu@mail.com's picture

24 Apr 2018 - 7:56 pm | manguu@mail.com

ते जसेच्या तसे चावडीवरुन कॉपी केले आहे.

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 8:17 pm | सुबोध खरे

उष्टं खाल्लं कि असं होतंय बघा.

manguu@mail.com's picture

25 Apr 2018 - 9:17 am | manguu@mail.com

तुम्हाला वरिजिनलपण दिले ना खायला ?

:)) मंडळी मग काय ठरलं थापेबाजीच्या स्पर्धेत कोणते नेतृत्व अधिक वेगवान आहे

सुबोध खरे's picture

24 Apr 2018 - 6:34 pm | सुबोध खरे

मोगा ला कोण हरवू शकेल?
इतक्या वेळेस हाकलल्या वर परत परत डू आय डी घेऊन मिपा वर येऊन अशा निवडून वेचून बातम्या टाकतात कि ज्याचं नाव ते.

डँबिस००७'s picture

24 Apr 2018 - 9:47 pm | डँबिस००७

त्याच काय आहे ना ! आता पर्यंत भारताचा ईतिहास हा जेत्यांनी लिहीला आणि तो त्यांनाच धार्जीणा असा होता असा विपर्यास मुघल मोगा
आता पर्यंत करत होता.
आता भाजपा चे मोदीच जेते आहेत आणी तो त्यांचा ईतितहास ते लि हीतात मग ह्यांना का टोचतय !!

विशुमित's picture

24 Apr 2018 - 11:39 pm | विशुमित

अरे वाह...
चांगलय चांगलय...

<strong>(संपादित)</strong>

माहितगार's picture

25 Apr 2018 - 9:54 am | माहितगार

भारतीयांचे जीन मिक्स आणि सिंधू सम्स्कृतीच्या लयाची कारणे पुन्हा एकदा बातम्यात आहे. आय आय टी खरगपूर वाल्यांनी सिंधू सम्स्कृती लयाच्या मागे ९०० वर्षे चाललेला दुष्काळ कारणीभूत असण्याची शक्यता वर्तवली आहे .

हडप्पा सम्स्कृतीत राहीलेल्या लोकांचे जीन्स अद्याप उपलब्ध झालेले नाही. राखी गढीतील छोटा सॅम्पल जीन अभ्यसासाठी दाखल झाला असला तरी त्याचा अद्याप रिपोर्ट नाही . पण एक वेगळ्यच अभ्यसावर पेपर आला आहे , ज्यात त्यांनी भारतच्या शेजरच्या प्रदेश ते स्टेप्पे प्रदेशातील प्राचीन लोकांचे जीन्स आणि सद्द् कालीन भारतीय जीन्स तुलना करुन काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केल आहे . त्या बद्दल या विषयात रुची असलेल्यांनी स्वतंत्र लेख लिहिणे उचित होईल अर्थात त्या अभ्यासातील दोन उणीवा म्हणजे भारतीय गुणसूत्रात ऑस्ट्रो एशियन जमातींचाही समावेश आहे त्याची दखलच या अभ्यासाने न घेणे या अभ्यासातील महत्वपूर्ण उणिव असू शकते . दुसरे भारतात अधिक पुरातत्वीय उत्खनेने होऊन प्राचिन सांगाड्यांवरुअन बर्‍यापैकी संख्येच्या सॅम्पलचा रिपोर्ट येत नाही तो पर्यंत असे अभ्यास किती डांगोरे पिटले तरी परीपूर्ण म्हणता येतील का या बाबत साशंकता शिल्लक राहते .

एनी वे एक परामर्ष लेखचा दुव देतो . इतर उत्साही मिपाकरांनी अभ्यासपूर्ण धागा काढण्यास वाव असावा.

जोधपूर: लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलीस कोठडीची हवा खात असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूसह त्याचे सहकारी शिवा, शिल्पी, शरद आणि प्रकाश यांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. जोधपूर न्यायालयाचे न्यायाधीश मधूसुदन शर्मा यांनी हा निर्णय दिला. दरम्यान, आसारामला काय शिक्षा ठोठावण्यात येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावेळी कोर्टाच्या बाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आसाराम बापूच्या शिक्षेनंतर कोणतीही हिंसा भडकू नये म्हणून राजस्थानसह तीन राज्यांत अॅलर्ट जारी करण्यात आला होता. विशेष म्हणजे जोधपूर मध्यवर्ती कारागृहाच्या कोर्टातच आसाराम बापूच्या शिक्षेवर सुनावणी करण्यात आली. यावेळी कारागृहाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिक्षेच्या पार्श्वभूमीवर जोधपूरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं होतं. जोधपूरला छावणीचं स्वरूप आलं होतं.
----

manguu@mail.com's picture

25 Apr 2018 - 12:20 pm | manguu@mail.com

आसाराम बलात्कारी नाही , असे मिपावर सतत घोकणारे एक आयडी होते ना ?

स्वधर्म's picture

25 Apr 2018 - 1:03 pm | स्वधर्म

न्यायव्यवस्थेबाबत अलिकडच्या काळात जे वादविवाद झाले, त्या पार्श्वभूमीवर चांगला निकाल अाला. असेच अाणखी सर्वधर्मिय धार्मिक नेते अात जावेत.

manguu@mail.com's picture

25 Apr 2018 - 11:37 am | manguu@mail.com

आपल्या फलंदाजीने अवघ्या क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारा सचिन तेंडुलकर, डावखुरा फलंदाज विनोद कांबळी आणि दादरची शारदाश्रम शाळा असे समीकरण बनले आहे. मात्र शाळा व्यवस्थापनाने आता शाळेचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असून ‘एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूल’ असे शारदाश्रम शाळेचे नामकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात शारदाश्रम शाळा हे नाव काळाच्या पडद्याआड जाणार आहे. या शाळेचे नाव बदलू नये अशी मागणी दादरमधील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 12:07 pm | बिटाकाका

आता मात्र मोदींनी यावर काहीतरी नक्कीच करावी. नुसत्या कानपिचक्या देऊन भागणार नाही. हा अतिशय थिल्लरपणा आहे असे मला वाटते. ह्या असल्या लोकांना सोबत घेऊन चालण्यापेक्षा त्या सीटवर पाणी सोडणे उत्तम!

https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/no-one-will-carry-him...

प्रसाद_१९८२'s picture

25 Apr 2018 - 12:36 pm | प्रसाद_१९८२

सध्या वादग्रस्त वक्तव्य करण्याचा सपाटा ज्या लोकांनी लावलाय ती लोक अशी वक्तव्य स्वत:च्या बुद्धींने करत असतील असे वाटत नाहीत. नक्कीच ह्या मागे मोदींचे पक्षांर्तगत हितशत्रु असावेत जे अश्या लोकांना पुढे करुन त्यांच्यातर्फे बेताल वक्तव्य करवुन घेत असावेत, जेणे करुन मोदींची प्रतिमा जनमानसात खराब होईल.

या मागे मोदीसुद्धा असण्याची शक्यता नाकारता येणार नाही का ?
प्रतिमां तर त्यांची घट्ट आहेच. काही बोलले तरी ती खराब होणार नाही असा त्यांचा दृढ विश्वास पण असू शकतो.
=====
२०१९ जवळ आले आहे त्यामुळे कारवाई तर दूर पण कानपिचक्या द्यायला सुद्धा आठवडा दोन आठवडे घालवतील. असो..

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 12:49 pm | मार्मिक गोडसे

२०१९ जवळ आले आहे त्यामुळे कारवाई तर दूर पण कानपिचक्या द्यायला सुद्धा आठवडा दोन आठवडे घालवतील.
उसका साबून स्लो हैंl

मार्मिक गोडसे's picture

25 Apr 2018 - 12:40 pm | मार्मिक गोडसे

अगदी बरोबर, पक्षात फक्त २.५ डोकी स्वतःच्या विचाराने चालतात. बाकी सारे बिनडोक