ताज्या घडामोडी - भाग २९

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
15 Apr 2018 - 7:58 pm
गाभा: 

कर्नाटक विधानसभेची निवडणुक १२ मे रोजी आहे. इंडिया टुडे च्या नवीन सर्वेक्षणानुसार निकालानंतर कर्नाटकात अशी परिस्थिती असेल.

भाजप - ७८ ते ८६
कॉन्ग्रेस - ९० ते १०१
निजद - ३४ ते ४३

प्रतिक्रिया

धर्मराजमुटके's picture

15 Apr 2018 - 10:45 pm | धर्मराजमुटके

तुमच्या अभ्यासानुसार भाजपा कर्नाटकात हरायला पाहिजे कारण जे कर्नाटकात हरतात तेच केंद्रात सत्तेत येतात असे तुम्ही कुठेतरी लिहिल्याचे वाचले. बघुया काय होते ते. तुमच्या म्हणण्यानुसार घडले तर काँग्रेस ला काही दिवस आनंदात काढता येतील आणि भाजपा ला २०१९ ला आनंदोत्सव साजरा करता येईल. एकंदरीत विन विन सिच्युएशन आहे !

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2018 - 3:18 pm | श्रीगुरुजी

१९८३ पासून असा इतिहास आहे की राज्यात सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष व केंद्रात सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष वेगवेगळे असतात किंवा एकाच पक्षाला दोन्हीकडे सर्वाधिक जागा मिळाल्या तर राज्यात व केंद्रात वेगवेगळे पक्ष सरकार स्थापन करतात. १९८९ ला थोडासा अपवाद होता. त्यावेळी राज्यात खांग्रेसला बहुमत होते व केंद्रात १९५ जागा जिंकून खांग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु केंद्रात सरकार स्थापन झाले ते जनता दलाच्या वि. प्र. सिंगांचे. २००४ मध्येही थोडीशी वेगळी परिस्थिती होती. तेव्हा राज्यात भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष होता तर केंद्रात खांग्रेसला सर्वाधिक जागा होत्या. परंतु केंद्रात इतर पक्षांच्या मदतीने व राज्यात निजदच्या मदतीने खांग्रेसचेच सरकार स्थापन झाले होते.

विशुमित's picture

16 Apr 2018 - 4:37 pm | विशुमित
विशुमित's picture

16 Apr 2018 - 4:37 pm | विशुमित
विशुमित's picture

16 Apr 2018 - 5:02 pm | विशुमित
श्रीगुरुजी's picture

16 Apr 2018 - 2:06 pm | श्रीगुरुजी

महाराष्ट्रातील या गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षानंतर वीज व एस टी सेवा पोहोचली.

http://indianexpress.com/article/india/maharashtra-bulumgavan-village-ge...

विशुमित's picture

16 Apr 2018 - 4:31 pm | विशुमित

मग बॉम्बस्फोट कोणी केला?
54 साक्षीदार फिरले याचे कुतूहल वाटले.
ही फाईल रिओपन होऊन लवकरात लवकर गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे.

manguu@mail.com's picture

16 Apr 2018 - 4:38 pm | manguu@mail.com

परकीय शक्ती

श्रीगुरुजी's picture

16 Apr 2018 - 5:14 pm | श्रीगुरुजी

देशात २५-३० वर्षे जे बॉम्बस्फोट करीत आहेत त्यांच्यापैकीच कोणीतरी यामागे असणार.

manguu@mail.com's picture

16 Apr 2018 - 6:42 pm | manguu@mail.com

खून , कट , स्फोट अशा खटल्यातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटणारे या देशाने १९४८ पासून पाहिले आहेत आणि तुम्ही फक्त २५ वर्षाच्या गोष्टी करता ?

सुबोध खरे's picture

16 Apr 2018 - 7:29 pm | सुबोध खरे

संशयाचा फायदा देऊन/सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटणे

आणि

राजकीय कारणासाठी नाव खटल्यात गोवलेले असताना कोणताही पुरावा नसल्याने न्यायालयाने निर्दोष सोडणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

आणि १९४८ पासून त्याची सुरुवात झाली आहे.

पण तुम्हाला तो समजणार नाही तेंव्हा सोडून द्या

भंकस बाबा's picture

17 Apr 2018 - 8:05 pm | भंकस बाबा

मंगू मेल्या पयल्यापासून तू इतिहासात कच्चाच

ज्या NIA च्या अधिकाऱ्यांनी पुरेसा सबळ पुरावा नसताना ही यांना तुरुंगात टाकले त्यांचेवर देशाची दिशाभूल केल्याबद्दल खटला चालवून शिक्षा करता येईल का?

manguu@mail.com's picture

16 Apr 2018 - 6:38 pm | manguu@mail.com

तशी सोय नाही.

पोलिसाना तपासात आरोपी मिळणे व कोर्टात ते गुन्हेगार सिद्ध होणे , या दोन भिन्न प्रक्रिया आहेत.

गामा पैलवान's picture

16 Apr 2018 - 9:56 pm | गामा पैलवान

एका बकरवाल माणसाची मुलाखत इथे आहे :

https://www.facebook.com/tgtpost/videos/2122302284655399/

त्यात मुलाखतदाता १ मिनिट ३८ सेकंदांनंतर स्पष्टपणे म्हणतोय की त्यांचा राज्य पोलिसांवर आजिबात विश्वास नाही. हत्येनंतर ७ दिवसांनी मुलीचं प्रेत मिळतं ते म्हणे हिंदू मंदिरात! जनता असल्या भूलथापांवर विश्वास ठेवायला मूर्ख आहे का?

रोहिंगे मुस्लिम येण्याआधी कोणी कधी असले प्रकार ऐकले होते का या प्रांती? मग रोहिंगे घुसल्यावर जर हा प्रकार होत असेल तर जे कळायला पाहिजे ते कळून येतं, नाहीका?

रोहिंग्यांनी अत्याचार करायचे आणि नाव मात्र हिंदूंचं. खासा न्याय आहे.

-गा.पै.

गामा पैलवान's picture

9 Aug 2021 - 9:06 pm | गामा पैलवान

मुलाखतीचा सुधारित दुवा : https://www.facebook.com/watch/?v=1676421599101165

-गा.पै.

गामा पैलवान's picture

17 Apr 2018 - 5:30 pm | गामा पैलवान

बाबरी मशीद असा उल्लेख न करता राममंदिर हे योग्य नाव वापरल्याबद्दल सरसंघसंचालक श्री. मोहन भागवत यांचं अभिनंदन!

बातमी : भारतीयांनी नव्हे विदेशी शक्तींनी पाडले राम मंदिर

-गा.पै.

मार्मिक गोडसे's picture

17 Apr 2018 - 6:15 pm | मार्मिक गोडसे

म्हणूनच आपले संस्कृती रक्षक विदेश्यांकडून ठोकून ठोकून कबुल करून घेण्यासाठी विदेशात तळ ठोकून आहेत.

हे असेच मुद्दे काढले जातील अशी खात्री वाटते. सर्वत्र अपयशी होत असलेल्या सरकारचा बचाव अश्या प्रकारे थातूरमातूर मुद्दे मिडियाला चघळायला देऊन करण्याचा जुनाच डाव भागवत खेळताहेत. हे आता वाढत जाईल.

आनन्दा's picture

17 Apr 2018 - 9:47 pm | आनन्दा

हा हा..
ते आशिफा प्रकरण पण यांचाच डाव आहे वाटतं..
कळलंच नव्हतं मला आजपर्यंत

manguu@mail.com's picture

17 Apr 2018 - 11:53 pm | manguu@mail.com

कठुआतील ८ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. हे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. त्यात चंद्र प्रकाश गंगा आणि चौधरी लाल सिंह हे भाजपचे दोन मंत्री सहभागी झाले होते. या दोन्ही मंत्र्यांना जनक्षोभामुळे आधीच राजीनामे द्यावे लागले असून आज उरलेल्या सर्व ९ मंत्र्यांचे राजीनामे भाजप नेतृत्वाने घेतल्याने जम्मू-काश्मीरच्या राजकारणात भूकंप झाला आहे. 

मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या इशाऱ्यामुळे भाजपला हा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे. ज्या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत त्यांची खाती बदलली जातील. मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जातील. याबाबत मेहबूबा मुफ्ती यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले जात आहे. 

मेहबूबा मुफ्ती यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या वाट्याला ११ मंत्रिपदं आलेली आहेत. या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यानंतर फेरबदल करताना यातील काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची तर काही नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

सुबोध खरे's picture

18 Apr 2018 - 11:45 am | सुबोध खरे

बरं मग?

manguu@mail.com's picture

18 Apr 2018 - 12:42 pm | manguu@mail.com

रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पासाठी गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. नाणारमध्ये तब्बल तीन लाख कोटींची गुंतवणूक असलेल्या रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जमिनीचं अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. खरंतर नाणारमध्ये सर्व जमिनी या स्थानिक शेतक-यांच्या आहेत. मात्र फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, नाणारमध्ये जमीन खरेदी करणा-यांपैकी ८६ पैकी ३८ जण व्यापारी असून यामध्ये मोदी, जैन, शाह, झुनझुनवाला यांची नावे आहेत. २ मे २०१७ ते १९ जानेवारी २०१८ दरम्यान म्हणजे फक्त आठ महिन्यांत व्यापा-यांनी जवळपास ५५९ एकर जमीन खरेदी केली आहे. यावरुन राजकारणी आणि व्यापा-यांची साटंलोटं असल्याचं सिद्ध होत असल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

‘एकीकडे स्थानिक विरोध करत असताना जमीन खरेदी करणा-या व्यापा-यांनी जे आता मालक आहेत त्यांनी आधीच एनओसी देऊन टाकली आहे. व्यापा-यांना या प्रकल्पाची माहिती कशी काय मिळाली ? इथल्या जमीन खरेदी करण्यात त्यांना अचानक इतका रस का आला ? याचा थेट अर्थ आहे की, काही राजकारण्यांनी व्यापा-यांना नाणारमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे व्यापा-यांना तब्बल २०० टक्के नफा होणार आहे आणि तोदेखील सफेद पैशांमध्ये’, असं संघर्ष समितीचे अशोक वालम यांनी म्हटलं आहे.

https://www.loksatta.com/maharashtra-news/559-acres-land-purchased-by-tr...

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2018 - 1:08 pm | श्रीगुरुजी

जमीन विकणा-यांनी विकताना अक्कल गहाण ठेवली होती का?

बिटाकाका's picture

18 Apr 2018 - 2:32 pm | बिटाकाका

घाणेरडी पत्रकारिता, त्याला फॉलो करणारे अंधविरोधक मग काय आनंदी आनंद!!
*************************************
८६ पैकी ३८ म्हणजे साधारणपणे ४५ टक्के व्यापारी. उरलेले कोण हे सांगणे गरजेचे नसते! या ३८ पैकी ४ म्हणजे साधारण १०-११% तथाकथित गुजराती. बाकीचे कोण हे सांगणे गरजेचे नसते. आणि या सगळ्यातून सांगायचे काय आहे तर बघा बघा आधी जमिनी विकत घेऊन मग गुजरात्यांच्या फायद्यासाठी प्रकल्प आणणार आहेत. आणि वरून दाखला विकणाऱ्यांचा. त्यांना स्वतःचं भलं बुरं कळत नसणारच ना? गन पॉईंट वर जमिनी घेतल्या असतील तर वरील बातमीत काही तरी अर्थ असता आणि कारवाईची, विरोधाची आवश्यकता असती. या असल्याच गोष्टी माध्यमांची विश्वासार्ह्यता रसातळाला घेऊन जात आहे.
*************************************
बादवे, तुमचं नाणार प्रकल्पाबद्दल काय मत (काही असलं तर) आहे? कि वरील प्रतिसादामागे काही विशेष हेतू आहे?

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2018 - 2:43 pm | श्रीगुरुजी

जवळपास ८६ शेतक-यामनी आपली ५५९.७७ एकर जमीन अधिग्रहण करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. ही जमीन मे २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान खरेदी करण्यात आली आहे. १८ मे २०१७ रोजी राजापूरमध्ये जमीन अधिग्रहणाचं परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर या जमिनींची खरेदी-विक्री झाली. ज्यांनी जमीन खरेदी केली आहे त्यांच्यात मोदी, जैन, मुदीराज, वाधवा, मुदियार, सिंघव, निलवर, शाह, दोशी, कटारिया, केडिया, चंदर, थाववरी, रथी आणि झुनझुनवाला यांचा समावेश आहे. यांच्यात काही जाधव, कारंजे, देवळेकर, जोशी असे महाराष्ट्रीयनदेखील आहेत.

जमीन अधिग्रहणाची सूचना मे २०१७ मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर एखाद्याने जमीन विकत घेतली तर एवढाआरडाओरडा कशासाठी? विकणा-यांना अक्कल नव्हती का? विकण्याची सक्ती होती का? सरकार जमीन विकत मागतंय तर द्यायची तयारी नाही. पण खाजगी व्यक्तीला विकून मोकळे झाले. मग आता प्रॉब्लेम काय आहे?

डँबिस००७'s picture

18 Apr 2018 - 3:34 pm | डँबिस००७

बादवे, तुमचं नाणार प्रकल्पाबद्दल काय मत (काही असलं तर) आहे? कि वरील प्रतिसादामागे काही विशेष हेतू आहे?

बीटाकाका,

त्यांचा एकच हेतु, फुकटचे १५ लाख कधी मिळणार ! तो पर्यंत गरळ ओकतच रहाणार !!

बर मिळाल्यावरही गरळ बंद होईल ह्याची खात्री नाही !!

हिंदू मुस्लिम ख्रिस्चन सगळ्या राजांच्या तिजोर्या आमच्या बापजाद्यानीच भरून दिल्यात.

कधीतरी राजतिजोरीतून १५ लाख आलाच पे आउट तर मी बिनधास्त घेईन.

तुम्हाला नको असतील तर तेही मला द्या.

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2018 - 4:39 pm | श्रीगुरुजी

त्यांचा एकच हेतु, फुकटचे १५ लाख कधी मिळणार !

साफ चूक. गरळ ओकणे हे कागलकरचे एकमेव जीवनध्येय आहे.

manguu@mail.com's picture

18 Apr 2018 - 3:39 pm | manguu@mail.com

इंद्राणी मुखर्जीने चिदंबरमविरुद्ध कोर्टात जबाब दिला होता म्हणे. भक्त लोक नाचत होते की म्हणे असा जबाब फिरवता येत नाही.

स्वामी असीमानंदानी कुणासमोर जबाब दिला होता ? तो जबाब कसा फिरला ?

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2018 - 4:36 pm | श्रीगुरुजी

सगळंच "म्हणे"? पुरावे आहेत?

बिटाकाका's picture

18 Apr 2018 - 4:18 pm | बिटाकाका

काय करावं अशा पत्रकारितेला?

https://timesofindia.indiatimes.com/sports/off-the-field/cwg-gold-medali...

https://timesofindia.indiatimes.com/sports/more-sports/shooting/i-was-no...

व्हीव्हीआयपी लोकांसाठी सुवर्णपदक विजेतील खाली बसवलं अशी बोंब ठोकणारे यानंतर काही स्पष्टीकरण देतील का?

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2018 - 4:34 pm | श्रीगुरुजी

यासाठी मोर्चे काढून मोदींचा राजीनामा नाही मागितला अजून?

सी.ए., सी.एस, ऑडीटर्स साठी रेग्यूलेशन्स च्या ड्राफ्टवर सेबी गांभीर्यानं विचार करतेय, ज्यामुळे शेअरधारकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना काम करावे लागेल. तसेच या कामात केल्या गेलेल्या चुका आणि हलगर्जीपणासाठी दंड ठोठावल्या जाऊ शकतो आणि गरज पडल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन प्रक्रीया देखील सुरू होऊ शकते. यासाठी ड्राफ्ट कन्सलटेशन पेपर तयार करण्यात आलेला आहे अणि आवश्यक त्या चर्चा अन् मतं विचारात घेऊन पुढचे पाऊल उचलण्यात येईल.

https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/cas-cs-valuers-...

श्रीगुरुजी's picture

18 Apr 2018 - 7:37 pm | श्रीगुरुजी

चला. पुरस्कार परती पर्व क्रमांक २ सुरू होणार. याही पर्वात नेहमीचेच यशस्वी कलाकार आहेत. त्यामुळे प्रयोग रंगून यशस्वी होणारच.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/intellec...

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पर्व क्र. १ सुरू झाले होते व मतदान झाल्याक्षणी पर्वाची समाप्ती झाली होती. आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पर्व क्र. २ सुरू होईल आणि १२ मे रोजी मतदान झाल्यानंतर या पर्वाची समाप्ती होईल.

पर्व क्रमांक ३ नोव्हेंबर २०१८ मध्ये राजस्थान, म. प्र., छत्तीसगड इ. राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू होईल.

एक शंका - पुरस्कार परतीच्या प्रथम पर्वात सर्व पुरस्कार परत दिले होते. आता या द्वितीय पर्वात परत देण्यासाठी पुरस्कार कोठून आणणार? का आधी परत केलेल्या पुरस्कारांचीच झेरॉक्स देणार?

manguu@mail.com's picture

18 Apr 2018 - 11:07 pm | manguu@mail.com

भाजपाच्या मंदिर प्रश्नाचंही तेच दुखणे आहे.

एकदा बांधून टाकले की मग दुसर्या वेळेला काय करायचे ?

बिटाकाका's picture

18 Apr 2018 - 11:12 pm | बिटाकाका

२०१४ ला भाजपा राममंदिर मुद्द्यावर निवडून आला होता आणि आता भारतभरात त्याच मुद्द्यावर पसरला आहे ह्या भ्रमात (की सुप्त दुखण्यात?) खुश राहा!!

बिटाकाका's picture

18 Apr 2018 - 11:04 pm | बिटाकाका

बुद्धिजीवींची नवे तर बघा!! मला तरी असली भूमिका घेऊन स्वतःला बुद्धिजीवी म्हणवून घेण्याची लाज वाटली असती.
************************
लोकशाहीचे अपहरण......दुसऱ्या एका धाग्यावरचा प्रतिसाद परत इथे टाकतो....

हाहाहाहा.....लोकशाही धोक्यात आहे हे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच हास्यास्पद होत चाललेलं आहे असे वाटते.
***********************
या देशात, एक थोर नेत्याची हत्या एका अमुक जातीच्या माणसाने केली म्हणून त्या अमुक जातीच्या लोकांना देशोधडीला लावण्यात आले तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली.
या देशात, आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हाही ही लोकशाही मजबूत राहिली.
या देशात, एका धर्माच्या माणसांनी एका पंतप्रधानांची हत्या केली म्हणून त्या धर्माच्या लोकांना चुन चुन के मारण्यात आले तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली.
या देशात, एका विशिष्ट जातीचे धर्माचे लोक त्यांच्या मूळ प्रदेशातुन अक्षरशः हाकलून काढण्यात आले, मारून टाकण्यात आले तेव्हाही ही लोकशाही मजबूत राहिली.
या देशात, एका रेल्वेच्या डब्यात पट्रोल टाकून जाळण्यात आले, त्याची परिणीती म्हणून दोन धर्मात खुनी खेळ खेळला गेला तेव्हाही लोकशाही मजबूत राहिली.
आज ज्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात आली असे काही लोकांना वाटतेय त्यांनी अशा घटनांचा इतिहास जरूर तपासावा. स्वतःचा दांभिकपणा स्वतःलाच कळून लोकशाही मजबूत असल्याची जाणीव नक्की होईल.
*************************
आपले नावडते सरकार आल्यावर जळफळाट होणे तसे स्वाभाविक आहे. म्हणजे हा ईव्हीएम घोटाळा आहे असे वाटणे, पैसे वाटून जिंकले आहेत वाटणे, जाती धर्माचे राजकारण करून जिंकले वाटणे, काहीच विकास होत नाही वाटणे वगैरे समजू शकतो. पण लोकशाही धोक्यात आहे...हे मात्र अनाकलनीय आहे.

मार्मिक गोडसे's picture

18 Apr 2018 - 11:35 pm | मार्मिक गोडसे

डिजिटल व्यवहार वाढले असतील तर देशात रोख चलन टंचाईचे कारण काय असावे?

गामा पैलवान's picture

18 Apr 2018 - 11:42 pm | गामा पैलवान

मा.गो.

मोर्चे काढायला निमित्त हवं ना, म्हणून अचानक मोठमोठ्या रोख रकमा काढून रोखपेढ्या रित्या करण्यात आल्या आहेत. पण काळजी करू नका. शासन आवश्यक तेव्हढ्या नोटा वितरीत करतंय.

आ.न.,
-गा.पै.

manguu@mail.com's picture

19 Apr 2018 - 7:51 am | manguu@mail.com

दोनचार मोठे लोक इतके पैसे काढून घेऊन ब्यान्क ठप्प करु शकतात का ?

महेश हतोळकर's picture

19 Apr 2018 - 10:41 am | महेश हतोळकर

RBI बॅंकेला पैसे (नोटा, नाणी) देते. बॅंक ठरवते, ATM मध्ये किती ठेवायचे आणि cash counter वर किती.

ही दोन-चार धेंडं ATM मधून पैसे काढणार नाही तर थेट ATM लागते जाणारे पैसेच पळवतात.

manguu@mail.com's picture

19 Apr 2018 - 1:22 pm | manguu@mail.com

गामाजी ,

चावट लोकानी जर मुद्दाम जास्त पैसे काढून नेलेत तर रिजर्व ब्यान्क जास्तीच्या नोटा का वितरित करत आहे ?

ब्यान्केतले पैसे कुणी नेले तर ती तूट रि ब्या का व कशी भरेल ?

श्रीगुरुजी's picture

19 Apr 2018 - 2:26 pm | श्रीगुरुजी

ते तुमच्या आवाक्यापलिकडचं आहे. तेव्हा जास्त विचार करून डोक्याला ताप करून घेऊ नका.

manguu@mail.com's picture

19 Apr 2018 - 4:12 pm | manguu@mail.com

ते बोलतात - पैसे कुणीतरी काढून नेलेत.

मग बोलतात - काळजी नका करु . रिजर्व ब्यान्क देईल छापून.

कुणीतरी पैसे नेले तर रि ब्या त्याची तूट कशी भरुन काढेल ? , हे समजणे माझ्या आवाक्याबाहेरचेच आहे, म्हणूनच विचारतोय.

गामा पैलवान's picture

19 Apr 2018 - 6:58 pm | गामा पैलवान

.... कारण की द्रव्यता व्यवस्थित राहील इतक्या नोटा वितरीत करणे हे राखीवपेढीचं काम आहे.

-गा.पै.

मार्मिक गोडसे's picture

18 Apr 2018 - 11:57 pm | मार्मिक गोडसे

काही आधार?

मार्मिक गोडसे's picture

19 Apr 2018 - 9:06 am | मार्मिक गोडसे

गा. पैं. गप्प का? पैसे कोणी काढले हे कळणे फार कठीण नाही. एव्हाना त्यांची लिस्ट तयार झाली असती. सरकार इतके सुस्त का?

सुबोध खरे's picture

19 Apr 2018 - 10:06 am | सुबोध खरे

नोटा बाजारातून कमी का झाल्या याची १० कारणे.

https://www.dailyo.in/business/cash-crunch-atm-queues-atm-rush-demonetis...

बाकी चालू द्या

श्रीगुरुजी's picture

19 Apr 2018 - 10:10 am | श्रीगुरुजी

सरकार इतके सुस्त का?

किती ही घाई.

हे वाचा.

https://m.timesofindia.com/business/india-business/taxmen-begin-raids-on...

मार्मिक गोडसे's picture

19 Apr 2018 - 10:25 am | मार्मिक गोडसे

गुरुजी छान बातमी. २००० ची नोट त्रास देऊ लागली वाटतं?

श्रीगुरुजी's picture

19 Apr 2018 - 10:34 am | श्रीगुरुजी

पुन्हा एकदा घाईघाईत ठाम निष्कर्ष!

मार्मिक गोडसे's picture

19 Apr 2018 - 11:31 am | मार्मिक गोडसे

लिंक तुम्हीच दिली ना? मग तुम्ही सावकाश वाचली नाही का? निदान हायलाईट तरी वाचा.

GDP वाढीच्या प्रमाणात रोख चलन उपलब्ध आहे का? लोकं रोख रक्कम का परत बँकेत भरत नाहीत?

बिटाकाका's picture

19 Apr 2018 - 12:51 pm | बिटाकाका

हे काही कामाला येतं का बघा - काही शक्यता वर्तवल्या आहेत.

https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/taxmen-begin...

मार्मिक गोडसे's picture

19 Apr 2018 - 10:14 am | मार्मिक गोडसे

मग सरकार अधिकृतपणे तसे स्टेटमेंट का करत नाही?

बिटाकाका's picture

19 Apr 2018 - 12:55 pm | बिटाकाका
श्रीगुरुजी's picture

19 Apr 2018 - 2:22 pm | श्रीगुरुजी

निधर्मांधांचे अजून एक कारस्थान अयशस्वी झाले. आधुनिक शेरलॉक होम्स सपशेल हरला. डिसेंबर २०१७ मध्ये गुजरात विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर, भाजपविरूद्ध फुफाटा उडविण्यासाठी काय करता येईल याबद्दल निधर्मांध व खांग्रेसी खल करू लागले.

मग त्यातूनच निवडणुकीच्या जेमतेम काही आठवडे आधी अमित शहांचे सुपुत्र जय शहा यांच्या कंपनीविरूद्ध धुरळा उठविण्यात आला. 'जय शहांच्या संपत्तीत एका वर्षात १६००० पटीने वाढ' असे दिशाभूल करणारे शीर्षक देऊन लेख पाडण्यात आले. प्रत्यक्षात कंपनीची उलाढाल ८० कोटींवर पोहोचली होती व एखाद्या कंपनीची उलाढाल सद्यस्तितीत ८० कोटी असणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नव्हते. ही कंपनी नियमित आयकर परतावा भरत होती. असे असताना व उलाढालीत वाढ झाली असताना 'संपत्तीत १६००० पटीने वाढ', 'उत्पन्न एका वर्षात १६००० पटीने वाढले' अशा बातम्या मुद्दाम पेरल्या गेल्या. जय शहांनी न्यायालयात जाऊन अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर निधर्मांधांचे धाबे दणाणले व ते प्रकरण मागे पडले.

दरम्यानच्या काळात निधर्मांध व खांग्रेसी यांच्या कुटील मेंदूतून अजून एक कारस्थान शिजले. सोहराबुद्दिन एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करणार्‍या न्यायाधीश लोयांचा हॄदयविकाराच्या धक्क्याने २०१४ मध्ये मृत्यु झाला तेव्हा निधर्मांधांनी त्या घटनेची दखलही घेतली नव्हती. डिसेंबर २०१७ च्या गुजरात निवडणुकीच्या तोंडावर यांनी ते प्रकरण उठवून भाजप व अमित शहा यांच्याविरूद्ध धुरळा उडविण्याचे कारस्थान रचले. ज्या व्यक्तीच्या मृत्युची ३ वर्षे दखलही घेतली गेली नव्हती तो मृत्यु यांना अचानक संशयास्पद वाटायला लागला. आधुनिक शेरलॉक होम्स असलेल्या निरंजन टकले नावाच्या एका निधर्मांधाने द वायर नावाच्या एका बदनाम साप्ताहिकात यावर लेख लिहून धुरळा उडविण्याचा नारळ फोडला. त्यापाठोपाठ लगेच खांग्रेसी व इतर काही जणांनी धुळवड खेळण्यास सुरूवात केली. लोयांच्या कुटुंबियांनाही यात गोवण्यात आले. न्यायसंस्थेवर संशय व्यक्त केला गेला. खांग्रेसींनी पत्रकार परीषद घेऊन या नैसर्गिक मृत्युमागे अमित शहाच आहेत अशा स्वरूपाचा आरोप करून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. नंतर छोटा भीम खासदारांचे एक शिष्टमंडळ घेऊन राष्ट्र्पतींना भेटला व लोयांच्या मृत्युची चौकशी करावी अशी मागणी केली. हे सर्व घडत होते ते मृत्युनंतर ३ वर्षांनी आणि त्याला कारण होते काही आठवड्यांवर येऊन ठेपलेली गुजरात विधानसभेची निवडणुक. निधर्मांध व खांग्रेसी धुरळा उडविण्यात यशस्वी झाले. एकदा धुरळा उडविला की तो खाली बसायला वेळ लागतो. तोपर्यंत आपले काम होऊन गेलेले असते. एवढे होऊन सुद्धा खांग्रेसला गुजरात जिंकता आले नाही.

आता सर्वोच्च न्यायालयानेच निकाल दिला आहे की लोयांचा मृत्यु पूर्ण नैसर्गिक असून त्यात काहीही संशयास्पद नाही. या निकालाने निधर्मांध व खांग्रेसी यांना एक जोरदार थोबाडीत बसली आहे. अर्थात ते अत्यंत निर्लज्ज असल्याने ते गप्प न राहता असेच नवीन खोटे प्रकरण उभे करून धुरळा उडविणार हे नक्की कारण पुढील १२ महिन्यात अनेक निवडणुका आहेत.

https://www.loksatta.com/maharashtra-news/judge-loya-death-case-supreme-...

अर्थात आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे संघाचे स्वयंसेवक आहेत असा नवीन आरोप सुरू होईल यात शंका नाही.

लोयांच्या कुटुंबियांनाही यात गोवण्यात आले.

ह्यात सर्वात शहाणी लोयाची गधडी बहीण. आता बहीणीची माया आंधळीच ! पण किती फायदा घ्यावा?
ती म्हणाली ज. लोयांच्या शवावर रक्ताचे एक दोन डाग होते. हार्ट अ‍ॅटॅक आला तर डाग कसे??? म्हणून मला काहीतरी काळंबेरं असल्याची शंका होतीच.
अगं बये, पोस्ट मार्टमच्या वेळी असे डाग पडतात!
पण तिला तेवढ्या एका मुद्द्द्यावर ब्लॅकमेल केलं गेलं. कितीतरी मुलाखती घेतल्या तिच्या.
शेकडो डावे पत्रकार!
हे काँग्रेसवाले नेहमी कोण्यातरी मूर्खाला हाताशी धरून डाव आखतात. तो ही खोटा.
डजन्ट इंप्रेस.

manguu@mail.com's picture

19 Apr 2018 - 4:57 pm | manguu@mail.com

खरे की काय !

मीपण ५० पीएम केलेत २ वर्षाच्या bond service मध्ये !

आता पुन्हा फोरेन्शिक वाचायला लागेल !!

बालवाडीत अ‍ॅडमिशन घ्याल तर मिपाकरांवर उपकार होतील.

डँबिस००७'s picture

19 Apr 2018 - 5:50 pm | डँबिस००७

पुन्हा पुन्हा आपण डॉक्टर कम कंपाऊंडर जास्त आहोत हे सिद्ध करत असता !

श्रीगुरुजी's picture

19 Apr 2018 - 5:55 pm | श्रीगुरुजी

Actually compounder-cum-nurse.

बिटाकाका's picture

19 Apr 2018 - 6:08 pm | बिटाकाका

जोशी सर, श्रीगुरुजी, डांबिस००७ वैयक्तिक टीका टाळावी हि विनंती!

विशुमित's picture

19 Apr 2018 - 8:52 pm | विशुमित

+1
तुम्हाला माहिती नसेल कदाचित पण मागे एकदा तर्राट जोकर नामक सदस्याने गुरुजींच्या Profession चा कंपलिट बायोडेटा दिला होता. (असले वागणं पटले नव्हते मला हे आधी स्पष्ट करतो)
तो प्रतिसाद पण उडाला आणि बहुतेक तो सदस्य ही...

सुबोध खरे's picture

20 Apr 2018 - 9:33 am | सुबोध खरे

"त जो" यांनी एका स्त्री सदस्याला आपला जन्म बलात्कारातून झाला असे अपशब्द खरडवहीत वापरले होते. त्यावरून त्यांचे सदस्यत्व रद्द केले गेले होते असे आठवते.

arunjoshi123's picture

20 Apr 2018 - 3:55 pm | arunjoshi123

मला तरी वैयक्तिक टिका अभिप्रेत नव्हती.

पैसा's picture

20 Apr 2018 - 10:32 am | पैसा

कोणावरही त्याच्या व्यवसायावरून वैयक्तिक लिहिणे प्लीज नको.

ते नवाब भाई म्हणतात डॉक्टरची नार्को घेतली पाहिजे. तो सुधीर भाऊ चा जवळचा नातेवाईक आहे. आणि रिपोर्ट मधे फेरबदल करतो असा त्याच्या विद्यार्थ्यांने आरोप केला आहे. (अर्थातच पैसै घेऊन करत असणार फेरबदल )
भावड्या तुला काय वाटतं त्या गधड्याबद्दल??

https://www.loksatta.com/maharashtra-news/judge-loya-death-case-ncp-lead...

विशुमित's picture

19 Apr 2018 - 9:16 pm | विशुमित

फेरफार

श्रीगुरुजी's picture

19 Apr 2018 - 10:13 pm | श्रीगुरुजी

ते नवाब भाई म्हणतात डॉक्टरची नार्को घेतली पाहिजे.

नबाब म्हणजे दुसरा राहुल आहे. मागे एकदा आरोप केला होता की गिरीश बापटांनी तूरडाळीत २०० कोटींचा भ्रष्टाचार केला. १५-२० दिवसांनी त्याने हा आकडा २००० कोटींवर नेला. महिनाभराने हा आकडा २०००० कोटींवर नेला. तो सातत्याने बाष्कळ आरोप करीत असतो. त्याच्या बरळण्याची कोणीही दखल घेत नाही.

manguu@mail.com's picture

20 Apr 2018 - 12:30 am | manguu@mail.com

https://www.loksatta.com/aurangabad-news/toor-dal-purchase-planning-giri...

बापटसाहेबानी पत्रकारावर डिफेमेशन केस घातली होती ना ?

सालदार's picture

20 Apr 2018 - 6:32 pm | सालदार

अगं बये, पोस्ट मार्टमच्या वेळी असे डाग पडतात! ----
तुमच्या माहीतीसाठी सांगतो, ती गधडी बहीण एक प्रतिष्ठीत डॉक्टर आहे.

arunjoshi123's picture

23 Apr 2018 - 11:04 am | arunjoshi123

प्रतिष्ठित?

प्रसाद_१९८२'s picture

19 Apr 2018 - 3:53 pm | प्रसाद_१९८२

नवी दिल्ली: न्यायाधीश बी. एच. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच होता. याप्रकरणातून केवळ न्यायव्यवस्थेची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी किंवा इतर स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येणार नाही, असा स्पष्ट निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निर्णय देताना लोया मृत्यूप्रकरणाची एसआयटी चौकशी करणारी जनहित याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली.

---
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/supreme-court-judgeme...
---

कॉंग्रेसी नेते/समर्थकांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपराक हाणली आहे. गेले कित्येक महिने जस्टिस लोया यांच्या नैसर्गिक मृत्यूचे भांडवल करुन स्वत:ची राजकिय पोळी भाजून घेत होते.

डँबिस००७'s picture

19 Apr 2018 - 5:55 pm | डँबिस००७

आता दहा वर्षात अमेठीचे सिंगापुर हाँगकाँग करणार , :- -- ईती युवराज राहुल गांधी ,

गेली ६५ वर्षे अमेठीमध्ये ह्यांचेच राज्य होते हे विसरलेले आहेत !! असा माणुस देशाचा पंत प्रधानपदाचा प्रतिस्पर्धी होणार ह्याचा विचार करुन जीवाचा थरकाप ऊडतो.

manguu@mail.com's picture

19 Apr 2018 - 6:02 pm | manguu@mail.com

वाराणसीचे व्हेनिस झाले वाटतं

बिटाकाका's picture

19 Apr 2018 - 6:07 pm | बिटाकाका

तसा दावा करत ते फिरत आहेत का? गेली कित्येक वर्षे राज्य केल्यावर असा दावा करणे हास्यास्पद वाटत नाही कि अशा दाव्यांचे समर्थन करणे मजबुरी आहे कसली?

नोटाबंदीने अमूक होइल , तमुक दिवसात होइल नाहीतर असे करा , तसे करा....

विसर लात काय ?

बिटाकाका's picture

20 Apr 2018 - 7:57 am | बिटाकाका

नेहमीप्रमाणे गोलपोस्ट चेंज करणे आहे का हे?
*********************
खडे टाकण्यापेक्षा जरा लिस्ट करा की राव काय काय १०० दिवसात करायचे ठरले होते, म्हणजे मग कळेल तरी!
********************
नोटबंदीचे स्वतंत्र धागे आहेत, परत जाऊन वाचा असे सुचवेन.
********************
सिंगापूर बनवून दाखवतो या स्टेटमेंटला तुमचे समर्थन आहे? ५१ पैकी ५० वर्षे काँग्रेस आणि गेली १९ वर्षे मतापुत्र आहेत तिथे खासदार, पैकी १० वर्षे त्यांचेच सरकार. अशी परिस्थिती असताना हे वक्तव्य करत आहेत आणि अंधविरोधक समर्थनार्थ उद्या मारत आहेत. मज्जाय!

manguu@mail.com's picture

20 Apr 2018 - 8:03 am | manguu@mail.com

तुमच्या रथयात्राही कधीपासून सुरु आहेत. एव्हाना प्रभूंचे अडीच तीन वनवास झाले असतील नै !

पण आमी नाय हसत तुम्हाला.

नेहरुंची सिगार , राहुलचे बटाटे ह्यांचा जप करायला तुम्हाला निवडून दिलय का ?

बिटाकाका's picture

20 Apr 2018 - 10:03 am | बिटाकाका

तुमचे मुद्दे वेगळे आहेत, त्यावर वेगळी चर्चा करूयात, कसे? सध्या त्यांच्या सिंगापूर करण्याबद्दल काय म्हणणे आहे तेवढे बोला ना, इकडचं तिकडचं का बोलत आहात? आणि तुमच्या, तुम्हाला म्हणजे नेमकं काय तेही लगे हाथ सांगून टाका.

शब्दप्रयोग बदलावे अशी विनंती.
सिंगापूर करण्यावर आक्षेप कसला ? प्रश्न असा आहे कि यांचे पिताश्रीनी अमेठी बारामतीसारखी विकसित करायची इच्छा प्रकट केली होती , ती तरी पूर्ण झाली का ?
आधीचं टार्गेट मीट न करता नवं टार्गेट उभं करतायत (यात काय समजायचं ते समजायचं)

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2018 - 10:34 am | श्रीगुरुजी

ते सिंगापूर किंवा क्यालिफोर्निया करणार आहेत.

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2018 - 10:35 am | श्रीगुरुजी

नेहरुंची सिगार , राहुलचे बटाटे ह्यांचा जप करायला तुम्हाला निवडून दिलय का ?

तुम्ही त्यांना मत दिलं होतं का?

गामा पैलवान's picture

19 Apr 2018 - 7:08 pm | गामा पैलवान

पप्पू अमेथीचं हे सिंगापूर करणार.

-गा.पै.

manguu@mail.com's picture

20 Apr 2018 - 3:13 pm | manguu@mail.com

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच फॉरेन्सिक लॅबने कठुआ घटनेचा अहवाल सादर केला आहे. या मंदिरात पीडित मुलीचे केस सापडले असून त्याची तपासणी केली असता तिचा डीएनए प्रोफाइल आरोपी शुभम सांगरा याच्याशी मिळत असल्याचं उघड झालं आहे. पीडित मुलीच्या कपड्यावर मिळालेले रक्ताचे डागही तिच्या डीएनए प्रोफाइलशी मिळत असून तिच्या गुप्तांगाजवळ रक्त आढळून आल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांचं विशेष पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र पुरेसे पुरावे नसल्याने या पथकाला अडचणींचा सामना करावा लागत होता. आरोपींनी काही पोलिसांशी हात मिळवणी करून पीडित मुलीचे कपडे धुऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल होता. काश्मीरच्या फॉरेन्सिक लॅबलाही कपड्यांवर रक्ताचे डाग मिळाले नव्हते, त्यामुळे त्यांना बलात्काराचा निष्कर्ष काढता आला नव्हता. परिणामी एसआयटीला आरोपींच्याविरोधात गुन्हा दाखल करता आला नव्हता. 

त्यामुळे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी गृहमंत्रालयाला विनंती करून दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅब द्वारे पुराव्यांची चौकशी करण्याची विनंती केली होती. मार्चमध्येच पीडित मुलीचे कपडे आणि इतर पुरावे तपासणीसाठी दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते. त्याचबरोबर आरोपी पोलीस अधिकारी दीपक खजुरीया, शुभम सांगरा आणि परवेशच्या रक्ताचे नमूनेही पाठविण्यात आले होते. 

https://m.maharashtratimes.com/india-news/delhi-forensic-lab-report-stro...

कर्नल पुरोहितांना गुंतवण्यात आले होते?

http://www.republicworld.com/india-news/general-news/republic-tv-exposes...

गामा पैलवान's picture

21 Apr 2018 - 1:17 am | गामा पैलवान

होय. प्रश्नंच नाही. कर्नल पुरोहितांनी सिमी ( = स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) फोडंत आणली होती. त्याची शिक्षा म्हणून त्यांना गुंतवण्यात आलं.

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2018 - 6:02 pm | श्रीगुरुजी

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील ६ नगरपालिकांचे निकाल लागले. भाजपने ४ जिंकल्या, नारायण राणेने एक जिंकली आणि बाकी एका ठिकाणी स्थानिक आघाडी निवडून आली. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला भोपळा मिळाला. आज झारखंडमधील स्थानिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपने ३४ पैकी २१ महापौर पदांवर विजय मिळविला. एवढे वाईट काम भाजप करीत असेल तर ते निवडून कसे येत राहतात?

https://www.indiatoday.in/india/story/jharkhand-nagar-panchayat-election...

विशुमित's picture

21 Apr 2018 - 8:39 am | विशुमित

EVM दुसरे काय?
=====
तरीसुद्धा तुमचे हार्दिक अभिनंदन...!!

सुबोध खरे's picture

21 Apr 2018 - 10:00 am | सुबोध खरे

तरीसुद्धा
आता निवडणुकांत VVPAT वापरतात. मागच्या वर्षी नांदेडच्या निवडणुकांनंतर याची सुरुवात झाली आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2018 - 10:00 am | श्रीगुरुजी

वाटलंच मला असा कांगावा होणार. "नाचता येईना *गण वाकडं" ही म्हण आठवली.

गुरुजी आणि खरे हा सदाशिवपेठी जोक तुम्हाला समजेल अशी अपेक्षा होती.
मी फक्त EVM म्हटलं EVM घोटाळा नाही.
बाकी चोराच्या मनात चांदणं ही सुसंस्कृत म्हण आठवली.
* टाकायची गरज भासली नाही.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2018 - 10:37 am | श्रीगुरुजी

कोणाच्या मनात चांदणं किंवा अजून वेगळंच काहीतरी, हे सर्वांनाच ठाऊक आहे.

बरं, तुमच्या आदरणीय साहेबांचे हे नवीन उद्योग पहा.

https://m.rediff.com/news/report/impeachment-the-pawar-factor/20180421.htm

विशुमित's picture

21 Apr 2018 - 11:19 am | विशुमित

हा उद्योग तुमच्या माजी तडिपारच्या पथ्यावर पडला त्याचा तरी आनंद माना.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2018 - 1:05 pm | श्रीगुरुजी

हा उद्योग साहेबांच्या पाताळयंत्रीपणाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी कितीही आपटली आणि असले कितीही उद्योग केले तरी त्यांची इनिंग केव्हाच संपलेली आहे.

विशुमित's picture

21 Apr 2018 - 4:18 pm | विशुमित

मग पेढे वाटा.
====

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2018 - 4:24 pm | श्रीगुरुजी

हे खूप जुनं आहे व पेढे वाटण्याएवढं महत्त्वाचं नाही.

गामा पैलवान's picture

21 Apr 2018 - 1:11 pm | गामा पैलवान

काय सांगताय श्रीगुरुजी? पवारसाहेबांकडे पैसे नाहीत?

"Most of us represent smaller parties. Whatever the public perception, neither we nor our parties have the wherewithal to fight expensive court battles if cases were to be filed against us out of sheer vindictiveness for pursuing the impeachment motion," an Opposition MP said.

नोटाबंदी चांगलीच डसलेली दिसतेय!

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2018 - 2:19 pm | श्रीगुरुजी

>>> ". . . neither we nor our parties have the wherewithal to fight expensive court battles . . . "

LLRC

सुबोध खरे's picture

21 Apr 2018 - 11:08 am | सुबोध खरे

हा जोक मला समजला तरी सर्वच लोकांना समजेल असे नसते म्हणून सार्वजनिक न्यासावर सरळ अर्थ असणाऱ्या गोष्टीच लिहाव्या लागतात.
यामुळे काही लोकांचा मला जोक समजत नाही असा (गैर) समज झालेला आहे.
वाच्यार्थ व्यंगार्थ समजून घेण्याची कुवत प्रत्येकाची असेल असे नाही. माझ्या सुरुवातीच्या काही लेखांमध्ये लोकांनी गदारोळ केल्यानंतर मी शहाणा झालो आहे.
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तपासून पाहू शकता.

विशुमित's picture

21 Apr 2018 - 12:28 pm | विशुमित

जोकमुळे वातावरणात खुपच seriousness आला.
जाऊ द्या द्या सोडून नाहीतर एवढं ग्यान ऐकून मी serious होयचे
...चिल्याक्स...!!

मार्मिक गोडसे's picture

21 Apr 2018 - 10:04 am | मार्मिक गोडसे

गुरुजी, अंगण लिहा की बिनधास्त.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2018 - 10:12 am | श्रीगुरुजी

इतरांच्या सर्जनशील व अमूर्त प्रतिभेच्या आविष्काराला संधी मिळावी यासाठी मुद्दामच * टाकलाय.

विशुमित's picture

21 Apr 2018 - 10:28 am | विशुमित

कोणी वास सोडला हे हुंगून ओळखून दाखवायची प्रतिभा कमाल आहे तुमची.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2018 - 10:40 am | श्रीगुरुजी

ऩाही हो, तुमच्या प्रतिभाशक्तीपुढे आम्ही अगदीच नगण्य.

मार्मिक गोडसे's picture

21 Apr 2018 - 10:34 am | मार्मिक गोडसे

इतरांच्या सर्जनशील व अमूर्त प्रतिभेच्या आविष्काराला संधी मिळावी यासाठी मुद्दामच * टाकलाय.
अमूर्त विनोद समजत असेल त्यानेच टाकावे.

manguu@mail.com's picture

21 Apr 2018 - 11:45 am | manguu@mail.com

२०१९ जवळ येईल तसे भक्तांची भाषा सात्विक- राजसी- तामसी अशी बदलत आहे.

पूर्वी जो तामसी भाव त्यांच्या मनातच होता तो आता परा-पश्यति-मध्यमा - वैखरी असा दृग्गोचर होत आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2018 - 1:07 pm | श्रीगुरुजी

अंधद्वेष्ट्यांची भाषा तामसीपणाकडून हीनतेकडे जात आहे.

"जात आहे" या शब्दाला आक्षेप.

काँग्रेसभक्तांबद्दल बोलत आहेत बहुतेक!!

माहितगार's picture

21 Apr 2018 - 2:03 pm | माहितगार

कोट्याधीश परीवारातीय्ल मोक्ष शेठ नावाच्या २४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या जैन तरुणाने संन्यास घेण्याचे ठरव्ले आहे आणि टाइम्स ऑफ इंडीया वृत्तात अलिकडे अजूनही काही श्रीमंत जैन तरुणांनी केल्याचे वाचनात आले. अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तरीही, घरात जो काही पैसा आहे तो राष्ट्रीय उत्पादन वाढीस लावण्यासाठी आपले षिक्षण कामात न आणता अवेळी संन्यास वगैरे कै पॉईंट समजत नाही.

कोट्याधीश परीवारातीय्ल मोक्ष शेठ नावाच्या २४ वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या जैन तरुणाने संन्यास घेण्याचे ठरव्ले आहे आणि टाइम्स ऑफ इंडीया वृत्तात अलिकडे अजूनही काही श्रीमंत जैन तरुणांनी केल्याचे वाचनात आले.

वर वर निरुपद्रवी/कौतुकास्पद/धार्मिक/अध्यात्मिक/ भासणार्‍या असल्या गोष्टींमागील अंदरकी बात काही वेगळीच असणार (काही प्रॉपटी , टॅक्स वगैरे चा लोच्या किंवा असेच काहीतरी) . माझ्या माहितीतला एक अरबोपती जैन व्यापारी असले काहीबाही करत असतो. मात्र नक्की काय हे खोलात जाऊन तपास केल्याशिवाय उलगडणे कठीण. आर्थिक क्षेत्रातले तज्ञ मिपाकर यावर काही प्रकाश टाकतील का ?

श्रीगुरुजी's picture

21 Apr 2018 - 2:15 pm | श्रीगुरुजी

_________________________________________

Good riddance. आता शत्रुघ्न सिन्हानेही यांचे अनुकरण करावे.

manguu@mail.com's picture

21 Apr 2018 - 6:58 pm | manguu@mail.com

'राज्यातील सन २०११च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता देण्यासाठी कायदा बनवण्यात आला असून, त्या विधेयकाचा प्रस्ताव मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर अशा झोपड्यांना कायदेशीर मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. त्यामुळे बेकायदा झोपड्यांना लवकरच दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांतील २०११ सालापर्यंतच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता द्यावी तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत संबंधित लाभार्थींना ४०० चौरस फुटांचे घर देण्यात यावे या दोन प्रमुख मागण्यांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोठ्या शहरांना प्रामुख्याने भेडसावणाऱ्या बेकायदा झोपड्यांबाबतच्या प्रश्नावरील उपाययोजनांची माहिती सादर केली. या बैठकीतच मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबतचीही माहिती दिली. 'झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किमान ३० मीटर ते ४० चौ. मीटरपर्यंतचे घर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शक्य आहे तेथे ४०० चौरस फुटांची घरे देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे', अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मुंबई व मोठ्या शहरांतील हे दोन मोठे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने घेतलेल्या या पवित्र्यामुळे घरांचा प्रश्न सुटण्यासही मदत होणार आहे.

-------------------------------------------------------

काँग्रेसच्या काळात हेच झाले असते तर टॅक्स पेअरचा पैसा बर्बाद झाला म्हणून गदारोळ झाला असता.

manguu@mail.com's picture

21 Apr 2018 - 7:06 pm | manguu@mail.com

माझ्या भावाला काँग्रेस पक्षाने तिकिट द्यावे अशी विनंती मी प्रियंका गांधींना केली होती. त्यांनी माझी विनंती धुडकावून लावली आणि रायबरेलीतून कोणत्याही ठाकूर समाजाच्या माणसाला तिकिट देणार नाही असे म्हटले. मात्र नंतर त्यांनी माझ्या भावाला हरचंदपूर येथून तिकिट दिले.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/be-it-sonia-or-priyanka-none-f...

भावाला तिकिट दिले नाही म्हणून काँग्रेस सोडून भाजपात जायचे आणि म्हणायचे .. काँग्रेसात घराणेशाही आहे म्हणून भाजपात जात आहे.

गंमतच करतात लोकपण !!

बिटाकाका's picture

21 Apr 2018 - 7:40 pm | बिटाकाका

आचं जालं होय, २०१९ ला कुठून लढायचं ठरलं मग?

manguu@mail.com's picture

22 Apr 2018 - 12:05 am | manguu@mail.com
manguu@mail.com's picture

22 Apr 2018 - 12:05 am | manguu@mail.com

ध्रुतराष्ट्राला पुत्रमोह होता म्हणे .. ( मग पांडू तरी का वनवासात गेला होता ? संभोग व पुत्रसुख मिळणार नाही म्हणूनच ना ? )

गुरु द्रोण सर्व मुलाना घागर द्यायचे म्हणे - नदीतून पाणी आणायला. सर्वांच्या घागरीची तोंडे अगदी बारीक असायची , ते उशीरा परत यायचे. फक्त अश्वत्थाम्याला मात्र रुंद तोंडाची घागर द्यायचे. तो लवकर आला की इतर मुले यायच्या आत ते त्याला स्पेशल मंत्र शिकवायचे म्हणे !

घराणेशाहीला फक्त ३ लोक विरोध करतात... ( असे माझे मत आहे. )
१. ज्याना बायको नाही
२. बायको आहे , पण मुले नाहीत
३. मुले अजुन अज्ञान आहेत.

ते कुणीतरी होते ते काँग्रेसच्या घराणेशाहीला फार्फार विरोध करायचे.

त्यांची पुढची आणि त्याच्यापुढची पिढी सज्ञान झाल्यावर आता त्यांचा पक्ष इतरांच्या घराणेशाहीबद्दल बोलत नाही . !!!

बिटाकाका's picture

22 Apr 2018 - 9:03 am | बिटाकाका

ते नव्हं, २०१९ ला कुंकडनं लडायचं ठरलंय??

manguu@mail.com's picture

22 Apr 2018 - 11:29 am | manguu@mail.com

जो आमाला रुंद तोंडाची घागर देईल त्योच आमचा बा !

द्रोणाचार्य की जय !

बिटाकाका's picture

22 Apr 2018 - 12:31 pm | बिटाकाका

रुंद तोंडाची घागर "परत" कोण देणार असं म्हणायचं आहे का? मंग कोण देणार रुंद तोंडाची घागर २०१९ ला परत?

गुरु द्रोण सर्व मुलाना घागर द्यायचे म्हणे - नदीतून पाणी आणायला. सर्वांच्या घागरीची तोंडे अगदी बारीक असायची , ते उशीरा परत यायचे. फक्त अश्वत्थाम्याला मात्र रुंद तोंडाची घागर द्यायचे. तो लवकर आला की इतर मुले यायच्या आत ते त्याला स्पेशल मंत्र शिकवायचे म्हणे !

महर्षी व्यास महामूर्ख होते. इतकं गलथान उदाहरण देणारा माणूस मूर्खच असणार.
१. राजकुमार पाणी भरायचे?
२. ५+१००+१ इतके लोक पाणी भरायला? बाकीचे देखील भरत असतील ते असो.
३. इतक्या घागरी? अरे काही लॉजिस्टिक्स?
४. रुंद आणि अरुंद तोंडाच्या घागरी भरायला किती वेळेचा फरक पडतो? हे लायनीनं थांबायचे की एकदाच घाटावर पाणी भरायचे?
५. बापाला पोरासोबत चंद सेकंद जास्त मिळत नाहीत? आमच्या मास्तरला त्याच्या पोरासोबत आमच्यापेक्षा फक्त काही सेकंद जास्त मिळतात?
६. रुंद तोंडाची घागर जास्त डचमळते.
७. पिठात पाणी का कैतरी घालून त्याला दूध म्हणून द्यायचे इतकी गरीबीची कहाणी आहे द्रोणाची. मग इतके पावरफुल मंत्र असताना ?
८. आन ते पिठाचं पाणी पिऊ घालताना, कौरव भेटायच्या अगोदर, शिकवायचे ना मंत्र?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2018 - 10:42 am | डॉ सुहास म्हात्रे

Rajya Sabha chairman Venkaiah Naidu rejects Opposition notice for removal of chief justice Dipak Misra

यासंबंधात, स्वतःच्याच पक्षातल्या विधितज्ञ वकिलांकडून घरचाच आहेर मिळाला असला तरी, काँग्रेस पक्षातील काही मंडळी आता सर्वोच्च न्यायलयात खटला दाखल करण्याची भाषा करत आहेत. असा रडीचा डाव ताणत बसल्याने लोकांत हसू होत राहते आणि त्याचा फायदा शेवटी भाजपलाच होते, हे या हुशार लोकांच्या अजूनही कसे घ्यानात येत नाही ?

गामा पैलवान's picture

23 Apr 2018 - 12:15 pm | गामा पैलवान

कपिल सिब्बल यांनी राणा भीमदेवी थाटात गर्जना केलीये की :

सरन्यायाधीश मिश्रा जोपर्यंत पदावरून पायउतार होत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या कोर्टात पायच ठेवणार नाही

च्यायला कपिल सिब्बलची चड्डी सुटलीये. चड्डीची नाडी सापडंत नाही तोवर तो कोर्टात पाउल ठेवणार नाहीये. मोठे उपकारंच झाले म्हणायचे जनतेवर.

-गा.पै.

मार्मिक गोडसे's picture

23 Apr 2018 - 1:55 pm | मार्मिक गोडसे

होना,मुंडण करीन, पांढरी वस्त्रे वापरेन, जमिनीवर झोपन अशी काहीतरी भीमदेवी थाटात गर्जना करायला हवी होती.

manguu@mail.com's picture

23 Apr 2018 - 3:54 pm | manguu@mail.com

नैतर ५० दिवसात असे झाले नाहीत तर लाथ घाला वगैरे ....

arunjoshi123's picture

23 Apr 2018 - 4:53 pm | arunjoshi123

अरे सहीच.
नेत्यांच्या गर्जनांवर गोडसेंचे मस्त लक्ष असते.
मक्काय चौकात वस्तरा घिऊन रडी?

श्रीगुरुजी's picture

23 Apr 2018 - 4:55 pm | श्रीगुरुजी

वस्तरा का पोकळ बांबू?

गर्जना मुंडनाची तर चौकात वस्तरा घेऊन थांबावं लागेल ना हो.
====================================================
पोकळ बांबूचे फोक हे मोदींची स्वतःची सुचवणी होती!!!!!!! समजलात काय??

arunjoshi123's picture

23 Apr 2018 - 4:58 pm | arunjoshi123

"भारताची फाळणी माझ्या मड्यावरून होईल." (मंजे होणार नाही याची मी गॅरंटी देतो.) अशी एक लै मोठ्ठी राणा भीमादेवी गर्जना एका काँग्रेस्याने केली होती. (त्यामुळे भारतीय लोक लै चिल राहिले होते, आन आक्रित झालं होतं). त्यावेळी चौकात काय घेऊन गेला होतात?

मध्यंतरी एक गोरी मड्डम नवर्‍यासोबत प्रचाराला गेली. नेमका तिला कंटाळा आला नि प्रचाराला गेली नाही त्याच सभेत तिचा नवरा बाँबस्फोट होऊन मेला. त्यावेळी तिने ही एक राणा भीमादेवी थाटात गर्जना केली.
तीच गर्जना एका पुरोगाम्याने लेकरांची शपथ घेऊन केली.
सावकाश त्या मोडल्या गेल्या.
गोडसे साहेबांचे वस्तरे, फोकं, इ इ त्यावेळी सर्विसला दिले होते.

१. केवळ महाभियोग चालवता येतो म्हणून चालवायचा (तितके संख्याबळ आहे म्हणून कार्यवाही चालू करायची) हे योग्य आहे काय?
२. मुख्य न्यायाधीशांनी नक्की कोणता नियम उल्लंघिला आहे? कोणता गैरव्यवहार केला आहे?
३. ....
४. ....
५. ....
असे अनेक प्रश्न आहेत.
त्यांवर चर्चा करा. आपल्या गर्जनांचं मेरीट (सध्याला मानू, आहे म्हणून) हा मुद्दा असू शकत नाही.

गामा पैलवान's picture

23 Apr 2018 - 5:51 pm | गामा पैलवान

'या काळाबाजारवाल्यांना फासावर लटकावले पाहिजे' ऐसी रा.भी. थाटात कोंण गर्जना करांयचें बरें? साक्षात पप्पूपितामातामहच (*१) की! प्रत्यक्ष जवाहरखान नेहरूंच्या तब्बल १७ वर्षांच्या पंतप्रधानकीच्या कारकीर्दीत एकही काळाबाजारवाला फाशी गेला नाही.

-गा.पै.

*१ - पप्पूपित्याचा मातामह

manguu@mail.com's picture

23 Apr 2018 - 6:33 pm | manguu@mail.com

वाजपेयी आणि मोदीनी किती भ्रष्ट काँग्रेश्ये फासावर चढवले ?

डँबिस००७'s picture

23 Apr 2018 - 7:43 pm | डँबिस००७

भ्रष्ट काँग्रेसी नेत्यांना फासावर लटकवा ! व्वा वा !!

देशाबाहेर ह्याच नेत्यांनी पाठवलेले पैसे मात्र ह्यांच्या झोळीत टाकायचे ! व्वा काय न्याय आहे !!

ह्या न्यायाने पैसे मागणार्या ह्या लोकांना सुद्धा फासावर लटकवल पाहीजे !!

manguu@mail.com's picture

24 Apr 2018 - 12:45 am | manguu@mail.com

देशाचा पैसा देशातील नागरिकाना नाही तर मग कुठे गंगेत अर्पण करणार आहात का ?

डँबिस००७'s picture

24 Apr 2018 - 9:52 pm | डँबिस००७

देशाचा पैसा देशातील नागरीकांना अर्पण करण्याचा प्र घात नाहीय आणी असता तरी तो चुकीचाच असता !!

नागरीकांना फुकट पैसे सरकारने वाटायचे नसतात !! आणि असा पैसा मागणारे फुकटे असतात !!

त्यामुळे असा वापस आलेला पैसा सरकारने लोक कल्याणार्थ योजनेसाठी वापरला पाहीजे ! अन्यथा फासावर जाणार्या नेत्यां अगोदर ह्यांना फासावर चढवल पाहीजे !!

हिंदू मुस्लिम ख्रिस्चन सगळ्या राजांच्या तिजोर्या आमच्या बापजाद्यानीच भरून दिल्यात. त्यातल्या कुणीही १९४७ साली देशाला फारसे दिले नाही.

कधीतरी राजतिजोरीतून १५ लाख आलाच पे आउट , तर मी बिनधास्त घेईन.

तुम्हाला नको असतील १५ लाख , तर तेही मला द्या.

सुबोध खरे's picture

25 Apr 2018 - 9:45 am | सुबोध खरे

तुम्हाला १५ पैसे सुद्धा कोणीहि राजकारणी देणार नाही
.
बाकी ते गरिबी हटाव म्हणून घोषणा देऊन ४० वर्षे होऊन गेली ती गरिबी हटली का?

एकदा का गरिबी हटली कि १५ लाख आलेच म्हणून समजा

भाजपाचीही १० वर्षे १३ दिवस इतकी सत्ता झाली. गरीबी हटली का ? गुजरात सी एम् नी गुजरातची २० वर्षात गरिबी हटवली का ?

६१ वर्षात काँग्रेसने गरीब केले ...
पण १९४७ पूर्वी इंग्रज काळात पणजोबाचे उत्पन्न जास्त होते व नातवाचे काँग्रेसच्या काळात उत्पन्न घटले असा मला तरी कुणी दिसला नाही.

पेट्रोलचा चार्ट दिलात तसा असा एखादा चार्ट मिळतो का बघा.

बिटाकाका's picture

25 Apr 2018 - 11:50 am | बिटाकाका

लै घाई होतेय हो! उगाच गोलपोस्ट चेंज करून लै मुद्दे एकत्र करण्यात काय हाशील?
--------------------------------
मुद्दा १ : भाजप ने एक तथाकथित घोषणा केली ती पूर्ण कधी होणार विचारता तशी काँग्रेसने एक घोषणा केली ती पूर्ण झाली नाही असे सरळ मान्य करायला काही अडचण आहे का?
मुद्दा २ : भाजपने १० वर्षे सत्ता उपभोगली यात त्यांनी गरिबी हटाव चा नारा दिला होता का? मग त्यांनी हटवली का म्हणून विचारण्यात काय पॉईंट? राम मंदिर विचाराकी!
मुद्दा ३ : काँग्रेसने गरीब केले हा मुद्दा कुठे आहे? गरिबांना श्रीमंत केले का हा मुद्दा आहे.
-------------------------------
बाय द वे - असे गृहीत धरा कि -
समजा माझी संपत्ती किती आहे याचा अंदाज देण्यासाठी माझ्या काही मित्रांत मी म्हणालो की माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी जर वाटले पैसे तर सगळ्यांना १५ लाख येतील. माझ्या काही हुशार मित्रांना माझ्या संपत्तीचा अंदाज आला. पण एक मित्र दुसऱ्या दिवशीपासून माझ्या घरासमोर म्हणाला आहेस तर १५ लाख दे म्हणून उपोषणाला बसला तर अशा मित्राला काय म्हणावे?

सुबोध खरे's picture

23 Apr 2018 - 6:39 pm | सुबोध खरे

प्रत्यक्ष नाही
पण राजकीय मृत्यु बऱ्याच दीड शहाण्या लोकांचे झाले आहेत (बाराच्या भावात गेले आहेत असे).
नावे तुम्हीच शोधून काढा

manguu@mail.com's picture

23 Apr 2018 - 6:47 pm | manguu@mail.com

आपोआप मेले तर भ्रष्टाला शिक्षा व पैशाची रिकव्हरी होते का ?

जुने जळू जावून नवे आले , असे झाले आहे.

manguu@mail.com's picture

23 Apr 2018 - 6:45 pm | manguu@mail.com

काँग्रेसच्या संविधान बचाव रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रोखले. ही आपली संस्कृती नाही. आपण कोणाविरोधातही अशा घोषणा द्यायच्या नाहीत, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आणि त्यांनी पुन्हा घोषणा देऊ नये, अशी तंबी देखील दिली.

दिल्लीतील तालकटोरा मैदानात सोमवारी काँग्रेसतर्फे संविधान बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. राहुल गांधी यांनी दलितांच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेला सुरुवात करताच काँग्रेसच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मोदी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. राहुल गांधींनी या अतिउत्साही कार्यकर्त्यांना तातडीने रोखले. ‘आपण काँग्रेसची लोकं आहेत. आपण कोणाविरोधात अशा अपशब्दांचा वापर करत नाही’, असे त्यांनी सांगितले.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-president-rahul-gandh...

बिटाकाका's picture

23 Apr 2018 - 7:06 pm | बिटाकाका

आचं जालं व्हय.....बलं बलं!!

प्रसाद_१९८२'s picture

23 Apr 2018 - 7:13 pm | प्रसाद_१९८२

‘आपण काँग्रेसची लोकं आहेत. आपण कोणाविरोधात अशा अपशब्दांचा वापर करत नाही’, असे त्यांनी सांगितले.

---
मौत का सौदागर, खून की खेती करनेवाला, नीच वगैरे अनेक शब्दप्रयोग, निवडणुक प्रचारा दरम्यान कॉंग्रेसी नेत्यांनी केले होते.
हे पप्पू सोयिस्कररित्या विसरलेला दिसतोय.