पच्ची पलसू

माहितगार's picture
माहितगार in पाककृती
25 Feb 2018 - 3:06 pm

पच्ची पलसू, मूळ तेलगू उच्चारण बहुधा 'पच्ची फुलसू ' असावे. बेसिकली गरम करण्या एवजी थंड केलेले, आंबटपणा बराच डायल्यूट केलेले चिंचेचे पेय (सार). ज्यांना पाणीपुरी मधली चिंच गूळ चटणी चालते त्यांना पच्ची पलसू ही आवडावे . उष्णतेच्या काळात हे गार क्षूधावर्धक दुपारच्या भोजनाची लज्जत सहज वाढवते. अगदी पुण्यासारख्या ठिकाणाचा उन्हाळाही तीव्र होतो आहे तेव्हा पच्ची पुलसू चा उन्हाळ्यात महाराष्टॄय लोकांनी अधून मधून समावेश करण्याचा विचार करण्यास हरकत नसावी.

मूळ पदार्थ चिंचप्रेमी तेलंगाणाचा, जराशा वेगळ्या व्हर्शन मध्ये आंध्रा मध्येही बनते . मराठवाड्या प्रमाणे विदर्भही तेलंगाणाच्या बॉर्डरवर येते पण वैदर्भीय मंडळींचे आंबट प्रेम मात्र अत्यंत कमी त्यामुळे वैदर्भीय व्हर्शन मध्ये आंबटपणा अजूनच डायल्यूट केला जात असावा. तसे आफ्रीकन ट्रायबल रेसिपी म्हणून दार ए सलाम मध्येही तदृश्य चिंच पेयाचा आनंद घेण्याचा एकदा योग आला होता.

बर्‍याच वर्षांनी काल मूळ तेलंगाणा व्हर्शनचा केवळ आस्वादच घेता आला असे नाही तर बनवताना पहाताही आली. या निमीत्ताने रेसिपी मिपावर शेअर करण्याचा विचार केला. त्यांच्या मूळ व्हर्शन मध्ये दोन लिटर पाण्यासाठी दिडशे ग्राम चिंच धुऊन कोमट पाण्यात भिजवली गेली . ( महाराष्ट्रीयन रुचीला कदाचित ५० ग्राम चिंचही पुरली असती असे वाटून गेले - वैदर्भीय व्हर्शनमध्ये असेच काहीसे कमी प्रमाण असावे, केवळ अधिक काळ भिजवावी लागली असती एवढेच.) चिंच भिजे पर्यंत अर्ध्या तासात अर्धीवाटी तीळ भाजून, मिक्सरवर बारीक वाटून घेतले. तीळ तीन चमचे पुरेत असे सांगितले होते तरीही मी अधिक वापरले - अधिक तीळ वापराबद्दल एका कुटूंबीयाची तक्रारही आली. ( युट्यूबवरील आंध्र व्हर्शन्स मध्ये तीळ किंवा कोणतेच थिकनर दिसले नाही; तर काही तेलंगाणा व्हर्शन्स मध्ये थिकनर म्हणून रोस्टेड पीनट पावडर अथवा भाजलेल्या शेंअदाण्याचा कुट अल्प ते पूर्ण आवडी नुसार बदललेला दिसला पण मूळ तेलंगाणा स्वैपाकात सहसा शेंअदाण्याच्या कुटा एवजी तीळाचा कुट प्रीफर करते. थिकनर म्हणून नॉन ऑईल सिड्सचा प्रयोग करुन पहाण्याची गरज असावी. पण तीळाचा तरंगता कूट पेयाच्या लज्जती सोबतच पहाण्यासही आकर्षक वाटतो अर्थात फोटोत तीळाचा तेवढा इंपॅक्ट सहज दिसत नाही मे बी अधिक जाणकार छायाचित्रणाची गरज असावी) गूळाचा बराच मोठा खडाही खिसून घेतला. ( वैदर्भीय व्हर्शन मध्ये तीळ आणि गूळ अधिक तर चिंच बरीच कमी असण्याची शक्यता वाटते)

चिंच भिजल्या नंतर कोळून चिंचेचे पाणि गाळण्यातून गाळून घ्यावी ( आंबटप्रेमी तेलंगाणा लोक गाळणी न लावता थोडी फार चिंच इनक्लूड होऊ देतात) थंड पाण्याचे प्रमाण साधारणपणे दिड ते दोन लिटर घेऊन आवडीनूसार शतक्य तेवढे डायल्यूट करून घ्यावे. त्यात अर्धा ते पाऊण चमचा हळद, चवी पुरते मीठ खिसलेला गूळ आणि तीळ पूड टाकावी. (गूळ न आवडत नाही पण आंबट चालते त्यांच्यासाठी बीन गूळाचे पाणी वेगळे काढून ठेवले ) गूळ विरघण्यासाठी पेय डावाने गोल फिरवावे. कोथिंबीर टाकावी, मोहरी आणि हिंगाची फोडणी दिली की झाले चविष्ट पच्ची फुलसू तयार. युट्यूब वरचाच्या आंध्रा व्हर्शन मध्ये फोडणीस कडीपत्ता हिरवी/ लाल मिरची जिरे इत्यादी दिसून आले . एका आंध्र व्हर्शन मध्ये फोडणीतील कडीपत्ता मिरची जिरे जरा वेगळे काढून खलबत्त्यात वाटून पच्ची पुलसूत टाकलेले

मी टेस्ट केलेल्या वैदर्भीय व्हर्शन मध्ये तुळशीच पाने टाकलेली होती असे आठवते. कच्चा चिरलेला कांदाही आवडीनुसार चालतो. पुदीना तसेच धणा जीरा चिंचे सोबत भिजवून पहाण्याचे प्रयोग करुन पहाण्यास हरकत नसावी असे वाटते.

तर असे हे पच्ची पलसू फ्रिज मध्ये ठेऊन दुपारच्या वेळी स्वतंत्र पेय म्हणून आस्वाद घेता येतो . किंवा भरडा भाजी भात किंवा भाताच्या एखाद्या मसालेदार व्हर्शन सोबत ताकाच्या मठ्ठ्या एवजी किंवा सोबतीने जेवणाची लज्जत वाढवू शकते.

भरडा भाजी बाबत आंतर जालावर युट्यूबसहीत फारशी माहिती पाकृत अद्याप नसाव्यात . एक या दुव्यावर सापडली पण अजून व्हर्शन्सची माहिती लिहिण्यास वाव असावा असे वाटते.

छायाचित्रांच्या आग्रहामुळे विकिमिडिया कॉमन्सवरील पच्ची पुलसू चे एक छायाचित्र खाली देतोय पण ते फारसे न्याय देणारे वाटत नाही. त्याला जाणकार छायाचित्रकाराची गरज असावी. पच्ची पुलसूच्या वेग वेगळ्या व्हर्शन्स युट्यूबवर उपलब्ध दिसतात.

pachchi pulasu

हे छायाचित्र विकि मिडीया कॉमन्सवरुन घेतले आहे. मी विकिमिडीया कॉमन्स शिवाय इतर पर्याय अद्याप ट्राय केलेले नाहीत पाकृ छायाचित्रांसाठी इतर संस्थळे सुचवल्यास किंवा तुम्ही कोणती वापरता ते सांगितल्यास आभारी राहीन.

माझी वैदर्भीय चवीची लेखातील ऑब्झर्वेशन चुकली असण्याची शक्यता खालील एका प्रतिसादा वरुन दिसते. त्या बद्दल क्षमस्व.

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2018 - 3:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही त्याला ''पन्हं'' म्हणतो, फक्त याला फोडणी दिली आहे, असे वाटते. जाणकार महिला सांगतीलच पण त्यांचाही पन्ह्याशी सबंध उरला नसावा असे वाटते.

नव्या अभ्यासू आणि आधुनिक विचारांच्या महिलांना मिपावर लिहायला परावृत्त केले पाहिजे. म्हणजे नवनवीन माहिती येत राहील.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

25 Feb 2018 - 6:11 pm | प्रचेतस

तुम्ही कायपण म्हणता, पन्हे म्हणजे कैरीचेच हवे, चिंच..नो वे.

आणि तुम्हाला वर प्रवृत्त म्हणावयाचे आहे का परावृत्त?

अभ्या..'s picture

25 Feb 2018 - 6:25 pm | अभ्या..

=))
=))
सगळे एकच हो प्रचेतसराव.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Feb 2018 - 9:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

पिलीयन रायडर's picture

25 Feb 2018 - 6:50 pm | पिलीयन रायडर

साला..ये दिल की मुराद जबान पे आ जाती है!!!

पैसा's picture

2 Mar 2018 - 10:11 am | पैसा

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =))

जेम्स वांड's picture

25 Feb 2018 - 5:32 pm | जेम्स वांड

काही अट्टल वैदर्भीय सहकारी मंडळीस हा लेख दाखवला त्यावर त्यांनी दिलेला अभिप्राय नोंदवतो आहे.

कोट विदर्भात चिंच भरपूर प्रमाणात वापरली जाते, असे लेखकांना सुचवा. उष्ण हवामानात आंबट पदार्थ खाण्याचा प्रघात जास्तच असतो. चिंचगुळाचे वरण हे विदर्भात रोजच्या आमटीचे स्थानिक व्हर्जन होय, आणि ते बऱ्यापैकी आंबट गोड असते. ह्या शिवाय, उन्हाळ्यात खास उन्हाचा प्रकोप कमी करायला घोळ ही भाजी भरपूर चिंच/कैरी घालून केली जाते, आंबट रसात अजून एक स्थानिक प्रकार म्हणजे गावठी शेम्बडी (लाल बारकी) बोरे आधी उन्हात कडकडीत वाळवून नंतर त्याचा होणारा बोरकूट हा एक गृहऔद्योगिक प्रकार करून विकला जातोच, ही शाबूत वाळलेली बोरे मिठाच्या पाण्यात उकळून चिनीमतीच्या बरणीत साठवून खाल्ली जातात. अगदीच चिंच आधारित रेसिपी म्हणलं तर अक्षयतृतीया (स्थानिक भाषेत आख्खाजी) च्या सणाला पितरांस वाळ्याचे पाणी पाजणे हे एक कर्मकांड असते, त्याच्यासोबत एक पूजा आणि नंतर पुरणावरणाचे पदार्थ असलेला चारी ठाव स्वयंपाक असतो, पण ह्या सणाला गुळाच्या फिक्या पुरणाची पोळी पारंपरिक पद्धतीने दूध किंवा तूप ह्यांच्या सोबत न वाढता आंबट अश्या 'चिंचवणी' सोबत वाढली जाते. ह्याचा उल्लेख श्री गजानन महाराज पोथीत स्पष्ट असून, श्री महाराजांनी केलेल्या एका चमत्काराशी संबंधित घटनेत हा उल्लेख सापडतो. तेलंगणा आणि विदर्भात उलट खानपान संबंधित समानता भरपूर सापडतात अन-कोट

-माहिती देणारे सहकारी सौ. वैशाली, श्री. अभिजित, श्री. नितीन,
-शब्दांकन वांडो.

माहितगार's picture

25 Feb 2018 - 5:50 pm | माहितगार

तसं दिसतय, माझ व्यक्तिगत ऑब्झर्वेशन मोजक्या वैदर्भीय लोकांच्या (काहीश्या आग्रही) चवी बद्दलच्या माहिती वर अवलंबून असल्याने माझा पुर्वग्रह तसा झाला होता ज्यात आपल्या प्रतिसादाने बदल करण्याची गरज दिसते. मनमोकळ्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभार

manguu@mail.com's picture

25 Feb 2018 - 5:50 pm | manguu@mail.com

छान

manguu@mail.com's picture

25 Feb 2018 - 9:50 pm | manguu@mail.com

भाजलेले वांगे , बारीक कांदा , लसूण इ अनेक variations आहेत.

manguu@mail.com's picture

25 Feb 2018 - 9:54 pm | manguu@mail.com

भरडा भाजी म्हणजे मोकळे तिखट म्हणतात. हरबरा डाळ भिजवून , जाड भरडून फोडणी घालून वाफ आणेपर्यंत शिजवणे.

आता थोड्या दिवसात नृसिंह जयंती असते. तेंव्हा डाळीची कोशिंबीर आणि कैरीचे पन्हे करतात . त्याच्यासारखेच हे दोन्ही मेनू वाटतात.

माहितगार's picture

26 Feb 2018 - 7:15 am | माहितगार

हरबरा डाळ भिजवून , जाड भरडून फोडणी घालून वाफ आणेपर्यंत शिजवणे.

हम्म हि व्हर्शन महराष्ट्रात अधिक प्रचलीत आहे. पण मी उल्लेख केलेली भरडा भाजी कोरडी हरभरा डाळीचे खूप जाडसर भरड (पीठ किंवा बेसन शब्द वापरु नये इतपत जाडसर बेसन लाडू साठी पुण्यात जाडसर बेसन मिळते पण भरडा भाजी साठी त्या पेक्षा कितीतरी जाडसर पोत लागतो) ठरावीक मोजक्याच ठिकाणी गिरणिवर दळून मिळत असावी. पर्यायी व्यवस्था म्हणजे मिक्सरवर घरी अगदी जाडसर मिक्सर कमित कमी फिरवून भरड करणे. बारीक दळलेले बेसन पीठ पेरुन केलेल्या भाज्यात जसे चिकट लागते तसे ही भरडा भाजी चिकट अथवा ओल्या डाळीच्या भाजी प्रमाणे ओलसर न लागता अगदी मोकळी बर्‍ञा पैकी कोरडी होते हे ह्या भाजीचे वैशीष्ट्य.

मला वाटते मी उल्लेख करत असलेली भरडा भाजी कांदा,मेथी , काकडी या तीन मूख्य व्हेरीएशन पैकी एकाला फोडणि देऊन हरभरा डाळिचा कोरडा भरडा टाकून पाण्याचा एखादा हबका मारून मोकळी राहील चिकट होणार नाही अशी वाफवली जाते. भाकर पोळी सोबतही चालते, पण ज्यांना मोकळा भात आवडतो त्यांना ही मोकळी भरडा भाजी , आंब्याचे लोणचे हा मेनू झकास होतो. हे फारच कोरडे होते म्हणून सोबत मठ्ठा अथवा पच्ची पलसू ने कोरडेपणा टाळण्याचा ऑप्शन मिळतो आणि लज्जत वाढते.

फोडणी दिली असल्याने हे पेय म्हणण्यापेक्षा रसम झाले.

माहितगार's picture

26 Feb 2018 - 7:24 am | माहितगार

रस्समला माझ्या माहिती प्रमाणे उकळी आणली जाते, मसाल्यचा वावर उष्ण वाटावे एवढा अधिक असतो, आणि सर्व पण गरम गरम केले जाते, चिंच ऑप्शनला असते कंपलसरी असतेच असे नाही.

पच्ची पलसू त्यामानाने मसाल्यांचा वावर कमी आहे, उकळी दिली जात नाही पाणी थंड वापरले जाते. (फोडणी फक्त वरून टाकली जाते) आणि सर्व अगदी फ्रिज मध्ये ठेऊन गार करता आल्यास अधिक चांगले . इथे सरबत स्टाईल उष्मा कमी करणे असा उद्देश आहे.

manguu@mail.com's picture

2 Mar 2018 - 4:05 pm | manguu@mail.com

चिंचेशिवाय रसम शक्य आहे का ?

जेम्स वांड's picture

2 Mar 2018 - 11:05 pm | जेम्स वांड

टोमॅटो रसम सुद्धा असतं की, मस्त आलं लसूण फोडणी घातलेलं फारच भारी लागतं चवीला, त्याला बेस स्टॉक म्हणून अगदी तीनचार चमचे तूरडाळ भरपूर पाण्यात शिजवून ते एकजीव करून वापरतात.

पैसा's picture

28 Feb 2018 - 6:40 pm | पैसा

चिंचेचे सार. उन्हाळ्यात अति उत्तम.