CFU (व्हॉटसअप गृप )
कोस्टल वॉक /ट्रेक ,
सागरी पदभ्रमण मोहिम -२ ...
भाग पहीला ...
दिवस पहिला -
०६/०२/१८
ठाणे प्लॅटफॉर्म न. ५ वर १०४५ पासुन सहभागी जमु लागलेत .एकजण मुम्बईहुन बसुन येणारेत . बाकी अंबरनाथ ,कल्याण,डोंबिवली, ठाणे येथुन ..ठाणे येथे बसणार ...
एकजण खेडला पहाटे ४किंवा गाडी पोचेल तेव्हा खेड येथे गाडित बसतील ...
सर्व सहभागी जमल्यावर रिवाजाप्रमाणे सेल्फि काढुन झाले .. लगेच ते गृपवरही धाडलेत ...
इंडीकेटरवर बोगिवाइज पोझिशन लागल्यावर आम्ही आपापल्या जागी गाडीत चढण्यास सज्ज झालो ..
गाडी आली आम्ही आपापल्या जागी स्थानापन्न झालो ..
s-2,s-3,s-4 अश्या तीन ड्ब्यात आमच्या सिट्स आहेत..
बारा वाजत आले आहेत ..
मग मात्र सर्व निद्राधिन झालोत ..
दीवस दुसरा ....
.०७/०२ /१८ .....
गाडी लेट होती.. म्हणुन आरामात उठलोय ...
शीरोडाला नाश्ता घ्यायचा होता . पण ट्रेन लेट झाल्यामुळे वाटेत स्टेशनवर ,गाडीत मिळालेला उपमा , कटलेट, बटाटावडा, मोदक, पुराणपोळी , इडली- चटणी, केळी ,चहा -कॉफी असा चौरस आहारयुक्त नाश्ता करुन घेतला ..
गाडी तासभर लेट म्हणजे साडेनऊला सावंतवाडीला पोचली..
स्टेशनवर सेल्फी घेउुन झाल्यावर स्टेशनबाहेरच असलेल्या बस स्टॉपवर गेलो ...
सावंतवाडी स्टेशन ते शिरोडा बिच हे २८ कि .मि . अंतर बसने जावयाचे होते ..
वातावरण पावसाळी झाले होते ..दोनचार पावसाचे थेंबही अंगावर पडले..बापरे म्हणजे पाउस येतोय की काय ? सिएफयु ट्रेकला मार्चला देखिल पाउस आलेला आहेमग फेबृवारीत का नाही ?
पाउस आला नाही बरे झाले आम्ही तसेही पावसाळी ट्रेकच्या तयारीत आलो नव्हतोच ...
लवकरच बस आली ..सर्वजण बसमधे बसलो दुतर्फा हिरवी झाडी असलेल्या रस्त्यातुन बस धावत होती मधुनच एखादे गाव असले की गाडी थांबे .. अंम्ब्याला छान मोहोर आलाय मधुन मधुन काजु, चींच, फणस दिसत होते .कोकणचे रम्य दर्शन मन प्रसन्न करित होते उंदीरमार हे काहिसे न शोभणारे नाव असलेली..त्यापेक्षा ग्लिरिसिडीया हे सुबक नाव ... भरगच्च गुलाबी फुले असलेली झाडे ठायी ठायी दिसत होती .. छान बहरली होती... बसप्रवास छान झाला शिरोडा गावात पोचल्यावर कांदाभजी चहा नाश्ता ..केला त्यानंतर गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतीष्ठान या शाळेतील खांडेकर स्मृती संग्रहालय पहायला गेलो ..या संग्रहालयात त्यांची पुस्तके, तसेच त्यांच्या कांदंबर्यांवर आधारीत सिनेमांची पोस्टर्स ,त्यांचा समुद्रकिनर्याची पार्श्वभूमी असलेल्या चित्रासमोर ठेवलेला पुतळा ,इतर मान्यवरांची छायाचित्रे इत्यादी गोष्टी जपुन ठेवल्यात ..प्रथम आम्ही मुख्याध्यापकांशी बोललो मुंबैहुन ही माणसे संग्रहाला भेट द्यायला आलेत त्याच त्याना समाधान वाटल ते स्वत: आमच्यासोबत येउन आम्हाला माहीती सांगितली आणी नियम शीथील करुन आम्हाला फोटो काढु दीले ...
संग्रहालय पाहुन झाल्यावर आम्ही शिरोडा बिचवर गेलो ..वाटेत फणस ,चिंच, काजु ,अंबा यांचे वृक्ष..आंब्याच्या मोहराचा सुगंध वातावरणात भरुन राहिला होता ...
बिचवरुन समुद्रकिनार्यावरुन चालत ४ कि.मि . अंतरावरिल आरवली या मुक्कामाच्या ठीकाणी गेलो ..
जेवायची वेळ झालेलिच होती मग आपापल्या खोलित सामान ठेवले आणी जेउन घेतले ...जेवण सर्वत्र उत्तम होते.. रोज आवडीची सोलकढी असे ..
जेवल्यावर थोडा आराम केला पाच वाजता गावात फिरायला गेलो ..रस्ता नागमोडी आणी रहदारीचा होता ...आम्ही सातेरा देवी , वेतोबा आणी दारुश्टा अशी तीन मंदीरे पाहिली नंतर कांदाभजी चहा घेउन मुक्कामाच्या ठीकाणी आलो ...
मग काही जण आवरायला गेलेत .. काहिजणानी वऱ्हान्ड्यात गप्पांचा फड टाकलाय भुगोल या विषयावर गप्पा सुरु झाल्या .. रंगल्यात मुख्य वक्ते अरुणजी आणी सुनिलजी ..
रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही फिरायला निघालो थोडा वेळाने मेन रस्ता सोडुन कच्च्या रस्त्याने समुद्राच्या दिशेने अंदाज घेत निघालो ...
आता रस्ता सोडला त्यामुळे अंधार झाला होता जवळचे टॉर्च लावले सहाजिकच भुताच्या गोस्टी निघाल्या ..
सागर काही दीसेना.. लाटांचा कानोसा घेत चाललो होतो शेवटी एकदा दीसला किनारा ..आता हवेत थोडी थंडी जाणउ लागली होती ..काळोख दुरवर पसरलला होत .. वातावरण थोडे गुढ वाटत होते सोभत भुतकथा ...
थोडावेळ थांबुन परत फिरलो ...
मुक्कामास पोचल्यावर सगळे आपल्या खोल्यांमध्ये झोपायला गेलो ...
क्रमश : ......
तीसरा दिवस ...
०८/०२ /१८ ...
आज आरवली ते वेंगुर्ल १४ कि . मी .अंतर चालायचे होते ...
आजची वेंगुर्ला येथील रहायची वेंगुर्ला शासकिय विश्रामगृहात केली होती ..काल संध्याकाळी त्यांच्याकडुन दोघेजण आम्हाला भेटुन गेले .. आणी आज ते वेंगुर्लाला आम्हाला भेटणार होते ...
आनंदाची गोस्ट म्हणजे आज आमच्या सॅक गाडीतुन पुढे जाणार होत्या... आम्हाला फक्त पाणी खाउ कॅप वैगरे घेउन एक पिटुसॅक कॅरी करायची होती.. त्यामुळे आजचा ट्रेक/ वॉक . हलकाफुलका असणारे ...
आम्ही पोहे चहा असा नाश्ता केला ..आणी मोठ्या सॅक ठेउन नीघालो...
आज १४ कि.मि . चालायचे होते .सुरवातीचा बराचसा रस्ता डांबरी होता.. ...पण हा रुट जंगलातल्या पायवाटेसारखाच वाटत होता ..
कारण एकतर गाव सोडल्यावर फारशी रहदारी नव्हती ..शांत रस्ता.. होता फार चढ उतार नाही असा.. .. बाजुला ना ..पहाड ना दरी ..दुशिकडे लांबवर वृक्ष ,फुलझाडे ,वेली .. त्यापलिकडे डोंगर- टेकड्या ...
सगळे आपापल्या स्पीडने चालत होते .. कोणी मागे.
.. कोणी पुढे .कोणी फोटो काढततय, कोणी गप्पा मारतय ,कोणी नुसतीच ती शांतता अनुभवतय ... चालण्यातला आनंद महत्वाचा ....
ती शुध्द हवा श्वास भरुन घेताना चीत्तवृती प्रसन्न करित होती ..
मधुन मधुन लिडर फोन करुन ,तर कधी हाताने इशारा करुन ,हाक मारित सुचना देत होता ..
पुढे लेफ्ट घ्यायचा आहे ... ब्रीजवर सगळ्यानी थांबा.. .. पुढचे जरा थांबा मागचे लवकर या इ .इ ....
मधुनच एखादी शेड एखादी झोपडी दिसे .. बाकी फक्त झाडांची सोबत ..
हो आणी खुप सारे पक्षी.. सकाळची शांत वेळ.. त्यामुळे विविध पक्षी दिसले ...किंग फिशर, घारी, वेडा राघू ,हॉर्न बिल, भारद्वाज ,बुलबुल ,सुगरण, सुतार , कोकिळ , तारवाली भिंगरी ...
तसेच पानथळीच्या जागी विविध बगळे आणी बदके ...
मला वाटते हाच रुट दोन दिवस ठेउन --एक दिवस जायचे -दुसर्या दिवशी यायचे --असा पक्षीनिरिक्षणाचा कार्यक्रमही करता येइल ....
आजही ग्लिरीसिडीयाची बरेच झाडे दिसली ..भरपुर हाताला येतील अशा काजुबिया लागलेली काजुची झाडे ..
देवचाफाची सुगंधी फुले फुललेली झाडे.. माझे हे खुप आवडते फूल ..
वाटेत एक छोटे वर्कशॉप होते .. तीथे होड्या बनवल्या जातात ..आम्ही चालत जाताहोत हे पाहुन आम्हाला त्यानी गार पाणी हवे का विचारले ...
एके ठीकाणी वडाच्या खुप सार्या पारंब्या लटकत होत्या ..मग काय जो तो झोका घेतोय फोटो काढतोय.. धमाल नुसती ...
मोचेमाड खाडीवरिल पुलावर आम्हाला थांबायला सांगीतले होते.. येथेही छान पक्षी दिसले.. पुलावर फोटो काढले ....दोन्ही साइडला खाडीचे पाणी दुरवरपर्यंत पसरलेले ..
मोचेमाड खाडी ओलांडुन वेंगुर्लाकडे निघालो सागरेशवराचे दर्शन घेतले ...
आता उन जाणउ लागले होते ...सरबताच्या गाड्या खुणावत होत्या .. आम्ही वेंगुर्ल्यात पोचलो... तेथिल स्टॅंडवर उसाचा रस प्यायला.. मग चालायला परत तरतरी आली.. सागरकिनार्याने मुक्कामाकडे निघालो ...
शेवटचा टप्पा पाण्यातुन जायला लागेल असे वाटले,: तेव्हा परत रस्त्याला लागलो आणी पोचलो गेस्ट हॉउसपाशी ...
आमचे स्वागत शहाळे पाणी आणी मलई देउन करण्यात आले .. . थोडा वेळ बसुन मग आम्ही जेवायला गेलो..आम्हाला दोन गाड्या दिल्या होत्या ..जा- ये करायला .. मासेप्रेमिंना आज खास बेत होता ..अनेक प्रकारच्या मासे रेसिपितुन निवड करायची होती ..अर्धे मेंबर्सनी व्हेज लंच घेतले ..
जेवण झाल्यावर आम्ही डच वखार पहायला गेलो ... शेवटच्या घटका मोजत अजुनही उभी इमारत.. आत प्रवेश केला... ढासळलेल्या भिंती ..आतमधे झाडे -झुडुपे ,वृक्ष उगवलीत ..
आमच्यातले कोणीतरी अगदी वरपर्यंत जाउन आले ..
यानंतर वेंगुर्ले मार्केटमधे गेलो ... दुपार असल्याने मार्केट शांत होते .. काही दुकानदार जेवायला गेलेत... आम्ही केळी, आणी हिरविगार वीड्याची पाने, कात -चुना घेतली ... बडीशेप मुखवास होताच आमच्याकडे ..
मग रेस्टहॉउसवर परतलो .....
सागरकिनारी छोट्या टेकडीवर गेस्टहॉउस होते .. तेथे एक रुम खोलेसरानी आम्हाला मिळउन दिली होती ..मुलानी समजुतदारपणा दाखवित आम्हा तीन मुलिना ती दीली .. आणी थोडी गैरसोय होउनही स्वत: तेथे *हाल* मधे राहिले ....
आमच्या सॅकही गेस्टहॉउसचे लोक घेउन आले .. रुम छानच आहे.. समोर व्हरांडा.... पुढे अंगण आणी समोर लाटांचे नृत्य करणारा अथांग निलसागर .... मागे एक गॅलरी त्यात डायनिंग टेबल ...बाजुला वाशरुम.. अशी शानदार आहे ही रुम ... कर्मचार्यांनी आम्हाला गार पाणी आणुन दिले ..आणी पाच वाजता चहाही मिळणार होता और क्या चाहिये ?
पावणेपाचपर्यंत आराम केला .. सवापाचला चहा मिळाला ..तोपर्यंत हॉलमधिल मंडळी आलित.. मग त्यांच्यासाठीही चहा सांगितला ..
यानंतर आम्ही ७/८ जण समोरच्या टेकडीवर दीपगृह पाहीला गेलो.. बाकिच्या लोकानी खालिच गप्पा मारीत बसणे पसंत केले ..
आम्ही अरुंद पायऱ्या चढुन वर गेलो ..येथे फार रहदारी नसावी.. पायऱ्यापर्यंत काटेरी झुडुपे येउ पोचल्येत ...येथे जनावरे असु शकतील.. संध्याकाळ होतेय .. मी एका मुलाला आमच्यासाठी थांबायला सांगतेय ...कडी वाजवतोय... आतुन काही हालचाल नाही .. बराच वेळ कडी वाजवत राहिलो ..हाका मारित राहिलो.. तेव्हा कुठे दिपगृहातुन एक मुलगा समोरुन पायऱ्या उतरुन आला .. आणी गेटचे कुलुप उघडुन आम्हाला आत घेतले .. तोपर्यंत अजुन दोघतीघ आले.. आम्हाला वर दिपगृहात जायचे होते ..त्याचे पर हेड दहा रुपये मागत होते तीथले कर्मचारी.. काहिना ते पटले नाही ... मग आम्ही वर गेलो नाही.. वळसा घालुन मागे गेलो.. अम्हाला तेथुन सनसेट पहायला मिळाला ...
फोटो घेतले ..वर आकाशात घारी वेगात उडत होत्या.. पण फोटो घेता आला नाही ... सुर्यास्थानंतर काळोख पडु लागला मग आम्ही खाली निघालो... अधिक अंधारात पायर्या उतरायला निट दिसले नसते ..
खाली गप्पां रंगात आल्या होत्या ...सर्वांचा आवडता विषय 'सीनेमा' संबंधीत .... आणी त्याची इथ्थंभुत माहीती असलेली गृपमधली सर्वाना परीचीत *असामी* साभिनय मनोरंजक माहीती सांगत होती ..सोभत खादाडी चालली होती ...शेवटी डिनर वेळ झाल्यावर *नाइलाजाने* सारे डिनरला निघालोत ..
व्हेज नॉनव्हेज 'जो जे वांछील' ते त्यास मिळाले ...
..
त्यानंतर आम्ही समुद्राकाठी जाउन बसलो.. काही वेळापुर्विच येथुन बाजार उठला होता.. वातावरणात तो गंध रेंगाळला होता .. थोड्या गप्पा झाल्या .. मग सारेउदाहरण आपापल्या ठीकाणी झोपावयास गेलो ...
ज्याना सकाळी लवकर चहा हवा होता त्यांच्याकरिता चहा सांगितला ...
प्रतिक्रिया
24 Feb 2018 - 3:50 pm | स्वप्निल रेडकर
वेंगुर्ला माझा गाव आहे, आणि वेंगुर्ल्याचं शासकीय विश्रामगृह हा सगळ्या वेंगुर्लेकरांच्या अभिमानाचा विषय आहे.विशेष करून बाहेरून आलेय पाहुण्यांना दाखवण्याची जागा. वेंगुर्ला दीपगृहामध्ये जाण्यासाठी खूप वर्षांपासून नॉमिनल एन्ट्री फी आहे.आमच्या लहानपणी ५ की ३ रुपये होती असं आठवतंय . तुमचे १० रुपये फुकट गेले नसते दीपगृहाला भेट देऊन समुद्राचे विहंगम दृश्य बघितल्यावर :)
26 Feb 2018 - 2:22 pm | भटकीभिंगरी
खर तर त्यावेळी सुर्यास्ताची वेळ होत आली होती. तो चुकु नये म्हणुन काही मेम्बर्स प़ळत माग गेले. मग आम्ही सुध्धा त्यान्च्या मागे गेल्प एव्हढेच ..
24 Feb 2018 - 4:07 pm | एस
फोटो टाकले असते तर आम्हांलाही आनंद घेता आला असता या भटकंतीचा. असो.
26 Feb 2018 - 2:31 pm | भटकीभिंगरी
फोटो टाकणे जमत नाहिये . खरेतर मला कन्जूस यानी शिकवले होते .. पण नाही जमत आहे.. माझ्याकडे या ट्रेकचे खूप छान छान फोटोज आहेत .. पण सेण्ड करता नाही य्र्त
24 Feb 2018 - 9:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर भ्रमंती ! परंतु, फोटोंशिवाय प्रवासवर्णन हा मिपावर डिफॉल्ट समजला जातो.
26 Feb 2018 - 2:34 pm | भटकीभिंगरी
फोटो टाकणे जमत नाहिये . खरेतर मला कन्जूस यानी शिकवले होते .. पण नाही जमत आहे.. माझ्याकडे या ट्रेकचे खूप छान छान फोटोज आहेत .. पण सेण्ड करता नाही य्र्त
26 Feb 2018 - 2:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपावर चित्रे टाकण्याची कृती
26 Feb 2018 - 2:38 pm | भटकीभिंगरी
फोटो टाकणे जमत नाहिये . खरेतर मला कन्जूस यानी शिकवले होते .. पण नाही जमत आहे.. माझ्याकडे या ट्रेकचे खूप छान छान फोटोज आहेत .. पण सेण्ड करता नाही येत..
25 Feb 2018 - 7:12 am | कंजूस
फोटो चालत येत आहेत,दम धरा.
26 Feb 2018 - 2:50 pm | भटकीभिंगरी
फोटो टाकणे जमत नाहिये . खरेतर मला कन्जूस यानी शिकवले होते .. पण नाही जमत आहे.. माझ्याकडे या ट्रेकचे खूप छान छान फोटोज आहेत .. पण सेण्ड करता नाही येत ..
26 Feb 2018 - 2:26 pm | जागु
छान. फोटोंच्या प्रतिक्षेत.
उंदीरमारीच्या झाडाला अजून वेगळे चांगले नाव आहे गिरीपुष्प.
26 Feb 2018 - 2:36 pm | भटकीभिंगरी
फोटो टाकणे जमत नाहिये . खरेतर मला कन्जूस यानी शिकवले होते .. पण नाही जमत आहे.. माझ्याकडे या ट्रेकचे खूप छान छान फोटोज आहेत .. पण सेण्ड करता नाही येत ..
26 Feb 2018 - 2:48 pm | राजेंद्र मेहेंदळे
सरळ पिकासा किंवा गुगल ड्रईव्हवर अपलोडवा आणि इथे लिंक द्या
बाकी पदभ्रमण छानच झालेले दिसतेय. कुठला गृप होता?