रामोजी फिल्म सिटी बद्दल माहिती हवी आहे...!!

विशुमित's picture
विशुमित in भटकंती
13 Oct 2016 - 4:07 pm

नमस्कार मंडळी..!!

नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आमच्या लग्नाच्या वाढदिवस प्रितेर्थ रामोजी फिल्म सिटी (हैद्राबाद) पाहण्याचा मानस आहे. नुसता मानस च नाही तर संकल्प सुद्धा सोडला गेला आहे. अर्थातच म्याडम साहेबानी ...!!
अंतर जालावरती खूप पुनरावलोकन तपासली पण मनाचे समाधान नाही झाले.
त्या बद्दल मिपा कर मंडळीं कडून खालील माहिती हवी आहे.

****सदस्य संख्या- प्रौढ 2 आणि 1 चिमुकली (वय वर्ष 2.5)
****वेळ- 2 रात्री 3 दिवस

1) रामोजी सिटी पूर्ण पाहायची आहे.
2) फिल्म सिटी मध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे (Do 's अँड Don't 's )
3) आत मध्ये कोणत्या वयक्तिक वापराच्या वस्तू घेऊन जाऊ शकतो आणि कोणत्या नाही.
4) फिल्म सिटी मध्ये राहण्याचा पर्याय ठीक आहे का बाहेर हैद्राबाद मध्ये राहिलेला बरं पडेल.
5) फिल्म सिटी व्यतरिक हैद्राबाद मध्ये एका दिवसामध्ये पाहण्या सारखा कोणती ठिकाणे आहेत.
6) सर्वात महत्वाचं हैद्राबादी बिर्याणी खाण्याची कोणती प्रसिद्ध ठिकाण आहेत? अर्थात आणखी काही स्पेशल खाण्याची ठिकाणे असतील, ते पण कृपया नमूद करावी.

###

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

13 Oct 2016 - 4:24 pm | कविता१९७८

1) रामोजी सिटी पूर्ण पाहायची आहे.

उत्तर : - एका दिवसात पाहुन होते, बस मधुन फिरवलं जातं,तीन शोज देखील असतात, एकात शुटींग कशी केली जाते याबद्द्ल माहीती. दुसरा - लेजर शो - खुपच मस्त , मिस करु नये असा, तिसरा एक ड्रामा असतो. दोन ऑप्शन्स असतात, साधे आणि वि.आय पी. , वि. आय. पी . टिकिट साधारण १९००-२०००/- पर हेड. ( ए.सी. बस , ३ स्टार हॉटेल मधे जेवण. , खाण्यासाठी खुप वरायटी , सगळ्यात बेस्ट चिकन चेट्टीनाद)

2) फ्लिम सिटी मध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे (Do 's अँड Don't 's )

उत्तर : - फिल्म सेटस च्या वस्तुंना हात लावायचा नाही.

3) आत मध्ये कोणत्या वयक्तिक वापराच्या वस्तू घेऊन जाऊ शकतो आणि कोणत्या नाही.

उत्तर : - खाण्या चे पदार्थ आतमधे नेले जात नाही.

4) फिल्म सिटी मध्ये राहण्याचा पर्याय ठीक आहे का बाहेर हैद्राबाद मध्ये राहिलेला बरं पडेल.

उत्तर : - तिथे राहायला काही सोय नाही कदाचित , मुळ हैद्राबादहुन ४० हुन जास्त कीमी लांब आहे (आठवत नाही आता)

5) फ्लिम सिटी व्यतरिक हैद्राबाद मध्ये एका दिवसामध्ये पाहण्या सारखा कोणती ठिकाणे आहेत.

हैदराबादला लुम्बिनि पार्क, लेझर शो (नक्की पाहाच , संध्याकाळी असतो) , बिर्ला मंदीर , बायकांना पाहण्यासारखं - चार मिनार जवळील चुडी बजार

6) सर्वात महत्वाचं हैद्राबादी बिर्याणी खाण्याची कोणती प्रसिद्ध ठिकाण आहेत? अर्थात आणखी काही स्पेशल खाण्याची ठिकाणे असतील, ते पण कृपया नमूद करावी.

उत्तर : - होटेल पॅराडाईस सगळ्यात बेस्ट , फेमस डेझर्ट - खुबानी का मीठा म्हणजे जर्दाळु पाक किंवा जेली म्हणता येईल ; मिठाई - पेपर राईस ची कुठली तरी होती - खुप आवडली.

वाईट अनुभव - हैद्राबाद बेगम पेठ इथे चटणीज मधे खुबानी का मीठा खाल्ल होतं अशक्य गोड होतं पुन्हा कधीच खाबारअनाही असं ठरवुन टाकलं , पण तेच मैत्रिणीने पॅरेडाईज मधे खाल्ल ते तिला आवडलं

अजुन आठवलं की सांगते.

सुंदर असतो. न चुकवण्याची गोष्ट!

अमृत's picture

18 Oct 2016 - 10:36 am | अमृत

शो छान असतू पण डास भयंकर असतात त्यामूळी सोबत ओडोमॉस अवश्य न्या.

लुंबिनी पार्क मंजेच गोळकोंडा फोर्ट काय?

त्रिवेणी's picture

19 Oct 2016 - 11:21 am | त्रिवेणी

नै.

त्रिवेणी's picture

19 Oct 2016 - 11:21 am | त्रिवेणी

नै.

त्रिवेणी's picture

19 Oct 2016 - 11:21 am | त्रिवेणी

नै.

संत घोडेकर's picture

13 Oct 2016 - 7:58 pm | संत घोडेकर

१) रामोजी फिल्म सिटी पाहायला साधारण संपूर्ण दिवस जातो. आपण साधारण साडेनऊ ला प्रवेश केलात तरी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पाहून होईल. आतमध्ये फिरायला बस आहेत तरी काही ठिकाणी तुम्हाला चालत जावे लागते. जेवणाची सोय आतमध्ये उपलब्ध आहे. तिकीट दर आणि इतर माहिती online मिळेल.

२) फिल्म सिटी मध्ये फिरताना दिलेल्या सूचनांचे पालन करा नियम काही कडक नाहीत, मोकळेपणाने व्यवस्थित फिरता येते.

३) माझ्या मते आत खाद्यपदार्थ व पाणी नेता येते. नसेल तरी अडत नाही खाण्याचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. कॅमेरा अथवा video shooting करता येते पण काही ठिकाणी परवानगी नाही.

४) राहण्यासाठी तारा आणि सितारा हॉटेल्स आहेत पण संध्याकाळी बाहेर फिरण्यासारखे काहीच नाही त्यामुळे हॉटेलमध्ये टीव्ही पाहण्याशिवाय पर्याय नाही.

५) पाहण्यासाठी बाकीच्यांनी सांगितलेल्या व्यतिरिक्त सुधा कार म्युझियम जरूर पहा.सालारजंग पाहताना नंतर कंटाळा येतो तसेच लहान मुले कंटाळून जातात.

६) कराची बेकरीला अवश्य भेट द्या.

मोती खरेदीला abids ला जाऊ नका भलतेच महाग आहेत. त्याऐवजी चारमिनारच्या आसपासची दुकाने try करा.

अजून काही माहिती हवी असल्यास अवश्य कळवावे.

> बायकांना पाहण्यासारखं - चार मिनार जवळील चुडी बजार

बायकांनी पाहण्यासारखं ! उगाच काही लोक गैरसमज करून घेतील.

भ ट क्या खे ड वा ला's picture

23 Oct 2016 - 12:54 pm | भ ट क्या खे ड वा ला

सालारजंग म्युझियम ,श्री शैलम एक दिवस रहाव लागेल

कविता१९७८'s picture

13 Oct 2016 - 4:25 pm | कविता१९७८

स्वतःचा कॅमेरा , मोबाईल बरोबर नेउ शकता आणि न्याच कारण पक्षी संग्रहालयात खुप रंगबेरंगी पक्षी असतात,

माहितीबद्दल खूप आभारी आहे...!!

त्यांच्या वेबसाइट वर तारा सितारा ही हॉटेल्स आहेत ती फ्लीम सिटी मधेच आहेत ना?

कुबानी का मीठा लैच गोड्ड असते. मला बिल्कुल आवडले नै. त्यापेक्षा डबल का मीठा (पॅराडाइज मधले) जब्बरदस्त टेस्ट होती. बिर्यानी अगदी अप्रतिम अशी नाही पण चूक काढायला जागाही नाही. कोटीत एक स्नॅक्स सेंटर होते. तिथे पण बरेच काही खाल्ले. (नाव आणि पदार्थ आठवेनात) पथ्थर गोश्त प्रकार पण ट्राय करणेबल आहे.

राघवेंद्र's picture

13 Oct 2016 - 7:26 pm | राघवेंद्र

अरे मित्रा, गोकुळ चाट सेंटर हे कोटी मधले सर्वात मस्त हॉटेल आहे. मिरची भजी, समोसा, पाव भाजी आणि बरेच काही. 'कोटी वुमेन्स कॉलेज' हा त्याच्या जवळील बस स्टॉप वरून रामोजी फिल्म सिटी जायला सिटी-बस सुटतात. रामोजी ला जायला सगळयात स्वस्त पर्याय आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Oct 2016 - 7:38 pm | कैलासवासी सोन्याबापु

अभ्या लगा प्रत्येक बिर्याणी अप्रतिमच असते रे, श्री श्री श्री १२००१ कोंबडी मांस प्रेमी ब्याटमन भाऊ म्हणतात त्याप्रमाणे "कोंबडी जाते जीवानिशी, तिचा मान राखणे गरजेचे असते, बाकी मै तुम्हारे लिये जान भी दुंगी वाल्या ५६ भेटतील पण खरोखर जान देऊन पानात येणारी एकटी कोंबडी असते." तेव्हा कुठलीही असो अन कशीही असो कोंबडी उत्तमच असते. अगदी उकडलेले पीस असले तरी =))

बोका-ए-आझम's picture

13 Oct 2016 - 9:21 pm | बोका-ए-आझम

खरोखर जान देऊन पानात येणारी एकटी कोंबडी असते.

बकरी, बोल्हाई, कोलंबी आणि मासळी या सर्व जान देऊनच पानात येतात. एकट्या कोंबडीचा उल्लेख केल्याबद्दल णिशेध!

कविता१९७८'s picture

13 Oct 2016 - 5:31 pm | कविता१९७८

हो हे वि आय पी तिकिट असेल तर जेवणासाठी आहे.

फिल्म सिटी मधे रहायची सोय आहे. नेट वरुन बुकींग पण होते. तिथेच रहा.

आधी हैद्राबाद मधे मुक्काम करा. हैद्राबाद दर्शन झाले की सकाळी आरामात निघुन १०-११ च्या सुमारास फिल्म सीटी ला पोहचा. तो दिवस फिलम सिटी बघण्यात घालवा. रात्री मुघल गार्डन सारखी बाग आहे त्यात सुंदर लायटींग असते. रात्रीच्या जेवणा ची सोय तिथेच असते बुफे प्रकारात. बर्‍याच वेळेला रात्री गाण्यांचा शो पण असतो.

दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट असतो तो घ्यायचा, अजुन काही बघायचे असेल तर बघायचे आणि बॅक टू हैद्रबाद.

हैदराबादहून रामोजी फिल्म सिटी बरीच लांब आहे. पण तुम्हाला जर हैदराबादमध्येच राहायचं असेल तर वनस्थलीपुरम भागात राहा. फिल्म सिटीचा रस्ता तिथूनच जातो.
बिर्याणीसाठी पॅराडाईज (सिकंदराबाद मधलं) छान आहेच, पण नामपल्ली (हैदराबाद) स्टेशनजवळ बावर्ची म्हणून एक आहे. ते अप्रतिम आहे. अजून चौकी का खाना झोमॅटोवर बघून घ्या. चारमिनारजवळ आणि जियागुडा भागात बिर्याणी छान मिळते. अर्थात इथे 'टूरिस्ट' रेस्टॉरंट्स नसतील. पण चव आणि quantity दोन्ही जबरदस्त!

सालारजंग म्युझीयम , गोवलकोंडा किल्ला

काही स्पेशल खाण्याची ठिकाणे - आंध्रा मील ( आता त्याला कदाचित तेलंगणा मील म्हणत असावेत .)

कविता१९७८'s picture

13 Oct 2016 - 5:35 pm | कविता१९७८

सालारजन्ग म्युझियम तस चान्गलय पण आम्हाला पाहायला जरा कन्टाळवाण वाटल

कंजूस's picture

13 Oct 2016 - 7:21 pm | कंजूस

(दोन वर्षांपुर्वीच्या माहितीपत्रकातले रेट्स आहेत)
CONDUCTED TOUR'
1. City' Tour: (Daily) Covers Birla Mandir, Qutab Shahi Tombs, Golconda Fort, Salarjung( closed
on Friday), Zoological Park, (closed on Monday), Osmanasagar, drive past Mecca Masjid and Charminar
and Lumbini Park, Timings: 0745-1900 hrs. Fare: Rs. 450/- (Adult) & Rs. 360/- (Child). Fare includes entry
fee for Museum, Palace. Entry fee charged extra for Foreign Tourists at Museum, Fort and Nizam Jubilee
2. Golconda Fort (Daily): Covers State Fine Art Gallery, Sound and Light show at Golconda Fort,(closed on Monday) Lumbini
Park via Charminar, Boat Ride at Hussainsagar Lake. Timings: 1700 to 2200 hrs. Fare: Rs. 450/- (Adult)
& Rs. 350/- (Child). Fare includes entry tickets, dinner (veg) on cruise and transportation.
3. Ramoji Film City Tour: Covers Sai Baba Temple, Sanghi Temple, Ramoji Film city. Timings: 0700 to
1900 hrs. Fare: Rs. 800/-(Adult), Rs.700/-(Child) (includes transportation & entry fee for film city).
4, Srisaillam Tour (Daily): Tour covers Mallikarjuna Swamy Temple, Sakshi Ganapati, Dam & Ropeway.
Timings: 0600 hrs to 2000 hrs. Fare: Rs.415/- (Non A/c Coach), Rs.700/- (A/c Coach)
5. Heritage Half Day Tour: Covers Buddha statue at Lumbini Park, Salarjung Museumprive through
Charminar, Chowmahalla Palace,Golconda Sound & Light Show ,State Fine Arts Gallery & Lumbini Park (
Terminating Point) from Tank Bund Road. Dep.: 1400 hrs. & Arr.: 2100 hrs. Fare: Rs.350/- (Adult) &
Rs.280/- (Child) (Including entry tickets)
6, Tirupati, Tirumala and Tirchanur Tour: (4 days tour) Every Friday covers Tirupati, Tirumalai, Tiruchanur,
Srikalahasti, Kanipakam, Srinivasa Mangupuram and Kapila Teertham Dep: 1800 hrs Arr. 0600 hrs day)
Fare: Rs.2600/-(Adult); Rs.2080/-(Child) includes accommodation at Tirupati and Sudarshan token).

प्राची अश्विनी's picture

13 Oct 2016 - 7:43 pm | प्राची अश्विनी

शक्य असेल तर रामोजी फिल्म सिटीमध्ये नक्की रहा. संध्याकाळी गर्दी गेल्यानंतर तिथली गार्डन्स किंवा इतर वास्तुंमध्ये फिरायला फार सुंदर वाटते. निशीगंधाच्या फुलांचा मंद वास, नितळ चांदणं, त्यात भिजलेले संगमरवरी महाल , निरव शांतता एकदा अनुभवून पहा. एकदम royal वाटतं. तिथल्या रुम्स, जेवण तर अप्रतिम. शिवाय तिथल्या होटेलमध्ये रहात असाल तर आत कुठल्याही शो किंवा राईडला तिकीट लागत नाही. (4-5वर्षांषांपूर्वी नव्हतं, आत्ताचं कन्फर्म करा.)

फार सुंदर आहे रामोजी फिल्म सिटि.जाऊन बरीच वर्ष झाल्याने सध्याचे नियम वा रेट माहित नाहि पण रहायची सोय चांगलिये. आतल्या आत फिरायला बसची सोय चांगली आहे. हव तिथे उतरून पाहुन परत या वा पुढची बस पकडा.पूर्वी तरि खाण्याचे आत घेऊन जाता येत होते. आत सगळी सोय आहेच.आत असलेले वेगवेगळे शॊ चुकवु नका.
बाकी हैद्राबादेत गोवळकोंडा किल्ला,लुंबिनि पार्क तिथला लेझर शॊ,एन टी आर गार्डन,सालारजंग म्युझियम,चारमिनार,सुधा कार म्युझियम,प्राणिसंग्रहालय,बिर्ला मंदिर हि ठिकाण आवडली.

चिमुकली बरोबर आहे म्हणता तर तिला यातल काय आवडेल तस बघा .एन टि आर गार्डन आणि झु बघा.दोन्हिकडे टोय ट्रेन आहे फिरायला शिवाय झु मधे आत फिरायला वेगळ्या गाड्याहि आहेत.एन टि आर मधील फळांच्या, कीटकांच्या मोठ्या प्रतिकृती मुलांना आवडतात.किल्ला, म्युझियम,मंदिर याठिकाणी कदाचित ती कंटाळेल.

त्रिवेणी's picture

13 Oct 2016 - 9:52 pm | त्रिवेणी

व्हि आय पी तिकीट घ्या.यात वाॅटर बाॅटल आणि चाॅकलेट पण मिळतील.एकूण गर्दी बघता व्हि.आय.पी बरे पडते.यात एक राईड पण असते ती नाॅर्मल तिकीट मध्ये नसते.पॅराडाईज बकवास एकदम.शादाब ट्राय करा.गोवलकोंड्याचा नाईट शो नाही बघितलात तरी चालेल. आणि ईच्छा झालीच तर फुल कपडे घालून जा.डास दोन मिनीट बसू देणार नैत तिथे. आम्ही विवांता ला राहिलो होतो.
वेळ असेल तर रामोजी पासून पुढे पोचमपल्ली ला जा. वहिनी खुष होतील.आम्हाला नवर्याच्या ओफिस मधले एक कलिग भेटले तिथे मग आम्ही सगळे मिळून रात्री आठ वाजता निघालो तिथे जायला. आणि एका विणकराच्या घरी जावून साड्यांची खरेदी केली तिथे.काय मस्त मस्त साड्या मिळाल्या तिथे.

त्रिवेणी's picture

13 Oct 2016 - 9:57 pm | त्रिवेणी

सुधा कार म्युझियम आणि प्राणिसंग्रहालय जवळ जवळ आहेत.३ ते ४ किमी अंतर असेल.चार पाच वाजता बिर्ला मंदिर ला जा तिथून लुंबिनी पार्क जवळ आहे. सहा वाजता तिकडे पोहोचून सातचा लेसर शो पहा.शक्य झाल तर शेवटच्या रांगेत बसा वरच्या.छान व्हू मिळतो.

मित्रहो's picture

13 Oct 2016 - 11:05 pm | मित्रहो

या बाबत हैद्राबादला काही कमी नाही. भरपूर चॉइस आहे प्रत्येकाची आवड त्यानुसार खायचे.
रामोजी बद्दल सर्वींनी माहीती दिलीच आहे. मस्त जागा आहे दिवस जातो. गाडी करुन गेलात तर सकाळी नउ ते संध्याकाळी सहा सात पर्यंत तिथे थांबायचे.
खाण्यासाठी
- गोविंद बंडी चारमिनार आणि बंजारा हिल्स उत्कृष्ट दोसा, राम बंडी दुसरा नंबर.
- कराची बेकरी नामपल्ली, तसे कराची बेकरीचे बरीच दुकाने आहेत हे मुख्य.
- पॅराडाइज सिकंदराबाद. हे सुद्धा शहराच्या प्रत्येक भागात आहे परंतु मुख्य पॅराडाइज हे त्याच नावाच्या चौकात सिकंदराबाद मधे. व्हेज बिर्याणीच खायची असेल तर इथे जाउ नये. मटन बिर्याणी उत्तम असते असे ऐकून आहे.
- बावर्ची, शा घोस (नक्की उच्चार कसा ते माहीत नाही), पिस्ता हाउस बिर्याणी अगदी खास हैद्राबादी परत व्हेज असेल तर जाउ नये.
- फेमस आइस्क्रिम नामपल्ली
- शाकाहारी साठी ताजमहाल, चटणीज, संतोष धाबा अॅबीडस. चटणीज मधे मला आवडनार म्हणजे बाबाइ हॉटेल इडली, स्टिम दोसा, ओनियन रवा मसाला दोसा

बघण्याची काही ठिकाणे
- फलकनुमा पॅलेस पण बघण्यासारखा आहे. तेलंगणा सरकार हेरीटेज इमारतीची सैर घडवते गाइड सोबत. पायीच फिरावे लागते सकाळी असते.
- भोंगीर फोर्ट
- हुस्सेन सागर, बोट राइड आणि लुंबीनी लेझर शो
- ओस्मान सागर लेक आणि हिमायत सागर लेक. हल्ली पूर्ण भरुन आहे. शहराच्या दुसऱ्या बाजूला आहे. तलावाशिवाय फार काही नाही.
- प्राणिसंग्रहालयात तीन ते चार तास जातात. जायचे दोन तास वेगळे.

लग्नाच्या वाढदिवसाला जायचे आहे म्हणून लंचसाठी एक जागा सुचवतो फक्त रामोजीपासून खूप लांब आहे आणि तुलनेत महाग आहे. तुम्ही नेटवर बघू शकता. गोवलकोंडा रिसोर्टच्या आत ज्वेल ऑफ निझाम. पहीला नंबर फलकनुमा पॅलेस आणि दुसरा हे हॉटेल. इथे निझामी पद्धतीचे जेवण आणि सेवा असते.

कंजूस's picture

14 Oct 2016 - 7:12 am | कंजूस

रामोजि फिल्म सिटी फोटो त्यांच्या माहिती पत्रकातून
१) १/२

२ ) २/२

चौकटराजा's picture

14 Oct 2016 - 7:36 am | चौकटराजा

रामोजी भेट हा एक रम्य अनुभव आहे. हैद्राबाद मधून बस ची सोय आहे. चालण्याची तयारीही ठेवावी तर मजा आहे.

विशुमित's picture

14 Oct 2016 - 10:16 am | विशुमित

धन्यवाद मिपाकर बंधू आणि भगिनींनो...!!
अप्रतिम प्रतिसाद. माझी 80% टक्के सहलीची तयारी आजच झाली. फक्त स्वतः गाडी हाकत घेऊन जाऊ की रेड बस.कॉम वरून बस बुक करून मस्त माझ्या दोन्ही पिल्लाना कुशीत घेऊन प्रवास करू एवढ्याच विवंचनेत आहे. हैद्राबाद मध्ये एखादी कॅब करता येईल.

कविता१९७८'s picture

14 Oct 2016 - 11:04 am | कविता१९७८

हैद्राबादला म्युझियम , पार्क, बिर्ला मन्दीर जवळ आहे पण रामोजी वैगरे बरेच लाम्ब आहेत , त्यानुसार ठरवा. हैदराबादेत स्नो वर्ल्ड ला गेलो होतो, मुलाना आवडेल तुमच्या.

बस पेक्शा आगगाडि चांगला पर्याय आहे. दुरन्तो का कहीतरी ए सी गाडी आहे. पहाटे निघते आणि मध्यरात्री परतते. सहसा तिकीटे ऊपलब्ध असतात.

रॉजरमूर's picture

14 Oct 2016 - 7:03 pm | रॉजरमूर

शताब्दी एक्सप्रेस ............!

आहे ती .
12025 पुणे -सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस .
पुण्याहून सकाळी 05:50 ला निघून दुपारी 2:20 वाजता सिकंदराबाद ला पोहोचते .
बिर्याणीसाठी सिकंदराबाद मधील पॅरॅडाईस बेस्ट .

मी-सौरभ's picture

14 Oct 2016 - 7:05 pm | मी-सौरभ

योग्य गाडीची महिती दिल्याबद्दल

शताब्दीच्या रेटमध्ये तीनदा प्रवास होईल एक्सप्रेसचा.
अर्थात डबे आणि सर्व्हिस चांगली असते, फास्ट असते, क्रॉसिंग, स्टॉप न के बराबर.
पण एक्स्प्रेसचे खूप ऑप्शन आहेत की.

कंजूस's picture

14 Oct 2016 - 7:17 pm | कंजूस

निघण्या - पोहोचण्याच्या दृष्टीने कुटुंबाला कोणार्क एक्स बरी नाही का? गाडीत एक रात्र काढावी लागली तरी पोहोचल्यावर पावणेआठला हॅाटेलात जाऊन चेकइन करून त्या दिवसाचा अर्धा दिवस आरामात मिळतो. ५-५० ची गाडी पकडणे काही भागातून अशक्य आहे. पिंचिंतून येणारे असतील तर?

रॉजरमूर's picture

15 Oct 2016 - 12:17 am | रॉजरमूर

हो .

५-५० ची गाडी पकडणे काही भागातून अशक्य आहे. पिंचिंतून येणारे असतील तर?

अगदी बरोबर ....
कोणार्क चांगली आहे . त्याचबरोबर ,
17031 हुसेनसागर एक्सप्रेस पण पर्याय चांगला आहे पुण्याहून दुपारी 04:30 ला निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 6:00 ला पोहोचते हैदराबाद नामपल्ली ला.

मित्रहो's picture

15 Oct 2016 - 8:12 am | मित्रहो

ती हुसेन सागर नाही, ती हैद्राबाद एक्सप्रेस आहे.
हुसेन सागर रात्री दीड की दोनला पुण्यावरुन निघून दुपारी अडीचला हैद्राबादला पोहचते.
पुण्यासाठी मुंबइ एक्सप्रेस किंवा येताना हैद्राबाद एक्सप्रेस तर
मुंबइवरन हुसेन सागर आणि डुरांटो सोयीचे असते.
वेळेवर प्रवास असेल तर शताब्दी उत्तम आहे.

विशुमित's picture

15 Oct 2016 - 11:17 am | विशुमित

कोणार्क बरी वाटतेय.

त्रिवेणी's picture

14 Oct 2016 - 10:51 am | त्रिवेणी

आम्ही पुण्यातून गाडीने गेलो होतो.नविन आटूकमाटूक झेस्ट चालवायची होती नवर्याला म्हणून.सोलापूर पासून पुढे लईच बेक्कार रस्ता आहे.म्हणायला फक्त राष्टीय महामार्ग.पण छोटा आहे. त्यात बर्याच ठिकाणी रुंदिकरणाच काम सुरु होत. आम्ही सकाळी साडेपाचला घरातून निघालो ते पाच वाजता हैद्राबादला पोहोचलो.रस्त्यात चांगली होटेल नाहित.त्यात हैद्राबादचे ट्रैफिक पुण्यापेक्षा बेक्कार. आम्ही एकूण पाच दिवस होतो त्यातले फक्त दोन दिवस स्व:तची गाडी बाहेर काढली त्यातला एक दिवस रामोजीला नेली होती.बाकी दिवस ओलाने फिरलो.मुल खुप लहान असतील तर स्व:तची गाडी न नेलेलीच बरी.कंटाळतील ते.सरळ तिकडे गेल्यावर ओला वापरा.

विशुमित's picture

14 Oct 2016 - 12:04 pm | विशुमित

तोच विचार आहे...!!

पिल्लांसाठी मला जास्त वेळ आणि लक्ष देता येईल....

अभ्या..'s picture

14 Oct 2016 - 12:16 pm | अभ्या..

मस्त. बर्थडेपार्टीसाठी हैद्राबाद मस्त. आमची पण मस्त झालेली. प्याराडाईज आणि आयटीसी काकतीयाला जेवलेलो.
सालारजंग जब्बरदस्त. दिवस त्यात गेला भारीपैकी. घड्याळाचे टोले पण पाहिले. बिर्ला मंदीर, लुंबिनी वगैरे पाह्यले.
कार म्युझियम भंकस आहे. लहान पोरांना आवडेल.
चारमिनारावाली चायबी पिये.
मोस्ट मेमरेबल ट्रीप झाली आयुष्यातील.

असंका's picture

18 Oct 2016 - 5:33 pm | असंका

कार म्युझियम भंकस आहे

+१..

पण ऑप्शन म्हणून माहित असावं...

कविता१९७८'s picture

14 Oct 2016 - 11:12 am | कविता१९७८

मोत्यांचे दागिने सगळीकडे सेम पण किमतीत फरक असतो. ४-५ दुकाने फीरुन नंतर घ्या. आम्हाला प्लस पॉईंट हा होता की मैत्रीण आणि तिच्या नवर्‍याचा क्लासमेट तेलंगणाचे ए.सी.पी. महेश भागवत. त्यांना भेटायला गेलो त्यांच्या ऑफीसमधे गेलो तर त्यांनी त्यांच्या ओळखीच्या ज्वेलरला फोन केला होता. त्या ज्वेलर ने सगळे सेटस अर्ध्या किमतीत दिले म्हणजे ज्याची प्राईस ३५ के लिहिली होती तो सेट १७.५ के असा मिळाला. म्हणजे खुप जास्त मार्जिन असतो मोत्यांच्या सेटसवर त्यामुळे बार्गेन करा.

कंजूस's picture

14 Oct 2016 - 12:00 pm | कंजूस

एकूण वाढदिवस गाजणार तर!!

विशुमित's picture

14 Oct 2016 - 12:10 pm | विशुमित

हा हा हा ..... तुमच्या सर्वांचे एवढे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यावर नक्कीच गाजणार त्यात काहीच संशय नाही..!!

आशुतोष-म्हैसेकर's picture

14 Oct 2016 - 12:13 pm | आशुतोष-म्हैसेकर

मी हैदराबाद मध्येच राहतो, आणि हे ऐकून मला भेटणारा प्रत्येक नवीन माणूस हाच प्रश्न करतो, म्हणजे तू रामोजी फिल्म सिटी पहिली असणार...!
खरं म्हणजे जन्मापासून हैदराबादचा संबंध असताना मी कधीच रामोजी फिल्म सिटी पाहिलेली नाही, त्या बद्दल महाराष्ट्रात सगळ्यांनाच भयंकर आकर्षण आहे,ती सुंदर आहे असंही ऐकलंय. पण एक हैदराबादी म्हणून तुम्ही हैदराबादला येऊन हैदराबाद न पाहणं म्हणजे तुमची सहल व्यर्थ होईल. केवळ रामोजी फिल्म सिटी करिता हैदराबादला येण्याऐवजी, हैदराबादला येऊन रामोजी फिल्म सिटी पाहणं जास्त मजा देऊन जाईल असं मला वाटतं,

बाकी हैदराबाद मध्ये प्रसिद्ध स्थळांकडे ओढा तर आहेच पण बरीच अपरिचित किंवा अल्पपरिचित ठिकाणं आहेत जी पाहून सहल सार्थ करता येते

कंजूस's picture

14 Oct 2016 - 12:44 pm | कंजूस

सालारजंगला जाल तर
अकरा वाजता आत जाऊन तो तळमजल्यावरचा पडदेवाला पुतळा पाहा नंतर घड्याळाच्या दालनात जागा पकडून बसा साडेअकराला. बाराचे बारा ठोके पाह्यला नंतर दुसय्रा मजल्यावर २६ नं हिरे माणकांचे दालन पाहा. त्यानंतर त्याच मजल्यावर चाइनिज रेशमी भरतकाम पाहा. यानंतर उत्साह असलाच तर इतर दालने पाहा.
यानंतर ओटो रिक्षाने चार मिनारला जा ( २०रु). स्ट्रीटफुड तिथे चाखल्यावर तुमची बांगड्या वगैरे खरेदी करता येईल. लहान मुले असल्याने अर्धा दिवसच साइटसिइंग करावे. फार ताणून सर्वच बघु नये.

विशुमित's picture

14 Oct 2016 - 12:47 pm | विशुमित

विचारांशी नक्कीच सहमत.
रामोजी हैदराबादची नवीन पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख आहे असा समज झाली असल्या कारणाने असू शकते.
रामोजीला पूर्ण अक्खा दिवस जातो (तरी सुद्धा संपूर्ण पाहता येत नाही) असे ऐकून आहे.

वेळेचे काही बंधन नाही फक्त चिमुकली सोबत असल्या कारणाने फक्त निवडक स्थळ पाहण्याचा मानस होता. तरी सुद्धा शक्य तेवढे परिचित आणि अल्पपरिचित ठिकाणं पाहून सहल सार्थ करण्याचा प्रयत्न करेन.

कविता१९७८'s picture

14 Oct 2016 - 2:43 pm | कविता१९७८

ईतकही खुप खुप छान नाहीये, सगळी कडे फील्मचे सेटस् अन पुतळे बसवलेत माणसान्च्या जागी, पक्षी पाहायला बरे वाटतात, वि आय पी जेवण मस्त अन जेवल्यानन्तर चे तीन शोज, दिवस सम्पतो. शेवटी ते सिनेमाच्या शुटीन्ग साठीच तर बनवलय

कविता१९७८'s picture

14 Oct 2016 - 2:50 pm | कविता१९७८

सगळी कडे फिल्म सेट्स उभारले आहेतस, सारखे सेट्स तरी किती पाहणार. फक्त योजनाबद्ध बांधकाम आहे , एखाद्या रीसॉर्ट मधे गावाची थीम घेउन घर आणि पुतळे काम करताना ठेवलेले दिसतात तसच आहे रामोजी मधे. उलट ते सेट्स तर फक्त एकेरी भिंत आहे, म्हणजे घर आणि बंद दरवाजा असा सेट आहे म्हणजे एक एकेरी भिंत त्याला रंगवुन एक दरवाजा लावलाय, दरवाजा उघडला कि समोर रान माजलेलं दिसतं घर वगैरे काही नाही. ओम शांति ओम आणि चेन्नई एक्स्प्रेस ची शुटींग तिथे झालिये. गेल्यावर सीन्स आठवतीलच.

कविता१९७८'s picture

14 Oct 2016 - 2:51 pm | कविता१९७८

पण एकदा पाहण्यासारखं नक्कीच आहे, जसे आनंद सागर बाग - शेगाव.

आशुतोष-म्हैसेकर's picture

16 Oct 2016 - 5:57 pm | आशुतोष-म्हैसेकर

हो, रामोजी हे एक मोठे शहर असल्यागत आहे, आणि इतक्या लांब येऊन एक दिवस नक्की राखून ते पहावं कारण पूर्ण भारतात असे कुठे पाहायला मिळणार नाहीये.

बाकी हैदराबाद की बाता नक्कोच करो,पुरी जिंदगी चारमिनार पे निकल गई तो बी हैदराबाद जीना नै होता.इदर उधर गल्ली गल्ली में चकाचौन्ध शोरशाराबा रेहता. हमारे इस्मैल भाई तो २५ साल से चारमिनार पे दुकान चलारे....

वामन देशमुख's picture

14 Oct 2016 - 2:11 pm | वामन देशमुख

हैद्राबादेतील ऑथेंटिक चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, नाहारी पाया, चिकन नाहारी (फक्त शनिवारी संध्याकाळी), तंदूर चिकन, रेशमी कबाब इ. खाण्यासाठी शाह गौस हे हॉटेल चुकवू नका.

पद्माक्षी's picture

14 Oct 2016 - 2:23 pm | पद्माक्षी

हैद्राबादमध्ये बघण्याची ठिकाणे; रामोजी, चारमिनार, गोळकोंडा फोर्ट, नेहरू झू ,

१. रामोजी :- खूप मोठे आहे. गर्दी असली तरी फरक पडत नाही. आत फिरायला बसेस असतात. रामोजीची साईट आहे. तिचे सर्व माहिती मिळेल. आतल्या राइड्स आणि बस प्रवास तिकिटात अंतर्भूत असतो. लहान मुलांसाठी छोट्या छोट्या राइड्स पण आहेत. नाताळच्या वेळी रामोजीमध्ये कार्निवल असते त्यावेळी जाण्यात जास्त मजा असते. एकूण पूर्ण दिवस आरामात जातो. तिथले नवीन पक्षी संग्रहालय खूप छान आहे. रामोजीमध्ये रहाण्यात फारसा फायदा नाही. हॉटेलचे दर खूप आहेत आणि शहरापासून रामोजी बराच लांब आहे (६० किमी ).

२. चारमिनार : चारमिनार जवळचा बाजार चांगला आहे. घासाघीस बरीच होते असे ऐकून आहे. चारमिनार मध्ये बघण्यासारखे खास काही नाही.

३. गोलकोंडा फोर्ट : किल्ला चांगला आहे. गाईड घेतला तर जास्त माहिती कळते. चढायला फार अवघड नाही. चढून उतरायला जास्तीत जास्त दीड ते दोन तास लागतात. लेझर शो ठीक आहे. अमिताभचा आवाज आहे.

४. नेहरू झू : झू चांगले आहे. पुण्याच्या झूपेक्षा बरेच जास्त प्राणी आहेत. मुलांना मजा येते.
कार museum मुलांना आवडेल. नेहरू झू पासून अगदी जवळ आहे.

५. खाण्यापिण्यासाठी : पॅराडाइज बिर्याणी (याच्या बऱ्याच शाखा आहेत), शाकाहारी लोकांसाठी chutneys, खायप्यायला काही प्रॉब्लेम नाही. भरपूर हॉटेल्स.

६. खरेदीसाठी मॉल्स : फोरम मॉल, इनॉर्बिट, GVK मॉल.

Ola, Uber आणि इतर बऱ्याच कॅब आहेत. आरामात मिळतात.
नोव्हेंबरमध्ये हवा चांगली असते. उन्हाचा त्रास होऊ नये.

सिरुसेरि's picture

14 Oct 2016 - 2:53 pm | सिरुसेरि

पारंपारीक वस्त्र खरेदी साठी - आर एस ब्रदर्स , चंदना ब्रदर्स , पटनी'स सेंटर .

अपरिचित किंवा अल्पपरिचित ठिकाणं - क्लॉक टॉवर , चिलकुर बालाजी , नेकलेस रिंग रोड - हुसेन सागर तलाव

टाकलेला म्याप स्पष्ट दिसतो का मोठा केल्यावर?

त्रिवेणी's picture

14 Oct 2016 - 7:45 pm | त्रिवेणी

बर्यापैकी वाचता येतय काका.

हैदराबादचा सिटी म्याप टाकू का ( तुकड्यात)?गुगलचा/नेटवरचा चांगला असेल तर नाही टाकत नाही.

हैदराबाद/ सिकंदराबाद शहर नकाशा माहितीपत्रकातून
१/४ ) उजवीकडे वर
Link:https://c4.staticflickr.com/6/5632/29700762603_79abf79a94_k.jpg

२/४ )उजवीकडे खाली
Link:https://c7.staticflickr.com/8/7532/30296913126_768e186c6f_k.jpg

३/४ ) डाविकडे खाली
Link:https://c7.staticflickr.com/6/5789/30035233470_ab3dccc02b_k.jpg

४/४ ) डाविकडे वर
Link:https://c1.staticflickr.com/9/8560/30035244000_728665fdb3_k.jpg

हैदराबाद/ सिकंदराबाद शहर नकाशा माहितीपत्रकातून
१/४ ) उजवीकडे वर

२/४ )उजवीकडे खाली

३/४ ) डाविकडे खाली

४/४ ) डाविकडे वर

चांगली माहीती मिळाली.

कधी हैद्राबादला जायचं असलं तर हा धागा कामाला येईल.

जयन्त बा शिम्पि's picture

16 Oct 2016 - 6:29 pm | जयन्त बा शिम्पि

रामोजी ' फ्लिम ' सिटी , ऐवजी ' फिल्म सिटी ' च म्हणायचे आहे ना ? नाहीतर ' बायकांनी ' ऐवजी ' बायकांना ' सारखा घोटाळा व्हायचा !

विशुमित's picture

17 Oct 2016 - 10:20 am | विशुमित

ओह्ह्ह..तरी मी म्हणतोय शब्दामध्ये काहीतरी गडबड दिसतेय... लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद...

mayurpankhie's picture

17 Oct 2016 - 3:12 pm | mayurpankhie

सध्या हैदराबाद मध्ये राहत आहे .
सुरुवात रामोजी पासून करते, ३ वर्ष्यांपूर्वी गेले होते. फार काही बदल झालेला नाहीये. प्रचंड मोठ आहे, खूप चालायला लागत, मुलांसाठी शक्य असेल तर pram, stroller जवळ असू द्या. मुलांना कंटाळ येऊ शकतो. VIP पास घ्या, यात lunch आणि snacks , water bottle, caps, २-३ राइड्स , बस आणि एक guide मिळेल. हा गाईड सर्व माहिती देतो, उदाहरण म्हणजे अमुक अमुक एका पिक्चरच्या एका सीन मध्ये हे दाखवलाय वगरे वगरे. तिकीट बद्दलची माहिती तुम्हाला नेट वर मिळेल. यांच्या टूर AC बसेस पण आहेत. तुम्ही कॅब ऐवजी बस ने जाऊ शकता. नोव्हेंबर एन्ड ला थंडी असली तरी हैदराबाद मध्ये कधीही ऊन वाढू शकत म्हणून मुलाची विशेष काळजी घ्या. बाकी सगळी माहिती तुम्हाला आत्तापर्यंत मिळाली आहेच.

रामोजी व्यतिरिक्त बघण्यासारखी ठिकाणे - बिर्ला मंदिर , नेकलेस रोड, लुम्बिनी पार्क, हुसेन सागर, सालारजंग , स्नो वर्ल्ड, कार म्युझियम, चारमिनार (वरती जाऊन बघण्यात काही पॉईंट नाही, खूप खराब आहे ), नेहरू झू पार्क, Escape अम्युझमेंट पार्क , पुरी जगन्नाथ टेम्पल (प्रति पुरी मंदिर ), फलकनुमा पॅलेस टूर , गोलकोंडा. सालारजंग , झू मुलांना जरा बोर होईल.

खाणे : नॉन व्हेजिटेरियन असाल तर असंख्य ऑपशन्स. पॅराडाईज पेक्षा बावर्ची, शाह गौस , रायलसीमा रुचूलू इथे अप्रतिम बिर्याणी मिळते. पॅराडाईज मध्ये ब्रेकफास्ट ला खिमा पाव मिळतो. खाल्ला नाहीये पण फेमस आहे. तुम्ही ट्राय करू शकता. absolute barbeque, खान साब, Ohari 's - Rubayat , नौटंकी गली छान आहे.
Chutney's प्युअर व्हेज आहे आणि साऊथ इंडियन स्पेशल. इथे ६ प्रकारच्या चटण्या आणि सांभर सर्व्ह करता प्रत्येक डिश सोबत. बबई इडली खाच. बिकानेरवाला अजून एक व्हेज ऑप्शन.
Jewel of Nizam हा एक चांगला experience असेल तुमच्या एनिवर्सरी साठी. पण जायच्या आधी खात्री करा, इथे डिनर साठी लहान मुले allowed नाहीत (१२ वर्षा खालील) लंच साठी बहुदा असावेत.

शॉपिंग : मोती फेमस , काही लोक स्टोन्स फेमस सांगता पण खर तर मोतीच फेमस आहे. Mangatrai , जगदंबा पर्ल्स , krishna pearls हे जेवेलर्स आहेत. Abids , चारमिनार मध्ये guarantee नाही. इथे सगळे लोक तुम्हाला मोती जाळून दाखवतील, त्यावर विश्वास नका ठेवू. चारमिनार च्या जवळ चुडी बाजार , अत्तर मार्केट आहे . खूप भाव करावा लागेल. नल्ली सिल्क , साऊथ इंडिया शॉपिंग मॉल, चेन्नई शॉपिंग मॉल इथे सिल्क शॉपिंग करू शकता. लहान मुलींसाठी जसे आपल्याकडे इरकल परकर पोलके मिळता तसे इकडे सिल्क चे मिळता. Half saree फेमस प्रकार.

तुमच्या ट्रिप साठी शुभेछया !!!

विशुमित's picture

17 Oct 2016 - 3:17 pm | विशुमित

खूप छान माहिती मिळाली धन्यवाद...!!

येत्या फ्रेब्रुवारीत हैद्राबाद व श्रीशेल्यला जाण्याचा विचार करतोय. त्यावेळी हा धागा नक्कीच उपयोगी पडेल. तरी यासाठी सर्वांचे आभार. शक्य झाल्यास आणखी एक मदत करावी. राहण्यासाठी चांगली हॉटेल, त्यांचे पत्ते व फोन नं. मिळाले तर बरे होइल.

सिरुसेरि's picture

21 Oct 2016 - 4:15 pm | सिरुसेरि

१. पार्कलेन , २. कामत -- सिकंदराबाद , ३. मांडवा'स इन ४. लेमन ट्री -- माधापुर हि काहि चांगली हॉटेल्स माहित आहेत . यांचे पत्ते व फोन नं हे नेटवर मिळतीलच . काहि शंका असल्यास त्याही फोनवरच त्यांना विचारुन घ्याव्यात .

त्रिवेणी's picture

23 Oct 2016 - 10:35 am | त्रिवेणी

आम्ही विवांता मध्ये राहिलो होतो.छान अनुभव होता.

विखि's picture

30 Nov 2016 - 10:18 pm | विखि

मागच्या आठवड्यात हैदराबाद ला जाणे झाले. वरील सर्वे माहीती कॉपी पेस्टुन् गेलो होतो. हाडाचा खादाड असल्यामुळ आनी बरोबर पण सगळेच तसले असल्यामुळ वरती दिल्याप्रमाने पॅराडाइज बिर्याणी, बावर्ची, गोकुळ चाट, फेमस आइसक्रिम सगळे पालथे घातले. तसेच वर दिल्याप्रमाने रामोजी ला जायचा सर्वात स्वस्त मार्ग ( कोटी वरुन) ही माहीती लै उपयोगी ठरली. ४२ रुपये मधे रामोजी ला जाउन आलो.
नामपल्ली रेलवे स्टेशन समोरच एक धर्मशाळा आहे. छान हवेशीर आहे. स्वस्त न मस्त.
वरील सर्व माहीती पुरवल्याबद्दल सर्वान्चे आभार.

babubobade's picture

6 Aug 2017 - 1:37 pm | babubobade

ऑक्टोबरमध्ये जायचे आहे.. तीन दिवस कॉन्फ्रन्स + २ दिवस ....

babubobade's picture

6 Aug 2017 - 1:56 pm | babubobade

रहायला हे कसे आहे ?

http://www.countryclubhyderabad.com/

कॉन्फ्रन्स बंजारा हिलच्या एका हॉटेलात आहे. म्हणून रहायची व्यवस्था बंजारा हिलच्या जवळ हवी .

हर्मायनी's picture

9 Feb 2018 - 10:20 am | हर्मायनी

Birla Mandir, Chowmahalla Palace, Charminar, Mecca Masjid & Shopping at Laad Bazaar(By walk), Salarjung Museum(Lunch Break), Nizam Jubilee Pavilion(purani haveli), Golconda Fort, Qutub Shahi Tombs(Drive through), Lumbini Park -(Terminating point) हे एका दिवसात फिरून होऊ शकते का? साधारण किती वेळ लागू शकेल? हि इटिनेररी त्यांच्या ऑफिशिअल टुरिझम साईट वर दिली आहे. तसेच, २ व्हीलर रेंट करून फिरणे कितपत योग्य? आम्ही दोघेच आहोत. आणि कुठून रेंट करता येईल? या वीकेंडला जात आहोत..

यादीतला क्रम तसाच आहे का? तो फिरवून स्वत: ओटो करून जा.
बरीच ठिकाणे बोगस आसेत अथवा वेळखाऊ आहेत.

हर्मायनी's picture

9 Feb 2018 - 12:49 pm | हर्मायनी

हो. तसाच आहे.. तुम्ही काय बदल सुचवाल ? आमचं आम्हीच फिरू.. आमच्या कडे फिरायला एकच दिवस आहे. सो, कोणती ठिकाणे एकदम मस्ट व्हिसिट अशी आहेत? शिवाय २-व्हीलर रेंट करून फिरता येत का?

सिद्धार्थ ४'s picture

9 Feb 2018 - 2:48 pm | सिद्धार्थ ४

Golconda Fort आणि Salarjung Museum

लुंबिनि पार्क, हुसेन सागर तलावाच्या उत्तरेस सिकंद्राबादकडे आहे. दक्षि्ण भागात अंज्जेया पार्क, आणखी एक पार्क आहे. सेक्रेटरिएटही जवळच आहे. आणि बुद्धाचा पुतळा तलावाच्या मध्यभागी आहे. संध्याकाळी एक क्रूज बोट फिरवतात, सर्वत्र लाइटिंग असते. फोटोमध्ये हे खुप छानछान वाटेल पण तलावात अतिशय दुर्गंधि आहे. आता डिसेंबरात गेलेलो. पाच वाजता पाहिला हा भाग. गटाराचे पाणी सोडून तलावाची वाट लावली आहे. बिरला मंदिर दक्षिण टोकालाच आहे. पण ही मंदिरे बय्ाच शहरांत आहेत.
२) चार मिनार ,

कंजूस's picture

9 Feb 2018 - 4:24 pm | कंजूस

) चार मिनार, चुडि बाजार, सालारजंग हे हुसेनसागरच्या दक्षिणेस आहेत.
सालारजंग - दहाला उघडते, शुक्रवार बंद. २६ नंबर दालनात रत्नजडित वस्तू आहेत. खाली एक पुतळा आणि टोले देणारे घड्याळ बाराचे टोले पाहा. नंतर चार मिनारवरून चुडि बजारात खरेदी.

३) शहराच्या पश्चिमेस अकरा किमिवर गोलकोंडा फोर्ट आणि कुतुब टुम आहे. इकडे उन फार लागते. सकाळी लवकर जा. कमानीकमानी आणि भिंती. गेटपाशी टाळी वाजवून वर ऐकू येते म्हणतात ते आता गोंगाटात शक्य वाटत नाही. वरून हैदराबाद शहर दिसणार नाही खूप अंतर आहे.

बिर्ला मंदिरात जाताना मेन गेटच्या बाहेरच चपला, बुट काढायला लावतात. वर चढुन जायला संगमरवरी पायर्‍या आहेत, ज्या उन्हात बेक्कार तापतात आणि पायाला चटके बसतात. बिर्ला मंदिरात एक तर सकाळी उन्हे चढायच्या आधी नाहीतर संध्याकाळी उन्हे उतरल्यावर जा. संध्याकाळीच गेलेले चांगले कारण तिथून हुसेनसागर आणि दिवेलागणीच्या वेळेचा नेकलेस रोड छान दिसतो. अगदी मुंबईच्या राणीहारासारखा नाही, पण ठीक ठाक दिसतो. :)

सालारजंग म्युझियममध्ये दुपारी बाराला टोले पाहायला गर्दी असते, तेव्हा जरा आधीच जा.

आम्ही ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी शताब्दीने निघून हैद्राबादला दुपारी पोचलो. आमचं बुकिंग ताज बंजारा हिल्स ला होता. तिथे चेकइन केलं. दुचाकी कुठे मिळेल हे आधीच गुगलून ठेवलं होता. तिथे जाऊन दुचाकी घेतली आणि गोळकोंड्याला गेलो. (आपल्या पुस्तकांमध्ये गोवळकोंडा असे का लिहितात बरें ?) तिथे उन्हं उतरता उतरता गेलो आणि दिवस वातावरण ढगाळच होता. हा किल्ला फिरून मग कुतुब शाही कबरी लांबूनच बघून लुम्बिनी पार्कला गेलो. गटाराचे पाणी सोडल्यामुळे हुसेन सागर दुर्गंधित झालेला असून सुद्धा क्रूझ ने फेरी मारण्यात उत्सुक होती याचे आश्चर्य वाटले. तिथे थोडावेळ शांत बसून हॉटेलवर परतलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी भरपेट नाश्ता करून बाहेर पडलो आणि गेलो ते थेट सालारजंग म्युझिअम ला.. तिथे सर्व दालने फिरून आणि ते १२ चे घड्याळाचे ठोके पाहून नेहरू झू ला गेलो. तिथे सायकल घेऊन झूल फेरफटका मारला. एव्हाना ४.३० वाजत आले. मग चारमिनार ला गेलो जात जाता chawmalha पॅलेस बंद झाल्याचे कळले. मग चारमिनार च्या इथे शॉपिंग करून सुलतानबझारला डोकावून हॉटेलवर गेलो. चारमिनार ला निमराह कॅफे मध्ये इराणी चाई घेतला. उत्तम चव! शिवाय कराची बिस्किटांची खरेदीही वाटेत झाली.

तिसऱ्यादिवशीची सकाळ हॉटेल वर विश्रांती घेऊन घालवली आणि दुपारच्या शताब्दीने पुण्याला परत. अशा तऱ्हेने दोन दिवसाची हैद्रबाद ट्रिप सुफळ संपूर्ण(सम्प्रूण )! :D

प्रचेतस's picture

14 Feb 2018 - 10:38 am | प्रचेतस

सालारजंगची veiled रिबेका पाहिलीत का? प्रचंड सुंदर आणि अप्रतिम संगमरवरी मूर्ती.

चटणीज ला साऊथ इंडियन थाळी आणि बावर्चि, पॅराडाइझ बिर्याणीचा आस्वाद घेतला का?