कोणता मोबाईल घेऊ ?

कट्टापा's picture
कट्टापा in तंत्रजगत
18 Oct 2015 - 8:09 pm

सर्व मिपाकरांना नमस्कार
मला चांगला मोबाईल घ्याचा आहे. बजेट 10,000रु/- फक्त(?)
Yu Yureka Plus घ्यावा हा विचार आहे.
तरीही सर्व मिपाकरांनी योग्य मॅाडेल सुचवा.
मोबाईल कडून अपेक्षा (Requirement)
1.चांगले बॅटरी बॅकअप.
2.उत्तम कॅमेरा

प्रतिक्रिया

मिडियाटेकचं काम स्लो असतं क्वालकामपेक्षा. अथवा नोकिया ३ पंधरा दिवसांनी येतोय बाजारात.

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2017 - 3:04 pm | श्रीगुरुजी

Lenovo Vibe K5 Note (Gold, 64 GB) (4 GB RAM) (किंंमत १२९९९) या नवीन संचाबद्दल कोणाला काही माहिती आहे का?

धर्मराजमुटके's picture

12 Jun 2017 - 3:50 pm | धर्मराजमुटके

लेनोव्हो के ६ नोट ऑफलाईन बाजारात १५००० रुपयांत उपलब्ध आहे. विजय सेल्स, क्रोमा मधे बघू शकता. बॅटरी तगडी आहे.

कंजूस's picture

12 Jun 2017 - 6:56 pm | कंजूस

Vibe K5 Note तापतो असा रिव्ह्य्यु आहे. सावधान

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2017 - 7:42 pm | श्रीगुरुजी

ओह. बरं झालं सांगितलंत ते. आता दुसरा फोन शोधायला लागतो.

सचिन७३८'s picture

12 Jun 2017 - 7:12 pm | सचिन७३८

मी दोन वर्षांपासून यु युरेका (नाईलाजाने) वापरतो आहे. ह्याचं कारण अजून मलाच ‘युरेकलं’ नाही. त्यापेक्षा तुम्ही दुसरा एखादा फोन बघा.

वेल्लाभट's picture

14 Jun 2017 - 5:04 pm | वेल्लाभट

रेड एम आय ४ घेण्यात आलेला आहे.... अखेर विंडोज चा संग सोडावा लागतोय. ही जबरदस्ती आहे खरं म्हणजे. पण असो. नव्याचं स्वागत स्वागतासारखंच होईल. पण विंडोज फोन मात्र जपण्यात येईल.

३ जीबी रॅम. स्नॅपड्रॅगन ४३५. आद्रीनो ५०५ जीपीयु. ४१०० बॅटरी. अँड्रॉईड ६.० एमआययूआय ६

उत्सुक !

नोक्या आलाय बघ अ‍ॅमेझॉनवर.
१२ ला ३ जीबी रॅम हाय भौतेक. फिचर्स छान वाटताहेत.

वेल्लाभट's picture

15 Jun 2017 - 3:37 pm | वेल्लाभट

नको. दहाचा आकडा ओलांडयाचा नव्हता. घेत्ला एमाय.

कपिलमुनी's picture

15 Jun 2017 - 3:57 pm | कपिलमुनी

कुठे आलाय ? की सम्पला ?

रेडमि २/३ आहे. एक सिम + मेमरी/दुसरे सिम.

रिमुवबल बॅट्रीवाले दोनच आहेत. E3 power आणि lenovo vibe k5.

रेडमि २/३ आहे. एक सिम + मेमरी/दुसरे सिम.

रिमुवबल बॅट्रीवाले दोनच आहेत. E3 power आणि lenovo vibe k5.

के.के.'s picture

23 Jan 2018 - 3:09 pm | के.के.

Mi A1, Lenovo K8 Plus आणि Moto G5s Plus ह्यान्च्यामधे कुठला मोबाईल घ्यावा?

श्रीगुरुजी's picture

23 Jan 2018 - 3:40 pm | श्रीगुरुजी

मी दोन महिन्यांपूर्वी सॅमसंग जे-७ मॅक्स हा संच घेतला. अजूनतरी उत्तम चालला आहे.

विशुमित's picture

23 Jan 2018 - 4:41 pm | विशुमित

मी ज-७ प्राईम घेतला. उत्तम चालला आहे.

धर्मराजमुटके's picture

23 Jan 2018 - 7:13 pm | धर्मराजमुटके

मी दोन महिन्यांपुर्वी नोकीया ५ घेतला. अतिशय उत्तम क्वालिटी. खरतर नोकीया बाजारात नसल्यामुळेच मी नाईलाजाने इतर फोन वापरले होते. कमी फिचर्स आणि जास्त किंमत असले तरी नोकीया च हवा असा माझा आग्रह होता. आता नोकीयाचे नवनवे मॉडेल्स बाजारात यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे काही वर्षे तरी चिंता नाही.

जेम्स वांड's picture

7 Feb 2018 - 8:38 am | जेम्स वांड

नोकिया ५, ३ जीबी रॅम घेण्यात आलेला आहे, दणकट अल्युमिनियम बॉडी, अन सोबत मेक इन इंडिया प्रॉडक्ट वापरायचा आनंद! बॅटरी वगैरे सगळं काही आलबेल आहे अजून तरी (नोव्हेंम्बर कडे घेतलाय, फ्लिपकार्ट वरून) , अन हो माझा नोकिया ५ ओरियो अपडेट झाला सुद्धा

माझाही ! फक्त माझा २ जीबी, १६ जीबी स्टोरेज वाला आहे. एकदम मस्त फोन आहे.

जेम्स वांड's picture

7 Feb 2018 - 12:01 pm | जेम्स वांड

टाइम टू टाइम सिक्युरिटी पॅच येत राहतात नोकियाचे ते एक बेस्ट, स्टॉक अँड्रॉइड असल्यामुळे ब्लोटवेयर जवळपास शून्य, त्यामुळे बॅकग्राउंड एप प्रोसेस मुळे बॅटरी ड्रेन होणे नाही, मला एक प्रश्न पडलाय, नवीन सिक्युरिटी पॅच आला की जुन्यावरच ओव्हरराईट होतो की नवी स्पेस लागते त्याला?

भित्रा ससा's picture

23 Jan 2018 - 8:34 pm | भित्रा ससा

आज झिओमी कंपनीचा sale आहे रात्री 12 पासून

चौथा कोनाडा's picture

23 Jan 2018 - 11:18 pm | चौथा कोनाडा

लेनोवो के८ नोट ( व्हेनम काळा) ऑन-लाइन अ‍ॅमेझॉन वरून खरेदी केला.
दोन तीन दिवसात कुरियरने घरी येईल.
आरडी सेल व हाडेफाका डेबिट कार्ड खरेदी सुट मुळे रू.१४,०००चा रू.९८९० ला पडला
४जीबी, ६४ जीबी इन्टरनल मेमरी, १३एमपी+५एमपी डयुअल कॅमेरा आणि बरेच काही.
व्हॅल्यू फॉर मनी !

https://www.amazon.in/Lenovo-Note-Venom-Black-4GB/dp/B01LZKSUXF?tag=goog...

कंजूस's picture

24 Jan 2018 - 4:24 pm | कंजूस

शाओमि नोट फोरने किंमत उतरवल्याने(~10ह) इतरांनाही कमी कराव्या लागत आहेत. प्रसेसर क्वालकॅाम नसून मिडियाटेक आहे k8चा.

चौथा कोनाडा's picture

27 Jan 2018 - 10:39 am | चौथा कोनाडा

अच्छा, मिडियाटेक तुलनेने नविन व कामगिरीत दुय्यम आहे.
घेतला आहेच, वापरून, अनुभव घेवुन पाहतो.
काही अडचण नाही आलीच तर ओक्केच.

जुलै २०१५ ला Redmi Note 4G फ्लिपकार्ट वरून खरेदी केला.....आता वय-वर्षे २.७
अजूनपर्यन्त मस्त पळत आहे......एकदाही आजारी नाही पड़ला.......

आता जुन्या माईक्रोसाफ्ट सर्विस सेंटरने नवीन नोकिया android ला सर्विस देणे सुरू केले आहे.

कपिलमुनी's picture

7 Feb 2018 - 3:29 pm | कपिलमुनी

Xiaomi Redmi 5A 32GB
७००० ला घेतला .
Quad Core, 1.4 GHzSnapdragon 425 , 3 GB RAM , 5.0 inches (12.7 cm)HD, 294 PPI, IPS LCD,13 MP Primary Camera ,LED Flash,5 MP Front Camera,Battery 3000 mAh.

नर्मदेतला गोटा's picture

13 Oct 2020 - 3:31 pm | नर्मदेतला गोटा

आजच्यासाठी कोणता चांगला पर्याय उपलब्ध आहे

चौथा कोनाडा's picture

13 Oct 2020 - 4:02 pm | चौथा कोनाडा

तुमचे बजेट किती आहे ? काय स्पेसिफिकेशन हवीत ? त्यावर कोणकोणती अ‍ॅप्स वापरणार आहात हे तर कळू द्या !

पोस्ट कोविड, फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर दसरा दिवाळी निमित्त सवलतीत सेल १६-१७ ऑक्टोबर पासॉन सुरु होणारेत, त्यावर अक्षरशः शेकड्याने आहेत.
कुठला ठरवलात ते इथे टाकायला विसरू नकात.

यावरून आता कोणता घ्यावा हे लगेच तुलना करून सांगता येईल.
ड्यूल सिम ,ड्यूल 4g LTE हा नवीन ट्रेंड आहे android phone साठी. ( एकाचवेळी जिओ आणि एरटेल/वोडा कार्ड
active राहाणे)

ओटिजी कनेक्टिविटी हवीच. चांगली क्याम्रे हाइ रेझ विडिओ काढतात आणि मेमरी लवकर फुल होते. ते दुसऱ्या कार्डावर ढकलण्यासाठी.

कपिलमुनी's picture

13 Oct 2020 - 9:43 pm | कपिलमुनी

६ जीबी १२८ जीबी मेमरि आणी १८,००० बजेट मध्ये असलेले फोन सुचवा

सॅम्सन्ग एम ३१ , मोटो फ्युजन प्लस , रेड मी नोट प्रो ९ हे तीन शॉर्ट्लिस्ट केलेत .

यातला चांगला कोणता ??

शाम भागवत's picture

13 Oct 2020 - 11:19 pm | शाम भागवत

मोटो नक्की नाही.
गुगलचा पहिला मोटो बेस्ट होता.
आता फक्त नाव राहीलंय.

मराठी_माणूस's picture

14 Oct 2020 - 9:29 am | मराठी_माणूस

गेले ३ वर्ष , मोटो चे दोन फोन वापरतोय. अजुन तरी काही समस्या नाही.

कंजूस's picture

14 Oct 2020 - 6:19 am | कंजूस

स्पमी नोटिफिकेशन वैताग आणू शकते. review

श्रीरंग_जोशी's picture

14 Oct 2020 - 8:43 am | श्रीरंग_जोशी

Teracube 2e: Next Evolution of Sustainable Phones - मी नुकताच बुक केलाय, डिसेंबरमधे मिळेल.

कंजूस's picture

14 Oct 2020 - 10:39 am | कंजूस

पूर्वीच्या जे सिरिजचं नाव बदलून एम केलंय.
A seriesयापेक्षा चांगली आणि S galaxy आणखी चांगली.
------------
A चा प्रॉब्लेम म्हणजे हाइब्रिड सिम स्लॉट . (पण ६४ /१२८ जीबीला आणखी मेमरी कार्डाची गरज नसते.)