माझी पहिली ४२.५ किलोमीटर सायकल राईड

ऋतु हिरवा's picture
ऋतु हिरवा in भटकंती
11 Dec 2017 - 7:53 pm

भिंतीवर लटकवलेली सायकल ..., तिच्यामुळे भिंतीवर पडलेले काळे डाग ...!

मनातल्या मनात बडबडत ( आठवले ना...... whats app वरील विनोद ...) मी ते डाग पुसून भिंत स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते.

मग हा घेणार एक पसरट टब... त्यात पाणी .. सायकलचा टायर काढून त्यातील ट्यूब काढून पंक्चर शोधत बसणार. आजूबाजूला पसरलेले दुरुस्तीचे साहित्य! मग पाणी पुसायला, सायकल पुसायला काळी करायला जुनी फडकी मी शोधून देणार! आणि हा सगळा पसारा हॉल मध्ये मांडलेला. त्याच्या परीने नंतर सगळं तो साफ करणार, पण माझ्या मनाला येणार नाही. त्यामुळे मी पुन्हा स्वच्छ करणार.

सायकल मध्ये हवा भर, तिची सीट वर-खाली कर, तिचे हँडल वर –खाली कर ... एक ना दोन..... हजार भानगडी ......!

“ तुला सायकल नक्की जमेल!”

“ पण तिची बाळंतपणं कोण करणार? छे बाबा! मला नको सायकल!
आणि शंभर काय ५-१० किलोमीटर सुद्धा मी चालवू शकणार नाही. आणि ती चढावावर चालवायला मला अजिबात जमत नाही.“

“ एकदा घेतली सायकल की तुला सगळं जमेल! आणि हे सगळं सारखं नाही करावं लागत. आणि पंक्चर बाहेरही काढून देतात.”
“ नको! तरीपण मला सायकल नको!”

या विचारात फरक पडला जेव्हा युथ हॉस्टेल, अंबरनाथचा कर्जत जवळ, कडाव गणपतीला सायकल ट्रेक गेला.
यात महिलांची संख्या लक्षणीय होती. कसलेल्या सायकलपटू तर होत्याच. पण ट्रेक जाणार म्हणून ४-५ दिवसात सराव करून आलेल्या महिला पण होत्या. गिअर ची सायकल घेऊन होत्या, तशाच चक्क साधी सायकल घेऊन सुद्धा होत्या. जोडीला support vehicle म्हणून कार आणि मोटार सायकली पण असणार होत्या.

बर्याच जणांनी ट्रेक पूर्ण केला.

मी सगळ्यांना टाटा करायला गेले होते. मात्र यात मी सहभागी नाही याचे मला वाईट वाटले. तेव्हा ठरवले , आपण पण सायकल घ्यायची.

त्या दिवशी आम्ही चार सायकली घेतल्या. एक माझी व बाकी तीन आमच्या मित्र-मंडळींच्या!

दुसर्या दिवसापासून सराव सुरु केला. आधी घराजवळच थोडी चालवली. मग म्हटले थोडे दूर जाऊ. पहिला घराजवळ छोटा चढ होता, तो पार केला. मग लागला शिवमंदिराजवळचा थोडा मोठा चढ. तो काही पहिल्या दिवशी मी चढू शकले नाही. चढ लागला की गिअर टाकायचे एवढं माहित होतं... खटाखट गिअर टाकत गेले.... सायकल एवढी स्लो व्हायची की मी उतरूनच जायचे आणि सायकल हातात घेऊन चढ पार! मग आज हा चढ चढला, उद्या तो बरा जमला .... असा प्रकार चालू! त्यातही चढात रेटायची ठरवले तर समोरून एखादे वाहन दिसले की भीतीने गाळण उडायची. बाजूने वाहन जाताना नाही तोल सांभाळता आला तर....! त्यामुळे तिकडे दूर वाहन दिसले की इकडे मी पायउतार!

नवरा म्हणाला हाय-वे ला जा! पण हाय-वे ला एकटीने जायला मला भीती वाटत होती. मग एक दिवस दोघे गेलो. त्याने बरेचसे तंत्र समजावून सांगितले. आणि हाय-वे वर स्पीडही मस्त मिळत होता! त्यामुळे आधीच चढ दिसला की जोरात पॅडल मारून चढ पार होऊ लागले. साधारण ८-९ किलोमीटर झाल्यावर हाताला खूप मुंग्या आल्या होत्या. मग मध्ये थोडे थांबलो. त्यानंतर मात्र सायकल मी मजेत चालवली. हँडल वरचा हात सैल करायलाही शिकले. नंतर फारशा मुंग्याही नाही आल्या. हाय-वे वरच्या शेवटच्या चढात मात्र थोडी गडबड झाली. झटझट गिअर टाकत गेले. सायकलचा स्पीड एकदम कमी झाला आणि गोंधळून मी उतरले. आता चढात सुरु करणे पुन्हा कठीण होते. त्यामुळे रस्ता क्रॉस केला तो सायकल हातात घेऊन. पण त्यादिवशी १७ किलोमीटर झाले. आणि मस्त मजा वाटली.

मग पुन्हा एकदा एकटीने याच रस्त्याला तेवढेच अंतर जाऊन आले. पुन्हा थोड्याशा मुंग्या आल्या. थोडी थांबले. पण नंतर मुंग्या गायब झाल्या. मजा वाटली. कुठला चढ चढताना उतरावेही लागले नाही.

आता म्हटलं, जरा लांब जाऊया ...! पुन्हा दोघे गेलो. अंबरनाथपासून साधारण २०-२२ किलोमीटर वर ‘हॉटेल अभिषेक’ नावाचे चांगले हॉटेल आहे. तिथे उसळ वडा असा मस्त नाश्ता केला. आणि तेथून परत फिरलो. घरी आल्यावर उत्सुकतेने स्ट्रावा बघितले तर चक्क ४२.५ किमी झाले. मध्ये नाश्त्याला अर्धा तास आणि शिवाय विश्रांतीसाठी ४-५ वेळा थांबावे लागले. थोडीशी दमले. घरी आल्यावर थोडावेळ पाय दुखले, तरी पण मजा आली आणि आपण एवढी सायकल चालवू शकतो याचा आत्मविश्वास आला...!

मग आता काय ................. चल मेरी धन्नो!

प्रतिक्रिया

sagarpdy's picture

11 Dec 2017 - 8:31 pm | sagarpdy

सुंदर लिहिलंय. पुढील प्रवासाला मनापासून शुभेच्छा

- भिंतीवर टायर आणि फरशीवर डिझेल चे डाग पाडणारा अजून एक सायकलवेडा

अरिंजय's picture

11 Dec 2017 - 9:17 pm | अरिंजय

मस्त वर्णन.

पुढील भरपूर भटकंती साठी भरपूर शुभेच्छा

इरसाल कार्टं's picture

11 Dec 2017 - 9:34 pm | इरसाल कार्टं

दंडवत स्वीकारा आमचा. आणि हो, पुढील प्रवासास शुभेच्छा.

वाह! क्या बात है. तुमचं सायकलवेड्यांच्या समूहात स्वागत. भरपूर सायकल चालवा. शुभेच्छा!

कंजूस's picture

12 Dec 2017 - 2:09 am | कंजूस

कमाल आहे!
एकाच घरात दोन पाट्या.
धर हँडल मार पॅडल
चल मेरी धन्नो

देशपांडेमामा's picture

12 Dec 2017 - 9:42 am | देशपांडेमामा

सायकलिंग की जोडी नंबर १ !! :-D

मस्त लिहिलय हो! सायकलिंगच्या पुढील वाटचाली करता मनःपुर्वक शुभेच्छा !!

देश

mayu4u's picture

12 Dec 2017 - 2:03 pm | mayu4u

शुभेच्छा!

मोदक's picture

12 Dec 2017 - 5:53 pm | मोदक

+१११..

पुढील सायकल प्रवासाला शुभेच्छा..!!

ऋतु हिरवा's picture

14 Dec 2017 - 1:57 pm | ऋतु हिरवा

+१११ म्हणजे काय? एवढे किलोमीटर करा... असा अर्थ का?

प्रशांत's picture

12 Dec 2017 - 6:38 pm | प्रशांत

मामा बोलले ......

ऋतु हिरवा's picture

14 Dec 2017 - 1:58 pm | ऋतु हिरवा

+१+????

या "अधिक एक" चा अर्थ म्हणजे "मी सहमत आहे"

यामध्ये सहमतीची तीव्रता दर्शवायला +१११ किंवा +१११११ असे काहीही आकडे आपण टाकू शकतो.

यामध्ये खवचटपणा करायलाही भरपूर वाव असतो. तो काकांना माहिती आहे किंवा प्रत्यक्ष भेटीत सांगेन. :D

एस's picture

15 Dec 2017 - 3:44 pm | एस

+२२२२२२२२२ ;-)

छान . पुढील भटकंती साठी शुभेच्छा

कोणीही कितीही लिहा. आमचे हातपाय सायकलीसाठी फुरफुरवा.. आम्ही सायकल घेणार नाही ज्जा.. आमचा मनावर कंट्रोल आहे.. कोणी सांगितलीय ती पायडल मारण्याची मेहनत अन त्यावर पुन्हा ब्यालन्सिंग.. कारण वीस वर्षांच्या ग्यापनंतर पहिल्यांदा सायकलवर बसणं.. "पल्डो मं?"...

मोदक's picture

12 Dec 2017 - 10:30 pm | मोदक

नमस्कार गवि,

सायकल कधी घेताय मग..?

:D

sagarpdy's picture

12 Dec 2017 - 11:06 pm | sagarpdy

पल्डो मं?

या प्रश्नाचं उत्तर लवकरच येत आहे.

देशपांडेमामा's picture

14 Dec 2017 - 3:26 pm | देशपांडेमामा

:-D

गवि, तुमचे म्हणणे एकदम पटले,
एवढी रिस्क आणि या वयात नकोच, पडायच्या भीतीने मी तर आजकाल चालणे सुध्दा बंद केले आहे. चालताना "पल्डो मं"
मॉर्निंग वॉकला पण मी कार घेउनच जातो. दुधाची पिशवी, भाजी, वाणी सामान सुध्दा ऑनलाईन मागवतो. व्यायाम म्हणुन लिफ्टनेच दोन तीन वेळा १२ मजले वर खाली करतो.
आता घरातल्या घरात फिरायला सुध्दा बॅटरीवर चालणारी व्हिलचेअर मागवणार आहे.
इतक्या सुविधा उपलब्ध असताना रिस्क कोणी घ्यायची.
जग किती मॉडर्न होतय आणि आपण उगाच कशाला सायकल चालवायचा, रस्त्याने चालण्याचा गावठीपणा ककरायचा?
पैजारबुवा,

ऋतु हिरवा's picture

14 Dec 2017 - 1:59 pm | ऋतु हिरवा

हाहाहा ... नाही पडणार. सायकल कधी विसरत नाही, असे म्हणतात म्हणे ...

इरसाल's picture

14 Dec 2017 - 2:13 pm | इरसाल

गगनविहारीजी, वाटल्यास इवान घेतील पण सायकल अजिबात शक्य नाही.
जो मनुक्श तीन चाकी इवान चालवतो तो पडायला दोन चाकी सायकल चालवणार का ? :))

थॉर माणूस's picture

13 Dec 2017 - 12:24 am | थॉर माणूस

सही! पुढील प्रवासास शुभेच्छा. :)

सुबोध खरे's picture

13 Dec 2017 - 9:51 am | सुबोध खरे

४२ किमी सायकल चालवल्याबद्दल आपले अभिनंदन
रच्याकने पहिल्या फोटोत आपल्या पुढे "भटक्या खेडवाला" आहेत का?

हाच प्रश्न माझ्याही मनात आला होता.

डॉ श्रीहास's picture

13 Dec 2017 - 10:44 pm | डॉ श्रीहास

बरोबर ओळखलं............ १०० गुण

ऋतु हिरवा's picture

14 Dec 2017 - 2:01 pm | ऋतु हिरवा

होय, ते आमचे अहो ....

धडपड्या's picture

13 Dec 2017 - 11:34 am | धडपड्या

खूप, खूप कौतुक आणि अभिनंदन...

तुमच्यासारखी सहचारिणी सर्वांना मिळो...

मिपामुळेच खरं सायकलची आवड निर्माण झाली आणि २ महिन्यापूर्वी मी पण सायकल घेतली, धन्यवाद मिपा आणि मिपाकर........................
आजच ऑफिसला घेऊन आले आहे पहिला प्रयत्न (ऑफिस ८ किमी आहे ऑफिस पासून ) , बघू मिपाच्या इतर सदस्यांसारखे लांब लांब जायला कधी जमते ते..................

मोदक's picture

13 Dec 2017 - 10:13 pm | मोदक

अरे व्वा.. अभिनंदन..!!

ऋतु हिरवा's picture

14 Dec 2017 - 2:02 pm | ऋतु हिरवा

अरे वा... मस्त

नितीन पाठक's picture

14 Dec 2017 - 2:51 pm | नितीन पाठक

नवीन सायकल घेतल्या बद्दल अभिनंदन. मिपावरील सायकलवेड्यांच्या समूहात स्वागत. सायकल चालवासाठी शुभेच्छा!

देशपांडेमामा's picture

14 Dec 2017 - 3:30 pm | देशपांडेमामा

खुप चांगला निर्णय घेतलाय!!

सायकलचे बेसिक सेटिंग्ज (म्हणजे सीट ची ऊंची आणि सीट पोजीशन ) निट आहे ना हे बघुन घ्या म्हणजे चालवताना काही त्रास होणार नाही

देश

स्थितप्रज्ञ's picture

14 Dec 2017 - 4:28 pm | स्थितप्रज्ञ

रोज ऑफिसात न्यायला सुरुवात करा. लांबच्या राईड्स मग आपसूक जमतील. विकांताला घराजवळची राहून गेलेली ठिकाणं पिंजून काढायला सुरुवात करा आता :)

बाबा योगिराज's picture

15 Dec 2017 - 1:28 pm | बाबा योगिराज

अभिनंदन शुभा तै,

लवकरच आपले सुद्धा ५० किमी पूर्ण होऊन धागा येओ हीच शुभेच्छा...

बाबा योगीराज

पद्मश्री चित्रे's picture

13 Dec 2017 - 9:39 pm | पद्मश्री चित्रे

मस्तच .
अभिनंदन !

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Dec 2017 - 10:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक नंबर !! यापुढच्या सर्व मोहिमांना अनेक शुभेच्छा !

मिपावर कित्येक उत्साही आणि धाडसी मंडळी आहेत, हे वारंवार कळत असते आणि मिपाकर असल्याचा असल्याचा अभिमान वाढत असतो.

पैसा's picture

14 Dec 2017 - 1:02 am | पैसा

अभिनंदन!

ऋतु हिरवा's picture

14 Dec 2017 - 2:03 pm | ऋतु हिरवा

तुम्ही दिलेले प्रोत्साहन आणि कौतुक यासाठी धन्यवाद !

नितीन पाठक's picture

14 Dec 2017 - 2:47 pm | नितीन पाठक

सायकल चालवण्याच्या भितीवर मात करून तुम्ही ४२ किमी सायकल चालवली याबद्दल तुमचे अभिनंदन.
आणि
घरचा (आणि सगळ्यात जवळचा) माणूस तुम्हाला प्रोत्साहन देतोय म्ह्टल्यावर तुम्ही यशस्वी होणार (च).
पुढील वाटचालीसाठी आणि सायकल चालवण्यासाठी मनापासून शुभेच्छा.

स्थितप्रज्ञ's picture

14 Dec 2017 - 4:25 pm | स्थितप्रज्ञ

अगदी थोड्या वेळात जबरदस्त ग्रीप घेतलीत सायकलवर! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
असेच लेख येत राहू द्या...

सानझरी's picture

15 Dec 2017 - 8:09 am | सानझरी

अरे वा!! पुढील प्रवासास शुभेच्छा. :)
(जबरदस्त इनो घेऊन सायकल चालवण्यास सुरूवात करणेत येईल)

सुधांशुनूलकर's picture

15 Dec 2017 - 10:53 am | सुधांशुनूलकर

वा, वहिनी, मनःपूर्वक अभिनंदन
सायकल चालवा, तशीच लेखणीही (कॉम्प्युटरचा कीबोर्डही) नक्की चालवा. मस्त लिहिलं आहे तुम्ही!

बाबा योगिराज's picture

15 Dec 2017 - 1:31 pm | बाबा योगिराज

वा वा वा, सायकल नुसती घेतलीच नाही तर व्यवस्थित पळवायला सुद्धा सुरुवात केलीत.
पहिल्या मोठ्या राईड साठी अभिनंदन. लवकरच आपली सेन्चुरी होईल हीच आशा.

बाबा योगीराज