*** *** *** *** ***
कंजूस
यांचे सर्व लेखन इथे पाहा
*** *** *** *** ***
वापी हे शहर मुंबईस जवळ असणाय्रा गुजरातमधल्या इतर सुरत,वलसाड,नवसारीप्रमाणेच औद्योगिक शहर ही ओळख बाळगून आहे. पण त्याची आणखी एक ओळख म्हणजे पश्चिमेकडे असणारे दमण, पुर्वेकडचे असणारे दादरा नगरहवेली या केंद्रशासीत भागांसाठी जवळचे रेल्वे स्टेशन. त्र्यंबकेश्वरच्या थोड्या पुर्वेकडच्या डोंगरांतून उगम पाऊन पश्चिमेकडे वाहात जाणारी दमणगंगा नदी समुद्राला मिळते ते दमण. या भागाचे समुद्री महत्व ओळखून सोळाव्या शतकापासून पोर्तुगिज लोकांनी इथे येऊन व्यापारानिमित्त किल्ला बांधला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर दमणचे महत्त्व एका वेगळ्याच कारणासाठी वाढले. तर पुर्वेकडच्या दादरा नगरहवेलीत पर्यटनाचा व्यवसाय हॅाटेलवाल्यांनी वाढवला. सिल्वास,खानवेल हे ते भाग. दमणगंगेवर झालेल्या मोठ्या मधुबन तलावाने पाण्याची सोय झाली. दादरा इथले वनगंगा गार्डन ( वापी - दादरा १२ किमि) बोटिंगमुळे पर्यटकांचे आकर्षण आहे.पंधरा वर्षांपुर्वी बोर्डी, दादरा,खानवेल,सिल्वास हे भाग फिरलो होतो. त्यावेळी रेल्वेतल्या प्रवाशांनी माहिती दिली तसे गेलो. "दमणला जाऊ नका तिथे तुमच्या कामाचे काही नाही" हा सल्ला मानून दमण वगळले होते. आता दमणची जुनी प्रसिद्धी ( दारु पिण्यासाठीची) अशी काही विशेष उरली नाही त्यामुळे चला दमणला काय आहे हे एक दिवसात पाहू म्हणून गेलो.
कसे जावे
दमण
मुंबई अहमदाबाद वेएवे रस्त्याने वापीला (१६० किमि) डावीकडे वळल्यास दहा किमिवर दमण आहे. जाताना पोलुशन फार वाटले तरी दमणला अजिबात नाही. वेस्टर्न रेल्वेच्या सर्वच गाड्या वापीला थांबतात. स्टेशनच्या पश्चिमेस टॅक्सी,ओटोरिक्षा आणि बसेस दमणला (१० किमि.) तर पुर्वेच्या दादरा,नगरहवेली ,खानवेलसाठी. वापी बस स्टँड पश्चिमेला पाचसे मिटर्सवर आहे.
नदीच्या उत्तर भागाला 'नानी दमण' - फक्त दमण म्हणतात. इथून एका पुलाने दक्षिणेकडचे 'मोटी दमण' ( याच नावाने ओळखतात) जोडले आहे. एक वेगळा पादचारी पूल आहे. दमण स्टँडवरून जांपोरे बीच (६ किमि )जाण्यासाठी बस ,ओटो मिळतात. दोन किमिवर फोर्ट आहे, पण स्टँडवरून अर्धा तासात पुलावरून चालतही जाता येते.
कसे जावे
दादरा, नगरहवेली
हे भाग वापीच्या पुर्वेस/आग्नेय दिशेस आहेत.
सिल्वास - वापीअगोदरच्या भिलाड स्टेशनपासून उजवीकडे १८ किमि.
खानवेल याहीपुढे.
वापी - सिल्वास २४.
काय पाहावे
दमण स्टँडपासून दमण जेट्टी/ दरिया पाचशे मिटर्स अंतरावर आहे. उत्तरेस ६ किमिवर देवका बीच, मिरासोल वाटरपार्क आहे. दक्षिणेस पुल ओलांडल्यावर अर्धा किमीवर फोर्ट मोटी दमण भागात आहे. किल्ल्याच्या भिंती चांगल्या स्थितीत आहेत. याच भागात सचिवालय,परगोला गार्डन,नगरपालिका इमारत,दोन चर्चेस जवळच आहेत. एन्ट्री फी नाही. फक्त सकाळी साडेसहाला एक मास/सर्विस असते. दिवसभरात कुणी येत नाही चर्चमध्ये. इमारती पाहात फोर्टात रस्त्याने फिरायला मजा वाटते. स्वच्छता आणि शांतता आहे. पाच किमिच्या जांपोरे बीचला गेलो होतो. इथले बीच काळपट वाळूचे आहेत. चांगले नाहीत. दमण दरियावर "बीच टॅाइलेटसाठी वापरू नका" ही पाटी दिसली. जांपोरे किनाय्राला सुरुची झाडे आहेत, खाण्याच्या टपय्रा आहेत. देवका बीचला गेलो नव्हतो. दमणमध्येच एरपॅार्ट आहे. मोटी दमण भाग टापटीप आहे.
राहाणे हॅाटेल्स, खाणे
सर्व हॅाटेल्स दमण स्टँड ते दरिया या रस्त्यावर आहेत. बार आणि रेस्टॅारंट्स बरेच आहेत पण ते खरेतर बारच असावेत. दुपारचे वातावरण अर्थातच सुस्त होते.
दमण - धावती फेरीमधली काही चित्रे.
खालील फोटो गायब झाल्याने हे टाकत आहे.
१ ) सचिवालय इमारत
२ ) शाळा
३ ) शाळेतल्या मुलांच्या सायकली
४ ) परगोला गार्डन
५ ) बॅाम जेझस चर्चमध्ये
६ ) किल्ल्यातला एक रस्ता.
७ ) किल्ल्यातला एक रस्ता.
८ ) पादचारी नवीन पुलावरून पश्चिमेकडे दिसणारे दमणगंगा नदीचे मुख, उजवीकडे दमण( नानी दमण), डावीकडे मोटी दमण आणि जेट्टी.
१ ) अहमदाबाद हायवेने १६०~ किमि वापी - पश्चिमेस दहा किमि दमण आहे.
२ ) दमण ते जांपोरे बीच पाच किमि.
३ ) दमण बीच
४ ) जांपोरे बीच
५ ) मोटी दमण किल्ला, दक्षिण दरवाजा
६ ) दमण नगरपालिका इमारत
७ ) बॅाम जेझस चर्चमधला एक सज्जा
८ ) रोझारिओ चर्चमधला एक सज्जा
९ ) सचिवालय इमारत
१० ) शाळा
११ ) शाळेतल्या मुलांच्या सायकली
१२ ) टेक्निकल स्कूल प्रवेशद्वार
१३ ) परगोला गार्डन
१४ ) किल्ला, नदीकडचा उत्तरेचा दरवाजा.
१५ ) किल्ला, नदीकडचा उत्तरेचा दरवाजा.
१६ ) किल्ल्यातला एक रस्ता.
१७ ) पादचारी नवीन पुलावरून पुर्वेकडचा दिसणारा दमणगंगा नदीवरचा वाहनांसाठीचा राजीव गांधी सेतू.
१८ ) पादचारी नवीन पुलावरून पश्चिमेकडे दिसणारे दमणगंगा नदीचे मुख, उजवीकडे दमण( नानी दमण), डावीकडे मोटी दमण आणि जेट्टी.
माहितीसाठी--
१९ ) रोझारियो फरशीवरील नोंद
२० ) रोझारियो चर्च पाटी
२१ ) बॅाम जिझस चर्च पाटी
तुम्हाला काही आणखी माहिती असेल तर द्या.
प्रतिक्रिया
10 Nov 2017 - 8:47 am | प्रचेतस
थोडक्यात पण उत्तम वर्णन.
दमणला पूर्वी गेलो होतो. मधुबन तलाव, सिल्वासाच्या बागा पाहिल्या होत्या.
बॉम म्हणजे बाल (इन्फन्ट). बाल येशूचे चर्च. पोर्तुगीजांचे 'कोट ऑफ आर्म्स' ठिकठिकाणी दिसतात.
दमणच्या मार्केटमध्ये कस्ट्म्सचा माल पूर्वी मोठ्या प्रमाणावर मिळत असे, हल्लीचे माहित नाही.
10 Nov 2017 - 9:49 am | पगला गजोधर
कोणी गाईड मिळतो का १००/२०० रुपयात ऐतिहासिक माहिती कम वॉक ....? किल्ला चर्च तत्कालीन सामरिक व्यापरिक महत्व....
10 Nov 2017 - 10:02 am | II श्रीमंत पेशवे II
ऑफिस च्या कामासाठी गेले १२ वर्ष वर्षातून किमान ४ वेळा तरी जातोय पण
एक दोन स्थळे सोडली तर कुठेच गेलेलो नाही,
आता मात्र माझ्यासाठी हि माहिती एक गाईड प्रमाणे आहे
नक्कीच एखाद दिवस स्टे करून या सगळ्या ठिकाणांना भेट देईन
खूप छान .............
धन्यवाद
10 Nov 2017 - 10:19 am | कंजूस
कस्टम्सचा माल घेण्यासाठी पुर्वी जात होते लोक. आता दुबई, सिंगापूर मुळे याचे महत्त्व राहिले नाही.
पुर्वी इथून DDN रेजिस्ट्रेशन नंबर मिळणाय्रा कार घेऊन लोकांनी टॅक्स वाचवला पण भारतात फिरताना आरटिओ पोलिस फारवेळा अडवणूक करायचे तेव्हापासून तेही बाद झाले.
# बॅाम जेझस चर्चमधला राखणदार माहिती सांगत होता.
10 Nov 2017 - 11:47 am | दुर्गविहारी
फारशी माहिती उपलब्ध नसणार्या परिसराबध्दल तुम्ही लिहीलेत याबध्द्दल धन्यवाद. किल्ल्याचे फोटो कमी वाटले. हॉटेल कोणकोणती उपलब्ध आहेत हि माहिती देखील दिली असती तर बरे झाले असते. ईथले बीच फारसे चांगले नाहीत असे एकले होते, ते खरचं दिसतय. नानी आणि मोती दमण दोन्ही पोर्तुगीज बांधणीचे किल्ले आहेत. त्यांचे बुरुज पंचकोनी आकाराचे आहेत. याशिवाय मधुबन धरणातही वेताळगड नावाचा चिमुकला किल्ला आहे.
हा धागा काढल्याबध्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
10 Nov 2017 - 3:01 pm | कंजूस
दमण आणि सिल्वास हॅाटेल्स लिस्ट
२२ ) दमण हॅाटेल्स लिस्ट ( प्रसिद्धि पुस्तिकेतून )

२३ ) सिल्वास हॅाटेल्स लिस्ट ( प्रसिद्धि पुस्तिकेतून )

२४ ) फोटा पाडवा आवजो।

बीचवरचा फोटोग्राफर तुमचीच वाट पाहतोय.
16 Nov 2017 - 1:58 am | विकास...
२२ ) दमण हॅाटेल्स लिस्ट ( प्रसिद्धि पुस्तिकेतून )
मधील हॉटेल उमेश टॅक्सी स्टॅन्ड च्या अगदी जवळ आहे (पोलीस स्टेशन समोर) तिथे जेवण चांगले आहे
५००/- पासून रूम्स होत्या (२०११)
Gurukripa, Sovereign पण जवळ आहेत एकदम छान लोकेशन ला आहेत rooms above ५०००/-
जेवण चांगले मिळते. Sovereign ला बहुतेक Pure Veg पण मिळते
बाकीची थोडी जास्त महाग आहेत दमण ला ७स्टार का ५ स्टार हॉटेल पण आहे (The Deltin, Daman https://www.deltin.com/the-deltin/)
ढाबा; वीरा दा ढाबा Veera Da Dhaba, Daman
10 Nov 2017 - 12:08 pm | कंजूस
हॅाटेल Brighton, Gurukrupa,Sovereign, Marina, ( gov rest house सरकारी नोकरांसाठी),ही मोठी शिवाय इतर लहान दमण स्टँड ते दरिया या वीस मिनिटांच्या रस्त्यावर आहेत. Sun n Sand,नानी दमण किल्ला- जेटीजवळ. डाइमंड स्टँडच्या पलीकडे. माझे परतीचे तिकिट तीन वाजताचे (सौराष्ट्र एक्स १९२१६) होते त्यामुळे किल्ला पूर्ण फिरता आला नाही. सूरत-मुंबई सुपरफास्ट( १२९३६ ) सवापाचला येते तीच जाता(१२९३५ वापी ९:३०) येता बरी आहे.
# मागे एकदा बोर्डीला गेलो होतो तिथलाही बीच असाच काळा आहे. शिवाय अंधार झाला की डासांची फौज अंगावर हल्ला करते हा अनुभव घेतला.
10 Nov 2017 - 12:16 pm | संजय पाटिल
फोटो सुंदर आहेत...
११ ) शाळेतल्या मुलांच्या सायकली
सयकली मुलींच्या असाव्यात...
10 Nov 2017 - 12:34 pm | पद्मावति
मस्तंच.
10 Nov 2017 - 3:13 pm | एस
चांगली आहे भटकंती.
10 Nov 2017 - 3:13 pm | एस
चांगली आहे भटकंती.
10 Nov 2017 - 6:33 pm | खेडूत
मस्त माहिती..!!
आता एकदा जायलाच हवं.
10 Nov 2017 - 8:23 pm | Naval
मस्त माहिती !!
फोटो सुंदर आहेत...
११ ) शाळेतल्या मुलांच्या सायकली
सयकली मुलींच्या असाव्यात...
तरी सगळ्या मुलींनी गुलाबीच सायकली घ्याव्या का बरं :))
10 Nov 2017 - 10:13 pm | स्वाती दिनेश
माहिती आणि फोटो छान!
स्वाती
10 Nov 2017 - 10:20 pm | बाजीप्रभू
मी सहा वर्ष... दमणमध्ये राहिलोय (९९-२००५). मशाल चौक जवळ.. बाजूलाच नेव्हल एअरपोर्ट... अतिशय सुंदर/शांत केंद्र शासित प्रदेश.. पटेल आणि तंडेल इथले मुख्य रहिवाशी..दोंघांत अजूनही विस्तव जात नाही. तंडेल म्हणजे मच्छीमार... डोक्याने तापट पण शिकलेल्या माणसांशी अदबीने वागतात.. इथल्या बँकांत चेकवर नावापुढे 'भाई' आणि 'बेन' लिहिलं तरी चालतं.. केंद्र शासित असल्यानें दोन महिन्याचं विजेचं बिल ८० रुपये (गिझर सर्वकाळ वापरूनही), सिनेमागृहात तिकीट ९ रुपये, २५ रु. स्पेशल बाल्कनी सारखे स्वप्नातीत किमती होत्या.
तुम्ही जो दमण बीच दाखवलाहेत त्याला इकडे बोंबील बीचहि म्हणतात.. फोटोतही बोंबील सुकवायचे खांब आणि दोऱ्या दिसत आहेत. देवका बीच जवळ "मिरासोल गार्डन" बघण्यासारखं आहे (आता माहित नाही)... दमण बसडेपो जवळ टुरिस्ट मदत केंद्र आहे... तिथे रोज संध्याकाळी मिनी बस सुटते.. तुम्ही पाहिलेली सगळी ठिकाणं माणसी ३५ रुपयांत फिरवायचे. (आता माहित नाही). दमणच्या हद्दीत प्रवेश केला काही अंतरावर सोमनाथ शिव मंदिर आहे.. तेही पहाण्यासारखं आहे.
मुलगी ३.५ वर्षांची झाली तेव्हा मुंबईच्याच शाळेत टाकायचं असा सौ चा हट्ट होता म्हणून नोकरीत बदल केला... अन्यथा दमण कधीच सोडायची इच्छा नव्हती..
11 Nov 2017 - 5:45 am | रेवती
मस्त ट्रीप.
सर्व फोटू आवडले पण दोन सज्ज्यांचे नक्षीकाम सुरेख आहे. मुलींच्या गुलाबी सायकलीही आवडल्या.
11 Nov 2017 - 7:47 am | कंजूस
धन्यवाद बाजीप्रभू.
ते टुअरिस्ट केंद्र नावालाच आहे हे '९८च्या लोनली प्लॅनिट आवृत्तीतही लिहिलं आहे. माझ्याकडे अगोदर प्रदर्शनातून घेतलेली माहितीपत्रकं/ नकाशे आहेत. त्यामधून हॅाटेल्सचे फोन नं दिल.
इकडच्या भागात गाव, वस्त्यांची नावं ***वाड, ***फालिया अथवा ***पारडी अशी बरीच असतात. परतताना सोमनाथपर्यंती बस होती पण ते शिवमंदिर आहे माहित असतं तर पाहिलं असतं. वेळेअभावी देवका बीच / मिरासोल राहिलं.
11 Nov 2017 - 8:51 am | कंजूस
काही उपयोगी गुजराती वाक्ये
*बस डेपो/एटीएम/सिनेमाघर क्यां छे?
- बस डेपो कुठे आहे?
!! डेपोमाटे आ रस्ताथी आगळ जाओ।
- डेपोसाठी या रस्त्याने पुढे जा.
!! सामे छे एटीएम.
- समोरच आहे एटीएम.
!! डेपोनी पाछळ सिनेमा छे।
- डेपोच्या मागे सिनेमा आहे.
* म्यूजियम आजे खुलु रहेशे?
- आज म्यूजियम उघडे असेल?
!! ना। काले सवारे नव वागे खुलशे।
- उद्या सकाळी नऊ वाजता उघडेल.
!! बपोरे बे थी त्रण वाग्यासुधी बंध रहे छे।
- दुपारी दोन ते तीन बंद असते.
!! आवतिकाले पब्लिक हॅालिडेमाटे बंध रहेशे। तमे काले'ज जुओ।
- परवा पब्लिक हॅालिडेमुळे बंद असेल. तुम्ही उद्दयाच पाहा.
!! बीचउपर सांजे जाओ तो सारु थशे ।
- बीचवर संध्याकाळी गेलात तर बरं होईल.
* डेपो केटला दूर छे?
- डेपो किती दूर आहे?
!! आ तो पाछळच छे।
-हा तो मागेच आहे.
!! दसेक मिनिट दूर छे।
- दहाएक मिनिटांवर आहे.
* दमणनी बस क्यां मळशे?
- दमणची बस कुठे मिळेल?
!! त्यां सात नंबरउपर।
- त्या सात नंबर वर.
* दमण जवामाटे बस क्यारे मळशे?
- दमणला जाणारी बस केव्हा मिळेल?
* बस क्यारे आवशे?
- बस केव्हा येईल?
!! वार छे।
- थोडा वेळ लागेल. थोड्या वेळाने येईल.
!! हमणाज् आवशे।
- येईल आताच.
!! घणी बधी बस्सो छे । पाँचपाँच मिनिटमां उपडे छे।
- खूप बस असतात. पाचपाच मिनिटाला सुटतात.
*अहियाँ जोवामाटे शूशू छे?
- इथे बघण्यासारखे कायकाय आहे?
!! घणीबधी जग्याए छे।
- खूपसाय्रा जागा आहेत.
!! सामे जाओ तो दमणनो दरियो छे।
- समोर गेलात तर दमणचा समुद्र आहे.
!! चाररस्ताथी डाबी बाजू निकळो तो जेट्टी अने नानो किलो देखाय।
- चाररस्त्यावरून डावीकडे गेलात तर जेट्टी आणि छोटा किल्ला दिसेल.
!! पुल पार करिने मोटी दमणना किलामां जई शकाय। पंधरवीस मिनिट लागशे।
- पुल पार करून मोटी दमणमधल्या किल्ल्यात जाता येते. पंधरा वीस मिनिटे लागतील.
!! बे चर्चो किलामां'ज छे।
- दोन चर्च किल्ल्यातच आहेत.
रेस्टारोंमा
रेस्तरांमध्ये
!! अहिया टेबल खाली छे।उपर फैम्ली रुमपण छे।
- इथे टेबल रिकामे आहे. वरती फैम्लीरुम आहे.
* नाश्तो'मा शु छे?
- नाशत्यासाठी काय आहे?
!! आ लो मेन्यु।
- हा घ्या मेन्यु.
!! चा केवी जोईए तमने/आपणे?
- चहा कसा हवाय?
* तीन नॅार्मल,दोन कमी साखरेचा,एक बिनासाखरेचा.
- त्रण नॅार्मल,बे मोळो अने एक बिनाशक्करवाळो।
* कार्ड पेमेंट'नी सगवड छे केम?
- कार्ड पेमेंटची सोय आहे का?
!! तमारी ए नोट बिजी आपो ने।
- तुमची ही नोट दुसरी द्या ना.
* नाश्तो झाझो स्पाइसी ना बनावो।
- नाश्ता फार तिखट नको.
* आ आइसक्रिम ढिल्लो पडी गयु छे केम?
- हे आइसक्रिम वितळलं आहे.
!! आजे चार कलाक पावर बंध हती एटले एम थयु ।
- आज चार तास वीज नव्हती म्हणून असं झालं.
* पावरनो प्राब्लेम छे केम?
- पावरचा प्राब्लेम आहे का?
!! अवारनवार पावर जती नही पण बहु दिवसपछी एम थयु।
-सारखीसारखी पावर जात नाही पण आज बय्राच दिवसांनी असं झालं.
हॅाटेलवर
* रुम मळशे केम?
* रुम खाली छे?
- रुम मिळेल?
- रुम रिकामी आहे?
!!केवी रुम जोईए?
- कशी हवीय रुम?
!! डिलक्स/सादी/एसीवाळी?
- डिलक्स/सादी/एसीवाली?
!! एसीवाळी बे रुमो छे।
- एसीच्या दोन आहेत.
!! एक रोडनी सामे ने बीजी दरियासामे।
- एक रस्त्याकडची आणि दुसरी समुद्राकडची.
!!एसीरुमनो टॅक्स वधु छे।
- एसीरुमचा टॅक्स जास्ती आहे.
* मारामाटे एक अंग्रेजी छापो सवारे मळशे केम?
- मला सकाळी एक इंग्रजी पेपर मिळेल का?
* अमे नॅानवेज खाता नथी। सेपरेट वेज रेस्तरां छे?
* शु पालिश करवानु छे।
- शुपालिश करायचं आहे.
* आम्ही नानवेज खात नाही, वेगळं वेज रेस्तरां। आहे का?
-अमे नानवेज खाता नथी । वेज रेस्तरां छे केम?
!! छे ना!! जुदाजुदा छे।
- आहे ना वेगवेगळं.
!! ए लो तमारी ३०१नी चाबी।
- ही घ्या तुमची ३०१ ची चावी.
!! तमारा लान्ड्रीना कपडा सवारे आठ पेला आपजो।
- तुमचे लाँन्ड्रीचे कपडे सकाळी आठच्या आत द्या.
!! सांजे सातवागे रुमउपर पाछळ आवशे।
-संध्याकाळी सातला रुमवर परत येतील.
* रुमवर पाणी येत नाही.
- पाणी आवतो नदी।
* फॅन चालतू नथी।
- फॅन चालत नाही.
* आ गिझर केविरिते चालू करवानू?
- हा गिजर कसा चालू करायचा?
!! आ तो ओटोमॅटिक छे, पाणी चालू करशो तो थोडीवार पछी गरम पाणी आवशे।
- हा ओटोमॅटीक आहे. पाणी चालू केल्यावर थोड्यावेळाने गरम पाणी येईल.
* नळ/टेप खोलवा आवडतू नदी।बहु टाइट छे।
- नळ उघडता येत नाही. फार घट्ट आहे.
!! अहिंथी फरवामाटे टॅक्सी बोलावी शकाय। टॅक्सी जोईए केम?
- फिरण्यासाठी टॅक्सी बोलावता येते. टॅक्सी हवी आहे का?
!! अमारी सर्विस केम लाग्यु?
- आमची सर्विस कशी वाटली?
!! अने नाश्तो अने जमण गम्यु केम?
- नाश्ता आणि जेवण आवडलं का?
!! फरी आवजो!
- पुन्हा या!
* नक्की येउच
-अमे चौक्कस आवशो।
* तमारु दमण बहु गम्यु।
- तुमचे दमण फार आवडले.
11 Nov 2017 - 10:34 am | जेम्स वांड
बिना शक्कर वाडो , ह्यांच्यापेक्षा 'एक चा नॉर्मल, बे ओछु खांड नाखीने, अने एक बद्धी मोरी चा आपो' म्हणावे (नेमक्या गुजरातीत)
अर्थ - एक नॉर्मल चहा, दोन कमी साखरेचे आणि एक बिन साखरेचा चहा द्या
प्रवासवर्णन झकास आहे एकदम, शॉर्ट बट स्वीट! गुजराती भाषा/लिपी मजेदार आहे फार, खूप शब्द मराठी सारखेच असतात फक्त अर्थ वेगळा असतो
15 Nov 2017 - 11:29 pm | विकास...
दमण मध्ये होतो ४२ महिने .. काही फोटो
https://photos.google.com/album/AF1QipNvEiHtGGr6DXl8DKLzkfKP9Av775TDIEYh...
1. https://photos.google.com/album/AF1QipOvjvM18vSw1QXYKK_xFoboT-Gk3Hz1Ha4b...
2. https://photos.google.com/album/AF1QipMzIn2ae_sao6p6pzRTDYyDMxtuUr3W-yHC...
3. https://photos.google.com/album/AF1QipMA05RA4Z8bvnWZJShQxNmV9DnDl0b3--Z8...
4. https://photos.google.com/album/AF1QipPO69HhdYzC2wpWee9AIBukZ9zmXT4EldbX...
16 Nov 2017 - 1:01 am | विकास...
कसे जावे
Pune - Dadar - Dadar West - Vapi - Daman (Two Days )
बुधवारी 11096 Pune Ahmedabad Ahimsa Express १९:५० ला पुण्यातून निघून रात्री १:४५ ला वापीला पोहोचते, टॅक्सी रात्री सुद्धा मिळते
वापी मधून टॅक्सी आहेत ३० ते ५० रुपये पर सीट दमण साठी. दमण मध्ये हॉटेल सहज उपलब्ध असतात (सुट्ट्या सोडून) . जेवण चांगले मिळेल व्हेज नॉन व्हेज असे पाहिजे तसे. मराठी येते बऱ्याच लोकांना पण हिंदी जास्त चालते
Mumbai - Vapi - Daman One Day
मुंबई वरून एका दिवसात दमण होऊ शकते 22953 Gujarat Super fast Express सकाळी ५:४५ ला निघून ८:४५ पर्यंत वापी ला पोहोचते. reservation ची गरज पण नाही लवकर गेलात तर छान विंडो सीट मिळते
वापीमधून दमण साठी टॅक्सी लगेच मिळते GSRTC CNG बसेस पण आहेत.
वापीवरून मुंबई ला येताना १७:०० ला 59046 Valsad - Bandra Passenger मिळते, बोरिवली मध्ये लोकल पकडावी पुढे ...
कधी जावे: Aug to Nov (बाकी ३१DEC ला खूप गर्दी असते)
दमण मध्ये
Jampore Beach: दमण टॅक्सी स्टॅन्ड - पोलीस स्टेशन - साई बाबा मंदीर - पादचारी पूल - मोटी दमण असे पायी जावे (१. ५ किमी) तिथे गार्डन पाहा, फोर्ट पहा आणि फोर्ट च्या पलीकडे जाऊन मग ऑटो Jampore Beach साठी करावी वाटेमध्ये भाजी मार्केट आणि चर्च आहे तिथे चहा छान मिळतो
Devka Beach ५ किमी: जाऊच नये !! खरे अंतर २ किमी असेल पण ऑटो वाले ५ सांगतात. तिथे पाहण्यासारखे काही नाही. Devka मार्गे mirasol lake ला जावे २ किंवा ५ रुपये एन्ट्री फी आहे आतमध्ये महागडे रेस्टॉरंट आहे काहीही ना घेता भरपूर फोटो सेशन करा
दमण मध्ये मुक्काम असेल तर
वलसाड ३० किमी - सकाळी वलसाड साठी GSRTC बस पकडावी एका तासामध्ये वलसाड, एकदम सोप्पं आहे, वलसाड मध्ये स्वामीनारायण मंदिर जे तिथलं बीच (Tithal Beach) वर आहे अप्रतिम लोकेशन. २-३ किमी चा बीच आहे. साई बाबा मंदिर आहे
वलसाड मध्ये जेवण चांगले मिळेल आणि कपडे छान स्वस्त मिळतात (अर्थात बस आणि रेल्वे स्टेशन पासून दूर गेलात तरच)
(वलसाड मधून थेट मुंबई किंवा पुणे साठी ट्रेन मिळेल त्यामुळे दमण मधून चेक आऊट करून वलसाड केले तरी चालेल)
सिल्वासा ४० किमी साठी - वापी ला जावे लागेल तिथून सिल्वासा साठी बस आहेत सिल्वासा मध्ये मराठी जास्त चालत. सिल्वासा मधून मधुबन साठी बस मिळते धरण साठी स्टॉप आहे तिथे लायन सफारी पण आहे. तिथे दमण गंगा चे पात्र खूप खोल आणि मोठे आहे
सुरत १२० किमी - वापी तो सुरत ट्रेन बेस्ट (सुरत मध्ये Textile Market ला खरेदी करा Bombay Market ला नको)
डहाणू: स्वतःची गाडी असेल तर समुद्रकिनाऱ्यावरून मस्त रस्ता आहे तिथे बीच आणि काही हॉटेल्स आहेत. डहाणू पासून २५ किमी वर NH८ चारोटी ला वर Mahalaxmi Mandir आहे. आता इथून पुढे मुंबई किंवा वापी / सिल्वासा असे कुठेही जाता येईल
इतर ठिकाणे: अतुल, आनंद (गावाची नवे आहेत हो), Atul, Anand, Umbergaon Beach, Vrindavan Studio हि नवे अशीच शोधा
जवळची मोठी गावे (Railway Station) : Vapi, Valsad, Surat, Dahanu (रोड)
दमण मध्ये काय करावे : मस्त जेवण करा आणि बीच वर आराम, दारू पिऊन राडा नको, खूप मारतात
मी तिथे ४२ महिने होतो पण कधी समुद्राच्या पाण्यात गेलो नाही. का ते तुम्हीच चेक करा भेट देऊन
टीप: काही नवे मुद्दाम इंग्लिश मध्ये लिहिली आहेत जशी च्या तशी मॅप वर शोधता यावीत म्हणून
16 Nov 2017 - 2:59 am | विकास...
अरे हो आता आठवलं पुणे स्टेशन वरून ट्रॅव्हल्स असतात सुरत साठी सेमी स्लीपर / स्लीपर ५००/- / ७००/- त्या वापी ला भल्या पहाटे सोडतात. तिथून ऑटो करावी लागते वापी स्टेशन किंवा बस स्टॅण्ड पर्यंत .. पुढे वरील प्रमाणे
25 Mar 2025 - 6:33 pm | कंजूस
चिडियाघर.
पुन्हा एकदा दमणला गेलो होतो रविवारी. कारण मागच्या वर्षी तिकडे एक नवीन पक्षी संग्रहालय उघडलंय ते पाहायचं होतं. जांपोरे किनाऱ्याला लागूनच ही जागा आहे. बरेच पक्षी परदेशी आहेत. स्थानिक भारतीय नाहीत. पिंजरा म्हणजे मोठी जाळी उंच लावली आहे त्यातच आपण जायचे आहे. पक्षी आपल्याच आजुबाजुला फिरत, उडत असतात. बरीच मोकळीक मिळते त्यांना. ( Statue of unity येथील jungle safari याहून मोठे आहे आणि प्राणी सुद्धा आहेत.) पिंजऱ्यांतले प्राणी/पक्षी बघायला आवडत नसेल त्यांनी जाऊ नये. साधारणपणे एक तासात पाहून होते.
Photo १


पाटी. प्रवेश ..
सूचना
१. फक्त मोबाईल कॅमेरा फोटोग्राफी करता येते. फी नाही. मोठे कॅमेरे, गोप्रो, नेता येणार नाही.
२. खाद्य वस्तू असलेली बॅग आत नेता येत नाही. गेटवर ठेवता येते.
३. प्रवेश फी तिकिट रु १०० आहे. फक्त ओनलाईन पेमेंट घेतात.
Photo २
.माहितीचित्रे
Photo ३

.प्रवेशद्वार
Photo ४

.मकाव पोपट दक्षिण अमेरिका
Photo ५

.गोल्डन फेजंट,चीन
वापीला उतरल्यावर पश्चिमेला नानीदमणला(११किमी) जाणारा रस्ता आहे. तिथून दमणगंगानदी ओलांडून गेल्यावर मोटीदमण आणि पुढे सहा किमीवर दक्षिणेकडे जांपोरे किनारा लागतो. तिथेच बाजुला हे चिडियाघर/Aviary आहे.
कसे जावे ...
मुंबई ते वापी बऱ्याच रेल्वे आहेत आणि वापीला काही थांबतात.
१.वापी स्टेशन ते नानी दमण बस स्टँडला शेअर रिक्षा मिळतात पन्नास रुपये सीट. बस चौदा रु तिकिट आहे पण तो स्टँड स्टेशनपासून एक किलोमिटरवर आहे.
२. नानी दमण बस स्टँडला दर पंधरा मिनिटांनी एसी बस जांपोरे बीचला जातात. दहा रु तिकिट. सकाळ संध्याकाळी असतात, दुपारी कमी.
ओटो रिक्षा १२० रु
३. वापी स्टेशन ते थेट जांपोरे बीच ओटो रिक्षा रुपये पाचशे घेतात.
४. जांपोरे बीचला खाण्याचे रेस्टारंट्स नाहीत. बीच काळा आहे. बरेच प्रवासी मुंबई ते गुजरात कारने जातात तेव्हा इकडे एक चक्कर मारतात. त्यामुळे त्यांना रेस्टॉरंटची गरज लागत नाही. पार्किंग दिलेले आहे.
५. दमणला प्रथम इकडे जावे ( दुपारी बंद असते, सोमवारी बंद). नंतर येताना वाटेत मोठी दमण किल्ला पाहून नदी पुलावरून नानी दमण किल्ला पाहावा. नंतर परत.
६. देवका बीच आणि मिरासोल गार्डन या दोन जागा नानी दमणच्या उत्तरेला सहा किमीवर आहेत. संध्याकाळी जाण्यासाठी योग्य आहे. सकाळी जाऊ नका.
25 Mar 2025 - 7:30 pm | Bhakti
छान धागा आहे.मुंबईहून दमणला एका दिवसात सहल होते?
25 Mar 2025 - 8:11 pm | कंजूस
होय.
जाताना 12935 (०६:४५ अंधेरी ) ...येताना12936 (१७:४५)आहेच.
पण मिरासोल गार्डन ही पाहायचे असेल तर येताना वापीहून वन्दे भारत(१८:१५) किंवा शताब्दी एक्सप्रेस(१९:२०) पकडावी लागेल.
धावपळ न करता सहज जमेल.
सोबत खाण्याचे पदार्थ ठेवल्यास वेळ वाचेल.
26 Mar 2025 - 7:18 pm | अमेरिकन त्रिशंकू
दादरा, नगर हवेली, दीव, दमण, पुदुचेरी हे अजून केन्द्रशासित प्रदेश का आहेत?
अंदमान, लक्षद्वीप, चंदीगड, लडाख, जम्मू काश्मिर वगैरे समजू शकतो.
27 Mar 2025 - 12:31 am | कंजूस
.....अजून केन्द्रशासित प्रदेश का आहेत? .....
माहीत नाही.