२९ किंवा ३० डिसेम्बर रोजी किल्ले रायगडावर एक छोटी सहल करण्याचा इरादा आहे. आम्ही एकून ८ मोठी जण असून एक लहान मुलगा आहे. या आधी घाई गडबडित एकदा हा किल्ला पहिला आहे, पण समाधान झाले नाही.
हेतु हाच आहे की, स्वराज्याची राजधानी आणि इतिहास अनुभवता येइल, थोड थ्रिल म्हणून रोपवेत बसता येइल. यापूर्वी कधीही किल्ल्यावर वस्ती केली नाहीये, त्यामुळ तो ही अनुभव घ्याचय. अगदी सकाळी उजडताना तो किल्ला आणि आजुबाजुचे सौन्दर्य पहायचे आहे.
शोधाशोध केली असता, रायगडावर MTDC च रिसोर्टवजा होटल आणि रोपवेवाल्यांचे एक छोटे होटल असल्याचे समजले.
MTDC च्या बुकिंग वेब्साईट वर रायगड किल्ल्याच्या निवासचा कुठलाही उल्लेख नाही. रोपवेवाल्यांना संपर्क करून इमेल केला असता आम्ही एक महिना आधी बुकिंग सुरु करतो असे उत्तर दिले. ८५० रुपयात नॉन एसी रूम किल्ल्यावर मिळेल असे त्यानी सांगितले.
MTDC मधे मुक्काम करावा की रोपवेवाल्यांच्या खाजगी होटेलात? स्वच्छ रूम, अंघोळ करण्यासाठी गरम पाणी आणि रुचकर नाश्ता जेवण . एवढ्याच माफक अपेक्षा आहेत. वरील दोन्ही पर्याय जर योग्य नसतील तर किल्ल्याच्या पायथ्याशी देखील रहायची तयारी आहे. स्थानिक घर वेगैरे मिळाले तर उत्तम.
प्रतिक्रिया
10 Nov 2017 - 3:35 pm | प्रचेतस
२९/३० डिसेंबर रोजी गडावर प्रचंड गर्दी असेल. न गेलेले उत्तम. जायचेच असेल तर सकाळी ८ च्या आत हिरकणीवाडीत पोहोचणे गरजेचे आहे नाहीतर किमान ४ तास रोपवेच्या रांगेत थांबावे लागेल.
रायगड रोपवेवाल्यांचे लॉज रोपवे स्टेशननजीकच आहे. वर जायला ६०/७० पायर्यांची सतत चढउतार करावी लागेल. एमटीडीसीचे निवासस्थान उत्तम आहे, ऐन माथ्यावर, दरीच्या जवळच आहे. त्यामुळे तेथून सुंदर दृश्य दिसते. एमटीडीचे बुकिंग पुणे/मुंबई येथील एमटीडीसीच्या ऑफिसांतून करता येते. एमटीडीच्या उपाहारगृहात तसेच वर देशमुखांच्या उपाहारगृहातही रुचकर जेवण मिळणार नाही (पोहे मात्र छान मिळतात), ते बाजारपेठेच्या मागे धनगरांच्या झापांवर उत्तम घरगुती जेवण मिळेल.
14 Nov 2017 - 10:11 pm | दिलीप वाटवे
सध्या गडावरचे देशमुखांचे उपहारगृह बंद झालेले आहे.
10 Nov 2017 - 6:27 pm | दुर्गविहारी
वल्लीदांच्या प्रतिसादाशी सहमत. २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हातात बुकींग असल्याशिवाय बाहेर पडू नये या मताचा मी आहे. एन वेळी सोय होईल याची खात्री नाही. पहिल्यांदा कुटूंबासमवेत १९९५ मधे रायगडावर गेलो होतो. त्यावेळी ट्रेक वगैरे करत नव्हतो. सहजिकच हिवाळी भटकंतीचे ट्रिक आणि टिप्स माहिती नव्हत्या. दिवाळीनंतर आम्ही लगेच गेलो होतो. बरोबर टॉर्च नेला नव्हता. महाडमधून जाताना ३ वा. ची बस चुकली आणी ५ वा.ची शेवटची बस पकडली . गड चढायला सुरु केला आणी अंधार झाला. सुदैवाने बरोबर एक कुटूंब होते, त्यांच्याकडे टॉर्च होती. पण महादरवाज्यातून आत गेलो आणि ती विझली. शेवटी वाटेवरचे कागद गोळा करून जाळत वाट काढली आणि गडावर पोहचलो. देश्मुखांचे अथितीगॄह भरलेले होते. त्यांनी एम.टी.डि.सी.च्या निवासस्थानाकडे जायला सांगितले. पहिल्यांदाच गडावर जात होतो. अखेरीस देशमुखांच्या धर्मशाळेत दोन गाद्यावर उघड्यावर कुडकुडत आम्ही ती रात्र काढली. तुमच्या धाग्यनिमीत्त या प्रसंगाची आठवण झाली.
बाकी रायगडावर एम.टी.डि.सी., देशमुख व रोपवेचे लॉज अश्या तीन ठिकाणी मुक्कम करता येतात. पैकी एम.टी.डी.सी.ची सोय सर्वात चांगली आहे. देश्मुख आणी रोपवे लॉजही ठाकठीक. अर्थात अश्या ठिकाणी खुप उत्कॄष्ट सोयीची अपेक्षा फारशी योग्य नाही असे मला वाटते. सल्ला मात्र एकच राहिल बुकींग होत असेल तरच रायगडाचा बेत करा. बाकी हिवाळ्यातील गडावरची सकाळ मोठी प्रसन्न असते. धुक्यात बुडालेली सह्याद्रीची रांग आणि शिखरे मनमोहक दिसतात.
तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा.
11 Nov 2017 - 3:11 pm | सतिश पाटील
बापरे !!
या दिवसात देखील गडावर एवढी गर्दी असते?
11 Nov 2017 - 4:08 pm | चारु राऊत
29,30 डिसेम्बरला गड़वार जाऊ नका खूप गर्दी असेल. हाल होतील.
11 Nov 2017 - 4:08 pm | चारु राऊत
29,30 डिसेम्बरला गड़वार जाऊ नका खूप गर्दी असेल. हाल होतील.
12 Nov 2017 - 10:59 pm | रुस्तुम
ऑनलाईन बुकिंग MTDC चे होते पण सध्या त्यांनी HOLD केलंय.MTDC मध्ये वापरासाठी जे पाणी येते ते अत्यंत प्रदूषित होते. गंगासागरच प्रदूषित झाला असावा कदाचित.असेच आम्ही एकदा बुकिंग न करता गेलो होतो आणि गडावर कुठे ही सोय होईना. बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यावर देशमुखांच्या समोरच धर्मशाळेसारखं काही आहे तिथे सोय केली गेली (त्यासाठी ZP ची परवानगी काढावी लागते असे काही तरी सांगण्यात आलेले)..बाकी वरील सर्व प्रतिसादांशी सहमत.
13 Nov 2017 - 11:43 am | सतिश पाटील
३० डिसेम्बरला सकाळी लवकर पोहोचून दिवसभर गड पाहून रात्री तिथेच रहायचे अणि ३१ तारखेला तिथून पुन्हा माघारी फिरायचे अशी योजना होती, अणि तेही MTDC च बुकिंग मिळाले तर.
13 Nov 2017 - 12:21 pm | अमर विश्वास
वर अनेक प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे बरीच गर्दी असेल ...
एक पर्याय सुचवतो ... जर गडावर राहायचे नसेल तर खाली पाचाड मध्ये किंवा महाडला राहू शकता ... सकाळी लवकर उठून गडावर हेलेत तर गर्दी कमी लागेल..
वर देशमुखाकडे जेवण मिळते .. सकाळी पोचल्यावर ऑर्डर देऊन ठेवावी
14 Nov 2017 - 10:31 pm | दिलीप वाटवे
गडावरचे एम टी डी सी सध्या एका खाजगी संस्थेने चालवायला घेतलेले आहे. आता ते शासनाकडे नाही. त्यामुळे एम टी डी सी च्या ऑफीसमधे बुकींग होईल असे वाटत नाही. माझ्या माहीतीत ते Goel Gupta Tourism Pvt. Ltd यांच्याकडे होते. त्याचा नंबर 9422787705/9422787776.
पाचाडला देशमुखांचा चांगला पर्याय आहे. पुढे दिलेले नंबर चित दरवाजा, हिरकणीवाडी आणि पाचाडच्या देशमुखांचे आहेत. (02145)202233/9271174050/9422693187/9422566820/9850676168/9422497110/9975443115.
हे सर्व नंबर बर्याच दिवसांपुर्वी घेतलेले आहेत. फोन करुन एकदा खात्री करुन घ्यावी.
15 Nov 2017 - 11:31 am | सतिश पाटील
धन्यवाद ..
दिलेल्या क्रमांकावर संपर्क करुण बघतो.
19 Nov 2017 - 3:03 pm | सुनिल पाटकर
रायगड पेक्षा पाचाड येथे अनंत देशमुख यांच्याकडे मुक्काम करा ,निवास,जेवण व नाश्ता उत्तम,सकाळी लवकर रोपवेची तिकिटे काढल्यास गर्दी टाळता येईल.रायगडावर काही निर्बंध असल्याने ३१ डिसेंबर साजरा करणारे येथे नसतात.बाकी हा सिझन उत्तम आहे.
अनंत देशमुख -- ९४२२६८९८९७,९७६६६१४४७३
20 Nov 2017 - 11:17 am | सतिश पाटील
माहिती बद्दल धन्यवाद ...
25 Nov 2017 - 1:01 pm | विश्वजीत कदम
मागच्या रविवारी जाऊन आलो. MTDC मध्ये उत्तम सोय होईल. MTDC मंगेश - ८७८८५१६४५२ संपर्क साधा.
29 Nov 2017 - 10:16 am | सतिश पाटील
धन्यवाद ...