पनीर टिक्का माझ्या आवडती एक डिश.... तशी किचकट पण चविला एकदम मस्त अशी पाककृती.
पनीर टिक्का एकदा घरी करुन बघावा या हेतुनी सगळं साहित्य जमवलं आणि प्रयोग सुरु झाला.
साहित्य :
१. पनीर - ५०० ग्रॅम
२. २-३ मोठे कांदे
३. २-३ सिमला मिरच्या
४. दही ( पाणी काढलेलं ) - ५०० ग्रॅम
५.२-३ मोठे चमचे लाल मिरचीची पेस्ट
६.२-३ मोठे चमचे आलं-लसुण पेस्ट
७. १ १/२ चमचा गरम मसाला पावडर
८.१/२ चमचा कसुरी मेथी
९. २ चमचे लिंबाचा रस
१०.१/२ चमचा मिरी पावडर
११. २-३ चमचे तेल
१२. मिठ चवीनुसार
कृती :
पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करुन घ्या. त्याचप्रमाणे कांदा आणि सिमला मिरचीचे पण तुकडे करुन घ्या.
मॅरिनेशनसाठी पाणी पुर्णपणे काढुन टाकलेलं दही घेऊन त्यात आलं-लसुण पेस्ट, लाल मिरचीची पेस्ट, आणि बाकीचे मसाले घाला. नंतर त्यात लिंबाचा रस, मिठ आणि तेल घालुन व्यवस्थीत मिक्स करा. आता यात पनीर, कांदा आणि सिमला मिरचीचे तुकडे घालुन हे मिश्रण फ्रिजमधे २-४ तासासाठी ठेवा. नंतर एका मेटल सळईवर हे तुकडे लावा.
नंतर याला ओवनमधे ७-८ मिनिटासाठी रोस्ट करुन घ्या किंवा ७-८ मिनिटांसाठी ग्रिल करुन घ्या. रोस्ट करताना थोड्यावेळानी त्याला थोडं तेल लावुन घ्या कारण रोस्ट होताना पनीर ड्राय होवु शकतं. ७-८ मिनिटांनी गरम गरम पनीर टिक्का खाण्यासाठी तयार :) पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला द्या.
प्रतिक्रिया
3 Mar 2009 - 12:47 pm | अवलिया
चितेवर निमुट जावुन पडलो आहे... पेटवा लाकडे !!!
:)
--अवलिया
3 Mar 2009 - 12:49 pm | दशानन
म्या बी !
लै भारी मिंटे :)
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
3 Mar 2009 - 1:10 pm | मृगनयनी
मिन्टे... ऐन जेवायच्या वेळेस ही पाककृती प्रकटित करुन तू आम्हाला मारुन, फाडुन, तोडून.... टाकलेलं आहेस..... :) :) :)
आता... खास तुझ्या हातचा पनीर टिक्का खाल्ल्याशिवाय मला चैन नाही पडणार!!!!!!!
मस्त!!!!!!!!
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
3 Mar 2009 - 1:17 pm | जागु
मिंटी बघुन आता खावेशेच वाटातात ग. मस्तच आहेत. पनिर टिक्का मसाला ची पाकृ माहीत आहे का तुला ? असेल तर दे मला.
3 Mar 2009 - 1:56 pm | मदनबाण
मिंटी ताय एकदम जबरस्त्,...भुक लागली जबरस्त...
(पनीर क्रेझी)
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
3 Mar 2009 - 2:00 pm | स्मिता श्रीपाद
जळव आम्हाला....असले जीवघेणे फोटो दाखवुन... ;-)
आत्ता कुठे तुझ्या "रोज पुडींग" चा फोटो पाहुन झालेला त्रास कमी झाला होता...आता आणि हे नवीन :-(
या शनिवारी नक्की करणार :-)
स्वतःशीच : देवा माझे सगळे वीकांत आता या मिंटी च्या पाकॄ करण्यात (मस्त) जाणार बहुतेक :-)
3 Mar 2009 - 2:06 pm | छोटा डॉन
पाकृ करण्यास अतिशय सोपी वाटत आहे.
आता करुन पाहिन, म्हणजे कुकबुवाला करायला सांगेन ...
मात्र कॄतीवरुन चविष्ट होईल अशी खात्री आहे, झकासच ...
बाकी फोटो बघुन मात्र "वा-र-लो"..!!!
( आता तात्या आत्महत्येच्या मार्गाने चालले असल्याने आम्हाला नैसर्गीक मरण येण्यास कोणाचे ऑब्जेक्शन नसावे. ;) )
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
3 Mar 2009 - 2:25 pm | गणपा
फोटु पाहुन डोळे @) ले.
:$ वाचा बसली आहे.
=P~ \_/ \_/\_/\_/कमी पडल्या \_/वी भरत आली.
:W कुठल्या जन्मीचा सुड उगवतेस :?
तात्याला आता तिरडी वर झोपलेला स्मायली बनवावा लागेल.
3 Mar 2009 - 3:35 pm | विसोबा खेचर
पिठावरची पणती तेवत आहे..!
Tatyaa passed away..! :)
3 Mar 2009 - 3:40 pm | परिकथेतील राजकुमार
छान पाकृ !
पण आम्हाला पनीर हे थर्माकोल खाल्ल्या सारखे वाटते , त्यामुळे आवडत नाही आणी त्यामुळे वरील फोटो पाहुन आम्हास दगा फटका संभवला नाही ;)
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
3 Mar 2009 - 7:42 pm | प्राजु
काय जबरा फोटो आहे.
मिंटे, फोटोमध्ये तू लाकडी काड्यांना लावले आहेस सगळे. त्या ओवन मध्ये चालतात का ?
मी ही आणेन. बाकी सामान आहेच घरी. चला विकेंडचा प्लॅन बनला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Mar 2009 - 8:10 pm | अनुजा
प्राजु करायच्या आधी काड्या दोन तास पाण्यात भिजवून ठेव. म्हणजे जळत नाहीत.
3 Mar 2009 - 8:32 pm | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Mar 2009 - 7:55 pm | रेवती
अरे देवा!!
आता काय करणार?
करावाच लागणार पनिर टिक्का.
झक्कास फोटू!
(खुद के साथ बातां : ही अमृता नां इतका त्रास देते. कधी सहलींचे फोटू तर कधी पदार्थांचे...)
रेवती
3 Mar 2009 - 8:14 pm | अनुजा
एकदम मस्तच! आजच करावे म्हणते....
3 Mar 2009 - 8:46 pm | मृण्मयी
अयाया, काय दिस्तोय पनीर टिक्का!! खरंच जीवघेणा!!!
इतका मस्त लाल रंग फक्त मिर्च्यांमुळे आला असेल तर कुठल्या मिर्च्या वापरल्या तेही सांगा.
3 Mar 2009 - 8:48 pm | चकली
मिंटीताई
एकदम झकास पाकृ..
चकली
http://chakali.blogspot.com
3 Mar 2009 - 8:50 pm | चतुरंग
हा तुम्ही पनीर बुक्का मारलाय हो पोटात!! ~X(
नका हो सकाळी सकाळी असे हाल करु!! :SS
चतुरंग
3 Mar 2009 - 9:01 pm | लिखाळ
मस्त आहे पाकृ .. लवकरच करुन पाहायला (सांगायला) पाहिजे. :)
-- लिखाळ.
4 Mar 2009 - 12:14 am | समिधा
मी पण असच करते, पण त्यात धने,जिरे पावडर पण घालते.
मस्त लागत. मी ओव्हन मध्ये करते.
4 Mar 2009 - 12:37 am | मिना भास्कर
मिंटी ही मा़झीही आवडती डीश आहे, आता नक्की करून बघेन. धन्यवाद एका छान पा. क्रु. बद्दल! =D>
4 Mar 2009 - 6:24 am | मिथिला
मस्त आहे पाकृ .. लवकरच करुन ख।यला पाहिजे., फोटो झकास ...
4 Mar 2009 - 1:34 pm | मुक्ता २०
सॉलिड पा.कृ..!!! :)
ह्यात टमाटे आणि अननस सुद्धा वापरलेल पाहिलय मी..! ते सुद्धा छान लागत.. :D
14 Apr 2009 - 3:12 pm | वाहीदा
धन्यवाद मिंटी !!
बघुनच जिभेला पाणी सुट्ले ...
शनीवारी नक्की कर णारच !
~ वाहीदा
14 Apr 2009 - 4:38 pm | दवबिन्दु
सगलेच स्टार्टर एक एक करुन इथ टाकाना. तै तुमी कीती सोप करुन सांगता कोन्ती पन रेशिपि.