नमस्कार मंडळी! दिवाळीचा फराळ करायला सुरवात झालीये.दरवर्षी प्रमाणे या वर्षीही बेसन लाडू मायक्रोव्हेवमधे केलेत.मायक्रोव्हेवमधे होणार्या सोप्या,झटपट आणि खमंग लाडूची पाककृती देत आहे.
साहित्य: बेसन पिठ : ३ वाट्या
तूप :एक वाटी
पिठीसाखर :दोन वाटी
वेलदोडा पुड
काजु,बेदाणे
कृती : प्रथम तूप पातळ करुन घेणे.मायक्रोव्हेवमधिल भांड्यात डाळीचे पिठ (जाडसर) (लाडू रवाळ होतात आणि पिठ खमंग भाजले जाते म्हणून डाळीचे जाडसर पिठ घ्यावे.)घेऊन त्यात पातळ तूप घालून मिश्रण एकत्र करुन घ्यावे.
आता मायक्रोव्हेवमधे हाय पॊवरवर हे मिश्रण दोन मिनिट भाजून घ्यावे.नंतर हे निट ढवळावे व पिठाच्या गाठी मोडुन घ्याव्यात व परत दोन-दोन मिनिट ठेवावे. प्रत्येकवेळी मिश्रण निट ढवळून परत ठेवावे.साधारण बदामी रंग आणि खमंग भाजल्याचा वास आला कि कमी पॊवरवर दोन दोन मिनिट दोन तिन वेळा ठेवावे.
बेसन छान भाजले जाइल.नंतर गार झालेल्या मिश्रणात पिठीसाखर, वेलदोडा पुड,बेदाणे घालून लाडु वळावेत.वरुन काजू लावून सजवावेत. अतिशय कमी वेळात ,श्रमात व झटपट लाडू तयार .
प्रतिक्रिया
16 Oct 2017 - 12:16 am | रेवती
वाह! आता दिवाळी जवळ आल्यासारखी वाटतिये.
लाडू चांगले दिसतायत. मी तुला विचारणारच होते की लाडू रवाळ झाल्यासारखे वाटले ना.
माझ्याकडेही तसेच झाले होते. घरी सगळ्यांना बीनरवाळ आवडतात म्हणून मी नेहमीप्रमाणे करते, अन्यथा हे लाडू मावेमध्ये करताना हात न दुखता बेसन भाजले जाते.
ते सुखाचे वाटते. ;)
मी पयली.
16 Oct 2017 - 8:44 am | सविता००१
सुरेख दिसत आहेत लाडू
16 Oct 2017 - 11:19 pm | स्वाती दिनेश
रेवती म्हणते तसे दिवाळी आल्याची वर्दी ह्या लाडूंनी दिली आहे, :)
छान दिसत आहेत बे ला.
मी ही मा वे मध्येच भाजते बेसन..
स्वाती
30 Jan 2018 - 1:46 pm | मराठी अमर्यादित
छान दिसत आहेत लाडू...!!
अजुन रेसिपि इथे http://www.marathi-unlimited.in/top-recipes/