Cheesy Hashbrown अर्थात बटाट्याचे थालीपीठ

गम्मत-जम्मत's picture
गम्मत-जम्मत in पाककृती
21 Sep 2017 - 7:41 pm

माझ्या बाबतीत नेहमी घडणारी गोष्ट म्हणजे नाले साठी घोडा खरेदी... कुणी तरी घरी येणार म्हणून कोणत्या तरी सँडविच साठी घरी cheese इटालियन हर्ब्स, चिली फ्लेक्स अशा आणलेलं होत, अर्थात सँडविच न बनवता बुर्जी पाव खाल्ल्याने हे सर्व फ्रिज मध्ये शोभिवंत होऊन पडलं. त्याचा सदुपयोग करण्या साठी हि पाकृ केली.
(मी ऋजुता दिवेकर ची पंखी असल्याने ब्रेड, बिस्कीट घरी दुर्मिळ!! त्यामुळे ब्रेड का नाही आणला हा प्रश्न बाद!! )
पाकृ येणेप्रमाणे -
साहित्य -
२ मोठे बटाटे लांब-लांब किसून, कांदा बारीक चिरलेला, कांद्याची पात बारीक चिरून, इटालियन हर्ब्स, चिली फ्लेक्स, मोझरेला किंवा प्रॉसिस्ज्ड चीझ किसून, (मी प्रोसिस्ज्ड चीझ वापरलं ), १ अंडे फेटून,किंवा - १ चमचा डाळीचे पीठ, शिमला मिरची उभी चिरून.

कृती-
१. बटाटे लांब किसून घ्यावे, मग थंड पाण्यात बुडवून घट्ट पिळून घ्यायचे. किसामध्ये पाणी राहता कामा नये.
२. बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात,किसलेला बटाटा, शिमला मिरची, हर्ब्स, चिली फ्लेक्स (भरपूर)हे सर्व एकत्र करून घ्यावे. फेटलेले अंडे किंवा बेसन या मिश्रणात टाकावे. सर्वात शेवटी चवी नुसार मीठ घालायचे.
३. हे मिश्रण आता साधारण थालीपीठाच्या पिठा सारखे दिसेल. निर्लेप तव्यावर किंचित तेल पसरून, बटाट्याची थालीपीठे लावावीत.
थोडीशी जाडसर थापली तर छान लागतात.
४. खालील बाजू भाजली गेली कि थालीपीठ उलटायचे आणि किसलेले चीझ कमी/भरपूर घालायचे. मग ४-५ मिनिटे मंद आचेवर शिजवून खायचे.
५. चीझ मस्त वितळायला लागेल तशी आपण लाळ गाळायला लागतो आणि सोबत कोणता सॉस नसला तरी चवीने खातो.
तरीही हवा असल्यास टोमॅटो सॉस घ्यावा.

माहिती स्रोत - आंतरजाल/ तू-नळी

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

21 Sep 2017 - 11:19 pm | राघवेंद्र

फोटू कुठाय ??

तरीही पाककृती मस्तच. ते Dunkin Donuts मधील दोन-तीन पाकिटे एकदम खाण्यापेक्षा घरीच करण्यात येईल.

खूप धन्यवाद !!!

गम्मत-जम्मत's picture

22 Sep 2017 - 5:30 pm | गम्मत-जम्मत

धन्यवाद!! फोटो लावले आहेत आता..

गम्मत-जम्मत's picture

22 Sep 2017 - 5:20 pm | गम्मत-जम्मत

P

गम्मत-जम्मत's picture

22 Sep 2017 - 5:28 pm | गम्मत-जम्मत

Photo

इरसाल's picture

23 Sep 2017 - 11:05 am | इरसाल

एक्/दोन कच्चे बटाटे सालासकट किसुन एका पॅन मधे थोडे बटर टाकुन त्यावर पसरुन ठेवतो, त्यात पुन्हा किसलेले चीज टाकुन व चवीपुरते मीठ टाकुन झाकण ठेवुन दोन्ही बाजुने गोल्डन ब्राउन होईपर्यंत खरपुस भाजतो..........(फक्त आणी फक्त माझ्या लेकीसाठी)
कं दिसत माहितीय !!!!!!आनी कं भारी लागत पन !!!!!

व्वा! यम्मी! इरसाल यांची सोप्पी पाककृतीही मस्त. करून बघणेत येईल. धन्यवाद!

गम्मत-जम्मत's picture

23 Sep 2017 - 3:16 pm | गम्मत-जम्मत

Dhanyawad!!

उगा काहितरीच's picture

24 Sep 2017 - 8:14 am | उगा काहितरीच

बटाटा +चीज = विषय संपला!

सविता००१'s picture

24 Sep 2017 - 7:45 pm | सविता००१

मस्तच.
इरसाल यांची पाकृपण खूप मस्तच. आईग्ग. खूप छान लागत असणार.

पैसा's picture

24 Sep 2017 - 8:54 pm | पैसा

खाताना किती गिल्टी वाटेल या विचाराने हुडहुडी भरलीय! =))

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2017 - 12:03 am | प्रभाकर पेठकर

डोळे बंद करून खायचं.

गम्मत-जम्मत's picture

27 Sep 2017 - 9:13 pm | गम्मत-जम्मत

गिल्टी नाही वाटुन घ्यायचं, खाण्यासाठी जन्म आपुला :D