मराठी संगणक प्रणाली

अमृतांजन's picture
अमृतांजन in काथ्याकूट
2 Mar 2009 - 9:13 am
गाभा: 

मी गेले अनेक दिवस मुक्तस्रोत संगणक प्रणालींचा अभ्यास करत आहे. अनेक चांगले प्रयत्न लोकांनी केले आहेत. जुमला, वगैरे अनेक प्रणाल्या फुकट उपलब्ध असतात. त्यातील अनेक प्रणालींचे भाषांतर हिंदी (मी तपासलेल्या जवळजवळ सगळ्या प्रणाल्या), तामीळ, कन्नड, सिंधी, गुजराती भाषेत झालेले आहे. मराठी भाषांतर झालेल्या प्रणाल्या अगदीच नगण्य आहेत. असे का व्हावे?

मराठी साहित्य, भाषेतील तज्ञ आपल्याकडे इतरांपेक्षा अधिक गुणवान असुनही असे का?
मराठी लोकांना एकत्र येऊन काम करता येत नाही हे असे म्हटले जाते हे त्यामागचे कारण आहे का (आठवा कुप्रसिद्ध खेकडा सिंड्रोम)?
मराठी माणुस तत्वाच्या खूप मागे लागून वाद घालत बसतो म्हणुन भरीव असे काहीच साध्य होत नाही का?
मायक्रोसॉफ्टच्या भाषा प्रोजेक्टमधे एकही मराठी माणुस का नाही?
ओपन ऑफीसचे मराठी भाषांतर बंगलोर येथे का झाले?

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

2 Mar 2009 - 9:29 am | विंजिनेर

तुझी कळकळ समजण्या सारखी आहे.
पण तुला संगणक प्रणालीचे मराठीकरण करायची/झालेले बघायची इच्छा असेल तर प्रथम हे वाच.
मोफत नाव नोंदणी करून तुलाही यथा शक्ती काम करता येणे सहज शक्य आहे.
(नुसते काथ्या कुटण्यापेक्षा हे किंचित बरे नव्हे का? ;))

दशानन's picture

2 Mar 2009 - 9:31 am | दशानन

http://www.lokayat.com

येथे देखील भाषातंराचे काम चालू आहे व पुर्णतः मराठी संकेतस्थळ आहे, आपल्याच मित्राचे.

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

अमृतांजन's picture

2 Mar 2009 - 9:42 am | अमृतांजन

विंजीनेर साहेब,
स. न. वि. वि.

अहो, काथ्या कुटायला खल + बत्ता घेउन आलोच नसतो तर तुम्ही दिलेली माहिती बत्त्यात आली असती का? :-)
असो, धन्यवाद. माझी मराठी व्याकरणाची जाण फार काही चांगली नाही त्यामुळे सहभाग घेता येईल की नाही हे माहित नाही. पण तिथे काय आणि कसे काम चालते हे पाहतो आता.