गेले काही दिवस मिपावर या विषयावर चर्चा होत आहे.
विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!
पुराणातल्या विमान शास्र वैगेरे वांग्याच चमचमीत भरीत !
डोंगरे सर तुम्हाला भेटायचं होतं! (Tribute to Dr. N. G. Dongare, who unearthed the roots of Physics in ancient Indian texts )
पण वरच्या चर्चातुन फारसे काही निष्पन्न होताना दिसत नाही - याचे कारण प्रश्न विचारताना आणि उत्तरे देताना आपण नीट काळजी घेत नाही. कुठलीही गोष्ट जाणून घ्यायची असली तर एक सिरियसनेस पाहिजे आणि कष्ट घेण्याची तयारी पाहिजे. उगाच हवेत प्रश्न विचारून आणि हातवारे करून उत्तरे देण्यात काही हशील नाही.
या विषयासंबंधी प्रश्न असणारे लोक या धाग्यावर मुद्देसूद प्रश्न विचारू शकता.
प्रश्न विचारताना आणि उत्तरे देताना घ्यायची काळजी -
१. एका प्रतिसादात एकच प्रश्न विचारावा. भरमसाठ प्रश्नाची जंत्री नको. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारावेत, सब्जेक्टिव्ह (ज्याची नेमकी उत्तरे देता येणार नाहीत) असे प्रश्न विचारू नयेत. Subjective information or writing is based on personal opinions, interpretations, points of view, emotions and judgment. Objective information or analysis is fact-based, measurable and observable.
२. उत्तरे देताना संदर्भासहित लिहावे. कोणतेही ब्रॉड स्टेटमेंट करू नये, जेवढे माहितीये तेवढेच सांगावे.
टीप - इतिहास या विषयात रस असणाऱ्यांना खालच्या वेबसाईट आवडतील.
https://www.reddit.com/r/AskHistorians/
https://history.stackexchange.com/
https://skeptics.stackexchange.com/
प्रतिक्रिया
22 Aug 2017 - 7:28 am | अत्रे
प्रश्न - कुतुब मिनारचा लोहस्तंभ न गंजता कसा राहतो? (मूळ चर्चा इथे आहे)
उत्तर -
संदर्भ - On the Corrosion Resistance of the Delhi Iron Pillar, R. Balasubramaniam, Corrosion Science, Volume 42 (2000) pp. 2103–2129. "Corrosion Science" is a publication specialized in corrosion science and engineering.
http://home.iitk.ac.in/~bala/journalpaper/journal/journalpaper_17.pdf
23 Aug 2017 - 2:23 pm | sagarpdy
वूट्झ स्टील हे भारतीय उपखंडात काही विशिष्ट तांत्रिक पद्धतीने बनवले जाई. प्रसिद्ध दमास्कस तलवारी बनवण्यासाठी त्याचा उपयोग होत असे. या तलवारी अत्त्युच्च (कालानुरूप) दर्जाच्या असत {blades were reputed to be tough, resistant to shattering and capable of being honed to a sharp, resilient edge}.
यामागील मुख्य विज्ञान स्टील मध्ये लोहाबरोबर असलेल्या हलक्या प्रमाणातील टंगस्टन सारख्या इम्प्युरिटीस व कार्बन नॅनोट्यूब्स यात लपले आहे. पण हि माहिती कारागिरांना / तत्कालीन पंडितांना माहित असावी असे वाटत नाही. ठराविक लोहखनिजाचे खाण व बनवण्याची खास पद्धत (अनेक वर्ष निरीक्षणांती विकसित केलेली) एवढेच यातील सत्य असावे असे वाटते.
मधील काळात हे तंत्रज्ञान / पद्धत लोप पावले (इ स १७०० च्या सुमारास). आज परीक्षण करून तश्याच पद्धतीचे स्टील बनवण्याचे प्रयत्न झाले पण हुबेहूब तेच तंत्रज्ञान शोधता आलेले नाही. (वेगळ्या तंत्राने अधिक चांगली ब्लेड बनवली जाऊ शकतात)
अशा प्रकारे मागील मूळ विज्ञान माहित नसताना देखील उत्तम तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे.
[गेम ऑफ थ्रोन्स मधील व्हिलेरिअन स्टील ची कथा यावरच बेतली असावी]
23 Aug 2017 - 2:46 pm | अत्रे
रोचक. दमास्कस स्टील आणि वूट्झ स्टील सेमच आहे का?
23 Aug 2017 - 5:38 pm | sagarpdy
काही छोटे फरक असावेत, पण बऱ्याचदा समानार्थी वापरलेले पाहिलेत.
22 Aug 2017 - 7:32 am | अत्रे
प्रश्न - वेद जे अपौरुषेय म्हटले जातात ते कशा स्वरुपात आणि कुठे मिळाले ? (मूळ चर्चा )
नेपाळमध्ये सापडलेल्या अकराव्या शतकातल्या मॅन्यूस्क्रिप्ट्स या सगळ्यात जुन्या मानल्या जातात.
संदर्भ - Due to the ephemeral nature of the manuscript material (birch bark or palm leaves), surviving manuscripts rarely surpass an age of a few hundred years.[41] The Sampurnanand Sanskrit University has a Rigveda manuscript from the 14th century;[42] however, there are a number of older Veda manuscripts in Nepal that are dated from the 11th century onwards.[43]
22 Aug 2017 - 7:39 am | अत्रे
प्रश्न - होयसळेशवर मंदिरातले खांब कसे तयार केले?
उत्तर -
लाकडी लेथ चा वापर करून. अधिक डिटेलसाठी खालच्या प्रश्नावरील उत्तर वाचा.
संदर्भ - https://skeptics.stackexchange.com/questions/39235/was-hoysaleswara-temp...
25 Aug 2017 - 5:20 am | ट्रेड मार्क
लाकडी (?) लेथ वापरून मंदिरातले खांब बनवले. तुमच्या प्रतिसादातल्या लिंक मधेच एक आर्टिकल आहे त्यात म्हणलंय, "खांबांवरचे वर्तुळाकृती मार्क्स बघून लेथ वापरून बनवले असे वाटत आहे. पण १२ फुटाचे दगडी खांब काही शे वर्षांपूर्वी कसे केले असतील याचे उत्तर सापडत नाही. आत्ताच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे आपण असे वर्तुळाकृती मार्क्स करू शकतो तरीसुद्धा एवढे मोठे खांब इतक्या संख्येत आणि इतक्या पर्फेक्शनने तयार करणे शक्य नाही.". या गोष्टीकडे तुमचे लक्ष गेले नसावे असे समजतो.
त्यावेळेला १२ फुटी दगड कोरून काढेल असं लेथ मशीन बनवलं होतं? मग हे लोक्स अभियांत्रिकीत मध्ये पण सरस होते का?
26 Aug 2017 - 12:37 pm | अत्रे
"पण १२ फुटाचे दगडी खांब काही शे वर्षांपूर्वी कसे केले असतील याचे उत्तर सापडत नाही"
ती लिंक नीट वाचा. मंदिर "सोपस्टोन" (मराठी नाव माहित नाही) वापरून बनवले आहे. हा मऊ दगड लाकूडकाम करण्यासाठी असलेल्या लेथ ने बनवला जाऊ शकतो.
लेथ चे तंत्रज्ञान इजिप्शिअन लोकांकडे इ. स. पूर्व २००० मध्येच होते. अकराव्या शतकात होयसळ साम्राज्यामध्ये ती टेक्नॉलॉजी ज्ञात असली तर आश्चर्य नाही.
26 Aug 2017 - 12:48 pm | अत्रे
टायपिंग मिस्टेक झालेली आहे.
असे वाचावे.
26 Aug 2017 - 11:40 am | एक सामान्य मानव
या लेथची काही डिझाइन्स उपलब्ध आहेत कि हा फक्त एक तर्क आहे? हे लेथ कोणती उर्जा वापरत असत? मला वाटते त्या काळात फक्त मानव व पाळीव प्राणी हेच यान्त्रिक उर्जेचे स्त्रोत होते. दगड कोरण्यास लागणारी टूल कशी बनवली ? ह्या वस्तुचा अजुन काही उपयोग होता का?
26 Aug 2017 - 12:46 pm | अत्रे
बरोबर. मनुष्य ऊर्जेचा वापर करूनच विजेचा शोध लागायच्या आधी लेथ वापरत असत.
पहा - https://en.wikipedia.org/wiki/Lathe#History
हा दगड मऊ असल्यामुळे (मूळ उत्तरात दिलेली संदर्भाची लिंक पहा) त्यावर काम करणे सोपे गेले असावे.
जगभरातल्या प्राचीन लेथची बरीच डिझाइन्स उपलब्ध आहेत.
यावरून (आणि इतर काही पुराव्यावरून - जसे की होयसळ राज्याचे अकराव्या शतकात जगाशी असलेले व्यापारी संबंध) असा तर्क केला आहे की त्यांच्याकडे पण हे तंत्रज्ञान असावे. होयसळ राज्यात कोणते लेथ वापरले आहे त्याची डिझाईन मला सापडली नाही. कोणाला माहित असल्यास कृपया संदर्भ द्यावा. धन्यवाद.
27 Aug 2017 - 9:38 am | अनिरुद्ध.वैद्य
.
22 Aug 2017 - 8:41 am | अत्रे
प्रश्न - एलोरातल्या कैलास मंदिराचे बांधकाम कसे झाले?
उत्तर - यासंबंधी मिळालेली माहिती.
The Kailasa Temple is notable for its vertical excavation—carvers started at the top of the original rock and excavated downward.
ही वेबसाईट छान आहे, मूळ लेखन Takeo Kamiya एक जपानी आर्किटेक्ट आहेत आणि या विषयावर संशोधन करतात. त्यांचे यावर जपानी भाषेत एक पुस्तक आहे ज्याचे भाषांतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर दिलेले आहे.
टीप - या जपानी लेखकाने वेबसाईटवर संदर्भ दिलेले नाहीत म्हणून अजून डिटेलमध्य उत्तर कुठून मिळाले तर बरे होईल.
अजून -
http://www.greatbuildings.com/buildings/kailasa_temple.html यात अजून काही पुस्तकांची लिस्ट दिलेली आहेत. ती कोणाकडे असतील तर कृपया त्यातली माहिती इथे द्यावी. धन्यवाद.
22 Aug 2017 - 10:01 am | अमरेंद्र बाहुबली
प्रश्न ~ ग्रहणाचा आणी स्त्री गर्भाचा काही संबंध आहे का?
म्हणजे ग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर येणारी किरणे स्त्री गर्भावर काही परिणाम करतात का??
22 Aug 2017 - 10:28 am | अत्रे
प्रश्न- ग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर येणारी किरणे मनुष्य गर्भावर काही परिणाम करतात का?
उत्तर - इतर नॉर्मल वेळी सूर्यकिरणांचा जितका परिणाम होतो तितकाच.
संदर्भ - https://en.wikipedia.org/wiki/Health_effects_of_sunlight_exposure
सूर्य वेगवेळ्या frequency चे तरंग (रेडिएशन) वातावरणात प्रक्षेपित करतो. यातले अल्ट्रा-व्हायोलेट किरण मानवावर चांगला आणि वाईट परिणाम करू शकतात.
जास्त किंवा अगदी थोड्या वेळाकरता सूर्याकडे पाहिल्यास डोळ्यांना वेगवेगळ्या व्याधी होऊ शकतात.
आता वळूया सूर्यग्रहणा कडे -
सूर्य ग्रहण म्हणजे पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येणे. पावसाळ्यात काळ्या ढगांमुळे जसा सूर्य दिसत नाही, त्याच प्रकारे, थोड्या वेळासाठी सूर्य हा चंद्राने झाकोळला जातो. (सूर्य पूर्ण झाकोळला गेला तर त्याला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात).
थोडक्यात - सूर्याकडून पृथ्वीवर येणारे किरण काही प्रमाणात चंद्रामुळे अडतात. पृथ्वीवर नेहमीपेक्षा कोणतेही जास्त सूर्यकिरण येत नाहीत, नेहमीपेक्षा कमीच येतात.
म्हणून मनुष्य गर्भावर सूर्यग्रहणाचा नेहमीपेक्षा वेगळा वाईट/चांगला परिणाम होत नाही.
23 Aug 2017 - 11:32 pm | ट्रेड मार्क
अत्रे साहेबांचा विकिपीडियावर फारच विश्वास दिसतोय.
24 Aug 2017 - 4:47 am | अत्रे
विकिपीडियाचे संदर्भ सापडायला सोपे असतात आणि सर्वजण क्रॉसचेक करू शकतात (आणि त्यातसुद्धा ९९% वेळा वाक्यांचा संदर्भ दिलेला असतो). ऑब्व्हियसली विकीमध्ये सुद्धा चुका असू शकतात - त्या संदर्भासहित दाखवल्या तर उत्तमच!
अजून एक एका प्रश्नासाठी मी विकी सोडून इतर ही संदर्भ दिलेले आहेत.
22 Aug 2017 - 10:37 am | अत्रे
हा प्रश्न वाचून मला पडलेला प्रश्न- सूर्य ग्रहणामुळे मनुष्य गर्भावर वाईट परिणाम होतो हा समज कोणत्या कालखंडात सर्वप्रथम दृढ झाला? फक्त भारतात असे समजले जात होते की जगात इतरत्र असे समज पसरले होते? मुख्य म्हणजे त्या काळात हा समज निर्माण होण्याचे कारण काय?
24 Aug 2017 - 7:29 pm | अत्रे
याची आतापर्यंत सापडलेली उत्तरे -
फक्त भारतात असे समजले जात होते की जगात इतरत्र असे समज पसरले होते?
प्राचीन भारतीय आणि ऍझटेक लोकांमध्ये चंद्र ग्रहणाच्या वेळी राहू राक्षस हा चंद्राचा काही भाग खातो (ऍझटेक लोकांना वाटायचे की कोणीतरी चंद्र खातो - त्यांच्याकडे राहू ही कन्सेप्ट नसावी) ( लिंक ) त्या काळी (नेमका कोणता काळ हे सांगता येणार नाही - संदर्भ सापडले नाहीत) असे समजायचे की या वेळी स्त्री-पुरुष शारीरिक संबंध आला तर होणाऱ्या बाळामध्ये बर्थ डिफेक्ट (उदा. क्लेफ्ट लीप) येईल - म्हणजे राहू बाळाचे ओठ खाईल वगैरे वगैरे.
गर्भ उपनिषद (काळ माहिती नाही - अगदी अलीकडे १५व्या शतकापर्यंत असू शकतो) यामध्ये असे लिहिले आहे की (From impregnation) during the eclipses of the sun and the moon, children are born with defective limbs त्यात राहू - चे लॉजिक दिलेले नाही. आणखी एक म्हणजे गर्भउपनिषद मध्ये गर्भवती स्त्री किंवा तिचा गर्भ यांसाठी ग्रहण काळ वाईट असतो असे म्हटलेले नाही.
नन्तरच्या काळात या प्रथेमागचे "विज्ञान" शोधणाऱ्या लोकांनी खालची कारणे शोधून काढली असे दिसते. मूळ राहूचे कारण लोकांना बालिश वाटेल म्हणून ही कारणे शोधली असावी असा संभव आहे.
१. ग्रहण काळात नेहमीपेक्षा जास्त अल्ट्रा - व्हायोलेट किरणे सूर्यातून निघतात
२. ग्रहण काळात बॅक्टरीया नेहमीपेक्षा जास्त वेगाने वाढतात आणि या काळात जखम झाली तर लवकर भरून येत नाही.
23 Aug 2017 - 7:50 pm | मामाजी
प्राचिन भारतातले सर्व ज्ञान विज्ञान इस्लामी आक्रमणाला तोंड देत देत सुद्धा सन 1800 ते 1825 पर्यंत संपूर्ण जगात आपले श्रेष्ठत्व टिकवून होते. सुलतानाने दिलेल्या शिक्षेत नाक व कान कापले गेलेले युद्धबंदी प्लास्टीक सर्जरी (या विषयावर मोदींची खील्ली उडवली होती) द्वारा परत नवीन व आपल्या आवडीनुसार बसवून घेत. भारतातील कृषी विज्ञान हे अव्वल दर्जाचे होते आणि हो हे सर्व भारतात पोस्टींग असणार्या ब्रिटीश अधिकार्यानी तारीखवार नोंदणी करून ठेवलेल आहे. विस्तृत माहितीसाठी खाली लिंक दिलेली आहे.
https://1drv.ms/b/s!AuFt4YPB-CeYhVkhoRtWHejBwMrP
24 Aug 2017 - 4:43 am | अत्रे
कृपया या धाग्याचे स्वरूप समजून घेऊन प्रतिसाद टाकावेत. प्रश्न-उत्तरे असे या घोड्याचे स्वरूप आहे. संपादक मंडळाला सांगून आपला प्रतिसाद डिलीट करून घेतला तर बरे होईल. आपल्याला एखादा प्रश्न असल्यास त्याचे स्वागतच आहे! धन्यवाद.
24 Aug 2017 - 4:44 am | अत्रे
धाग्याचे*
23 Aug 2017 - 9:28 pm | डँबिस००७
१) जगातील मेटलर्जीच्या विकासात प्राचिन भारताचा किती हातभार लागलेला होता ?
२) कोणत्या धातुच्या शोधाच श्रेय विदेशी शास्रज्ञांना दिल जात, जे धातु प्राचिन काळापासुन भारतात शुद्ध करुन वापरले जातात ?
३)आचार्य शुश्रुत यांना प्लॅस्टिक सर्जरीच जनक (भारतातच) समजल जात !! ह्या आचार्य शुश्रुत यांनी निर्माण केलेल्या १५० शस्त्रक्रिया आयुधांच्या संख्येत आजच्या आधुनिक विज्ञानाने किती भर घातली ?
24 Aug 2017 - 4:41 am | अत्रे
कृपया एका प्रतिसादात एकच प्रश्न विचारावा. आपला प्रतिसाद डिलीट करावा किंवा नवीन टाकावा.
24 Aug 2017 - 6:05 am | अत्रे
तुमचा पहीला प्रश्न खूप ब्रॉड आहे आणि त्याला ऑब्जेक्टिव्ह असे म्हणता येणार नाही. प्रश्न अजून स्पेसिफिक प्रश्न करता आला तर उत्तम.
दुसरा प्रश्न चांगला आहे, उत्तर शोधायचा प्रयत्न करतो.
तिसरा प्रश्न नीट कळाला नाही. हे 150 आयुध कोणते? त्यांची माहिती आपल्याला जिथून मिळाली तो संदर्भ द्यावा. धन्यवाद.
24 Aug 2017 - 5:07 pm | arunjoshi123
ईस्टर आयलँड (पॅसिफिक ओशन, चिलिच्या बाजूला) आणि सिंधु संस्कृतींची लिपी एकसमान आहे. काय संबंध? एकतर दोन्ही जागा आर्केऑलॉजिस्ट्स डिलाइट आहेत त्यात वर ही भर.
24 Aug 2017 - 5:16 pm | मामाजी
प्र.1 प्राचिन भारतातले सर्व ज्ञान विज्ञान इस्लामी आक्रमणाला तोंड देत देत सुद्धा सन 1800 ते 1825 पर्यंत संपूर्ण जगात आपले श्रेष्ठत्व टिकवून होते का?
ऊ. होते.*
प्र.२ सुलतानाने दिलेल्या शिक्षेत नाक व कान कापले गेलेले युद्धबंदी प्लास्टीक सर्जरी (या विषयावर मोदींची खील्ली उडवली होती) द्वारा परत नवीन व आपल्या आवडीनुसार बसवून घेत होते का?
ऊ. होते. *
प्र.३. भारतातील कृषी विज्ञान हे अव्वल दर्जाचे होते का?
ऊ. होते. *
*विस्तृत माहितीसाठी खाली लिंक दिलेली आहे.
https://1drv.ms/b/s!AuFt4YPB-CeYhVkhoRtWHejBwMrP
24 Aug 2017 - 5:37 pm | अमितदादा
अत्रे साहेब उत्तम आणि माहितीपूर्ण धागा. अनेक नवीन आणि रोचक माहिती मिळतेय. नवीन माहिती वाचाय मिळाली तर भर घालेन.
@sagarpdy
अगदी योग्य बोललात, बऱ्याच प्राचीन गोष्टी बाबत हे सत्य आहे. Observation आणि intuition ह्या गोष्टी माणसाने प्राचीन काळापासून वापरल्या आहेत, त्यातून अनेक चांगल्या गोष्टीचा उगम झाला आहे.
अत्रे साहेब काही खोडखर प्रतिसादांना उत्तर देऊ नका हि विनंती, ज्याणेंकरून ह्या धाग्याची quality उत्तम राहील.
24 Aug 2017 - 5:59 pm | विशुमित
अत्रे साहेब उत्तम आणि माहितीपूर्ण धागा. अनेक नवीन आणि रोचक माहिती मिळतेय
==>> +१
अत्रे जी धन्यवाद..!!
24 Aug 2017 - 6:04 pm | एस
चांगला धागा आहे. मला वाटले मारामारी असेल की काय नेहमीसारखीच. :-P
25 Aug 2017 - 5:41 am | ट्रेड मार्क
दुर्बिणी वगैरे प्रकार आपल्याला माहित नव्हते म्हणताय. तर मग ग्रहताऱ्यांची, नक्षत्रांची आणि आकाशगंगांची एवढी अचूक माहिती आपल्या पूर्वजांनी कशी काय आत्मसात केली? ५०० AD मध्ये आर्यभट्टाने गणिती सिद्धांत मांडला -
In 500 AD, Aryabhata presented a mathematical system that took the earth to spin on its axis and considered the motions of the planets with respect to the sun (in other words it was heliocentric). His book, the Aryabhatya, presented astronomical and mathematical theories in which the Earth was taken to be spinning on its axis and the periods of the planets were given with respect to the sun.
Aryabhata wrote that 1,582,237,500 rotations of the Earth equal 57,753,336 lunar orbits. This is an extremely accurate ratio of a fundamental astronomical ratio (1,582,237,500/57,753,336 = 27.3964693572), and is perhaps the oldest astronomical constant calculated to such accuracy. Aryabhatiya suggested that the Earth was sphere, containing a circumference of 24,835 miles (39,967 km).[21] Aryabhata also mentioned that reflected sunlight is the cause behind the shining of the moon. अधिक माहिती येथे मिळेल.
आता यातला काय काय अंदाजपंचे होतं ते सांगा. अजूनही २०१७ सालात पृथ्वी सपाट आहे असं मानणारे समुदाय आहेत. आणि आपल्या पूर्वजांना १५०० वर्षांपूर्वी माहित होतं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते तसेच सूर्य केंद्रबिंदू मानून आपली ग्रहमालीका सूर्याभोवती सुद्धा फिरते.
आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कर आणि इतरांनी हे सगळे शोध कसे लावले असतील? सगळ्यांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेले पुराणातील विमान नव्हतंच.इतकंच काय इतर वाहनं सुद्धा नव्हती. दुर्बिणी, भिंग वगैरे प्रकार या लोकांना ज्ञात नव्हते. आर्यभट्टाच्या "तर्का"प्रमाणे पृथ्वीचा परीघ 24,835 miles आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने मोजलेला परीघ 24,901 miles आहे. फक्त ६६ मैलाचा फरक आहे म्हणजे आर्यभट्ट अव्वल दर्जाचा तर्कतीर्थ म्हणला पाहिजे.
तर साधा सरळ प्रश्न - हे आर्यभट्टाने कसं केलं?
25 Aug 2017 - 5:53 am | ट्रेड मार्क
मंदिरं, लेणी ई डोळ्यासमोर दिसतंय. खगोलशास्त्रातील प्रगती विकिपीडियाने सिद्ध केली आहे.
तर मुद्दा असा - आत्ताच्या अतिप्रगत विज्ञानाने हे सिद्ध झालंय की ही मॉन्यूमेंट्स काही शे वर्षे तरी जुनी आहेत. मग यात तुम्हाला काही गडबड वाटत नाही? एकीकडे आपण म्हणतो की वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती गेल्या १००-१२५ वर्षांत झाली. त्याआधी मानव फारसा प्रगत नव्हता. काही शे वर्षांपूर्वी तर विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे काय हेच माहित नव्हतं. ज्या काही गोष्टी त्यांनी केल्या त्या फक्त निरीक्षणातून आणि प्रयोग करत रहात "जमवल्या", पण त्यांना ते का आणि कसं हे मात्र कळत नव्हतं.
एका पाषाणातून वरपासून कोरून एक प्रचंड लेणी/ मंदिर उभे करणे, त्यात विविध मुर्त्या,बारीक कलाकुसर आणि नक्षी करणे जी काही शे वर्षांनीसुद्धा सुस्थितीत आहे. यासाठी दगड सलग किती मोठा आहे, त्याची क्वालिटी कुठे कमी जास्त आहे, लेणं कसं असावं याचा आराखडा तयार करणे, त्याप्रमाणे सर्व कारागिरांना कामाला लावणे, त्यात कोणीही चूक न करणे किंवा केली तरी बेमालूम सुधारता येणे, एवढ्या कठीण दगडात सगळी सारखी नक्षी आणि छोट्या मुर्त्या कोरणे. अगदी जिथे दोन दगड जोडलेत, तिथे सुद्धा परफेक्शन आहे की फटी सापडत नाहीत. म्हणजेच ते इतक्या प्रिसिजनने कापलेत वा तासलेत की दोन दगड एकमेकांवर परफेक्ट बसतील. पण मग ते एकमेकाला जोडले कसे असतील? इथे २०१७ मध्ये बांधलेल्या आपल्या घरातल्या टाईल्स सुद्धा एका लेव्हलला बसवलेल्या नसतात.
हे सर्व अंदाजपंचे आणि फक्त निरीक्षण करून आणि प्रयोग करत रहात करता आलं असेल?
आतापर्यंत आपण पूर्वज कशाकशात सरस होते हे मान्य केलंय?
१. धातुशास्त्र
२. रसायनशास्त्र
३. स्थापत्यशास्त्र (यात बांधकाम, शिल्पकाम वगैरे सगळंच आलं)
४. अभियांत्रिकी - कारण यातल्या काही गोष्टी आपल्या आत्ता करणे सुद्धा अवघड आहे
५. खगोलशास्त्र
बाकी जशी चर्चा पुढे जाईल तसे या यादीत वाढ होऊ शकते.
25 Aug 2017 - 9:26 am | अमितदादा
मुळात एक Q/A करून गोष्टी स्पष्ट करू इच्छितो
१. आपल्या सगळ्या प्राचीन गोष्टी थोथांड होत्या का? त्यात काही विज्ञान न्हवत का ?
उत्तर : अजिबात नाही, अनेक प्राचीन गोष्टी मागे वैज्ञानिक पार्श्वभूमी होती हे सिद्ध झालं आहे, प्राचीन काळी खगोलशास्त्र गणित यामध्ये भारतीय लोकांनी/वैज्ञानिकांनी मोलाची भर घातली आहे भारतीयांनी नाही तर जगाने मान्य केलं आहे. अनेक उदाहरणे देता येतील, यातील आर्यभट आणि भास्कर यांचं उदाहरण ट्रेडमार्क यांनी दिलंच आहे, जालावर आणखी उदाहरणे सापडतील . भारतातील किंवा जगभरातील अतिउच्च प्राचीन स्थापत्यकलेत त्या काळच्या लोकांचं उच्च दर्जाचे स्किल दिसून येत.
पण एक लक्षात घ्या काही लोक दावा करत असलेल्या अनेक गोष्टी खोट्या आहेत. पुष्पक विमान, जेनेटिक विज्ञान, अतिप्रगत प्लास्टिक सर्जरी इत्यादी इत्यादी. म्हणजे थोडक्यात काय खऱ्या गोष्टीमागून खोट्या गोष्टी खपवायच्या चालेत.
२. मग सगळ्याच सिद्ध झालेल्या प्राचीन/जुन्या गोष्टीमागे समजून उमजून घेतलेलं विज्ञान होत का?
उत्तर: असं वाटत नाही अनेक गोष्टी आपण अनुभवातून आणि निरीक्षणातून शिकू शकतो. उदारणार्थ न गंजणारे लोखंडामागे त्यातील फॉस्फरस (आणि बहुतेक कार्बन नॅनोट्यूब ) सारखे घटक कारणीभूत आहेत हे आपण वाचल, ह्या गोष्टी पाहायला microscope ची गरज आहे, जे जुन्या काळी न्हवत (निदान तसे पुरावे नाहीत ), त्यामुळे ह्या गोष्टी वर्षानुवर्षांच्या निरीक्षणातून घडल्याचे कळून येते. आणि तसेही निरीक्षण करून गोष्टी करणे (भलेही त्यामागची कारणे माहित नसोत) हा हि विज्ञानाचा एक छोटा भाग आहे.
३.मग प्राचीन उपयुक्त गोष्टीकडे आपण कसे पाहिले पाहिजे ?
जुन्या /प्राचीन गोष्टी आपण विज्ञानाच्या कसोटीवर तोलून मापून पहिल्या पाहिजेत, आणि सिद्ध होण्याऱ्या जुन्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत त्याचवेळी अयोग्य गोष्टी फेटाळून लावल्या पाहिजेत. जुन्या गोष्टीबाबत संशोधनास नक्कीच वाव आहे.
४. जर प्राचीन काळी निरीक्षण करण्यासाठी उपकरणे न्हवती तर शोध कसे लागले ?
उत्तर : अहो इथे तर कमाल आहे विज्ञानाच्या भाषेची त्याच नाव गणित. विज्ञानातील अनेक गोष्टी ह्या गणित आणि निरीक्षण यावर स्पष्ट झालेल्या आहेत, अनेक अनेक उदाहरणे देता येतील ज्या गोष्टी विद्वानांनी एका पेपर वर गणिताने सिद्ध केल्यात आणि अनेक वर्षांनी त्या गोष्टी experiment करून सिद्ध झालेत. उदाहरण म्हणून theory of relativity, गॉड्स पार्टीकल असे घेता येतील. प्राचीन काळातील गोष्टींना सुद्धा हे लागू पडत.
@ट्रेडमार्क
तुम्ही तुमच्याच दिलेल्या दुव्यातील पाहिलं वाक्य वाचलंय का ? हे पहा
मला असे वाटते कि डोळ्याने दिसणाऱ्या सूर्य तारे ग्रह याबाबत अनेक खगोलशास्त्रीय शोध हे दुर्बीण नसताना लागेलेले आहेत, जालावर शोधू शकता किंवा एखाद्या खगोलशास्त्राचा विद्यार्थ्यास विचारू शकता (मिपावर आहेत अनेक जण).
आकाशगंगांची आपल्या पूर्वजांना माहिती होती याचा दुवा द्या ?
उत्तर ४ पहा. मला वाटत यांनी गणित, साधी उपकरण आणि निरीक्षण याचा जोरावर हे केलं असाव (हे माझं मत आहे)
कसली गडबड, हे त्या काळच्या लोकांचं उच्च स्किल आणि गणिती दृष्टी यांचं प्रतीक आहे. हे काय लेथ मशीन, कटर यांचं काम न्हवे कारण त्यावेळी ह्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या. एक लक्षात घ्या ह्या गोष्टी रातोरात उभ्या नाही राहिल्या, किती हि वेळ लागो लोक लागो काम परफेक्ट करणे हे त्यांचं ध्येय होत. अलीकडंच उदाहरण म्हणून ताजमहाल पाहता येईल. ताजमहाल सुद्धा उत्तम कलाकृती आहे. म्हणून आपण म्हणायचं का कि हा वैज्ञानिकांनी बांधला आहे किंवा शहाजहान वैज्ञानिक होता ?
वरती अत्रेंनी कोणत्यातरी लेणी कि मंदिराबाबत जपानी शास्त्रज्ञांचं संशोधन मांडलं आहे ते वाचा
सर्व गोष्टी नाहीत, काही गोष्ट विज्ञान आहेत काही थोथांड आहेत. तसेच काही गोष्टी मागे वैज्ञानिक थेअरी आहेत तर काही गोष्टी फक्त निरीक्षणाच्या जोरावर आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तोलून मापून accept केली पाहिजे.
आतापुरत इतकंच. माझं मत पटत नसल्यास काही हरकत नाही.
26 Aug 2017 - 4:06 am | ट्रेड मार्क
जुन्या /प्राचीन गोष्टी आपण विज्ञानाच्या कसोटीवर तोलून मापून पहिल्या पाहिजेत
विज्ञानाच्या कसोटीवर म्हणजे फक्त आत्ता माहित असलेल्या थिअरीज आणि उपकरणे वापरून त्यावेळच्या गोष्टी सिद्ध करणे? फक्त निरीक्षणाने आणि प्रयोग करत करत खाणीतून आयर्न ओर काढून त्यापासून साधं लोखंड कसं बनवायचं याची कृती आणि मग तिथून पुढे त्यात फॉस्फरसचे प्रमाण किती असले म्हणजे ते गंजरोधक होते हे सगळं शोधून काढलं!
आकाशात दिसणाऱ्या ग्रहताऱ्यांचे साध्या डोळ्यांनी फक्त निरीक्षण करून त्यांच्याविषयी एवढी माहिती गोळा केली असेल? शहराच्या बाहेर, जिथे दिव्यांचा प्रकाश नसतो, अश्या ठिकाणी गेल्यावर आकाशात तारकांचा खच दिसतो. त्यातले आपल्या सूर्यमालेतले ग्रह कोणते, नक्षत्र कोणते, सूर्याभोवती आपण फिरतो हे सर्व कसं शोधून काढलं असेल? २७ नक्षत्रांची माहिती ज्योतिष शास्त्रात खूप आधीपासून वापरली जाते. विज्ञानाच्या दृष्टीने ज्योतिष थोतांड आहे म्हणतात पण ग्रह आणि नक्षत्र तर खरे आहेतच. आता ज्या काळात प्रवासाची साधनं लिमिटेड होती त्या काळात पृथ्वी गोल आहे हे सांगायला आणि तिचा परीघ एवढा अचूक सांगायला निरीक्षणाची कुठली पद्धत वापरली असेल?
कसली गडबड, हे त्या काळच्या लोकांचं उच्च स्किल आणि गणिती दृष्टी यांचं प्रतीक आहे.
आता यात गडबड अशी आहे की काही शे वर्षांपूर्वी फक्त निरीक्षणातून एवढं सगळं करून दाखवणारे आणि न गंजणारे लोखंड बनवू शकणारे आपले पूर्वज होते आणि आता आपण म्हणतो साधा लोखंडी नांगराचा फाळ बनवायला विसावं शतक उजाडायला लागलं? १५००-२००० वर्षांपूर्वी जे निरीक्षणाने आणि प्रयोग करत करत साध्य केलं होतं तेच आता आपण १०० वर्षांपूर्वी केलं हे विचित्र आहे.
पुराणातल्या वैद्यकीय ज्ञानाबद्दल बोलायचं तर सुश्रुत आणि शालिहोत्र यांच्याबद्दल वाचा.
शहाजहान वैज्ञानिक होता?
शहाजहानने फक्त पैसे पुरवले, आराखडा करणारे आणि बांधणारे वेगळेच होते... ज्या बिचाऱ्यांचे हात तोडण्यात आले. पण तो विषय वेगळा.
तर, सध्या आपण जे आपल्याला ज्ञात आहे किंवा जे सध्या माहित असलेल्या विज्ञानाने साध्य होतंय तेवढंच मानतोय. म्हणजे जमिनीवरून वाहतुकीसाठी इंधनावर चालणाऱ्या गाड्या, हवेतून जाण्यासाठी इंधनावर चालणारे विमान हेच आपण सत्य मानतोय. यापलीकडे पण प्रवासाची साधनं असतील का? टेलिपोर्टेशन चा उल्लेख आला आहेच आणि त्याची चेष्टाही करून झाली आहे. पण पुढच्या १०० वर्षात ते साध्य झालं तर? मग ज्याप्रमाणे लोखंडाचं झालं त्याचप्रमाणे असं शक्य असेल का की जी गोष्ट काही शे वर्षांपूर्वी माहित होती किंवा करता येत होती तीच मधल्या काळात माहित नव्हती आणि आता आपण परत पहिल्यापासून संशोधन करून तेच साध्य करायचा प्रयत्न करतोय?
सध्या अशी एक थिअरी मांडली गेलीये की ब्लॅक होल्स ही दुसऱ्या मितीत जाणारी वोर्महोल्स असू शकतात. त्या मितीत अजून वेगळी युनिव्हर्स असू शकतात अशी शक्यता आहे. आता गम्मत बघा मल्टिव्हर्स चा उल्लेख आपल्या पुराणात बऱ्याच जागी आढळतो. कदाचित सप्तलोक म्हणल्यावर लक्षात येईल. सध्या या वोर्महोल्सचा प्रवेशद्वार म्हणून वापर करून दुसऱ्या युनिव्हर्समध्ये जाता येईल का याचा शोध चालू आहे. तुम्ही टौरेड वरून आलेल्या माणसाची गोष्ट ऐकली असेल. हा कदाचित दुसरीकडून चुकून आपल्या मितीत तर आला नसेल?
माझं मत: आपल्याला माहित नसलेल्या असंख्य गोष्टी जगात आहेत. आपण आत्ताची फूटपट्टी लावून सगळं मोजायचं म्हणलं तर बऱ्याच गोष्टी कल्पनेच्या बाहेरच्या असतील. कोणतीच गोष्ट १००% खरी किंवा खोटी आपण म्हणू शकत नाही. कारण १०० वर्षांपूर्वी हातात मावणाऱ्या एका उपकरणातून जगभरात संपर्क साधता येईल या कल्पनेलाही लोकांनी मुर्खात काढलं असतं, पण तेच आता साध्य आहे. त्यामुळे असं म्हणायला वाव आहे की कदाचित त्यावेळच्या टेकनॉलॉजीचा अजून आपल्याला शोध लागला नसेल!
अवांतर: नेटफ्लिक्स वर "White Rabbit Project" नावाची एक मालिका आहे. शक्य असल्यास बघा.
1 Sep 2017 - 6:33 pm | sagarpdy
माझ्या या प्रतिसादास उद्देशून लिहीत असल्यास पुढील उत्तर :
हा अंदाज सांगतो आहे. कारण आपल्याकडे ते माहित असल्याचा पुरावा नाही. आणि अशा प्रकारचे तंत्रज्ञान आपण विकसित केले, पण आधुनिक विज्ञानास माहित असलेल्या काही मूलभूत गोष्टींचे ज्ञान नव्हते यात काही कमीपणा आहे असे मला वाटत नाही.
आज शास्त्रज्ञ पार्टीकल physics च्या अनेक गोष्टी निरीक्षणाने जाणून आहेत. त्या मागील पूर्ण विज्ञान त्यांना माहित आहेच असे म्हणता येणार नाही. त्यासाठी स्ट्रिंग थेअरी सारख्या गोष्टी मांडून त्या सिद्ध करण्याचा ते प्रयत्न ते करत आहेत. पण ती मूलभूत गोष्ट जरी माहित नसली तरी निरीक्षणाच्या आधारे जे आण्विक कणांचे गुणधर्म समजले आहेत त्याचा आजच्या तंत्रज्ञानात वापर होतोच.
प्रतिसादाचा उद्देश एवढाच कि बनवलेल्या प्रत्येक गोष्टीचे संपूर्ण विज्ञान आपणाला माहित होतेच हा दावा करू नये. ते माहित होते असेलही, नसेलही.
25 Aug 2017 - 12:58 pm | डँबिस००७
वरती अत्रेंनी कोणत्यातरी लेणी कि मंदिराबाबत जपानी शास्त्रज्ञांचं संशोधन मांडलं आहे ते वाचा
कमाल ह्याची आहे की आपण फक्त एका जपानी शास्त्रज्ञांने संशोधन मांडे पर्यंत वाट बघायची पण एकाही भारतीय सरकारी आरकियोलॉजीकल सर्वे ऑफ ईंडीयाच्या लोकांना हे का जमल नाही अस विचारायच नाही.
ग्रह तार्यांच्या अकलना साठी जंतर मंतर सारखे ऑबझरव्हेटरीज उभारल्या मागेही शास्त्र आहे. जगातील सर्वात मोठी स न डायल जयपुरच्या जंतर मंतर मध्ये आहे. ती संपुर्ण ऑबझरव्हेटरी जयपुरच्या महाराजांनी स्वतःच्या पैश्याने व ईच्छा शक्तीने उभारलेली आहे.
शुश्रुताच्या प्लॅस्टीक सर्जरीविषयी गुगल व विकी पिडीयावर भरपुर वाचयला मिळेल !
शेवटी प्रत्येक गोष्ट तोलून मापून accept केली पाहिजे हेच तर मी पहील्या पासुन म्हणतोय !!
25 Aug 2017 - 1:17 pm | अत्रे
डँबिस००७,
कृपया धाग्याचे गांभीर्य लक्षात घ्या. हा धागा वायफळ चर्चा करण्यासाठी नसून आपले ऑब्जेक्टिव्ह प्रश्न (एका प्रतिसादात एकच, एकाच नॅरो कॅटेगरीतल्या विषयावर, शक्यतो दोन-तीन ओळीत मावतील असे) विचारण्यासाठी आणि त्यांना मुद्देसूद, संदर्भासहित उत्तरे देण्यासाठी आहे.
27 Aug 2017 - 9:21 am | हतोळकरांचा प्रसाद
वायफळ चर्चा? अत्रेसाहेब, विनंती आहे जरा सबुरीने घ्या. तुम्ही म्हणताय तशा सब्जेक्टिव्ह प्रश्न उत्तर प्रकारात काऊंटर प्रश्न विचारायची मुभा असू द्या!
27 Aug 2017 - 10:31 am | अत्रे
काउंटर प्रश्न विचाररयला ना नाही प्रसादराव. पण हे प्रश्न विचारून काय साध्य होणार आहे सांगा तुम्ही?
असे प्रश्न विचारून धाग्याला भरकटवण्याचा प्रयत्न दिसतो (असे मला वाटते). असो, इथून पुढे कोणीही जे वाटेल ते या धाग्यावर लिहावे, मी काहीच म्हटणार नाही. मला जर काही प्रश्नांची उत्तरे सापडली तर मी देईन. (फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची, सबजेक्टिव्ह नाही , कारण त्यामुळे वायफळ चर्चा होऊ शकते) फक्त एवढंच आहे की या विषयावर उत्तरे द्यायला वेळ लागतो, लगेच उत्तरे मिळत नाहीत. अरुण जोशींनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यावर त्यांच्याशी व्यनि मध्ये संपर्क केलेला आहे - चर्चा झाली की कन्क्लुझिव्ह उत्तर टाकेन.
25 Aug 2017 - 2:37 pm | डँबिस००७
<<<<~कृपया धाग्याचे गांभीर्य लक्षात घ्या. हा धागा वायफळ चर्चा करण्यासाठी नसून आपले ऑब्जेक्टिव्ह प्रश्न (एका प्रतिसादात एकच, एकाच नॅरो कॅटेगरीतल्या विषयावर, शक्यतो दोन-तीन ओळीत मावतील असे) विचारण्यासाठी आणि त्यांना मुद्देसूद, संदर्भासहित उत्तरे देण्यासाठी आहे.~>>>>>>
जर माझ्या वरच्या प्रतिसादाला वायफळ म्हणत असाल तर तुमच्या विचारलेल्या प्रश्नावर १% माहिती नसताना गुगल व विकी पिडीयाच्या आधारे प्रश्नाची ऊत्तरे देण्याच्या आव आणण्याला निव्वळ विनोदच म्हणाव लागेल.
मी विचारलेल्या ऐकाही प्रश्नाच ऊत्तर तुम्ही देऊ शकलेला नाहीत यातच सर्व काही आलय !!
हेमाशेपो !!!
26 Aug 2017 - 1:07 pm | प्रसाद_१९८२
सहमत !
6 Sep 2017 - 4:00 am | Ram ram
Aani dhaga band padla............