गोवा सफर --मंडळीबरोबर-- आणि ते पण २ व्हीलर वर..

विशुमित's picture
विशुमित in भटकंती
22 Jul 2017 - 2:48 pm

लग्नाची सुपारी फुटल्या नंतरच्या तिसऱ्याच दिवसापासून जो आमचा NXG स्प्लेंडरवर प्रवास चालू झाला तो आमची कन्यारत्न पोटात आली आहे समजल्यावरच त्याला ब्रेक लागला. (पोटात असताना ती कन्या आहे का हे तपासले नव्हते बरका मायबाप हो..!! )
आमच्या दोघांच्या जवळपास सगळ्या आवडी निवडी खूप भिन्न आहेत पण एकच आवड आता कॉमन झाली आहे ती म्हणजे २ व्हीलरवर (च) भटकंती करणे.

पहिल्या चार वर्षात सिंहगड, लोणावळा, सज्जनगड, कास, ठोसेघर, महाबळेश्वर, प्रतापगड, कोल्हापूर, जोतिबा,पन्हाळा, शिर्डी, तुळजापूर, सांगली, सोलापूर सगळं २ व्हीलर वर फिरलो. ते दिवस आठवले तर वाटतं खूप येडे होतो आम्ही. कसलीच फिकीर नव्हती. कसलं ही प्लांनिंग नव्हतं. खूप थरारक रिस्क सुद्धा घेतल्या होत्या.
पण कन्या झाल्या पासून गेली ४ वर्ष झाली गाडीवर कोठेच जाता आले नाही. लॉन्ग राईडला कुठेतरी जाऊ म्हणून मॅडम समोर प्रस्ताव ठेवला तर बाईसाहेबांनी थेट गोव्याकडेच अंगुलीनिर्देश केला.
तिला म्हंटले "तुझं सिजरीन झालंय जमेल का तुला?"
तिकडून उत्तर: "१९ जुलै २००९ आठवती ना? "
ठरलं मग जायचं गोव्याला.
अगोदर दोघे ही आयुष्याबाबत बेफिकीर होतो पण आता एका मुलीची आमच्या दोघांवरही जवाबदारी आहे म्हणून म्हंटल ह्या वेळेस थोडे नियोजन करून सुरक्षित प्रवास करू. 'मोदक' रावांना व्यक्तिगत संदेश टाकला तर ते म्हंटले धागाच काढा की. म्हंटलं चला धागा काढू सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल.

माझ्याकडून काही माहिती:
गाडी- NXG स्प्लेंडर (२००९). अजून ही सुस्थितीत आहे. टायर बदलायचेत फक्त. ७० किमी प्रति लिटर एवढं अवरेज.
प्रवासाची सुरवात आणि संपण्याचे ठिकाण: सातारा
प्रवासाचा कालावधी: ऑगस्ट च्या ३ किंवा ४ आठवड्यात. हक्काचे ६-७ दिवस आहेत .
जाताना खानापूर वरून दक्षिण गोव्यात उतरण्याचा आणि येताना उत्तर गोवा करून खारेपाटणला तिच्या मावस बहिणीच्या घरी शेवटचा मुक्काम करण्याचा मानस आहे.

तर मिपाकर मित्रमंडळी हो तुमच्या कडून खालील माहिती हवी आहे:

१) प्रवासाचं वेळापत्रक पाऊस गृहीत धरून.
२) खाण्याची ठिकाणं - एक पक्के मांसाहारी आणि दुसरे पक्के शाकाहारी (अर्थात मी)
३) मुकामाची ठिकाणं- सहसा बजेट मधील सुचवा
४) नवरा बायकोनी आवर्जून पाहावी अशी ठिकाणे
५) स्वच्छ समुद्र किनारे
६) इतर सुरक्षाविषयक माहिती.

प्रतिक्रिया

गणामास्तर's picture

22 Jul 2017 - 3:41 pm | गणामास्तर

खरं तर हा सीजन गोव्यात जाण्यासारखा नाही, असल्या पावसात समुद्र किनारे वगैरे तुम्ही एंजॉय करू शकाल का ही शंकाच आहे. तरी जे काही सुचेल ते सुचवतो.
साताऱ्यावरून लवकर निघालात की बेळगावपर्यंत पोचून मुक्काम करा.तिथून पुढे दक्षिण गोव्यात उतरेपर्यंतचा प्रवास शक्यतो संध्याकाळी वा अंधाराचा करू नका. बेळगावात बाजारपेठेमध्ये 'नियाझ' म्हणून हॉटेल आहे. तिथे मटन बिर्याणी, डबल का मिठा आणि खुबानी का मिठा हाणा. दुसऱ्या दिवशी सकाळी खानापूर मार्गे उतरून दूधसागर धबधबा पाहून पुढे जाऊ शकता. मुक्कामाला केळोशीला (cavelossim) अथवा कोळव्याला जावा. सध्या स्वस्तात बरेच चांगले ऑप्शन मिळतील. आता टाइप करायचा कंटाळा आला :)
अधिक माहितीसाठी आमचे धागे वाचा (थोडी जाहिरात करून घेतो हां ;) )
अजून काही हवे असेल तर निसंकोच फोन करा. जमेल तितकी मदत करेन. पिंची मध्ये राहत असाल तर संध्याकाळी बसून बोलूया :)

विशुमित's picture

22 Jul 2017 - 4:58 pm | विशुमित

बेबी को रेन पसंद है. संध्याकाळी ६ च्या पुढे नो प्रवास स्ट्रिक्टली.

बेळगावातील खादाडीची ठिकाणं नोटेड.

तुमचे दोन्ही धागे वाचून काढले. खूप उपयुक्त माहिती.

मी सध्या पुण्यात काम करतो पण राहत नाही. पिंचिला येणे झाले तर नक्की भेटू.

पैसा's picture

22 Jul 2017 - 4:06 pm | पैसा

खानापुराहून गोव्यात येता ते उत्तर गोव्यातच प्रवेश करता. द. गोवा अजून 50 किमी लांब आहे.

विशुमित's picture

22 Jul 2017 - 5:08 pm | विशुमित

मला सद्यस्थितीला गोव्याला कसे जायचे हे काहीच माहिती नाही. ८-९ वर्ष पूर्वी गेलो होतो पण रात्री लक्सारीत बसून.
दूध सागर बघायचा आहे, केळोशी आणि सेर्नाबती ला जायचा आहे. कृपया तो रास्ता सांगा.

पैसा's picture

22 Jul 2017 - 6:34 pm | पैसा

नंतर सांगते

मंदार कात्रे's picture

22 Jul 2017 - 5:32 pm | मंदार कात्रे

दूधसागर धबधबा या पावसाळ्यात पर्यटकांसाठी बन्द आहे . आम्हाला परवा बघता आला नाही . अगदी जायचेच असेल तर पायलट मोपेड घेवून १५००/- भरून एकट्याला जाता येते ,तेसुद्धा फक्त लाम्बून धबधबा बघण्यासाठी . आंघोळ वगैरे सोडाच !

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर असेल का तिकडे?

प्रीत-मोहर's picture

24 Jul 2017 - 12:44 pm | प्रीत-मोहर

अरे दरवर्षी कुणी ना कुणी तरी मरतं तिथे शिवाय कचरा करणे वगैरे प्रकार आहेतच म्हणुन हे पायलट(टु व्हीलर) आणि जीप्स प्रकार आहेत. तुमची गाडी नाही नेऊ शकत तिथे

मंदार कात्रे's picture

22 Jul 2017 - 5:39 pm | मंदार कात्रे

इन्टर्नल मालवण आणि तळकोकणात आत्ता डोळ्याचे पारणे फेडणारे देखावे दिसतात . किरणपाणी पुलावरून सागरी महामार्गाने गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करून मालवण कुणकेश्वर करत नान्दगाव ला हायवेला येवून मग खारेपाटण ला आलात तर बरेच काही सापडेल ...
खरोखर अविस्मरणीय!rt

विशुमित's picture

24 Jul 2017 - 12:30 pm | विशुमित

नोटेड

विशुमित's picture

24 Jul 2017 - 12:41 pm | विशुमित

नोटेड

रघुनाथ.केरकर's picture

25 Jul 2017 - 5:33 pm | रघुनाथ.केरकर

आरोन्दा , शीरोडा करत पुढे आरवलीच्या वेतोबाला नमस्कार करत, मोचेमाडची खाडी पार करुन वेंगुर्ला बंदर बघत पुढे मठ मार्गे कुडाळ गाठा.

वेंगुर्ल्याला एस्टी स्टँड च्या शेजारी हॉटेल बांबु आहे, तिथे सि-फुड छान मीळते.

अभ्या..'s picture

22 Jul 2017 - 5:39 pm | अभ्या..

ह्ये जिगर.
बेस्टच प्लान हो साहेबराव.
आम्ही पण जुलै महिन्यातच असलीच १२ टाळकी ८ गाड्या घेऊन अचानक भयानक ट्रीप काढलेली. पहाटे निघालो, सोलापूरहून मंगळवेढा मार्गे मिरज गाठले. मग कोल्हापूर. अभयारण्य बघत बघत खाली उतरलो. थेट कणकवली गाठले रात्री ११ वाजेपर्यंत. कणकवलीत एक जिगर दोस्ताचा आशियाना होता. तिथेच मुक्काम ठोकला. एक दिवस आंबोली बिंबोली करुन माघारी, एक दिवस कुणकेश्वर वगैरे, एक दिवस थेट गोवा गाठले. टोटल ८ दिवस नुसते भिजत भिजत फिरलो. एक लंबर ट्रीप झालेली. तेम्व्हा स्प्लेंडरने ५५ मायलेज दिलेले. मागचा टायर फक्त ३.१८ चा टाकलेला होता इतकीच पूर्वतयारी.
तुम्हाला शुभेच्छा आहेतच भरपूर. तुमचा आणि सहचारिणीचा उत्साह बघून एकदम आह्ह्हा झाले, सुखरुप अन रिफ्रेश होऊन आनंदात परत या. आल्यावर धागा टाका.

विशुमित's picture

24 Jul 2017 - 12:27 pm | विशुमित

"६-७ वर्षच शिल्लक उरले आहेत गाडीवर लांबचा प्रवास करण्याचे. तुम्ही एकदा थेरडे झाल्यावर मी कशी गाडीवर फिरणार" असले हुच्च विचार आहेत आमच्या सहचारिणीचे.

तुमच्या नशीबाने लोहा अब्बीच गरम हय... "तू म्हणते आहेस ते अगदी बरोबर आहे, ६-७ वर्षच शिल्लक आहेत आता दुचाकीवर फिरायचे" असे सांगून आत्ता भटकून घ्या.

हळूहळू सहधर्मचारीणीला सायकल बद्दल सांगा.. आणि पुढच्या ६ - ७ वर्षांनंतर दुचाकीवरून फिरणे बंद झाले की दोघे दोन सायकल घेऊन फिरायला बाहेर पडा. :)

मंदार कात्रे's picture

22 Jul 2017 - 5:42 pm | मंदार कात्रे

गोवा मुम्बई हायवेने वर आलात तर थोडी वाट वाकडी करून कुडाळवरून नेरूरपार मार्गे मालवण आणि पुढे कुणकेश्वर करत नान्दगाव ला हायवेला येवून मग खारेपाटण ला जाता येइल

मंदार कात्रे's picture

22 Jul 2017 - 5:44 pm | मंदार कात्रे

hg

मंदार कात्रे's picture

22 Jul 2017 - 5:45 pm | मंदार कात्रे

uy

मंदार कात्रे's picture

22 Jul 2017 - 5:48 pm | मंदार कात्रे

l

बोर्डावरचे 'तातूंची वाडी'चे सुलेखन फार आवडले!

मंदार कात्रे's picture

22 Jul 2017 - 5:49 pm | मंदार कात्रे

tfu

सिरुसेरि's picture

1 Aug 2017 - 12:21 pm | सिरुसेरि

छान फोटो . " ईक रास्ता है जिंदगी , जो थम गये तो कुछ नही .... ये कदम किसी मुकामपें जो जम गये तो कुछ नही ."

सुबोध खरे's picture

22 Jul 2017 - 6:29 pm | सुबोध खरे

एकच कळकळीची विनंती
एवढा खर्च करणार आहेत तर जायच्या अगोदर दोन्ही टायर बदलून नवे टाका. साधारण मध्यमवर्गीय वृत्ती( आपली असेल असे नव्हे) अशी असते कि ट्रीपमध्ये रस्ते खराब असतील तर जुनाच टायर वापरून घ्या. खराब झाला तरी चालेल.
पण आपण सहकुटुंब जात आहात पावसाळी वातावरण आहे एकद घसरला तरी त्रासदायक होऊ शकते तरी सहलीच्या अगोदर टायर बदलून घ्या. गोव्यात कोणत्याही गल्लीतून दुचाकी वाहने "भसकन" बाहेर येतात आणि इतर शहरांपेक्षा एकंदर रस्ता निर्मनुष्य असल्याने माणूस थोडा बेफिकीर असतो. त्याची काळजी घ्या.
आपल्याला सहलीच्या शुभेच्छा

विशुमित's picture

24 Jul 2017 - 12:12 pm | विशुमित

टायर बदलणारच आहे इनफॅक्ट बदलायलाच आले आहेत.

गाडी चालवताना २०० मीटर व्हिजनच तंत्र माझ्या आजोबानी शिकवलं आहे. ते मी पाळतोच. कुत्री, गुरं, लहान मुलं आणि म्हातारी माणसे दिसली तर मी हमखास गाडी स्लोव करतो. कटाक्षाने.
फक्त निर्जन रस्त्या बाबत एकच भीती आहे. रास्ता अडवून चोऱ्या चपट्या करणाऱ्यांची.
बाकी माझे काम एकदम मस्त मौला असते. सगळं निवांत.

अभिजीत अवलिया's picture

22 Jul 2017 - 6:50 pm | अभिजीत अवलिया

४ वर्षाच्या मुलीला घेऊन बाईक वरून प्रवास करणे मला योग्य वाटत नाही. लहान मुलांना लगेच झोप येते. त्यामुळे त्यांना घेऊन बाईकवर मागे बसणाऱ्या माणसाचे अशा लांबच्या प्रवासात खूप हाल होतात.
(ट्रीपसाठी नाउमेद करण्याचा उद्देश नाही)

विशुमित's picture

24 Jul 2017 - 10:59 am | विशुमित

मुलीला नाही नेणार.

धागा काढलात ते ब्येष्ट केलेत. आता हे वेळापत्रक घ्या.. जे जमेल ते जमवा, आत्ता नाही जमणार ते पुढच्या ट्रिपला जमवा.

पुण्यातून सकाळी सकाळी म्हणजे ७ वाजण्याच्या दरम्यान बाहेर पडा. खेड शिवापूर, कापूरहोळ वगैरे हायवे आणि ट्रॅफिकचा रस्ता पार पडला की शिरवळ येईल. श्रीराम वडापाववाल्याकडे चुकूनही थांबू नका. खंडाळा गाठा. खंबाटकी घाट चढायच्या आधी जेथे उजवीकडचा रस्ता साथ सोडेल तेथे उजव्या बाजूला भैरवनाथ नामक हॉटेल आहे. तेथे कढीवडा चापा. शेंगदाणे, कढीपत्ता, लसूण वगैरे घातलेली चुरचुरीत फोडणीची कढी ओरपा. तेथे जाईपर्यंत पावसाने भिजले असालच. मग गेल्यागेल्या चहा ऐवजी कढी प्या आणि नंतर निघताना चहा मारा. तेथे पोहे / मिसळ वगैरे गोष्टी उदरभरणासाठी असतातच.

खंबाटकी चढताना डावीकडे दत्ताचे मंदिर लागेल, त्याननंतर खंबाटकीच्या शेवटच्या टर्नजवळ गाडी उजवीकडे रस्त्याच्या बाजूला लावा आणि ढग+पाऊस+धुके असा खेळ बघत निवांत टाईमपास करा.

डावीकडे पवनचक्क्या दिसल्या की सुरूर फाटा, जोशी विहीर वगैरे गावे लागतील. इथे काहीही करू नका सरळ सातारा गाठा. सातार्‍याला जेवणाची बोंब असते असे माझे प्रामाणिक मत आहे. त्यामुळे सातार्‍याला उड्डाणपुलावरूनच टाटा करा आणि कराडकडे कूच करा.

सातार्‍याची हायवेवरची खिंड ओलांडली की अजिंक्यतारा का कोणतातरी साखर कारखाना लागेल तेथे उजवीकडे प्रियांका फूट वेअर नावाचे मोठ्ठे शोरूमही आहे. तेथे डावीकडे तुळजाभवानी मंदिर आहे. त्या मंदिरात देवीचे दर्शन चुकवू नका. अत्यंत रेखीव मूर्ती आणि सुंदर परिसर. (मी पुणे सांगली / पुणे कोल्हापूर करताना हा एकमेव थांबा घेतो. पुणे ते कोल्हापूर / सांगली या २५० किमी पैकी हे मंदिर बरोब्बर १३० किमी अंतरावर आहे)

कराडलाही जेवण चांगले मिळते पण सगळीकडे गेलेला वेळ गृहीत धरूनही फक्त १२ च वाजलेले असतील. मग कराडलाही उड्डाणपुलावरून टाटा करा. कासेगांव, पेठनाका वगैरे ठिकाणे मागे पडतील. वाटेत नेर्ल्याला दत्त भुवन हे मांसाहारी हॉटेल आहे. (पुन्हा उजव्या बाजूलाच - यू टर्न घेऊन यावे लागेल.) याच्यावर २००३ च्या दरम्यान धाड पडली होती आणि संशयास्पद माल सापडला होता असे ऐकले आहे. माझ्याकडे पुरावे नाहीत - पण मी येथे जाणे बंद केले आहे.

पेठनाका सोडल्यानंतर पुन्हा उजव्या बाजूलाच MK धाबा शोधा. दोन आख्खा मसूर, एक रोटी आणि चारपाच दह्याची लोटकी मागवा. रोटी स्ट्रिक्टली दोघात एकच मागवा नाहीतर प्रत्येकी एक संपेपर्यंत निम्म्याहून जास्त रोटी वातड होते. यांची एक रोटी = इतर ठिकाणाच्या दोन ते अडीच रोट्या.

बाहेर पानपट्टीवर मस्त साधे पान थोडी खुशबू, बडिशेप आणि सुपारी जमवा - कोल्हापूरला सुटा.

कोल्हापूरला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचून (तुमच्याकडे ६ / ७ दिवस आहेत त्यामुळे एका दिवसात पुणे गोवा करायची गरज नाहीये!) सामान टाका, फ्रेश व्हा आणि संध्याकाळी ५ / ६ वाजता खासबाग मैदानाजवळ राजाभाऊ कडे जा.
भेवडा = फरसाण+चिवड्याची भेळ, मालवणी भेळ किंवा सोबत तिथले मित्रमंडळ असेल तर "टी टाईम" असे प्रकार फस्त करा. आवड असेल तर सोळंकीमध्ये दूध कोल्ड्रिंक प्या. (दूध कोल्ड्रिंक मध्ये निरसे दूध असते त्याने पोट बिघडणार नाही याची खात्री असेल तरच हे साहस करा)

भेळेने पोट भरेलच, नाहीच भरले तर तिथेच खादाडी करा. समजा पोटभर जेवायचेच असेल तर पद्मा गेस्ट हाऊसला मासे चापा.

राजारामपुरीत जाऊन राजाबाळचे पान खा. हैदराबादी पान (वाळा फ्लेवर), मँगो पान, स्पेशल पान वगैरे प्रकार उडवा.

दुसर्‍या दिवशी कोल्हापूर सोडल्यानंतर गोवा वेस ला दोन हॉटेल आहेत आणि तेथून उजवीकडे रस्ता आंबोलीला जातो. त्यापैकी टर्न घेतल्यानंतर डावीकडच्या हॉटेलमध्ये नाष्टा + कॉफी (कॉफी चुकवू नकाच्च!!)

इथून पुढे आंबोली सावंतवाडी आणि गोवा - या भागात फारसे फिरणे झाले नसल्याने पास.

गोव्यातून पुण्यात येण्यासाठी आरामात दोन दिवस घ्या. तीन दिवस घेणार असलात आणि सिंगल लेनवर गाडी चालवायची खुमखुमी असेल तर NH17 ने या. येताना रत्नागिरी-गणपतीपुळे समुद्राच्या कडेने आणि अगदीच धाडस करायचे असेल तर गणपतीपुळे-चिपळूण "आबलोली मार्गे" करा. आबलोलीचा रस्ता एकदम निर्जन आहे. जीपीएसवर पूर्ण विश्वास ठेऊन आणि पुरेसे पेट्रोल वगैरे सोबत आहे याची खात्री करूनच या रस्त्यावर जा. निर्जन रस्ता आवडत नसेल तर इकडे जाऊ नये. इकडे गेलात तर तुम्ही नक्की धन्यवाद देण्यासाठी फोन कराल याची खात्री आहे. ;)

शक्यतो ताम्हिणी चढून पुण्यात पोहोचा. इतके दिवस बघितलेली शीनशीनरी आणखी जास्त तीव्रतेने बघायची असेल तर वरंध्यातून या. जन्नत..!

गोव्यात कसे आणि किती फिरताय याचे डिट्टेल वर्णन करणारे धागे टाका. मी सायकलवरून तिकडे जाताना तुमचे धागे रेफर करेन. :)

एस's picture

22 Jul 2017 - 8:43 pm | एस

_/\_

मोदक's picture

23 Jul 2017 - 12:29 am | मोदक

मी व्यनीतील चर्चेच्या अनुषंगाने धागा न वाचता हा प्रतिसाद लिहिला.. सातार्‍यातून सुरूवात असेल तर वेगळा प्लॅन बनवावा लागेल.

पहिला आणि दुसरा मुक्काम कुठे असणार ते सांगाल का..?

विशुमित's picture

24 Jul 2017 - 10:56 am | विशुमित

सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद..!!

पहिल्या दिवशी स्ट्रेच करण्याचा इरादा आहे म्हणून सातारा ते थेट बेळगाव गाठायचं. संकेश्वर पर्यंत एकदा गेलो होतो गाडीवर त्यामुळे बेळगाव शक्य वाटते. अगदी नाही जमलं तर संकेश्वरलाच पहिला मुक्काम करेल.
दुसरा मुक्काम कोठे करावा या बाबत अनभिज्ञ आहे.

इरसाल's picture

24 Jul 2017 - 5:31 pm | इरसाल

कं लिवला काय तु ह्यो सर्वा ????????
जल्लो ना पार .....................!

दिपस्वराज's picture

31 Jul 2017 - 11:26 am | दिपस्वराज

काय योगायोग म्हणायचा, शुक्रवारी कोल्हापूर (ज्योतिबा) ला निघालो असता खंबाटकी घाटाच्या आगोदर अचानक आदल्या रात्री वाचलेला धागा आणि त्यावरची मोदकरावांची प्रतिक्रिया अचानक व्हिज्वलाइझ झाली. मग काय गाडी घेतली साइटला. थेट मोर्चा भैरवनाथवर. म्हंटल बघू तरी कढीवडा हे काय प्रकरण आहे. मुंबईत वडापाव, सिंगल वडा, वडा उसळ खाल्ला होता. पण आहाहा .....मुसळधार पाऊस ...गार हवा ...आणि गरमागरम कढीवडा. काय सांगू देवा मन तृप्त झालं . जिओ... मोदक .......सलाम मिपा.

मोदक's picture

31 Jul 2017 - 3:31 pm | मोदक

:)

पिलीयन रायडर's picture

22 Jul 2017 - 8:00 pm | पिलीयन रायडर

४ वर्षाच्या मुलीला घेऊन जाताय??? उत्साह चांगलाय. पण ६-७ दिवस रोज गाडीवर प्रवास त्या लेकराला झेपेल का? तिचं अंग दुखेल हो. आणि नाही म्हणलं तरी पाठ वगैरे खुप अवघडुन जाते. तिला जास्त ताणु नका. शिवाय मुलं म्हणलं की खाणं, पिणं, ऊन - पाऊन, शी-शू.. हजार भानगडी असतात.

मुलांना घेऊन फिरायचं असेलच तर बस, ट्रेनने गोव्याला जाऊन तिथे बाईक रेंट करुन शकताच ना. तिथे जवळपास फिरा.

लहान मुलांना घेऊन फिरुच नये असं नाही. पण तरी ४ वर्षाच्या मुलीला ६-७ दिवस जास्त होतील असं मला वाटतं.

एवढं करुन जाणार असालच तर प्रवासाला शुभेच्छा! लहान मुलीच्या दृष्टीने विचार करुन शक्य ते सगळं सोबत असु द्या. गाडीचीसुद्धा विशेष काळजी घ्या.

विशुमित's picture

24 Jul 2017 - 10:42 am | विशुमित

प्रतिसादासाठी धन्यवाद
मुलीला घेऊन जाणार नाही. ती तिच्या आजीबरोबर एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी ४- ५ दिवस जाणार आहे.
पिल्लाने ग्रीन सिग्नल दिल्यामुळेच ही पाखरं भुर्रर्र होणार आहेत.

सर्व सीझन्समधे गोव्याची वेगवेगळी रुपं बघता येतात. सर्वच सुंदर असतात. पावसाळ्यातही.

फक्त जाण्यायेण्यासाठी दुचाकी नको. हा मूळ कल्पनेतच बदल ठरेल पण ऐका. हे दिवस नव्हेत त्याचे.

दुचाकीवरून लहान मुलांना घेऊन असा इतक्या लांबचा प्रवास करू नका इतकेच म्हणेन. बाकी भटकंतीला भरपूर शुभेच्छा. आल्यानंतर धागा टाका. वाट पाहतो.

साताऱ्यातून निघून तुम्ही बेळगाव ला आरामात पोहोचू शकता. पहिला मुक्काम शक्यतो बेळगाव ला करा. नियाझ हॉटेल ला चुकून पण जाऊ नका. अजिबात चांगलं नाहीये आता ते असं माझा मत आहे. (१३ वर्षाच्या नियाझ मध्ये खाण्याचा अनुभव, सध्या सोडून दिलो तिथे खायचं)

कपिलमुनी's picture

24 Jul 2017 - 1:42 pm | कपिलमुनी

१.सातारा - बेळगाव
२. बेळगाव - चोर्ला - फोन्डा - दक्षिण गोवा (सकाळी ६ ला निघालात तर दुपारी १२ पर्यन्त पोचाल , मी ड्राइव केलेला रस्त्यामधे याचा नम्बर वरचा आहे.)
३. गोव्यात फिरण्याचे बरेच धागे आहेत.
४. येताना आम्बोलीमार्गे या , वरन्धा , पोलादपूर, चिपळूण चा घाट नको, सेफ नाही.

-----------------------------------------------?
१ टायर ट्यूबलेस आहेत का ?
२. हवा भरयचा टूल आहे का ? पन्कचर किट असल्यास उत्तम.
३. दोघानी हेल्मेट कम्पल्सरी , शक्य असल्यास राईडर जॅकेट .
४. कम्युटर बाईक आहे , ब्रेकींग डिस्टन्स कमी असतो त्यमुले जपून जावा.
५. प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक ओळखीचा लोकांचे , रेफरन्सचे नम्बर जवळ ठेवा.

विशुमित's picture

24 Jul 2017 - 2:34 pm | विशुमित

उपयुक्त माहिती.

............?
१. टायर ट्युब्लेस नाहीत. ट्युब्लेस टाकू का ?
२. हो टूल आहे.
३. हेल्मेट कम्प्लसरीचं. रायडर जॅकेट सध्या नाहीत. घेता येतील
४. काहीही गडबड नाही. सोसेल एवढंच ताणायची. यदाकदाचित लयच ताप दिला च तर डिरेट ट्रक मध्ये घालून घरी पाठवून द्यायची. हाय काय नाही काय.
५. नोटेड.

टायर बदलणार आहातच तर टुबलेसच घ्या!
पंचर झाली तरी बाईक पुढे 10-15 किमी सहज जाते.

विशुमित's picture

1 Aug 2017 - 11:26 am | विशुमित

कालच्या शनिवारीच टाकले ट्युब्लेस टायर. चाचपाणी करण्यासाठी १८० किमी चा प्रवास पण केला दोघांनी.

गणोराज's picture

3 Aug 2017 - 11:07 pm | गणोराज

पण पावसाळी वातावरण असल्यामुळे थोडं जपुन. आणि गोवा तर औल टाईम फेवरेट डेस्टिनेशन आहे.

गणोराज's picture

3 Aug 2017 - 11:07 pm | गणोराज

पण पावसाळी वातावरण असल्यामुळे थोडं जपुन. आणि गोवा तर औल टाईम फेवरेट डेस्टिनेशन आहे.

गणोराज's picture

3 Aug 2017 - 11:07 pm | गणोराज

पण पावसाळी वातावरण असल्यामुळे थोडं जपुन. आणि गोवा तर औल टाईम फेवरेट डेस्टिनेशन आहे.

गणोराज's picture

3 Aug 2017 - 11:07 pm | गणोराज

पण पावसाळी वातावरण असल्यामुळे थोडं जपुन. आणि गोवा तर औल टाईम फेवरेट डेस्टिनेशन आहे.