शेंगदाणे कुटातली मिरची

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in पाककृती
19 Jul 2017 - 12:06 pm

साहित्य:-
१०-१२हिरवी मिरची,
लसून -७ ते ८ पाकळ्या,
भाजलेले शेंगदाणे -१ मोठा बाउल,
तेल फोडणीसाठी जरा जास्तच,
हळद,
जिर,
मोहरी,
धने जिरे पूड एक चमचा,
पाणी - १ ग्लास,
मीठ
साहित्य ---
प्रथम शेंगदाणे भाजून त्याचा लसूण घालून थोडा जाडसर कूट करून घ्यावा.मिरच्या कापून घ्याव्यात.
कढईत तेल गरम करून जिर,मोहरी,हळद घालून चांगल परतवून घ्यावे आणि कापलेल्या मिरच्या घालून पाच मिनिटं तेलात मस्त परतवून घ्याव्यात. आता त्यात गरम पाणी घालून एक उकळी आली की दाण्याचा कूट घालावा. मीठ, कोथंबीर घालून पाच मिनिटं मिरची शिजू द्यावी.
आमच्या खान्देशात गोडाच जेवण असेल तर आमच्या सारख्या गोड न आवडणाऱ्या लोकांसाठी हमखास केली जाते ही मिरची तोंडी लावायला.

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

19 Jul 2017 - 12:12 pm | त्रिवेणी

मिरची

त्रिवेणी's picture

19 Jul 2017 - 12:14 pm | त्रिवेणी

मिरची

त्रिवेणी's picture

19 Jul 2017 - 12:15 pm | त्रिवेणी

मिरची

वा झणझणीत दिसतेय चवीला फायनल फोटू टाक न ग त्री

त्रिवेणी's picture

19 Jul 2017 - 12:17 pm | त्रिवेणी

मिरची

दिपक.कुवेत's picture

19 Jul 2017 - 1:37 pm | दिपक.कुवेत

मस्त!! फोटोतून झणझणीतपणा पुरेपूर उतरलाय. पण किती दिवस टिकतं? केल्यावर फ्रिजमधे ठेवायला हवं का?

त्रिवेणी's picture

19 Jul 2017 - 1:41 pm | त्रिवेणी

फ्रिजमध्ये ३-४ दिवस टिकत.बहुतेक बाहेर एक दिवस वैगरेच टिकेल. १०-१२ मिरच्यांचे तीन चार दिवसात संपते माझ्याकडे.

कंजूस's picture

19 Jul 2017 - 1:53 pm | कंजूस

छान!

पद्मावति's picture

19 Jul 2017 - 1:55 pm | पद्मावति

मस्तच!

आमच्या देशावर याला 'महाद्या' म्हणतात. जबरदस्त दिसतो आहे!

महाद्या म्हणजे शेंगदाण्याच्या कुठाचे पिठले.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
म्हाद्या मोदक म्हणतात तसाच होतो आमच्या इकडेही. भरपूर कांदा आणि लाल तिखट घालून. टाकते त्याच्या फोटो करला की.
हिवाळ्यात मिरची+काळी उडीद डाळ+अगदी कमी ह डाळ अशी ही पातळ भाजी होते.

ओक्के. म्हणजे यात डाळीचं पीठ + कांदा घातला की महाद्या होतो होय! (आमच्याकडे महाद्या करून लोणच्यासारखी साठवणूक करतात.)

मोदक's picture

19 Jul 2017 - 3:50 pm | मोदक

ते वायलं.. हे वायलं..

प्रतिसाद नीट वाचा वो झंटलमन साहेब.

सस्नेह's picture

19 Jul 2017 - 2:19 pm | सस्नेह

चरचरीत !
बघूनच डोळे आणि जीभ पाणावली !

II श्रीमंत पेशवे II's picture

19 Jul 2017 - 3:13 pm | II श्रीमंत पेशवे II

मस्तच आहे हा महाद्या ..........

दोन तीन दिवस लागोपाठ उपास झाले , कि जिभेची धार वाढवायला उत्तम शस्त्र आहे .........

मंजूताई's picture

19 Jul 2017 - 3:38 pm | मंजूताई

मस्त! भाकरी बरोबर छान लागेल.

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

19 Jul 2017 - 4:41 pm | सिद्धेश्वर विला...

माझा उपवास मी आताच सोडू कि काय असं वाटू लागलंय..

फोटोबरोबर चवपण उतरलीय...

त्रिवेणी ताई .. एकदम झक्कास ...

हे असले चविष्ट फोटो .. चातुर्मासकरांवर खुलेआम सुड म्हणायचं कि ओ...

धन्यवाद ,, सर्व प्रिंट काढली आहे .. आजच रात्री उपवास सोडताना प्लॅन तयार आहे ... बायकोने नीट केले तर ठीक नाही तर हे चित्र डोळ्यासमोर ठेवून जेवण म्हणतो .... कशी वाटली आयडिया ...

II श्रीमंत पेशवे II's picture

19 Jul 2017 - 5:50 pm | II श्रीमंत पेशवे II

करा करा बेत करा

इरसाल's picture

19 Jul 2017 - 4:50 pm | इरसाल

:(( गणेशा

मस्त! शेवटचा फोटो कातिल आलाय.

अरे वा! नवीन पाकृ आवडली. यात आणखी दोनेक जिन्नस अ‍ॅडवले तर पंचामृत होईल.

नावातकायआहे's picture

19 Jul 2017 - 7:32 pm | नावातकायआहे

पंचामृत मध्ये हिरवी मिर्चि नसते ओ ताई....

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2017 - 7:40 pm | पिलीयन रायडर

असते हो दादा. ते तुम्हाला वाटतंय ते वायलं. रेवाक्का म्हणते ते वायलं. आमच्याकडे त्याला मिरच्यामृत पण म्हणतात. नैवेद्याच्या स्वयंपाकात असतं.

नावातकायआहे's picture

19 Jul 2017 - 7:55 pm | नावातकायआहे

आय माय स्वारी पि रा ताई...
आमच्या " पुण्यात " नसते हो :-))
पुण्यात कुठे मिळेल? :-(

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2017 - 8:25 pm | पिलीयन रायडर

नो आयडीया सर जी!

पुण्यात मध्ये कुठे तरी "फोडणीची पोळी" सुद्धा मिळायची म्हणे. तर हे ही मिळायला पाहिजे पण अवघड वाटतंय. रेसेपी काही मला माहिती नाही कारण मी कधी नैवेद्य बनवलेला नाही अजुन.

@ रेवती, आक्के, तुज ठाऊक असेलच ना पाककृती?

अरे हो! नावातकायआहे साहेबांचा जरा गोंधळ झालाय.
पूजेतील पंचामृत- दूध, तूप, मध, साखर, दही
नैवेद्यातील पंचामृत- हिरव्या मिरच्या (येथे ढब्बू मिरची, पेरू असे बदलून वापरावे) चिरून एक छोटी वाटी, त्याच मापाने तिळाचे कूट, त्याच मापाने दाण्याचे कूट, त्या मापाने गूळ, मापाच्या वाटीने ओल्या/ सुक्या खोबर्‍याचे काप, पाव वाटी भिजवलेले शेंग्दाणे, फोडणीचे साहित्य, चिंच कोळ.
पातेल्यात/ कढईत जरा जास्त तेलाची फोडणी (मोहरी, हिंग, हळद, मेथ्या), त्यात मिरच्या जरा परताव्यात व चार वाट्या पाणी. पाण्याला उकळी आली की सर्व साहित्य घालून जरा शिजवणे. दाटसर झाले की बंद करा. पानात डाव्याबाजूचे तोंडीलावणे आहे.

अभ्या..'s picture

21 Jul 2017 - 7:38 pm | अभ्या..

अहाहाहाहा, पंचामृत.
आमच्या इथे बिथे कै नै. नैवेद्यातील पंचामृतात मिरची असतेच. ;)

हीहीही. आमच्या इथे म्हटल्याने लेकराचं मन दुखावलं.

जुइ's picture

25 Jul 2017 - 2:05 pm | जुइ

हेच म्हणाचे होते!

झेन's picture

19 Jul 2017 - 9:20 pm | झेन

नाही तरी नावातकायआहे

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2017 - 6:29 pm | पिलीयन रायडर

बोर्डावर धाग्याचं नाव वाचुनच तोंडाला पाणी सुटलं. असलं काही तरी आमचे बाबा झकास करतात. महाद्या, भुरका, पिठलं असले आयटम्स. करायलाच पायजेल!

ती एक बारिक हिरवीगार मिरची असते, ती नाही ना घ्यायची ह्याला? थोडी मोठी (जी कमी तिखट असते) ती घेतली आहे ना? कारण बारिक हिरव्या मिरची घालुन हे मी इमॅजिन सुद्धा नाही करु शकत इतकं तिखट होईल.

मी नेमकी ती बारिक मिरचीच आणलीये.. आणि हे करुन तर खावं वाटतंय... काय क्रावे ब्रे?

इरसाल's picture

20 Jul 2017 - 2:14 pm | इरसाल

त्या मिरच्यांची देठं खुडुन उभ्या चीरा द्या. मग पातेल्यामधे २/३ कप पाणी, १/४ टेस्पु. हळद, १ पळी तेल आणी थोडसं मीठ टाकुन त्यात त्या मिरच्या टाका ४/५ मि. उकळु द्या मग हळु हळु त्यात बेसन टाका नी हलके हलके ढवळा. गोळा व्हायला लागले की अजुन थोडं तेल टाकुन झाकण ठेवुन २/३ मि. शिजवा. चपाती, भाकरी किंवा भात-भाजी बरोबर भारी लागतं आणी तिखटपणा ही नाही जाणवत.

पिलीयन रायडर's picture

21 Jul 2017 - 1:02 am | पिलीयन रायडर

ओक्के!! नक्कीच ट्राय करेन!

त्रिवेणी's picture

19 Jul 2017 - 7:09 pm | त्रिवेणी

अग मी बारीकच घेतलीय, तू दोनच मिरच्या घे. जनरली मी पण जाडच मिरची घेते पण आज घरात नव्हती जाड मिरची.
@सिध्येश्वर करतील हो वहिनी चांगली, पण कशी झाली होती सांगा ह.
@मंजू ताई हो भाकरी बरोबर मस्तच लागते त्यात बाजरीची शिळी भाकरी, कढी आणि अशा मिरच्या खूपच भारी बेत होतो.
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.

आता सावजी मसाला लिहा कुणीतरी.

अजया's picture

19 Jul 2017 - 7:53 pm | अजया

हुच्च रेसिपी आहे. तुम्ही खात असलेल्या तिखटीची पण आठवण आली सौ त्रिवेणी ताई.

मनिमौ's picture

19 Jul 2017 - 10:02 pm | मनिमौ

मस्त आहे रेसिपी. मला एकदम मीठभुरका अका तिखटीची आठवण झाली.

मस्त.. शेवटचा फोटो भारीच!

पैसा's picture

20 Jul 2017 - 1:51 pm | पैसा

पण हे म्हणजे खायचे काम नव्हे! =))

मस्त आहे हे. भाकरी सोबत छानच लागेल, करतोच आज रात्री, तसाही बहुदा आज रात्री भोपळा असेल घरी! :-(
:-)

नूतन सावंत's picture

20 Jul 2017 - 11:05 pm | नूतन सावंत

झकास हो त्रिवेणिताई,मुबई पावसाने थंड झालीय.करून पाहिली पाहिजे ही हॉट रेसिपी.

स्मिता.'s picture

21 Jul 2017 - 2:12 am | स्मिता.

ही मिरची म्हणजे अहाहा!!
पण मी अशी भाजी (?) जरा जाडसर मिरचीची आणि थोडा लिंबाचा रस घातलेली खाल्ली आहे

प्राची अश्विनी's picture

21 Jul 2017 - 7:06 am | प्राची अश्विनी

कालच केली. एकदम झणझणीत मस्त झाली.
पुरावा.;)..

धन्स गं.

मस्त दिसतेय. आणि आठवणीने फोटो टाकल्याबद्दल ५ मिरच्या बक्षीस.

ज्योति केंजळे's picture

21 Jul 2017 - 6:53 pm | ज्योति केंजळे

खांदेशि पद्धतिचि मिरचिचि भाजि जि तुरिच्या डाळीत करतात, त्याचि रेसिपि आहे का कोणाकडे ?

आहे माझ्याकडे पण नुसती तुरीची डाळ नसते. मी जी बघितली य ती ह डाळ+उडीद डाळ घालून करतात.
हिवाळ्यात केली जाते.
टाकेन ती रेसिपी ही बघा तीच आहे का.

स्मिता.'s picture

24 Jul 2017 - 5:06 pm | स्मिता.

मला वाटतं त्या दाय (डाळ) गंडोरीबद्दल विचारत आहेत. उ. डाळ + थोडी ह. डाळ शिजवून करतात ती भाजी वेगळी. तिला काही भागात 'फौजदारी' असंही म्हणतात.

ज्योति केंजळे's picture

21 Jul 2017 - 6:53 pm | ज्योति केंजळे

खांदेशि पद्धतिचि मिरचिचि भाजि जि तुरिच्या डाळीत करतात, त्याचि रेसिपि आहे का कोणाकडे ?

दुसर्‍या वेलांटी साठी दोनदा e वापरा.

इरसाल's picture

21 Jul 2017 - 7:46 pm | इरसाल

ती मलकापुर साईडला तिला "दाय गंडोरी" म्हणतात किंवा नुसतच " मिरच्यांची भाजी".

त्रिवेणी's picture

21 Jul 2017 - 8:38 pm | त्रिवेणी

हो डाळ गंडोरी.

विशाखा राऊत's picture

22 Jul 2017 - 2:31 am | विशाखा राऊत

वाह क्या बात है

धाग्यच अर्ध शतक ज़ालयाबड्डल सौ त्री यांचा शनिवार वाड्या वर सत्कार करण्यात येत आहे ;) घ्या पुष्पगुच्छ ;)

नुसता पुस्प्गुच काय देऊन राह्यली पिवडे. मिरचीला उतारा पण द्यावा लागतोय. विसरली का तिखटी ;)
पुस्प्गुच आणि राजमंदीरचे पेरू आइसक्रिम देऊन सत्कार करण्यात येत आहे.

II श्रीमंत पेशवे II's picture

24 Jul 2017 - 3:28 pm | II श्रीमंत पेशवे II

मी हि रेसिपी केली .....मस्त झालीये ,,,, घरातले सगळे तुटून पडले होते
मला धाग्यावर लोड करायची आहे पण ....... जमत नाहीये

II श्रीमंत पेशवे II's picture

24 Jul 2017 - 4:25 pm | II श्रीमंत पेशवे II

mirchi

त्रिवेणी's picture

25 Jul 2017 - 8:29 am | त्रिवेणी

मी imgur android हे अँप डा लो केलंय मोबाईलमध्ये. ते वापरून इमेज अपलोड करते इकडे.मलातरी खूप सोप्प वाटलं ते.
धन्यवाद रेसिपी करून बघितल्याबद्दल.

नीलमोहर's picture

26 Jul 2017 - 8:32 pm | नीलमोहर

इतके तिखट खात नाही पण जरा प्रमाण बदलून करता येईल.
फोटो भारी आलेत, बघूनच खायची इच्छा होतेय.

विखि's picture

31 Jul 2017 - 11:31 pm | विखि

उद्या करतो, आत्ताच केला असता पण लै रात्र झालीत. मागं एकदा म्हाद्या केला होता, शायनिंग च्या नादात लैच तिखट टाकलं, अर्धा तास घरात ठसका येत होता. फादर लै उचकले :)

जागु's picture

1 Aug 2017 - 12:10 pm | जागु

छान रेसिपी.