राम राम मंडळी ,
"पालक" हा बहुतेक लोकांना आवडत नाही त्यात मी पण एक प्राणी :) पण हळू हळू मिहि खायला शिकतेय. असा नाही तर तसा पालक पोटात जायला हवा म्हणून काहीतरी वेगळं न चवीला पण बर अस करावं म्हणून आंजावर शोध शोध शोधून माझ्या मैत्रिणीचं डोकं खाऊन "पालक पुरी"बनवण्याचा घाट घातला न तो पहिल्या प्रयत्नातच इकडच्या स्वारीला न मला पसंत पडला ;)तर मंडळी घ्या साहित्य.
साहित्य :
एक जुडी पालक
कणिक ( अदमासे म्हणजे मावेल तितकी )
लसूण ठेचून - २ चमचे
बेसन पीठ - ३ चमचे
तीळ ( आवडीनुसार)
ओवा - १ चमचा
धना जिरे पावडर - १ चमचा (ऑप्शनल )
लालतिखट ( आवडीनुसार तुमच्या हिशोबाने )
मीठ चवीनुसार
कृती : पालक धुवून, स्वच्छ करून त्याची पाने ५ मिनिट उकळून घ्यावीत न मिक्सी ला फिरवून प्युरी करून घ्यावी. आता या प्युरीत मावेल तितकी कणिक न वरील सर्व साहित्य मिसळून एकजीव मळून घ्यावी मिश्रण थोडं घट्ट असेल तरी चालेल आता हे मिश्रण १५ मिनिट रेस्ट करायाला ठेवून द्यावे मग ह्या कणकेचे उंडे करून गोल पोळी लाटून एकसारख्या पुऱ्या वाटी किंवा ग्लासच्या सह्याय्याने कापूंन घ्याव्यात नाहीतर छोट्या छोट्या पुर्या लाटून तेलात खरपूस तळून घ्याव्यात .
कधी रिमझिम तर कधी धो धो कोसळणाऱ्या पावसाबरोबर एखाद्या संध्याकाळी आलं घातलेल्या वाफाळत्या चहाच्या कपा बरोबर ह्या पुरीचा आस्वाद घ्यावा :) हि पुरी गरमागरम मस्त लागतेच शिवाय २,३ दिवस टिकते तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता ..
प्रतिक्रिया
18 Jul 2017 - 3:49 pm | II श्रीमंत पेशवे II
वा .............झकास ...............
"हि पुरी गरमागरम मस्त लागतेच शिवाय २,३ दिवस टिकते तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाऊ शकता "
फोटो पण मस्त आलेत ...........
18 Jul 2017 - 3:57 pm | अजया
"नवीन" रेसिप्या करायला लागली पोरगी. ज्या मैत्रिणींचे डोके खाल्लेस त्या रेम्याडोक्या झाल्या अस्तील ना ;)
18 Jul 2017 - 4:00 pm | कौशी
आवडली पुरी...
18 Jul 2017 - 4:04 pm | सिरुसेरि
मस्त .
18 Jul 2017 - 5:32 pm | रेवती
पुर्या छान दिसतायत.
18 Jul 2017 - 6:22 pm | स्रुजा
अरे वाह ! आवडली गं ही पण सेसिपी पिश्वी. इकडची स्वारी - अग्गं बाई :) :) आता उखाणा पण घे च.
18 Jul 2017 - 6:30 pm | सूड
बर्या दिसतायेत. लिखाणात जाणवण्याइतपत सुधारणा आहे.
18 Jul 2017 - 7:25 pm | त्रिवेणी
आता लगे हाथ बिर्याणीची पण नवीन रेसिपी टाक.
19 Jul 2017 - 1:40 pm | दिपक.कुवेत
माझ्या ऑल टाईम फेवरेट. छ्या फोटो पाहून भुक लागली. फक्त बेसनाएवजी थोडा रवा घातला तर अजून जास्त छान लागतात.
19 Jul 2017 - 4:16 pm | पियुशा
रवा च घालणार होते किंवा तांदूळ पिठी पण तेल फार खराब होईल असं वाटलं मला राव्याणे म्हणून स्कीप केलं पुढल्या वेळी बघते तस करून :)
19 Jul 2017 - 5:26 pm | सस्नेह
मस्त !
अगदी सुबक पु-या आणि सुरेख फोटू !
पिवशीच्या तिकडच्या स्वारीस शुभेच्छा !!
19 Jul 2017 - 5:29 pm | पद्मावति
खमंग दिसताहेत पुर्या. खुप मस्त.
19 Jul 2017 - 8:56 pm | पिंगू
पुर्या तर भारी दिसताहेत.
20 Jul 2017 - 12:07 am | जुइ
पालक पुर्या अगदी गोल गर गरीत दिसत आहेत ;-)
20 Jul 2017 - 10:41 pm | नूतन सावंत
पापु दिसताहेत तर झकासच! नवीन नवीन प्रकार करून तिकडच्या स्वारीला अगदी खुश करून सोडायचा चंग बांधलेला दिसतोय,
20 Jul 2017 - 11:43 pm | इशा१२३
मजाय नविन स्वारीची :)झकास दिसताहेत पुर्या पिवडे ...