कुठलेही कडधान्य (आपल्या आवडीप्रमाणे ) भिजत घाला ... त्याला चांगले मोड येऊ द्यात .. हे मोड आलेले कडधान्य ,थोडे मीठ , तिखट, हळद (चवीपुरतं) टाकून मस्तपैकी हलवा ... गरम तव्यावर थोडे तेल टाका आणि पद्धतशीर परतून घ्या .. डिश तय्यार ... दही असेल सोबतीला तर अजून खाण्यास मजा येते ... करून बघा ..करून बघा .. एकदा बायकोशी भांडून बघा .... तिला पहिलं खायला द्या ...नंतर स्वतः खाल्लंत तरी चालेल
प्रतिक्रिया
7 Jul 2017 - 7:16 pm | लॉरी टांगटूंगकर
ही पाककृती अंडे घालून कशी करता येइल?
8 Jul 2017 - 9:08 am | माहितगार
विनोदाचा भाग सोडून द्या. अंडे +कडधान्य असलेल्या सोप्या चविष्ट नाष्ट्यासाठी, उकळत्या मॅगी सोबत मटकी उकडा आणि त्यावरच अंडे फोडा. वेळ वाचतो चविष्ट अंडेके साथ मटकीवाली मॅगी भी !
8 Jul 2017 - 9:10 am | माहितगार
मटकी मोड आणलेली हे सांगायचे राहीले
7 Jul 2017 - 7:25 pm | सिद्धेश्वर विला...
अंड्याला पण भिजवत ठेवा
मोड येतायत का ते बघा
आले तरच आले टाकून कुटून घ्या
मग मस्तपैकी फोडणी द्या
डिश तय्यार
7 Jul 2017 - 7:33 pm | सिद्धेश्वर विला...
खरंच करायचं असेल तर अंड फोडून अस्संच टाकलं तरी चालत ... मस्त लागत .. करून बघा .. करून बघा .. एकदा बायकोशी भांडून बघा ....
7 Jul 2017 - 8:05 pm | सूड
तुम्ही ही पाकृ अंडं घालून केली आहे का?
7 Jul 2017 - 9:13 pm | मुक्त विहारि
आजकाल काही सांगता येत नाही....
(अर्थात वरील प्रतिसाद हा "सूड" ह्यांनाच आहे.)
7 Jul 2017 - 9:18 pm | सप्तरंगी
यात अंडे घालून बायकोला खायला द्याल तर तुमचे काही खरे नाही....
7 Jul 2017 - 10:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
ही पाकृ अंड्याऐवजी पनीर घालून करता येईल का ?
(मिपाचा IP Rights / पेटंट असलेला प्रश्न, साभार :) ;) )
7 Jul 2017 - 10:37 pm | दशानन
=))
तूम्हाला दसऱ्याच्या सभेच्छा :P
7 Jul 2017 - 10:36 pm | दशानन
शकतो आपले लग्न झाले नसावे!
*मिपाकर असल्या लेखाला का साद देत बसले आहेत ऑ ;)
8 Jul 2017 - 7:32 am | दो-पहिया
अहो ही डिश चांगली झाली तर बायको सारखीच भांडू लागेल याचा विचार केला आहे का?