रावेरखेडी २

अमरेंद्र बाहुबली's picture
अमरेंद्र बाहुबली in भटकंती
3 Jul 2017 - 1:05 am

इंदौर बायपास ला एका छोट्या हाँटेलवर आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. तिथे चहा , कचोरी व पोहे घेतले. व पुढे निघालो. इंदौर शहरात प्रवेश न करता बाय पास हुन गाडी डावीकडे ओंकारेश्वर रस्त्याला वळली. हा रस्ता पूर्ण ओमकारेश्वर पर्यंत व्यवस्थित आहे. इंदौर हुन ओमकारेश्वर चे अंतर ८० की.मी.
पुढे १० की.मी जाताच टोलनाका लागला. त्या ठिकाणी २० रु. टोल देऊन पुढे निघालो. पुढे सीमरोल जवळ रस्त्याच्या कडेला भलीमोठी पाईपलाईन दिसली. तीच्यावर नर्मदा~क्षिप्रा योजना असे लिहीले होते. व बाजूलाच म. प्र. चे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांचा फोटो होता.( उज्जैनची क्षिप्रा नदी पाण्याआभावी सुकत आल्याने नर्मदेचे पाणी उचलून ते क्षिप्रा नदीत सोडण्याची म.प्र. सरकारची ही महत्वाकांक्षीव खर्चिक योजना आहे.) .
म.प्र. शात इंदौर च्या पुढे माळवा भागात संपुर्ण मैदानी प्रदेश आहे. कुठेतरी दूर एखादी टेकडी दिसते. पण ईथे नर्मदा घाटात डोंगरदर्या व घाटाचा रस्ता पाहुण महाराष्ट्रात फीरत असल्याचा फील आला. आम्ही गाडीतील सर्व जण जास्त गप्पा न करता बाहेरच्या हिरव्यागार घाटाचा आनंद घेत होतो. जानेवारी चा महीना असल्याने बोचरी थंडी जाणवत होती. पुढे एखाद तासाने चालकाने त्याचे एनर्जी फूड ( विमल, बिडीचा बंडल वैगेरे ) घेण्यासाठी गाडी थांबवली. आम्ही देखील बिस्लेरी वगैरे घेतली. ह्या संपूर्ण रस्त्यावर गावे कमीच. असलीच तर तुरळक लोकवस्तीची. बहुतेक ह्या भागात शेती कमी असल्याने. हाँटेल्स ही फार कमी.
पुढे बडवाह जवळ एक फाटा फुटून ओमकारेश्वर ला जातो. बडवाह व सनावद ही नर्मदेच्या दोन्ही बाजुला वसलेली जुळी शहरे. फाट्याच्या पुढे नर्मदे च्या विशाल पात्रावरील लांबलचक पुल ओलांडून ओमकारेश्वर पोहचावे लागते. त्या प्रमाणे आम्ही ओमकारेश्वर पोहोचलो.

ओमकारेश्वर! ओमकार मांधाता! शिवशंकराच्या भारतातल्या बारा ज्योतीर्लींगापैकी एक! नर्मदेच्या पात्रात निसर्गतः निर्माण झालेल्या एका प्रचंड विशाल बेटावर हे प्राचीन मंदिर वसले आहे.
मंदिरात जाण्यासाठी एंट्री साठी एक व एक्सीट साठी एक असे दोन भलेमोठे उंच पुल बांधले आहेत. पुला खाली नर्मदेच्या पात्रात छान बोटींग चालते.
नर्मदेवरील पुल
.
काही दिवसांपूर्वीच ऊज्जैन चा कुंभमेळा संपल्याने गर्दी तशी कमीच होती. पण गर्दी व्यवस्थापनाच्या खाणाखुणा स्पष्ट दिसत होत्या.
आम्ही गाडी एक्सीट पुलाकडे पार्क केल्याने आम्ही एक्सीट नेच एंट्री केली. पुलावर पोहोचताच सेल्फी स्टीक काढुन क्लिककिकाट सूरू झाला.
हम पांच ( मागे मंदीर)
.

भरपूर फोटो काढल्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. गर्दी नाही म्हटलं तरी बरीच होती. मंदीराच्या आतील बांधकाम जूने होते. खांब देखील रेखीव होते.
.
मंदिरात रांग बरीच मोठी असल्याने हळुहळू पुढे सरकत होती.
दर्शन घेऊन बाहेर निघायला जवळ जवळ पाऊन तास गेला. बाहेर आल्या नंतर भरपूर वेळ सर्वांनी नर्मदेचे सुंदर पात्र न्याहाळल. बाजूलाच नर्मदेवर मंदीराच्या चांगल्या जवळच एक उंच धरण बांधलय.
.
बाकी सर्व जन आजूबाजूला समाधी बद्दल विचारत होते. त्यापैकी एकाने आम्हाला व्यवस्थीत रस्ता सांगीतला तो असा सनावद~बेडीया~पीपलगोन रोड व पीपलगोनरोड वर बोर्ड दिसल्यावर उजवीकडे वळायचं. त्याच्या म्हणण्यानुसार अंतर ओमकारेश्वर पासुन २० कि.मी.
त्याप्रमाणे गाडी रावेरखेडी च्या दिशेने रवाणा झाली.
क्रमशः

प्रतिक्रिया

मनिमौ's picture

3 Jul 2017 - 3:51 pm | मनिमौ

पुढचे भाग पण येऊदे. बादवे म प्र मध्ये पवार ही एक वेगळी जमात असून त्यांची स्वताची पवारी बोली देखील आहे.

छान माहिती , चांगलं लिहिताय , लेख अजुनी मोठे केले तरी चालतील .

पैसा's picture

3 Jul 2017 - 5:15 pm | पैसा

लवकर लिहा

Ranapratap's picture

3 Jul 2017 - 7:57 pm | Ranapratap

लेखन जमतंय, लिहीत रहा.

पद्मावति's picture

3 Jul 2017 - 9:37 pm | पद्मावति

वाचतेय. 'नये साल का पहीला "जाम" आपके नाम :)
पु.भा.प्र.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Jul 2017 - 12:43 am | अमरेंद्र बाहुबली

पु. भा. प्र. म्हणजे?

राघवेंद्र's picture

4 Jul 2017 - 2:37 am | राघवेंद्र

मस्त चालु आहे सहल!!!

पुढील भागाच्या प्रतीक्षेत ( पु. भा. प्र .)

अजया's picture

4 Jul 2017 - 4:39 pm | अजया

वाचतेय. पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

4 Jul 2017 - 10:32 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

इरसाल कार्टं's picture

5 Jul 2017 - 3:33 pm | इरसाल कार्टं

पुभाप्र