अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग १
अंदमान : मोअर दॅन अ होम अवे फ्रोम होम भाग २
नंतर आम्ही चिडिया टापू भागाकडे जात होतो. हा भाग पोर्ट ब्लेअर च्या दक्षिणेला आहे. नावावरुन कळलंच असेल याला चिडिया टापू का म्हणतात. घनदाट अरण्य, वेगवेगळे पक्षी, अंगावर नाचणारी फुलपाखरं ,वेगवेगळे किडे अशी एक टिपीकल एवरग्रीन फॉरेस्टमधली इको सिस्टम आहे ही. पण फक्त तेवढच नाहीये, ह्या सगळ्याला समुद्र किनार्याची जोड आहे, त्यामुळे समुद्री वैभवही आहे. फोटो बघुन लक्षात येईलच. फुलपाखरं आणि पक्षी क्यामेर्यात कैद नाही करु शकले :( आम्ही फुलपाखरं बघुन थांबलो एके ठिकाणी तर ती आमच्याच अंगावर नाचत होती. फार मजा आली अशी अंगा खांद्यावर बागडुन उडणारी फुलपाखरं बघताना.
वाटेत एके ठिकाणी आम्ही आमच्या शिदोर्या सोडुन खायला बसलो, तिथे काही पोरं मासे पकडत होती आणि कितीतरी जेलीफिश कार्टून सारखे बागडत होते. खायचं सोडून त्यांनाच बघत बसलो आम्ही. अश्या वेळी मी नेहमी एक गोष्ट पाळते आणि इतरांनाही सांगते, माश्यांना किंवा इन जनरल कोणत्याही जंगली प्राण्याला तुमच्याकडचा खाऊ आयुष्यात देऊ नका, आणि पर्यावरणाचे /निसर्गाचे नियम पाळा. अंदमानी लोक कसोशीने हे नियम पाळतात. आपण तिथे जाऊन तिथला तोल बिघडवु नये.
मग आम्ही पुढच्या रस्त्याला लागलो तर एक बॉटॅनिकल झूलोजिकल गार्डन लागलं. तिथे अंदमानी मगरी , घोरपडी , अस्वलं, अंदमानी पक्षी त्यांच्या हॅबिटॅट मधे स्वच्छंद बागडताना बघितले, प्रत्येक झाडावर त्याचं सायंटिफिक नाव लावलं होतं. तिथुन बाहेर पडेस्तो जोरदार पाऊस आला. खूप भिजले पावसात. अंदमानमधला पाऊस खूप बेधुंद असतो, कोणत्याही वेळी कोणत्याही दिशेने कितीही वेळ पाऊस कोसळु शकतो. मुसळधार पाऊस म्हणजे काय ह्याचा अनुभव घेतला. मग तिथुन अजुन थोडं पुढे मुंडा पहाड च्या पायथ्याला मुंडा पहाड बीच वर पोचलो. तिथे थोडा क्लिकक्लिकाट केला मग सुरक्षित क्षेत्रात आंघोळ केली. कपडे बदलायला आणि शावर घ्यायला सरकारने व्यवस्था केलीय लाकडी घरांची तिथे जाऊन कपडे बदलले आणि पुढल्या वाटेला लागलो.
सुनामीमधे पडलेल्या झाडांचा आता असा उपयोग केला आहे
अंघोळीसाठीचे सुरक्षित क्षेत्र जाळीने मार्क केलय . इथे प्रत्येक बीचवर लाईफगार्ड, पोलीस कंपल्सरी असतातच. आणि अंघोळीसाठी सुरक्षित क्षेत्र मार्क करतात. पर्यटकांनी त्या क्षेत्राच्या बाहेर जाऊ नये अशी अपेक्षा असते.
मग आम्ही जिथे गेलो ती जागा माझ्यासाठी स्वर्ग होती. त्या गावाचं नाव मंजेरी . पुर्ण रिजर्व फॉरेस्ट एरिया. तिथे जाण्यासाठी परमिट काढावं लागतं. ही जागा महात्मा गांधी नॅशनल मरिन पार्क चा एक हिस्सा असलेल्या १५ बेटांपैकी एक आहे.
हे मंजेरीच्या वाटेतले फोटो
इथल्या दलदलीत मगरी आहेत
@ मंजेरी फॉरेस्ट चेक पोस्ट.
@मंजेरी जेटी
इथे फॉरेस्ट पोस्ट पासून ७-८किमी आत घनदाट जंगलात ही एक जेटी आहे. आम्ही तिथे गेलो आणि मला परत यायचच नव्हत!! एक तर तिथे अज्जिबात माणसं नव्हती. फक्त आम्ही दोघंच आणि सोबतीला इतका सुंदर निसर्ग. आम्ही पोचलो तेव्हा भरती येत होती तिथे. काय काय नाही पहिलं तिथे? हजारो प्रकारचे जिवंत कोरल्स, आजपर्यंत फक्त डिस्कवरी वर पाहिलेले मासे, मगरीने एका मोठ्या माशाला खातानाचा लाईव्ह शो, माश्यांचे खेळ बापरे!!! शब्दातीत अनुभव होता.
आमचं वाहन
इथुन तृप्त मनाने निघालो तेव्हा ५ वाजले होते. लगेच सुर्यराव पश्चिमेला गुडुप होणार होते . वाटेत कुठेतरी हा सुर्यास्त टिपला .
उद्या महात्मा गांधी नॅशनल मरिन पार्क चा एक भाग असलेलं जॉली बॉय बेट बघायचं अस ठरवुनच गुडुप झालो अंधारात.
क्रमशः
प्रतिक्रिया
28 Jun 2017 - 5:05 pm | पिशी अबोली
सुरेख!
28 Jun 2017 - 5:45 pm | धर्मराजमुटके
अप्रतिम ! भारताच्याच मालकीचं इतक सुंदर ठिकाण आहे. परदेशातील जलपर्यटनाचा विचार करण्याअगोदर अगोदर इथे भेट देणे आवश्यक आहे.
29 Jun 2017 - 2:51 am | रुपी
सुरेख!
अंगावर नाचणारी फुलपाखरे! किती छान अनुभव असेल! अश्या आठवणी कॅमेर्यात कैदे करण्यापेक्षा मनात जपून ठेवणेच जास्त सुखद.
या भागाची बरीच वाट पाहायला लावली. आता पुढचा भाग लवकर येऊ दे.
29 Jun 2017 - 3:37 am | इडली डोसा
छान झाला हा भाग पण, लवकर लिहि आता पुढचा भाग
29 Jun 2017 - 9:36 am | हर्मायनी
किती सुंदर अनुभव ! फोटोज हि खूप छान ! :)
29 Jun 2017 - 10:18 am | एस
भन्नाट!
29 Jun 2017 - 10:18 am | एस
भन्नाट!
29 Jun 2017 - 10:34 am | दुर्गविहारी
मस्त माहिती !! अंदमान केव्हापासुन बकेट लिस्टमधे आहे. या लेखमालिकेमुळे जमवावेच लागेल.पु.भा.प्र.
29 Jun 2017 - 6:07 pm | सूड
भारीच! जाण्याचा योग कधी येतोय बघू.
29 Jun 2017 - 7:04 pm | सुबोध खरे
अंदमान येथील समुद्र नि निसर्ग अतिशय सुंदर आहे आणि जगातील कोणत्याही उत्कृष्ट सागरी पर्यटनाशी सहज तुलना करता येईल इतका आहे. पण भारतीय मनोवृत्तीप्रमाणे ( अरे तिकडे गेलो तर भारतात आहोत असे वाटतच नाही) असे उद्गार ऐकू येतात.
एक विशेष सूचना -- जेली फिश दिसायला जितके छान असतात तितकेच ते भयानक विषारी असतात आणि त्यांचा स्पर्श झाला तर विंचू चावल्यासारख्या भयानक वेदना असतात तेंव्हा त्यांना हात लावून पाहण्याचा विचार सुद्धा करू नये.
http://www.mayoclinic.org/diseases-conditions/jellyfish-stings/basics/de...
प्रीत मोहर ताई
आपले लेखन सुंदर आणि फोटो अतिशय नेत्रदीपक आहेत. पुनःप्रत्ययाचा आनंद झाला
फोटोत दिसतो त्यापेक्षा प्रत्यक्ष निसर्ग कित्येक पटीने सुंदर आहे.
धन्यवाद
29 Jun 2017 - 7:44 pm | प्रीत-मोहर
धन्यवाद खरेकाका
तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. काही जेलीफिशेस ना हात लावल्यास अर्धांगाचे झटके ही येतात.
पण आम्ही हातात घेतलेले जेलीफिश मस्त होते. जोली बोय च्या सफरीत, जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली हात लावला होता. शेंबडासारखा द्रव सोडला तर क्युट होते ते.
29 Jun 2017 - 8:05 pm | प्रचेतस
अंदमानला जावेसे वाटत आहे.
29 Jun 2017 - 8:31 pm | मंजूताई
अशी प्रवासवर्णने व फोटो वाचले की वाटतं तडक निघावं बैग पाठीवर टाकून...
29 Jun 2017 - 8:40 pm | दशानन
सुरेख लेखन आणि अप्रतिम छायाचित्रे!!
अंदमान आयुष्यात एकदा तरी भेट द्यावे असेच ठिकाण आहे.
29 Jun 2017 - 9:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
भन्न्नाट सुंदर दिसतो आहे हा प्रदेश ! वर्णन आणि फोटोही त्याची प्रचिती देणारे !
30 Jun 2017 - 8:00 am | मी कोण
अंदमान -- एक सुखद स्वप्न. ते पुर्ण होण्यासाठी शुभेच्छा द्या हिच पामराची विनंती
30 Jun 2017 - 8:15 am | मी कोण
फोटो मेमरी कशी आणि किती नेली होती? कमेरा कोणता वापरता?
30 Jun 2017 - 8:29 am | प्रीत-मोहर
क्यामेराबद्दल विचारताय मला, खर मला त्यातलं फारसं काही जमत नाही हो. फोटो चांगले आले असतील तर त्यात अंदमानच्या निसर्गाचा हात आहे फक्त. इतक असूनही खरे काका म्हणाले तसं फोटोपेक्षा जास्त सुंदर आहे अंदमान.
Camera: Nikon d3300,
८ gb ची २ मेमरी कार्ड. आणि एक एक्स्ट्रॉ ब्याटरी क्यामेराची फुल चार्ज. बाकी एस दांच्या टिप्स.
4 Jul 2017 - 1:40 am | पद्मावति
हाही भाग खुप आवडला.
4 Jul 2017 - 11:25 am | अप्पा जोगळेकर
सुंदर.
अजून तीन तरी भाग असतील ना / असावेत.
7 Jul 2017 - 7:53 pm | प्रीत-मोहर
सर्व प्रतिसादकांचे आभार.
11 Jul 2017 - 10:48 am | मिनेश
जॉली बॉय आयलॅंड ला आम्ही ग्लास बोट राईड केली होती त्याचा व्हिडिओ
https://youtu.be/W7Co1I2LNOQ
11 Jul 2017 - 10:49 am | मिनेश
जॉली बॉय आयलॅंड ला आम्ही ग्लास बोट राईड केली होती त्याचा व्हिडिओ
https://youtu.be/W7Co1I2LNOQ