मी आणि स्वीट टॉकरीणबाई नुकतेच झांबिया आणि केनियाचा दोन आठवड्यांचा फेरफटका मारून आलो.
कड्यावरून खाली उडी मारणे वगैरे अतिशहाणपणाच्या गोष्टी केल्या. तिथल्या प्राण्यांबद्दल तर विचारायलाच नको. व्हीडियो आणि फोटो बरेच घेतले. त्यांना कॉमेंटरी देऊन एक डॉक्युमेंटरी फीत तयार केली आणि तू-नळीवर टाकली आहे.
अर्ध्या तासाची आहे.
प्रतिक्रिया
21 Jun 2017 - 12:25 pm | दुर्गविहारी
थोड वर्णन व अनुभवही लिहा. यु ट्युबवर असे व्हिडीओ हजारो आहेत. तुमचे अनुभव महत्वाचे.
21 Jun 2017 - 1:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
खूप सुंदर अनुभव, व्हिडिओ आणि कॉमेंटरी !
21 Jun 2017 - 1:36 pm | स्वीट टॉकर
पूर्वी नियमितपणे लिहीत असूनदेखील गेले कित्येक महिने एकही शब्द लिहिलेला नाही त्याचं कारण हल्ली अजिबात वेळ होत नाही. इच्छा असूनदेखील वर्णन लिहिणं अशक्यच दिसत आहे. प्रयत्न करतो.
21 Jun 2017 - 2:13 pm | अत्रे
ट्रिप कशी प्लॅन केली? सविस्तर वाचायला आवडेल.
21 Jun 2017 - 7:02 pm | जव्हेरगंज
मराठीत ऐकायला मजा आली असती.
कड्यावरून खाली उडी मारणे वगैरे खतरनाक वाटले. मस्त!!!
22 Jun 2017 - 11:51 am | स्वीट टॉकर
जव्हेरगंज - मलाही मराठीत जास्त सोपं पडलं असतं पण माझ्या अशा नोकरीमुळे माझे जितके मराठी मित्र आहेत तितकेच किंबहुना जास्त अमराठी आणि काही अभारतीय आहेत. त्यामुळे इंग्रजीला पर्याय नव्हता.
22 Jun 2017 - 12:41 pm | पुंबा
अहाहा.. घरी गेल्या गेल्या ऐकणार..
बादवे, तुम्ही लिहा परत काही तरी मस्त..
22 Jun 2017 - 9:52 pm | सही रे सई
कड्यावरून खाली उडी मारणे फारच भन्नाट.. खरच हे सगळ मराठीतून तुम्ही इथे लिहाच अशी आग्रहाची विनंती
23 Jun 2017 - 4:48 am | कंजूस
स्लाइडशोमधले फोटो छान आहेत. विशेषत: धबधब्याचे.
लिहिण्यास वेळ नसल्यास मराठी ओडिओ क्लिप देऊ शकता. ( clyp dot it ).
23 Jun 2017 - 9:07 am | स्वीट टॉकर
तुमच्या व्यनितून संपर्क करीन.
23 Jun 2017 - 10:59 am | कंजूस
फार सोपं आहे आणि त्याचा ओडिओ प्लेअर इथे देता येतो ( लिंक द्यावी लागत नाही). एमपी३ फाइल असेल तर दहा मिनिटाला तीन एमबी होते. त्यासोबत चारपाच फोटो दिलेत की झालं काम.
25 Jun 2017 - 10:23 pm | ठुसकीसोडा
ह्या लेख चे शीर्षक बघून अत्यानंद झाला ... केवढे वर्षांपासून मिसळपाव वाचतोय .. पण kadhi लिहिण्याची सुबुद्धी झाली नाही.. आज खरंच झाली मित्रांनो ...मिसळपाव वर सगळे लेखन आणि लेखकांना मी फालो करतो जवळ जवळ ८ वर्षांपासून.. माझा २००९ पासूनचे आयुष्य भारत -आफ्रिका आणि काही आशिया मधले देश मी पालथे घातले आहेत ...विशेष करून माझी पयली भेट हि केनिया आणि झांबिया लाच होती ......बस्स्स्स्स आता मी नक्की लिहिणार ..गॉड मानून घ्या
25 Jun 2017 - 11:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
जरूर लिहा. तुमच्या लेखाची वाट पाहत आहे.
27 Jun 2017 - 4:07 am | मुक्त विहारि
मस्त
27 Jun 2017 - 3:55 pm | धर्मराजमुटके
स्लाइडशोमधले फोटो छान आहेत. विशेषत: धबधब्याचे.
29 Jun 2017 - 11:26 am | दिपस्वराज
.......माझीही अशीच अवस्था आहे. गेल्या तीन चार वर्ष्यापासून निमित मिपावरचे लेख वाचतोय , खासकरून भटकंतीचे पण लिहिण्याचा धीर होत नव्हता. मोदकरावांशी बोलून, किल्लेदारांचा सल्ला घेऊन लडाख ट्रिप यशस्वी केली. ते अनुभव शेअर करायचे आहेत. बस आता ठरलं ....लवकरच एक लेख लिहिणार ...गॉड मानून घ्या