मुलींची नावे इ / आ कारान्त, मुलांची अ कारान्त असे का?

कपिल काळे's picture
कपिल काळे in काथ्याकूट
25 Feb 2009 - 10:21 pm
गाभा: 

बहुतेक माझ्याआधी हे बरयाच जणांनी निरिक्षण केलेच असेल की मुलींची नावे बहुतेक करुन इ कारान्त किंवा आ कारान्त असतात. उदा प्राजक्ता, नयना, साधना, अरुणा, सुषमा, सोनिया, अंबिका,सरोजिनी, रेवती, अदिती,वगैरे. अगदी इंग्रजी नावे पहिली तरी लिसा, मार्था, ब्रेन्डा, अशीच बहुतेक आढळतील.

ह्यात पूनम, सोनम, सुझान, एलिझाबेथ, केट असे काहीच अ कारान्त अपवाद दिसतील.

तर असे का?

तसेच मुलांची नावे संजय, महेश,चित्तरंजन, सुनीत, मिलिंद,विनायक, बिपिन, प्रमोद, पराग, यशवंत, शिरिष, आशिष, सुनील , सचिन, कपिल अशी बहुतेक अ कारान्त आढळतील

हे ही कोण समजून सांगू शकेल काय?

आडनावांच्या बाबतीत कोणाचे काही निरिक्षण आहे काय?

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

25 Feb 2009 - 10:23 pm | विनायक प्रभू

लै भारी सायन्स आहे त्यात

कपिल काळे's picture

25 Feb 2009 - 10:26 pm | कपिल काळे

लै भारी क्रिप्टीक!! इचार केल्यावर उमगेल.. क्ल्यू....

विनायक प्रभू's picture

25 Feb 2009 - 10:29 pm | विनायक प्रभू

पाध्ये मारतील क्लु इथे दिला तर

योगी९००'s picture

25 Feb 2009 - 11:00 pm | योगी९००

मुली
कमल, सुमन, विमल

मुले
अश्वत्थामा, रमणी ,क्रुष्णमुर्ती ( शेवटची दोन दक्षिणेकडील आहेत),

'तात्या' हे पण आकारान्तच आहे..

खादाडमाऊ (ऊ कारान्त नाव)

शिवापा's picture

26 Feb 2009 - 12:24 am | शिवापा

मला गरगरायला होतय. पण कायतरी लय डेंजर असलं. श्ठीपन हांकीग ला महित आसलं का? नायतर याचा जगबुडीच्या december 2012 शी कायतरि संभद असल बाबा.

सनस्कृत मधे स्त्रिलिन्गि नामे ही फक्त आकारान्त किंवा ईकारांत आहेत आणि पुल्लिंगी नामे अकारान्त आहेत . जर मराठी नावांचे मूळ संस्कृत भाषेत आहे असे मानले तर हे तरक्य वाटावे. जर आकारान्त पुल्लिंगी नामे असतील तर नाम चालवने या व्याकरणा नुसार ती स्त्रीलिंगी नामा प्रमाने चालवली जातात. उदा. संस्कृत भाषेत "कमल" हे नाम "राम" या नामा प्रमानेच चालेल . म्हणजेच त्या नामा ला पुल्लिंगी नामाचे विभक्ती प्रत्यय लागतील .

आशा आहे तुम्हाला या प्रतिसादाने थोडी फार मदत होईल.

अमोल नागपूरकर's picture

27 Feb 2009 - 1:10 pm | अमोल नागपूरकर

सन्स्क्रित मध्ये रवि, हरि, विष्णु अशी इ, उ करन्त नावे आहेत. ती मराठीत येताना ई, ऊ कारान्त होतात.

ढ's picture

27 Feb 2009 - 1:36 pm |

शनिवारवाडा नाव ठेवीन....मुलगी माझी आहे की..
इति. दिलीप प्रभावळकर ( हसवा फसवी )

ऍडीजोशी's picture

27 Feb 2009 - 1:38 pm | ऍडीजोशी (not verified)

६ फूट उंच, १०० किलो वजन, पोट सुटलेलं, धाढी वाढलेली अशा व्यक्ती नी येऊन सांगितलं माझं नाव 'माधुरी' आहे तर कसं वाटेल?