गाभा:
गेल्या काही दिवसात मिपावरुन उडणार्या आयडींचे प्रमाण वाढलेले दिसते. गटणे, सोम, शनि व आता सर्किट.... (काही नावे नजर चुकीने राहीली असतील तर चु.भु.दे.घे.)
पण हे असे आयडी मिपावरुन का उडतात हा महत्वाचा प्रश्न आहे. जर संरपंच किंवा संपादक मंडळ आयडी काही कारणास्तव उडवत असतील तर त्याचे कारण आमजनतेला कळले तर बरे होइल असे वाटते. जेणेकरून अश्या काही गंभीर आणि येथील स्वास्थ्य बिघडवणार्या गोष्टी आपण केल्या तर आपलाही आयडी उडू शकतो असा संदेश प्रत्तेका पर्यंत पोहोचेल आणि अश्या गोष्टीना थोडा तरी आळा बसेल असे वाटते.
वाविप्र सारखा वेगळा विभाग अथवा धागा काधुन त्यात उडालेला आयडी व त्याचे कारण जाहीर करण्याची काही सोय करता येईल काय?
अर्थात आणिबाणी असल्याने आशा जो निर्णय घेईल तो मान्य असेल हे वेगळे सांगायची गरज नाही.
प्रतिक्रिया
24 Feb 2009 - 6:59 pm | अवलिया
अर्थात आणिबाणी असल्याने आशा जो निर्णय घेईल तो मान्य असेल हे वेगळे सांगायची गरज नाही.
ही आशा कोणता आणी कोणाचा आयडी आहे?
--अवलिया
24 Feb 2009 - 8:00 pm | ब्रिटिश टिंग्या
नाही!
24 Feb 2009 - 6:58 pm | अभिज्ञ
सर्किट यांचे आयडिचे पान उघडत नाहिये.
काहितरि तांत्रिक गडबड आहे काय?
अभिज्ञ.
24 Feb 2009 - 6:59 pm | विनायक प्रभू
निराशेची बहीण
24 Feb 2009 - 8:27 pm | मुक्तसुनीत
संपादक कुणाचाही आय्डी उडवू शकत नाहीत. हे अधिकार केवळ तात्यांना आणि नीलकांत याना आहेत.
कळावे.
25 Feb 2009 - 7:17 am | विसोबा खेचर
अर्थात आणिबाणी असल्याने
करेक्ट! इथेच सर्व विषय संपतात..
अर्थात, ज्यांना इथे काही स्वान्तसुखाय निवांत लिहायचे आहे, वाचायचे आहे त्यांच्या आयडीला कसलाही धोका नाही आणि नसेल हे बहुतांशी मिपाकरांना मान्य व्हावं!
आशा जो निर्णय घेईल तो मान्य असेल हे वेगळे सांगायची गरज नाही.
आशा कोण?? ;)
आपला,
(आशावादी अविवाहीत ;) ) तात्या.
25 Feb 2009 - 9:44 am | सातारकर
आशा = आणिबाणीचा शासनकर्ता
असं आहे का?
25 Feb 2009 - 10:34 am | सुनील
>:D<
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.