कोकणात कुठे फिरावे ? काय बघावे? कुठे रहावे ?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in भटकंती
26 May 2017 - 12:22 pm

मित्रहो, येत्या ऑगस्ट महिन्यात साधारणतः १२ ते १६ तारखेच्या दरम्यान कोकणात फिरायला जावे असा बेत आहे. आम्ही दोघे, मुलगा-सून आणि ६ वर्षांचा नातू असे पाच जण असू. गणपतीपुळे व आसपासचा परिसर पूर्वी बघितलेला आहे. गर्दीच्या जागा किंवा प्रसिद्ध देवस्थाने वगैरे नकोत. शांत, निसर्गरम्य समुद्रकिनारा, धबधबे, किल्ले, लहान खेडी, अप्रसिद्ध पण सुंदर मंदिरे/लेणी असे काही बघायला मिळाले तर बरे. या संदर्भात कुठे कुठे जात येईल, रहाण्याची/जेवण्याची सोय कुठे करावी, पुण्यापासूनच गाडी करून जावे किंवा कसे ? गाडीचा खर्च अदमासे किती येईल ? वेळ किती लागेल ? (पुण्यातून निघून परत पुण्यालाच यायचे आहे). त्यावेळी फार पाऊस असेल का? संभावित त्रास काही आहेत का? त्याबद्दल काय खबरदारी घ्यावी? ..... वगैरे माहिती दिल्यास खूप मदत होईल.
पुण्यापासून गाडीने जाताना वाटेत काही खास बघण्याजोगे असल्यास तेही कळवावे.

प्रतिक्रिया

shaileshd's picture

26 May 2017 - 3:46 pm | shaileshd

Ladghar, near Dapoli.

Try Blue Breeze Resort

अद्द्या's picture

26 May 2017 - 4:14 pm | अद्द्या

http://www.misalpav.com/node/१९७०३

हा धागा एकदा बघता का ?

अद्द्या's picture

26 May 2017 - 4:24 pm | अद्द्या

आणि हो.. त्यात गविंचे प्रतिसाद वाचा हे वेगळं सांगायला नकीच आहे :D

माझी एक छोटीशी भर त्यात .( मी बाईकवर जेवढा फिरलोय .. आणि तेही खूप कमी.. तेवढाच सांगू शकतो )
अगदी वरून सुरुवात केली तर चिपळूण भागात गेल्यावर लोटे परशुराम करू शकता , तसंही गणपतीपुळे चुकवता आहेत.. त्यामुळे मग पुढे गुहाघर ला व्याडेश्वराला जाऊ शकतो . तिथे देऊळ हि बघता येईल. छोटं आहे तसं पण अगदी शांत आहे देऊळ, आणि अगदी किनाऱ्यावर आहे. त्यामुळे ते हि होईल . देव दर्शनाचा कंटाळा नसेल आला या दोन्ही नंतर . तर मग देवगड मध्ये कुणकेश्वर करता येईल. हे हि देऊळ किनाऱ्यावर आहे. पण तिथे पाण्यात उतरता नाही येत, कारण किनारा लगेच खाली उतरतो.
ऑगस्त महिन्यात जातंय त्यामुळे बहुदा सिंधुदुर्ग बंद असेल. पण मालवण ला तारकर्ली बीच ला जाता येईल . महाराष्ट्र सरकारचेच रिसॉर्ट आहे तिथे. आणि किनारा अगदी स्वछ आहे आणि गर्दी हि जास्ती नसते . जवळ वेंगुर्ल्यात आला कि रेडी देवस्थान करता येईल . तिथून जवळच खाली शिरोडा , अरावली बीच आहेतच . शिरोडा गावात मग वेताळेश्वराचं देऊळ हि आहे. काही वर्षा पूर्वी कौलारू होतं. आता दगडी बांधलंय पूर्ण .

इतर लोक बाकी माहिती देतीलच . आणि हो .. जर शिरोड्यापर्यंत आलाच. तर मग सावंतवाडीत येऊन भालेकर खानावळीत जेवायला विसरू नका ( मासे आवडत असतील तर )

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

26 May 2017 - 4:36 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

पावसपासून जवळ आडीवरे आहे ,छान मंदीर आहे तिथे.तिथल्या आडातले गोड पाणी खूप छान लागते.
गुहागरजवळ वेळणेश्वर बिच आहे.तोही छान .

Ranapratap's picture

26 May 2017 - 6:36 pm | Ranapratap

डेरवण ची शिवसृष्टी पहा, चिपळूण पासून जवळ आहे.

भटकंती अनलिमिटेड's picture

26 May 2017 - 7:23 pm | भटकंती अनलिमिटेड

गाडी कुठूनही करा, ती दिवसाला ३०० किमी या हिशेबाने पैसे घेणारच. झूमकारचा पर्याय बघू शकता.
दापोलीच्या आसपास गेलात तर शांत, निसर्गरम्य समुद्रकिनारा, धबधबे, किल्ले, लहान खेडी, अप्रसिद्ध पण सुंदर मंदिरे/लेणी असे सारे काही बघता येईल.

काका, दापोली चा भाग करा, १२ ते १६ म्हणजे चांगले ५ दिवस आहेत की,
केळशी - आंजर्ले - मुरुड - हर्णे बंदर - कर्दे - लाडघर हे समुद्रकिनारे होउ शकतील, पैकी कर्दे मुक्काम करायला छान आहे भरपुर घरगुती राहाण्याची सोय आहे , मासे खाणारे असाल तर हर्णे बंदर ला लिलाव भरतो रोज दुपारी ४ वाजता, बर्‍याच घरगुति खानावळ मासे बनवाय्चे २५०/३०० रुपये घेतात. कड्यावरचा गणपती पण करता येइल, गुहागर होउ शकेन, दापोली ते गुहागर साधारण ५० किमी आहे.

गणपतीचे दिवस,बदाबदा पाऊस पाहता कोकण नको.
( हे माझे मत)
पर्याय: वापी परिसर
१)दमण, समुद्र,एक किल्ला पर्यटन करमणूक केन्द्र. दमण उत्सव ओगस्टमध्ये असतो.
२) दादरा गार्डन ,खानवेल पर्यटन,तलाव
हे सर्व ३५-५० किमी भागात आहे. वापीच्या पश्चिम -पूर्व २० किमीटरात.
मुंबई अहमदाबाद हायवेवर मुं वापी १८० किमी.
पाऊस कमी असतो.
( यावेळी नाही तर पुढच्यावेळीसाठी)
मुले खुश होतील.

पुण्यातून जाणार आहात तर, ताम्हिणी घाटाचा आंनद घेत.. श्रीवर्धन, हरिहरेश्वर करत पार खाली उतरत जावा! कोकणात काय बघेल तेथे सौंदर्य भरलेले आहेच.

जयंत कुलकर्णी's picture

27 May 2017 - 1:35 pm | जयंत कुलकर्णी

तुम्ही ट्रिप रद्द करू नये म्हणून ... :-)
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तुषार काळभोर's picture

27 May 2017 - 2:25 pm | तुषार काळभोर

"गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त

हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त"

चौथा कोनाडा's picture

29 May 2017 - 8:49 pm | चौथा कोनाडा

+१
सही फर्माया |

धरती पर अगर कहीं स्वर्ग है,
तो यहीं है, यहीं है, यही हैं |

वाह, कोकणाचं अजून काय वर्णन करायचं !

चित्रगुप्त's picture

27 May 2017 - 5:15 pm | चित्रगुप्त

जबरदस्त दृष्य जयंतराव. नेमके कुठले आहे ?

जयंत कुलकर्णी's picture

27 May 2017 - 5:41 pm | जयंत कुलकर्णी

लोटे परशूराम वरून खालच्या वशिष्ठी नदीचे.

चौकटराजा's picture

27 May 2017 - 4:24 pm | चौकटराजा

मी नुकतीच युरोपची ट्रीप करून आलो. काटकसरीची ट्रीप असा तिचा बेस होता. तसा "पावसाळ्याचे कोकण" असा आपला बेस असेल तर बेत जरूर करा. मुरूड,नागाव चौल ई भागाबरोबरच काशीद ही चांगले आहे. रेवदंडा इथे बिर्ला मंदीर प्रेक्षणीय. तसेच चौल येथून वर टेकडीवर दत्तमंदीर आहे तेथून खालील किनारा नारळाची गर्द झाडी मस्त दिसते. नागाव या भागात घरी राहून आपले मनपसंत जेवण घेण्याची सोय आहे.

चित्रगुप्त's picture

27 May 2017 - 5:02 pm | चित्रगुप्त

या धाग्यावर आपुलकीने विविध माहिती देत असल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. सध्या माझ्या डोळ्यांचा त्रास फार वाढलेला असल्याने दिवसातून अगदी थोडा वेळ लॅपटॉप उघडत आहे, त्यामुळे काही दिवसांनंतर मी इकडे जास्त लिहू शकेन, तरी माहिती देत रहावी.

सुनिल पाटकर's picture

27 May 2017 - 10:28 pm | सुनिल पाटकर

पावसाळ्यातील कोकणातील सौदर्य अप्रतिम असते.परंतु कोकणात पाऊस प्रचंड पडतो. दरडी कोसळणे, पूर येणे ,रस्त्यावरील पूलांवरुन पाणी जाणे असे प्रकार व आपत्ती घडत असतात त्यामुळे पावसाचा अंदाज व हे गृहित धरुन प्रवासाला बाहेर पडावे.तसे कोकण कधाही छानच..

सुनिल पाटकर's picture

27 May 2017 - 10:29 pm | सुनिल पाटकर

शिवथरघळ आवर्जून कराच

भ ट क्या खे ड वा ला's picture

28 May 2017 - 12:10 pm | भ ट क्या खे ड वा ला

पावसाळ्यात जाताय तर धुतपापेश्वर , राजापूर जवळ .
उग्र रुप असते धबधब्याचे ..

पुंबा's picture

29 May 2017 - 1:39 pm | पुंबा

हर्णे, आंजर्ली

मु॑बई-गोवा रस्त्यावरच्या हातख॑बा गावापासून साधारण १५-२० किलोमीटरवर मुम्बई- गोवा रस्त्यावरच पाली गाव लागत॑. पालीतून कोल्हापूरकडे जाणारा एक फाटा फुटतो. या रस्त्यावर ३-४ किलोमीटरवर डावीकडे जाणारा एक रस्ता लागतो. या रस्त्यावर "साठरे" नावाच॑ दरीत वसलेल॑ व बारमाही धबधब्यातून निघणार्या पाटाच॑ पाणी वापरणार॑ गाव लागत॑. दरीच्या काठापर्य॓त (ज्याला तिथे "धारेपर्यन्त" अस॑ म्हणतात) जायला मोटरेबल रस्ता आहे. धारेपासून गावात जाण्यासाठी कातळात खोदलेली उतर॓ड (जिला "घाटी"म्हणतात) आहे. पावसाळ्यात दगडी घाटी जरा निसरडी असेल, वाटेतल्या काही ओढ्या॑ना "फूग" (पूर) आली असेल. पण जाऊ शकलात तर पावसाळी "गच-पानात" लपलेल॓, झुळझुळत्या पाट-पाण्याच॑ एक अस्सल कोकणी खेड॑ पाहू शकाल! हातख॑बा येथे १-२ बरी हॉटेल्स आहेत, जिथे राहून ही ४-५ तासा॑ची ट्रिप करता येते.

प्रचेतस's picture

30 May 2017 - 8:57 am | प्रचेतस

पुणे-नागाव-चौल- रेवदंड्याचा किल्ला, कोर्लईचा किल्ला, कोर्लई गावात पोर्तुगीज, अरबी, मराठी आदींच्या मिश्रणातून तयार झालेली एक मिश्र भाषा (क्रिओल) ऐकता येईल.

कोर्लई करुन अतिशय स्वच्छ काशिद बीच पाहा. तिथे लाटा खूप उंच येतात. जाम मजा येते. फणसाड अभयराण्यात जाता येइल. आजूबाजूला काही रिसोर्ट्स आहेत. काशिद - फणसाड वरुन पुढे गेल्यास नांदगावचा स्वच्छ किनारा आहे. मध्ये मुरुड जंजिरा टाळून त्याच रस्त्याने दिवेआगर गाठा. वाटेत कुडा-मांदाडची लेणी करता येईल. दिवेआगरला मुक्कामाच्या आणि जेवणाच्या सोयी चांगल्या आहेत. बापटांची शुद्ध शाकाहारी खानावळ छान आहे. उकडीचे मोदक आवर्जुन खा. दिवेआगारला रूपनारायणाची अद्भूत मूर्ती बघता येईल. दिवेआगर करुन पुढे श्रीवर्धनचे पेशव्यांचे जन्मस्थान पाहून हरिहरेश्वर करता येईल.

वाह..!! छान माहिती दिली आहे उत्तर कोकणातली. नाहीतर आता कोकण म्हटल की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ल्ह्याचिच माहिती दिली जाते... रायगड जिल्हा सुधा कोकणातच येतो ह्याचा लोकांना विसर पडला आहे बहुतेक..

विजयदुर्ग फोर्ट जवळ - रामेश्वर मंदिर Rameshwar Mandir Girye

देवगड पासून जवळ - कुणकेश्वर मंदिर Kunkeshwar आणि Sri Vimaleshvar Temple, Maharashtra State Highway 4, Wada, Maharashtra

Rameshwar Mandir Girye व Sri Vimaleshvar Temple, Wada Google Map वर अस्सेच टाका

विमलेश्वर मंदिर नक्की पहा, मी जानेवारी मध्ये पाहिले आहे, पावसाळ्यामध्ये पहावयाचे बाकी आहे

शशिकांत ओक's picture

10 Jun 2017 - 10:32 pm | शशिकांत ओक

मित्रांनो, चित्रगुप्त पावसाळ्यात मुक्तपणे कोकणात जातील सुंदर चित्रे सादर करतील. त्या निमित्ताने आम्हा सर्व मिपाकरांच्या साठी देखील ही फर्माईश पर्वणी वाचायला मिळाली. धन्यवाद.