ओट्सचा झटपट उत्तपा

रुपी's picture
रुपी in पाककृती
27 May 2017 - 5:14 am

.

ओट्सचा आहारात कसा समावेश करावा हा प्रश्न बर्‍याचदा सतावतो. ओट्सचे बिस्कीट आवडतात, पण किती वेळा करणार, म्हणून हा एक प्रयोग करुन पाहिला. ओट्सचा डोसा, उत्तपा असे प्रकार ऐकले होते, पण शोधाशोध करण्याइतका वेळ नव्हता. म्हणून नेहमी रव्याचे उत्तपे करते तसेच ओट्सचे करुन पाहिले.
मस्त आणि फस्तही झाले! घाईत हाच फोटो बरा आला.

साहित्यः
२ वाट्या ओट्स (मिक्सरमध्ये बारीक करुन पूड करुन),
१ वाटी रवा,
दीड वाटी दही,
१ हि. मिरची बारीक चिरुन,
पाणी,
तेल,
मीठ,
१/२ टी. स्पून सोडा,
कांदा, कोथिंबीर बारीक चिरून

कृती:
१. ओट्सची पूड, रवा, दही एकत्र करा. उत्तपे, डोसे घालता येतील असे मिश्रण होईल इतपत पाणी घाला.
२. मीठ, मिरची, सोडा घालून एकत्र करुन घ्या. साधारण अर्धा तास झाकून ठेवा.
३. मध्यम आचेवर नॉनस्टीक पॅन गरम करुन तेलाचे ४-५ थेंब टाकून उत्तपा घाला.
४. वरुन कांदा, कोथिंबीर पसरवा (मी कोथिंबीरीऐवजी पालक बारीक चिरुन घातला).
५. २-३ मिनिटांनी उत्तपा उलटून दुसर्‍या बाजूने थोडासा भाजून घ्या.
गरम-गरम उत्तपा केचप, चटणीबरोबर खायला द्या.

प्रतिक्रिया

u

फोटो दिसेना.. प्लीज अ‍ॅड करा

राघवेंद्र's picture

27 May 2017 - 9:40 am | राघवेंद्र

मस्त एकदम!!!

पद्मावति's picture

27 May 2017 - 10:35 am | पद्मावति

मस्तच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2017 - 11:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी. अजून येवू द्या.

-दिलीप बिरुटे

रुपी's picture

28 May 2017 - 2:31 am | रुपी

धन्यवाद :)

कौशी's picture

28 May 2017 - 8:41 am | कौशी

फोटो खुप मस्त... आवडला.

भारीच. खाली काय आहे ते? तुम्हीच बनवलं आहे का?

एकदम बालिश प्रश्न वाटेल पण "ओट्स" म्हणजे काय?

सविता००१'s picture

28 May 2017 - 10:44 pm | सविता००१

मस्तच ग

रुपी's picture

29 May 2017 - 4:17 am | रुपी

धन्यवाद!

@एस भाऊ - नाही हो. माझ्यात इतकी कला कुठली? :) माझ्याकडे एक मॅट आहे ते चित्र असलेलं, त्यावर डीश ठेवून फोटो काढला.

@दशानन - ओट्स हे एक तृणधान्य आहे. मी वापरलेले ओट्सचा हा अ‍ॅमेझॉनवरुन फोटो. त्याची पूड करुन यात वापरलीये.

oats

हे हुग्गीचे गहू आहेत का? म्हणजे हे चपटे केले आहेत की असेच असतात?

रुपी's picture

30 May 2017 - 2:43 am | रुपी

"हुग्गीचे" म्हणजे काय?
हे गहू नाहीत. ओट्स (Oats) हे वेगळे धान्य आहे. हे फोटोमधले चपटे केलेले आहेत. त्यांना Rolled Oats म्हणतात.

पिलीयन रायडर's picture

29 May 2017 - 8:08 pm | पिलीयन रायडर

केले आजच. रव्या ऐवजी इडली रवा वापरला. ओट्स जास्त घेतले गेले बहुदा म्हणुन मिश्रण खुप चिकट झालं पण उत्तम झाले.

Uttape

वा. मस्तच जाळी पडली आहे.

अजया's picture

29 May 2017 - 9:49 pm | अजया

छान पाकृ रुपी :)