सुभाषिते हवी आहेत.

भाग्यश्री कुलकर्णी's picture
भाग्यश्री कुलकर्णी in काथ्याकूट
3 Oct 2009 - 10:40 am
गाभा: 

माझे हे मिपावरचे तसे पहिलेच लेखन आहे . कुठे लिहायचे ते न कळल्याने इथे लिहीत आहे.
शाळेत असताना एक ते दहा अंकांची गंमत असणारी दहा सुभाषिते होती.आता सगळी आठवत नाहीत.तरी जाणकारांनी माहित असल्यास ती द्यावी.काही शब्द चुकले असायचीही शक्यता आहे.(काही शब्द तर मला टंकता येत नाहित निटसे.)

एकः स्वादिष्ट मश्नाति वस्ते वासश्च् शोभनम्
यो संविभुज्य भ्रुत्येभ्या कों न्रुश् सतरस्तथा 1

द्वामिमा वुदधो क्षेप्यो कंठे बध्वां द्रुढांम शीलाम
श्रीमान् न योहर्ते दत्ते दारिद्र्ये योलस्य सदा.२

उत्तमा मध्यमा नीचा तिस्त्रो वे प्राणीनां विधा
परार्थ स्वार्थ विध्वंसा लक्षणानी यथा क्रमम3

प्राच्यवाची प्रतिचीच तुर्योदिची तथैवच
दिशश्च्तश्च प्रमुखा वन्दंते धार्मिका जना4

(सुरवातीची ओळ आठवत नाही)
शनै कंथा शनै पंथा पंचेतानी शनै शनै5

आम्ल स्तिक्थ कषायश्च मधुरो लवण: कटु
परत( तेच....... आठवत नाही)6

एन्द्रम धनु सप्तवर्णान बिभ्रत प्रावृषी शोभते
रत्नहारो मेघकंठे नानारत्नेर्नु गुंफीता:7

पादौ हस्तौ जानुनी द्वे उर छात: ललाटकं
अष्टांगेन स्प्रुषेन भुमी साष्टांग प्रणतिश्चसा8

शृंगार वीर करुणा अदभुत हास्य भयानक:
बिभत्स रौद्रौ शांतस्य काव्ये नवरसा मता9
मा मनो मधुपो मेघो मद्यपो मर्कटो मरुत
मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दश:चंचला10
ह्यात बर्‍याच चुका आहेत माझ्या अल्पमतीनुसार मी हे लिहले आहे.

प्रतिक्रिया

दशानन's picture

3 Oct 2009 - 10:45 am | दशानन

संस्कृत :S

डोक्यावरुन गेलं !

तेव्हा शाळेत पण.... व आजकाल महाजालावर पण :''(

विद्याप्रेमी राजे

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

व्यंकु's picture

3 Oct 2009 - 11:11 am | व्यंकु

उद्यम:,साहसं,धैर्यँ, बुद्धि,शक्ति,पराक्रम:।
षड् एते यत्र वर्तन्ते तत्र देवो हि साह्यकृतम्॥

अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा। पञ्च कन्या: स्मरेत नित्यम् महापातकनाशिनि:॥

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Oct 2009 - 11:15 am | भाग्यश्री कुलकर्णी

ह्याबरोबर नवीन सुभाषितेही कळतील्.ते अहल्या.... चे माहित होते.पहिले मात्र नवीन कळाले,धन्यु.

नंदन's picture

3 Oct 2009 - 2:34 pm | नंदन

दुसर्‍या सुभाषिताबद्दल कल्पना नाही. पाचवे साधारण असे असावे -

शनै पन्था: शनै कन्था: शनै पर्वतोल्लंघनम्|
शनैर्विद्या शनैर्बुद्धि पञ्चैतानि शनै: शनै:||

सहावे सुभाषित क्रमिक पुस्तकात सुभाषितमालेत होतं, हे आठवतं. त्यापुढची ओळ 'हे सहाही रस रोजच्या जेवणात असावेत' अशा अर्थाची होती.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

3 Oct 2009 - 3:43 pm | विसोबा खेचर

नंद्या मेल्या गप रव! तुका रे खय कळता त्या संस्कृतातलो? :)

आधी त्या वेलच्यान तुका मुद्रित संशोधक नेमल्यान आणि आता भाग्यश्रीनं मेल्या तुझो फुकटचा नंद्याचा नंदनजी करून तुझो भाव मात्र वाढवून ठेवल्यान! :)

तात्या.

नंदन's picture

3 Oct 2009 - 4:05 pm | नंदन

आता मालकांनीच संस्कृत शिकणा सुरु केल्यावर आमका पण थोडे धडे गिरवूक होयेच मा? ;). बाकी
वेलच्याक उचके लागत असतले थंय. कितकी रे आठवण काढशीत? :D

[आपांपसातील संवादासाठी कृपया खरडवहीचा वापर करावा, अशी नोटीस येतली आता :).]

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Oct 2009 - 9:06 am | llपुण्याचे पेशवेll

=)) =)) =))

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

बेसनलाडू's picture

4 Oct 2009 - 1:23 pm | बेसनलाडू

नक्की ओळ आठवत नाही मात्र ते रस - कषाय (तुरट?), तिक्त (तिखट), मधुर (गोड), कटु (कडू), लवण (खारट), आम्ल (आंबट) असल्याचे आठवते. खाली मितालींनी दिलेच आहे.
(विसराळू)बेसनलाडू

विजुभाऊ's picture

6 Oct 2009 - 1:13 pm | विजुभाऊ

तिक्त (तिखट), कटु (कडू),
या मूळ संस्कृत शब्दांचे एकदम वेगळेच आहेत.
तिक्त ( कडवट/ कडू)
कटू ( भेदक /टोचणारे) ( उदा: कर्णकटू किंकाळी)
मराठीत येताना थोडे अर्थ बदलले आहेत

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Oct 2009 - 2:41 pm | भाग्यश्री कुलकर्णी

धन्यवाद नंदनजी. तुमचे म्हणणे बरोबर आहे.सहाव्या सुभाषिताचा अर्थ असाच आहे.
द्वामिमा वुदधो क्षेप्यो कंठे बध्वां द्रुढांम शीलाम
श्रीमान् न योहर्ते दत्ते दारिद्र्ये योलस्य सदा.
असा असावा असे आत्ता आठवतेय.

मितालि's picture

3 Oct 2009 - 6:51 pm | मितालि

आठवणींच्या शिदोरीतुन.. (दहावीच वर्ष कोण विसरेल ...)
१०० मा़र्क संस्कृत १० वी च १९९६ च पुस्तक मिळालं तर त्यात अचुक मिळतील हि सुभाषीतं. रोजच्या रोज घोकुन पाठ करवुन घेऊन आमचे संस्कृत आणि त्यायोगे एकुण % वाढवणार्‍या सरांना स्मरण करुन आठवणींच्या शिदोरीतुन ही सुभाषीतं..

एकः स्वादिष्टमश्नाति वस्ते वासश्च् शोभनम् |
यो असंविभज्य भ्रुत्येभ्य: को नृशंसतरस्तथ: |

(एकटाच स्वादिष्ट भोजन घतो, सुन्दर वस्त्र परिधान करतो, आपल्या नोकराना वाटा देत नाही त्याच्या सारखा निर्दय कोण बरे असेल?)

द्वामिमावुदधो क्षेप्यौ कंठे बध्वां दृढांम शीलाम |
श्रीमान् न योहर्ते दत्ते दारिद्र्यो योलस: सदा |

( या दोघानाही गळ्यात मोठा दगड बांधुन समुद्रात टाका. श्रीमंत व्यक्ती जो योग्य माणसाला दान देत नाही, आणि दरिद्री माणुस जो सदा आळशी पणा करतो.)

उत्तमा मध्यमा नीचा तिस्त्रो वे प्राणीनां विधा |
परार्थ स्वार्थ विध्वंसा लक्षणानी यथा क्रमम |

( उत्तम , मध्यम व निच असे प्राण्यांचे तीन प्रकार होत. परार्थ , स्वार्थ, विध्वंस अशी त्याची अनुक्रमे लक्षणे आहेत.)

प्राच्यर्वाची प्रतिचीच तुर्योदिची तथैवच |
दिशश्च्तश्च प्रमुखा वन्दंते धार्मिका जना |

(प्राची (पूर्व), अर्वाची (पश्चिम), प्रतिची (उत्तर) , तुर्योदि (दक्षिण) या चार प्रमु़ख दिशांना धार्मिक लोक पुजनिय मानतात.)

शनै: कन्थः शनै: पन्थः शनै: पर्वतमुर्धनि |
शनै: विद्या शनै: वित्तम पन्चैतानि शनै: शनै: |

( घोंगडी विणने , धर्म पालन , पर्वत चढणे, विद्यार्जन , पैसा कमवणे ही पाच कामे सावकाश करावी.)

आम्लतिक्त कषायच मधुरो लवणः कटु |
षड रसा: पुरुषेणेहः भोक्तव्याम बलंइच्छिता |

(बल मिळवण्यासाठी आंबट, तुरट, तिखट, कडु, गोड, खारट या पाच रसांचे सेवन करावे.)

एन्द्रम धनु सप्तवर्णान बिभ्रत प्रावृषी शोभते |
रत्नहारो मेघकंठे नानारत्नेर्नु गुंफीता |

(पावसाळ्यात सात रंगाचे इन्द्रधनुष्य शोभुन दिसते. ढ्गांच्या गळ्यातील रत्नहारच जणु.)

पादौ हस्तौ जानुनी द्वै उरच्छातललाटकं |
अष्टांगेन स्प्रुषेत भुमी साष्टांग प्रणतिश्चसा |

(दोन पाय , दोन हात, दोन्ही गुढगे , छाती , कपाळ या आठ अंगानी भुमीला स्पर्श करावा. याला सुर्यनमस्कार म्हणतात.)

शृंगार वीर करुणादभुत हास्य भयानक: |
विभत्स रौद्रौ शांतस्य काव्ये नवरसा मता |

(शृंगार , वीर ,करुण ,अदभुत ,हास्य, भयानक, विभत्स, रुद्र, शांत असे काव्याचे नऊ रस मानले जातात.)

मा मनो मधुपो मेघो मद्यपो मर्कटो मरुत |
मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दश चंचल: |

लक्ष्मी (मा), मन, भुंगा (मधुप), मद्यपि(दारुडा), मेघ, माकड, वारा ( मरुत), माशी (मक्षिका), ढेकुण (मत्कुण), मासा हे दहा "म"कार चंचल आहेत.)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

3 Oct 2009 - 8:49 pm | भाग्यश्री कुलकर्णी

फार आभारी आहे गं.खुप दिवसांपासुन पाचवे अन् सहावे सुभाषित अडले होते.माझी टंकनक्षमता फारच कमी आहे त्यामुळे अर्थ लिहीला नव्हता तो तु पुर्ण केल्याबद्दल धन्यु गं.
प्रतिक्रिया देण्यार्‍या सर्वांचे आभार.
तात्या माझ्या इंदोरी वास्तव्याचा परिणाम हो हा. :D सगळ्यांना जी जी म्हणायची सवय लागलीये. :)

गणपा's picture

4 Oct 2009 - 10:04 am | गणपा

लाज वाटते सांगायला की मला पण १०० मार्कांच संस्कृत होतं आणि १० वीला ९१ मार्क मिळाले होते.
लाज अश्या साठी की आज काहीही आठवत नाही. शेजवळकत बाईंचा आत्मा तळमळत असेल. :(
(नालायक )गणपा

मितालि's picture

4 Oct 2009 - 5:11 pm | मितालि

तुला इतर काही नाही आठवले तरी चालेल, पण त्या छान छान पाककृत्या विसरु ऩकोस.. आणि आम्हा सर्वांना जेवायला निमंत्रण द्यायला पण..

विनायक प्रभू's picture

3 Oct 2009 - 7:38 pm | विनायक प्रभू

..................................
निर क्षिर विवेके तु हंसो हंसो बको बकः
पहीली लाइन आठवत नाही.
मित्राने केलेले भाषांतरः
खिर खाउन विवेकने खुप पानी पिल्ले आनि हसला म्हनुन बकाबका वोक्ला.
मास्तरांनी मरेस्तोवर ठोकला.

सुनील's picture

4 Oct 2009 - 6:54 am | सुनील

खिर खाउन विवेकने खुप पानी पिल्ले आनि हसला म्हनुन बकाबका वोक्ला.
=)) =)) =))

पहीली लाइन आठवत नाही.
मी आठवायचा प्रयत्न करतो..

हंसः शुभ्रः बकः शुभ्रः
को भेदो हंसबकयो:
नीरक्षीरविवेके तु
हंसः हंसः बकः बकः

आणि याच सुभाषिताचा एक पाठभेद -

काकः कृष्णः पिकः कृष्णः
को भेदो काकपिकयो:
वसंतसमयेप्राप्ते
काकः काकः पिकः पिकः

(पिक म्हणजे कोकिळ)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विदेश's picture

3 Oct 2009 - 9:55 pm | विदेश

भर्त्रुहरीच्या `नीतिशतक` या पुस्तकात शंभर सुभाषिते आहेत.

ज्ञानेश...'s picture

4 Oct 2009 - 10:25 am | ज्ञानेश...

"अमंत्रं अक्षरं नास्ति, नास्ति मूलं अनौषधं..
अयोग्यः पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः"

"Great Power Comes With Great Responsibilities"

व्यंकु's picture

4 Oct 2009 - 11:27 am | व्यंकु

जम्बुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले। तानि मत्स्या: खादन्ति जलमध्ये डुबूक डुबूक॥

बेसनलाडू's picture

4 Oct 2009 - 1:24 pm | बेसनलाडू

खादन्ति नव्हे, खादन्ति असे आहे (कोळ्याने टाकलेले जाळे समजून मासे ती खात नाहीत)
(स्मरणशील)बेसनलाडू

मैत्र's picture

6 Oct 2009 - 10:37 am | मैत्र

जम्बुफलानि पक्वानि |
पतन्ति च विमले जले ||
तानि मत्स्या: न खादन्ति |
जालगोलक शंकया ||

कोळ्याच्या जाळ्याचे गोल गोटे आहेत असे समजून मासे ती पिकलेली जांभळे खात नाहीत.
कालिदासाची समस्या पूर्ती आहे असं कुठेतरी वाचलं होतं...

अशीच एक समस्या पूर्ती राणीच्या हातून चंदन पात्र पडल्याच्या आवाजाची होती. ती आठवत नाही आता.
ठा ठं ठ ठं अशी काहीतरी होती....

नंदन's picture

6 Oct 2009 - 11:33 am | नंदन

तुम्हांला हवे असलेले सुभाषित आणि त्याचा पाठभेद इथे मिळेल. या दोघांपैकी शालेय अभ्यासक्रमात रामाच्या राज्याभिषेकाचे सुभाषित होते.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रमोद्_पुणे's picture

6 Oct 2009 - 4:13 pm | प्रमोद्_पुणे

बहुदा पहिला "ठं" नसून "ठा" आहे..

हेरंब's picture

4 Oct 2009 - 6:01 pm | हेरंब

भोजनान्ते चकिं पेयं जयंतः कस्य वै सुतः |
कथं विष्णुपदं प्रोक्तं, तक्रं शक्रस्य दुर्लभम् ||

पहिले ३ प्रश्न आहेत, शेवटच्या भागात तिन्हींची उत्तरे एकेका शब्दात आहेत.

धनंजय's picture

5 Oct 2009 - 9:27 pm | धनंजय

गमतीदार सुभाषिते आहेत.

धन्यवाद.

Nile's picture

8 Oct 2009 - 9:21 am | Nile

सहमत. चांगला धागा. धन्यवाद. :)

-आलसस्य कुतो: विद्या, अविद्यस्य कुतो धनम| :(

भाग्यश्री कुलकर्णी's picture

6 Oct 2009 - 1:01 pm | भाग्यश्री कुलकर्णी

ह्या निमीत्त्याने बरीच सुभाषिते कळली.काही विस्मृतीत गेलेली सुभाषिते परत समोर आणल्याबद्दल सार्‍यांचे आभार.

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2009 - 2:37 pm | बिपिन कार्यकर्ते

अतिपरिचयादवज्ञा | संततगमनात अनादरो भवति ||
मलये भिल्लपुरंध्री | चंदनकाष्ठमिंधनं कुरुते ||

आकाशात पतितं तोयं | यथागच्छति सागरं |
सर्वदेवनमस्कारं | केशवं प्रतिगच्छति ||

बिपिन कार्यकर्ते (५० मार्क संस्कृत)

प्रमोद्_पुणे's picture

6 Oct 2009 - 4:16 pm | प्रमोद्_पुणे

चन्दनतरूकाष्ठमिन्धनं?? आहे का?

Nile's picture

8 Oct 2009 - 9:28 am | Nile

बरोबर आहे तुमचं.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

6 Oct 2009 - 3:26 pm | भाग्यश्री कुलकर्णी

अजुन एक मजेशीर सुभाषित अर्धवट आठवतयं...

सुसरला गौरी सुवंशोद्भवा
तंवी स्पर्शसुखावह मधुमती
नित्यंमनोहारिणी(जी सरळ,शुभ्र, चांगल्या कुळातील ,बारिक ,जी चा स्पर्श सुखकर आहे )
सा केनापि ह्रुता न्रुसशहो गंतुं न शक्तोस्यहम (ती च्या शिवाय मी जाउच शकत नाही.)
रे भिक्शो तव कामिनी (तुझी ती प्रिय पत्नी का?)
नही नही प्राणप्रिया यष्टीका (माझी प्राणप्रीय काठी.)

प्रमोद्_पुणे's picture

6 Oct 2009 - 4:01 pm | प्रमोद्_पुणे

या पाणिग्रहलालिता सुसरला तन्वी सुवन्शोद्भवा
गौरीस्पर्शसुखावहम गुणवतीम नित्यम मनोहारिणीम
सा केनापि ह्रुता तया विरहितुम गन्तुम न शक्योस्म्यहम
रे भिक्शो तव कामिनी , नही नही प्राणप्रिया यष्टीका

भाग्यश्री कुलकर्णी's picture

6 Oct 2009 - 7:13 pm | भाग्यश्री कुलकर्णी

धन्यु हो.

प्रमोद्_पुणे's picture

6 Oct 2009 - 4:27 pm | प्रमोद्_पुणे

हे हेरम्ब, किमम्ब? रोदिषी कथं? कर्णॉ लुठत्यग्निभू:
किम ते स्कन्द विचेष्टीतं मम पुराम सन्ख्याक्रुताचक्शुषाम
नेततेप्युचितम गजास्य चरितम, नासाम मिमीतेम्बमे
तावेवम सहसा विलोक्य हसितव्यग्रा शिवा पातु वः

ऐका दाजीबा's picture

6 Oct 2009 - 10:05 pm | ऐका दाजीबा

मूळ सुभाषित :

शनैर्विद्या शनैर्वित्तं शनैर्पर्वतमूर्धनि।
शनै: कन्था: शनै: पन्था: पञ्चैतानि शनै: शनै:॥

वर्षभरानंतर उगवलेला - दाजीबा!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

7 Oct 2009 - 12:38 pm | भाग्यश्री कुलकर्णी

धन्यु हो.

अश्व नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच ।
अजा पुत्रम बलिम दध्यात देवहो दुर्बलस्य घातक ॥

विद्या शस्त्रंच शास्त्रं च, द्वे विद्ये प्रतिपत्तये ।
आद्या हास्याय वृध्दत्वे, द्वितीया आद्रियते सदा ॥

विद्या विवादाय, धनं मदाय्, शक्ति: परे षां परिपीडनाय ।
खलस्य: साधो: विपरीतम् एतद ज्ञानाय, दानाय, च रक्षणाय ।।

उद्योगः खलु कर्तव्यम फलं मार्जरवत भवेत् |
जन्म प्रभृति गौर नास्ति पयः पिबति नित्यशः ||

उपकारोsपि नीचानामपकारो हि जायते ।
पय:पानं भुजंगानां केवलं विषवर्धनम् ॥

यथा हि एकेन चक्रेण न रथस्य गति: भवेत्|
एवं पुरुषकारणे विना दैवं न सिध्यती||

विद्या मित्रं प्रवासेषु, भार्या मित्रं गृहेषु च ।
व्यधितस्यौषधं मित्रं, धर्मो मित्रं मृतस्य च ॥

येषां बहुबलं न अस्ति येषां न अस्ति मनोबलम ।
तेषां चंद्रबलं देव: किं करोति अंबरे स्थितम ।।
( ज्यांच्या कड़े बहुबल नाही, आणि ज्यांच्या कड़े मनोबल ही नाही.
त्यांच्या करीता आकाशात राहूनही चंद्रबल काय करू शकेल ?)

दधि मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव ।
तस्य तदेव हि मधुरं यस्य मनो यत्र संलग्नम ॥

राष्ट्रध्वजो राष्ट्रभाषा राष्ट्रगीतं तथैव च ।
एतानि मानाचिन्हानि सर्वदा ह्रदि धार्यताम् ।।

व्याधेसत्व परिज्ञानम् वेदनायाश्चनिग्रहः ।
ऐतत् वैद्यस्य वैद्यत्वं न वैद्यः प्रभुरायुषः । ।
( व्याधीचे आकलन करुन / रोग समजाऊन घेऊन, वेदना कमी करणे / सुसह्य करणे, हाच वैद्याचा निग्रह अहतो आणि हेच वैद्याचे वैद्यत्व आहे. कारण नाही कोणतही वैद्य जो प्र्भूप्रमाणे आयुष्य देऊ शकेल)

आत्मनः मुख दोषेण बध्यन्ते शुक सारिका ।
बकः तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थ साधनं ॥

ज्येष्ठत्वं जन्मना नैव गुणै ज्रयेष्ठत्वमुच्यते ।
गुणात् गुरुत्वमायाति दुग्धं दधि घृतं क्रमात् ॥
(जेष्ठत्व जन्माने नाहि तर गुणांनी सिद्ध होते, कारण दुध जन्माने जेष्ठ असले तरी तुप गुणमुळेच श्रेष्ठ आहे - दुध, दही ,आणि तुप हि याच क्रमात येतात)

आदौ रामतपोवनाभिगमनं हत्वा मृगं काञ्चनम्
वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणम् ।
वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनम्
पश्चाद्रावण कुम्भकर्णहननं एतद् हि रामायणम् ॥

अयं निज: परो वेति गणना लघुचेतसाम्।
उदारमनसानां तु वसुधैव कुटुंबकम्॥

डॉ.प्रसाद दाढे's picture

7 Oct 2009 - 9:14 am | डॉ.प्रसाद दाढे

स्त्रिय्स्चरित्रम पुरूषस्य भाग्यम
दैव न जाने कुतो मनुष्यः

आगाऊ कार्टा's picture

7 Oct 2009 - 10:54 pm | आगाऊ कार्टा

जम्बुफलानि पक्वानि |
पतन्ति च विमले जले ||
तानि मत्स्या: न खादन्ति |
जालगोलक शंकया ||

या सुभाषिताची कथा अशी आहे.
चार तरुण भोज राजाच्या दरबारात काव्य करुन काही धन मिळवण्याच्या इच्छेने आले होते.
भोजराजाने आज्ञा दिल्यावर पहिल्या तरुणाने पहिली चटकन रचुन पहिली ओळ म्हटली ,"जम्बुफलानि पक्वानि ".
लगेच दुसरा म्हणाला, "पतन्ति विमले जलम"
तिसरा म्हणाला, "तानि मत्स्या: न खादन्ति "
चौथ्याला चटकन काही सुचेना.
तेव्हा तो म्हणाला "जलमध्ये डुबुक डुबुक"
त्याबरोबर भोजराजाला एकदम राग आला.
तो रागाने त्यांना काही शिक्षा देणार एव्हढ्यात कालिदास पुढे आला आणि त्याने चौथी ओळ दुरुस्त केली. "जालगोलक शंकया ||"
ही कथा नववी किंवा दहवीच्या पुस्तकात आहे

हर्षा's picture

25 May 2017 - 10:11 am | हर्षा

एक प्रकारची समस्यापूर्ती आठवते ..
बहुतेक 10 वी च्या पुस्तकातील आहे ..

राजा एकदा कोडे विचारतो - मृगात् सिंह: पलायते | (हरणापासून सिंह पळतो.) हे कसे काय ?

त्यावर दरबारातील काहीजण आपापल्या परीने त्याचे उत्तर देतात.

एकजण अर्जुन व कर्ण युद्धाचे उदाहरण देतो व अर्जुनाच्या तोंडी वाक्य देतो - मृगात् सिंह: पलायते ? { हरणापासून सिंह पळतो ( काय ) ? }

शेवटी एकजण त्याचे उत्तर देतो -
त्यासाठी तो सुभाषित रचतो ..

कस्तुरी जायते कस्मात्
को हन्ति करिणां शतम् |
भीत: कुर्वीत किं युद्धे
मृगात् सिंह: पलायते ||

स्पष्टीकरण - प्रथम, द्वितीय व तृतीय चरणातील प्रश्नांचे उत्तर चौथ्या चरणातील अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या शब्दात मिळते.
पहा,
कस्तुरी जायते कस्मात् ? = मृगात् { कस्तुरी कोणापासून मिळते ? = हरणापासून }
को हन्ति करिणां शतम् ? = सिंह: { शंभर हत्तींना कोण ठार करतो ? = सिंह }
भीत: कुर्वीत किं युद्धे ? = पलायते { भित्रा माणूस युद्धात काय करतो ? = पळतो }
===> मृगात् सिंह: पलायते | { हरणापासून सिंह पळतो. }

- या प्रकारच्या आणखी समस्यापूर्ती कोणाला माहीत असतील तर कृपया सांगावीत.

कुंती सुतो रावणकुंभकर्ण: | (कुंतीची दोन मुले - रावण आणि कुंभकर्ण)
असे शेवटचे पद असलेले एक सुभाषित असेच समस्यापूर्तीचे होते.
त्यात आधीच्या तीन पदांमध्ये असलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे मिळून हे पद बनते. पण मला आत्ता ते सुभाषित पूर्ण आठवत नाहीये.

धागा मस्त आहे.

<< कुंती सुतो रावणकुंभकर्ण: >>
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

का अर्जुनस्य माता
क: वंशस्य दीप: |
कौ बिभीषणस्य बन्धू
कुंती सुतो रावणकुंभकर्ण: ||

का अर्जुनस्य माता = कुंती { अर्जुनाची माता कोण = कुंती }
क: वंशस्य दीप: = सुत: { वंशाचा दीप कोण = सुत (मुलगा) }
कौ बिभीषणस्य बन्धू = रावणकुंभकर्ण: { बिभीषणाचे बंधू कोण = रावण (आणि) कुंभकर्ण: }

"किम् विपरीत कथनम्" हाही एक श्लोकाचा भाग आहे असे वाटतेय.
ह्याचे उत्तर म्हणजे शेवटची पूर्ण ओळ.

किम् विपरीत कथनम् = कुंती सुतो रावणकुंभकर्ण: { विपरीत (चुकीचे) बोलणे काय = रावणकुंभकर्ण हे कुंतीचे मुलगे (होत) }

- हर्षा {हर्षद}

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मला आठवतं त्याप्रमाणे कुंती, सुत, रावण, कुंभ, कर्ण अशी पाच उत्तरे असलेले पाच प्रश्न होते. पण आता सापडेना.

रुपी's picture

27 May 2017 - 3:08 am | रुपी

का पान्डुपत्नी गृहभूषणम् किम्
को रामशत्रु: किम् अगस्त्य जन्मः |
कः सूर्यपुत्रः विपरीत पृच्छत
कुंती सुतो रावण कुंभकर्णः ||

सिरुसेरि's picture

25 May 2017 - 5:39 pm | सिरुसेरि

संस्कृत सुभाषीत रत्नमाला या पुस्तकात अनेक सुभाषीते आहेत . बाकी २ पप , ४ आप , ६ तप हा प्रकार तसा भव्य दिव्य आहे .

राघवेंद्र's picture

26 May 2017 - 10:35 pm | राघवेंद्र

पप - परस्मै पद
आप - आत्मने पद
उप - उभय पद

तप - ??

हर्मायनी's picture

26 May 2017 - 9:07 am | हर्मायनी

माझ्या सर्वात आवडती समस्यापूर्ती.

एकदा राजदरबारात सुभाषिताची शेवटची ओळ दिली जाते :

ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ:।

आणि कवी रचतो :

रामाभिषेके जलमाहारन्त्या
हस्ताच्युतो हेमघटो युवत्या:
सोपानमार्गेण करोति शब्दम्
ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ:।

अर्थ :

रामाच्या अभिषेकासाठी जल आणण्याऱ्या युवतीच्या हातातून सोन्याचा घडा पडला. तो पायऱ्यांवरून ठं ठं ठ ठं ठं ठ ठ ठं ठ ठं ठ असा आवाज करत गेला.

राघवेंद्र's picture

26 May 2017 - 10:35 pm | राघवेंद्र

+१

हर्षा's picture

27 May 2017 - 1:57 pm | हर्षा

<<<<<<
का पान्डुपत्नी गृहभूषणम् किम्
को रामशत्रु: किम् अगस्त्य जन्मः |
कः सूर्यपुत्रः विपरीत पृच्छत
कुंती सुतो रावण कुंभकर्णः ||
>>>>>>>

रूपीताई, वरील श्लोक उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद !

<< मला आठवतं त्याप्रमाणे कुंती, सुत, रावण, कुंभ, कर्ण अशी पाच उत्तरे असलेले पाच प्रश्न होते >>
तुमचे म्हणणे बरोबर आहे.

धन्यवाद !

- हर्षा { हर्षद }

मला आठवतं त्याप्रमाणे कुंती, सुत, रावण, कुंभ, कर्ण अशी पाच उत्तरे असलेले पाच प्रश्न होते.
>>>>>>
तुमचे म्हणणे बरोबर आहे.

धन्यवाद !

- हर्षा { हर्षद }