शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स लेखांक ४

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
23 May 2017 - 11:26 am

दिवस चौथा .

सकाळ सकाळी बायकोने एक सुवार्ता दिली. " एक बूट पुढून फाटला आहे. " युरोप सहलीवर अधिक सामान नको म्हणून पर्यायी पादत्राण न नेण्याचा धोका आम्ही पत्करला होता. पण उसना घेतलेला शेजारणीचा बूट इतक्या अचानकपणे धोका देतो आहे या जाणीवेने मी हादरूनच गेलो. कारण आता नवीन शूज युरोपियन देशात विकत घ्यायचे म्हणजे....जिथे कंगवा रूपये ३५० ला मिळतो तिथे शूज ची किंमत काय असेल " याची कल्पना देखील सहन होईना. कोंणत्याही समस्येने पॅनिक व्हायचे नाही असे मनोमन ठरवून देखील आता युरोचा हिशेब चुकतो की काय ? अशी भिती वाटू लागली. वास्तविक" तू नवे बूट घे व एक महिना त्यावर सराव कर "असे मी तिला सुचविले होते पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. युरोप ला अगदी नवे शूज घालून जाउ नका व अगदी अद्ययावत लगेजही नेऊ नका असा सल्ला अनेकानी आंतरजालावर दिलेला असतो. युरोपमधे बर्‍याच जागी रस्ते लगेज नेण्यास योग्य नाहीत , दगडाचे असल्याने.

आता सकाळीच प्रथम शूज विकत घ्यावे लागणार होते. आमच्या प्लान प्रमाणे सकाळी साडेआठ वाजता व्हॅटिकन मुझियम साठी तेथे पोचणे गरजेचे होते. पण ही समस्या मधे उपटली होती. " इथे शूज खरेदीस योग्य असे मार्केट कुठे आहे.. ? " अशी विचारणा बस स्टॉपवरील एका तरूणीस केल्यावर " मोरमाट " असे तिने सांगितले. पिरॅमिड चौकापासून पुढे हा थांबा आहे हे कालच आम्ही पाहून ठेवले होते. २३ नंबरने उतरलो पण कुठे मार्केट असे दिसेचना. आजूबाजूच्या गल्ल्यातून चौकशी करता एकाने जरा माहिती दिली. पण ते दुकान अगदी फॅशनेबल शूज चे निघाले कमीतकमी किंमत रू १०००० चे दरम्यान. असे एक दोन जागी घडले. घड्याळ तर पुढे सरकत होते.
मधेच एक दुकान दिसले ,पादत्राणे तयार करण्याचा उद्योग एक जोडपे करताना दिसले. आम्ही आमची अडचण सांगितली १३ युरो पर्यंत त्याच्याकडे काही शूज होते पण साईज चा वांधा आला. आता "तात्पुरते का होईना पण हाच शू चिकटवून द्या" अशी विनंति त्याना केली. त्यानी ती मान्य करून शू चिकटवून दिला पण.... पण "तुम्ही आणि तुमचे नशीब" या वाक्याने जाणीव करून देतच. दरम्यान आमचे वेळापत्रक कोलमडले होते. आत तिथून व्हॅटिकन गाठावयाचे मग तिकिट, मग लाईन हा विचार मनात आल्यावर " तो कार्यक्रमच रद्द " असे मी जाहीर करून टाकले. मुळात चित्रकारीत रस नसलेल्या बायकोने हा प्रस्ताव लगेच मान्य केला. आतून मी किती कष्टी झालो याची कल्पना मिपावरचे चित्र तज्ञ मित्रच करतील.

शेवटी आता मधेच कुठेतरी घुसून पर पुढची आखणी करू म्हणून एका बसमधे बसलो. बस जात असताना अचानक बाजूने कलोसियम दिसू लागले म्हणून तातडीने उतरलो. काल पाहिलेल्या कओसियमच्या बाजूची की एकदम विरूदध बाजू होती. हा अधिक क्लो़ज लूक होता.

आम्हाला रोममधे आणखी काही पहायचे होते व शेवटच्या दिवसाचे जेमतेम ५ तास राहिले होते. म्हणून कलोसो हे भूमिगत स्थानक गाठून टर्मिनी येथे गेलो.लाईन बदलून रिपब्लिका हे स्थानक गाठून बाहेर आलो. ६१ क्रमांकाची बस " बोर्गीज विला" या ठिकाणी जाते. तिचा थाम्बा शोधण्यात काही वेळ गेला. बस येण्यासही वेळ लागला . ती आल्यावर रोम मधील एका टेकडीवर जाउन लागली. सर्व साधारण पणे मोठे झालेले शहर हे चढउताराच्या वर वसलेले नसते पण जगातील काही अशा मोजक्या शहरांपैकी रोम हे आहे. ते सात टेकड्यानी बनलेले आहे. अर्थात या टेकड्या पुण्यातील पर्वती इतक्या काही उंच नाहीत. काही वेळातच "विला बोर्गीज "या विशाल बागेचे दर्शन घडवीत बस मार्ग क्रमू लागली. येथे विला बोर्गीज नावाचे एक संग्रहालय आहे पण त्याचा आकार लहान असल्याने आगाउ बुकींग शिवाय ते पहाता येत नाही. रोज फक्त ३५० माणसे असा त्यांच्या कोटा ठरलेला आहे. सहजिकच तिथे जायचा प्रश्नच नव्हता.
.
विला बोर्गीज या अतिविशाल बागेचे फ्लॅमिनिओ बाजूचे द्वार.
शेवटी एका भव्य कमानीपाशी बस चे शेवटचा थांबा आला . सगळे उतरले हे पाहून आम्ही ही उतरलो. १४४ एकर पसरलेल्या या बागेत आस्वादक पातळीवर फिरणे शक्यच नव्हते.कमानी बाहेर रोम शहराचा भाग दिसत होता.
.
या चित्रातील उजव्या बाजूस दिसणार्‍या सफेद शेड खाली शूज विकत घेतले. ( चायना मेड जिंदाबाद )
व जवळ शॉपिगची सोय असलेला एक चौक दिसला इथे शूज विकत घेता येतील का स्वस्तात या उद्देशाने आम्ही पुढे सरसावलो. शूज ,भेटवस्तू , पडदे बेडशीट्स असे संमिश्र स्वरूपाचे मार्केट तिथे उभे केलेले होते. शूजच्या किंमती पाहून मनस्वी आनंद झाला व पश्चिम व चीन यांच्या तील किमतीच्या पातळीचा फरक स्पष्टपणे जाणवू लागला. बर्यापैकी चांगले शूज चिन्यानी १० युरो किमतीत विकायला ठेवले होते. काल सकाळी १०००० रू खाली शूज मिळणार नाहीत असे वाटत असतानाच इथे ७०० रूपयात घेऊन मोकळे झालो.
.
" पोर्ट पिआझ्झा डेल पोपोलो " अर्थात भव्य प्रवेश द्वार
रस्ता ओलांडून समोर काय आहे हे पहात एक भव्य द्वारातून आत शिरलो तर पलिकडे एक विशाल चौक दिसला. नाव पिआझ्झा डेल पोपोला.

.

.

पिआझ्झा डेल पोपोला उंच स्तंभ व कारंज्या सहित
पीआझ्झा डॅल पोपोलो हा रोम मधील एक मोठ्या आकाराचा प्रमुख चौक असून तो १८११ ते १८२२ का काळात तयार झाला .मध्यभागी असलेला २४ मीटर उंच ( जोते धरून ३६ मीटर ) एक स्तंभ दुसर्‍या रामसे च्या काळात इजिप्त मधे तयार झाला. तो १० व्या शतकात रोमला आणण्यात आला.या प्रांगणाच्या एका बाजूला एक प्रेक्षणीय असे कारंजे आहे. फोन्ताना डेल नेट्यूनो ( बहुदा नेप्चून या देवाचे ) . युरोपातील या महाकाय चौकानी मला अगोदरच वेड लावले होतेच. याचा एक विडिओ घ्यावा यासाठी मी वर्तुळाकार भटकू लागलो. काही ठिकाणी चौथरे व त्यावर पुतळे अशी रचना दिसते. युरोपातील अन्य चौकांप्रमाणे हा चौक देखील पत्थरबंद आहेच.

आता व्हॅटिकन संग्रहालयाला सकाळच्या पादत्राण प्रकरणामुळे मुकलो आहोतच तर निदान "सेंट पीटर्स बॅसिलिका " हे तर पाहून रोमचा निरोप घ्यावा असा विचार करून नकाशा काढला. आम्हाला वॅटिकन साठी लेपान्टो हे स्थानक ऑटॉविआनो या स्थानका पेक्षा योग्य आहे असे एकाने सांगितले होते. त्यासाठी मग जवळचे मेट्रो स्थानक शोधणे आले. काही वेळापूर्वी जिथे शूज विकत घेतले त्या पलोकडे " म म मेट्रो " चा पाहिल्याचे आठवत होतेचे ते " फ्लॅमिनिओ " हे स्थानक गाठले व पुढचेच लेपान्टो हे स्थानक गाठण्यासाठी मेट्रो त शिरलो. मेट्रो नदीखालून जात होती. अशी एक मेट्रो लाईन न्यूयॉर्क येथे हडसन नदीखालून गेली आहे असे ऐकले आहे. लगेचच लेपान्टो येथे उतरलो .वर रस्त्यावर आल्यावर लगेचच "टू व्हॅटिकन " अशी पाटी दिसली. त्या रस्त्याने जाउन लागलो. रोम मधला हा रस्ता विया एम कोलोना ना नावाने ओळखला जातो.
.

.
पिआझ्झा काव्हूवर्र "
या वर एकूण ९ ब्लॉक पार करीत एक अतिशय सुंदर रेखीव चौकात आलो. या जागी यायचेच असे मी ठरविले होते पण मी अचानकच इथे अवतरल्या मुळे माझी अवस्था " ये कहां अ गय हम ... ? " अशी झाली . चारही बाजूनी मस्त इमारती मधे पुतळा. आखीव रेखीव हिरवळ व फरसबंदीची मांडामांड ! क्या बात है ! पुन्हा इथे विडिओ घ्यावासा वाटला या नवल नाही.
.

या चौकात कोपर्‍यात एक रस्ता दिसत होता. एकाला विचारले "सेंट पीटर् बॅसिलिका" ?? " सरळ" असे उत्तर आल्यावर त्या रस्त्याने जरा पुढे गेल्यावर उजव्या बाजूला एक भव्य गोलाकार वास्तू दिसू लागली. हेच ते " हेड्रियन टुम्ब" हे समजून आले. अर्थात ते मी आतून पहाणार नव्हतोच. आपण आता बॅसिलिकाच्या जवळ आलेले आहोत याची खूण मनाशी पटली होती. रोम मधील एक प्रसिंद्ध वास्तू असेच हेड्रियन टूम्ब चे वर्णन करावे लागेल.

.
हेड्रियन टुम्ब
रोमचा राजा हेड्रियन याचे अवशेष या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यानंतर अनेक राजांचे अवशेष ही इथे जपून ठेवले होते. या वास्तूची रचना चौरसाकृती चौथरा त्याला चारही कोनात बुरूज अशी आहे. मधे गोल आकाराचे उंच बांधकाम आहे. असे सांगितले जाते की "सेंट पीटर बॅसिलिका " चे रचनेसाठी येथील अनेक खांब पळविण्यात आले. या वास्तूचा जन्म इ स १३८ च्या दरम्यान झाला . जर आपण याचा फोटो पाहिला तर ई स १३८ मधे ही रोमनाना कमान (arch) च्या रचनेचे इंगित माहीत होते असे दिसते. जगाला कमानीच्या रचनेचे ज्ञान व्हायला फार शतके जावी लागली असा माझा आपला एक कयास आहे.
.
या स्मारकाच्या समोरच " पॉन्ट एन्जोलो " हा पूल आहे. त्याच्या एका कडेला हे असे पुतळे स्थापिण्यात आले आहेत. या पुलापासून सरळ पुढे चालत गेले की आपण एका रस्त्याला कधी मिळालो हे कळत नाही तो रस्ता म्हणजेच " सेत पीटर्स बॅसिलिका"
.

या जगातील मानाने व आकाराने प्रथम असणार्‍या चर्चच्या दारात नेणारा रस्ता. आजूबाजूचे क्रॉस रस्ते पार करीत चर्चच्या भव्य प्रांगणात येऊन पोहोचलो. प्रांगणात दोन्हीबाजूमी अर्धगोलाकार पोर्टिको असून समोर भव्य असे चर्च उन्हे आहे. या पोर्टिकोवर एकूण वीस फूट उंचीचे ३९ पुतळे स्थापिण्यात आले आहेत. म्हणजे एकून चर्च व हे पोर्टिको किती भव्य असेल याची कल्पना करा. जमनीपासून चर्च वरील घुमटासकट एकूण उंची ४४८ फूट म्हणजे सुमारे ४५ मजले इतकी आहे. खरे तर मानाने हे चर्च सर्वात मोठे नाही पण समारंभाना सोयीचे व पोप यांच्या निवासस्थानापासून ए जवल असल्याने व॑ आकाराने प्रचंड असल्याने त्याला तो मान मिळाला आहे.
.

.
या प्रांगणातील पोर्टिको त्यावर पुतळे याचे सर्व डिझाईन बर्निनी या कलाकाराने केले . ई स १५०६ मधे बांधकाम सुरू होऊन ते १६१५ मधे पूर्णत्वास नेण्यात आले. १९८४ ला या वास्तूस "वर्ल्ड हेरिटेज " दर्जा बहाल करण्यात आला.

आपल्या कडील सूर्यास्त व तिकडील सूर्यास्त यात फारच फरक असल्याने आमच्या कडून एक चूक झाली. आता शी साडेचार झालेत या भ्रमात आम्ही प्रांगणात फिरत असताना सहाचे टोल पडले व त्याच क्षणी चर्चच्या आत जाणार्‍या रांगेच्या गेटला साखळी लावण्यात आली. आमच्या प्रमाणे अनेक बेसावध प्रवाशानी आत जाउ देण्याची विनंति केली पण व्यर्थ. सकाळच्या " शूज" प्रकरणात वेळ गेल्याने वॅटिकन म्युझियम व आता या बेसावध पणा मुळे सेंट पीटर बॅसिलिका या दोन्ही अद्वितीय जागी जाण्याची संधी हुकली होती. नशीबाला दोष देत खिन्न मनाने परत फिरलो. कोपर्‍यावरील आईस्क्रीम दुकानात शिरून इटाली स्पेशल आईसक्रीम च्या पेल्यात दु:ख बुडविले . २३ नंबरची बस पकडून थेट रूमच गाठली . . उद्या सकाळी फार लवकर म्हणजे पहाट ५ वाजताच रूम सोडून मेट्रो गाठायची होती. फ्लोरेन्स ला जायचे होते ना ?

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

23 May 2017 - 12:07 pm | प्रचेतस

हा ही भाग जबरदस्त.

व्हॅटिकन ला जाऊन म्युझियम आणि सेन्ट पीटर्स बॅसिलिका पाहायला न मिळणे म्हणजे वेरुळला जाऊन कैलास लेणी न पाहण्यासारखेच आहे. :)
हेड्रियनचे थडगे जाम भारी आहे. पिआझ्झा डेल पोपोलोचा ओबेलिस्क जबरदस्त दिसतोय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2017 - 8:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

वा वा, शामभट्टांचा प्रवास आवडतोय. पुभाप्र.

सतिश गावडे's picture

23 May 2017 - 9:08 pm | सतिश गावडे

भारीच हो चौराकाका. मस्त लिहीत आहात.

दोनचार ठिकाणं हुकली तर पुन्हा जाऊन पाहून या पुढल्या वर्षी. इथेही लोकांचे आयोजन कोलमडते तर परदेशात होणारच. फोटो ,सेल्फीसह भारी आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 May 2017 - 2:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं वर्णन आणि फोटो ! दोन महत्वाची ठिकाणे आतून बघता न आल्याची चूटपूट वाचता वाचता आम्हालाही लागलीच :(

म्युझियम आणि बॅसिलिका हुकली वाचून हळहळ वाटतेय पण परत दौरा होण्याचे संकेत आहेत हे!

चौकटराजा's picture

24 May 2017 - 6:40 pm | चौकटराजा

मुम्बई- इस्तन्बूल - सोफिया- अथेन्स - ब्रिन्डेसी- रोम- फ्लॉरेन्स- पिसा-नीस- बार्सेलोना- पॅरिस- मुंबई ?????

भेळ वाटतेय. देश कमी करुन जास्त ठिकाणं बघता येतील का?
फक्त टर्की ग्रीस किंवा इटली जर्मनी असे काही. यात धावपळ कमी आणि जास्त बघणे होईल.
तुमच्याकडून प्रेर्ना घेऊन पुढच्या वर्षी हाॅलंड bnb करावे म्हणतेय चार दिवसात. ट्युलिप गार्डनसाठी.

य्यो डायमंडकिंग अंकल, एकडम भारी ओ.
हेड्रियन टुम्ब आवडलेले आहे.
डायमंडक्वीनला रोमात बूट घेऊन दिलात म्हणा की. छान छान.

पैसा's picture

24 May 2017 - 9:52 pm | पैसा

मस्त लिहिताय! एक दोन वर्षात रोम स्पेशल बघून याल. हाकानाका!

अत्रुप्त आत्मा's picture

25 May 2017 - 6:50 am | अत्रुप्त आत्मा

ये भी मससससस्त..!

अनन्न्या's picture

25 May 2017 - 7:15 am | अनन्न्या

आधीचे भागही मस्त, फोटो पण छान आलेत.

गुड गुड गुड. पुभाप्र.

चौराकाका.. त्रेव्हीच्या कारंज्यालगत असलेल्या अनेक खाद्य"पेय"गृहांपैकी एखाद्यामध्ये मनसोक्त मद्य आणि पिझ्झा चापून पावलं मोजत मोजत आसपासचा परिसर चाचपलात तर बोला.... :-)

चौकटराजा's picture

25 May 2017 - 6:47 pm | चौकटराजा

मी खवय्या नाही पत्नीही नाही. मी मांसाहारी ही नाही. कोण्त्याही प्रकारचे मद्य सेवन नाही. यास कारण माझी जात नाही माझी ती कॉन्स्टीटूशन आहे. सबब संपूर्ण युरोपमधे फळे , ब्रेड व दूध इतक्याच तीन वस्तू मी युरो वा फ्रॅन्क॑ मधे घेतल्या. बाकी मेड टू कुक याचा भरपूर वापर केला. आपला ढोकळा थाईला आवडला व कांदेपोहे इटालियन माणसाला ही आवडले.

मी खवय्या नाही पत्नीही नाही. मी मांसाहारी ही नाही. कोण्त्याही प्रकारचे मद्य सेवन नाही.

अरेरे.. बरं... तुमची मर्जी काका...

यास कारण माझी जात नाही माझी ती कॉन्स्टीटूशन आहे.

म्हणजे ?
नाही समजले तुम्हाला काय म्हणावयाचे आहे :(

चौथा कोनाडा's picture

29 May 2017 - 9:31 pm | चौथा कोनाडा

"मद्यसेवन न करणे" याला माझे जातीय अथवा धार्मिक कारण नसून माझ्यासाठी ते ब्रह्मवाक्य आहे

(तज्ञ मिपाकरांनो, बरोबर आहे का ?)

मी प्रश्न कोणाला विचारला , उत्तर "को'ण देत आहे, लैच डोक्याला शॉट!

:(

चौकटराजा's picture

30 May 2017 - 8:21 am | चौकटराजा

"त्या" जातीत पक्के मांसाहारी , दर आठवड्याला " बसणारे" व खादाड असतीलही पण तरीही प्रमाण कमीच.

दशानन's picture

26 May 2017 - 12:22 am | दशानन

छान! लेखन आवडले व फोटो ही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 May 2017 - 7:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

शामभट्टं पुढचा भाग येउंद्या की ओ.

वेदांत's picture

2 Jun 2017 - 3:21 pm | वेदांत

पुभाप्र