गाभा:
'स्लमडॉग मिलिनियरला' या चित्रपटाला ऑस्कर मिळाला आणि भारतात एकच जयजयकार सुरू झाला. बॉलीवूडच्या लाडक्या ए. आर. रहमान यांनाही ऑस्कर मिळाला. पण, भारतीय मनावर अधिराज्य गाजवणा-या रहमान यांना त्यांच्या चाहत्यांनी कधीच 'ऑस्कर' दिला आहे. 'स्लमडॉग' बाबत बोलायचे झाल्यास विदेशी निर्माता-दिग्दर्शकाने भारतातील गरिबीचे भांडवल करून या चित्रपटाची निर्मिती केली. आणि केवळ विदेशी असल्यामुळेच या चित्रपटाची ऑस्करमध्ये 'हवा' झाली. यापूर्वी भारतातील निर्माता-दिग्दर्शकांनीही याच विषयावर दर्जेदार चित्रपट निर्मिती केली आहे. पण, त्यांना ऑस्कर सोडाच साधा पुरस्कारही मिळालेला नाही. म्हणूनच 'स्लमडॉग' ला मिळालेल्या यशाबद्दल आपण आपली पाठ थोपटून कोणाचा जयजयकार करायचा? असा प्रश्न पडतो. आपले मत काय........?
प्रतिक्रिया
23 Feb 2009 - 10:48 am | नरेश_
मला फक्त ए. आर. रेहमानचेच अभिनंदन करावेसे वाटते.
बाकी चित्रपटाचा विषय आणि शीर्षक मुळीच आवडले नाही.
अर्थातच ही वैयक्तीक मतं.
23 Feb 2009 - 11:37 am | विकास
>>>
यापूर्वी भारतातील निर्माता-दिग्दर्शकांनीही याच विषयावर दर्जेदार चित्रपट निर्मिती केली आहे. पण, त्यांना ऑस्कर सोडाच साधा पुरस्कारही मिळालेला नाही.
<<<
एक परदेशी कॅटॅगरी सोडली तर ऑस्कर ऍवॉर्ड हे हॉलीवूडमधे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मिळतात. आपल्या चित्रपटांसाठी (परदेशॉ कॅटॅगरी) सरकार अनुमोदन करते मला वाटते एक स्वदेस ने स्वतःचे अनुमोदन करून प्रयत्न केला होता. त्यामुळे इतर ऑस्कर न मिळायचे कारण समजेल. अर्थात तरी देखील त्यात मार्केटींग आणि लॉबिंग करावे लागते हे वेगळे सांगायला नको.
स्लमडॉग मधे परीस्थितीचे नग्न स्वरूप दाखवल्याने बर्याचदा भारतीयांना आवडत नाही, त्यात मी देखील आलो. वास्तवीक मुलगी नाचवणे आणि डोळे फोडणे हे "जगाच्या पाठीवर" मधे पण दाखवले होते आणि चित्रपट कितीतरी पटीने चांगला होता. तरी देखील या चित्रपटाला पारीतोषिक मिळत असताना रेहमान आणि गुलझार ला पारीतोषिक मिळाल्याने एक वेगळे दर्शन जगाला झाले. शिवाय ज्या चित्रपटाला साधे वितरक अमेरिकेत मिळत नव्हते असा हा काँपिटीशन मधील "अंडरडॉग" जेंव्हा सर्वोत्र्कृष्ठ ठरला तेंव्हा काहीतरी स्वतंत्र मते आहेत असे वाटले.
बाकी दुसरे पारीतोषिक मिळाले तेंव्हा रेहमान जे काही बोलला ते सर्व भारतीयांनी लक्षात ठेवण्यासारखे वाटले, "All my life I`ve had a choice of hate and love. I chose love, and I``m here."
या एका वाक्यासाठी त्याचे खास अभिनंदन!
23 Feb 2009 - 7:08 pm | नीधप
थोडा समजुतीचा घोटाळा आहे इथे.
>>एक परदेशी कॅटॅगरी सोडली तर ऑस्कर ऍवॉर्ड हे हॉलीवूडमधे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मिळतात.<<
मिळतात असे नसून परदेशी चित्रपटाची क्याटेगरी सोडली तर बाकीच्या क्याटेगर्यांमधे इतर देशातील(केवळ भारतीयच नव्हे) चित्रपट पात्रच नसतात. ऍकेडमी ऍवॉर्डस ही अमेरीकन बक्षिसे आहेत. तेव्हा त्यांनी स्वतःच्या देशातल्या फिल्म्स साठी सर्व क्याटेगर्या आणि बाहेरच्यांसाठी फॉरेन लँग्वेज क्याटेगरी ठेवली तर त्यात त्यांचे काही चुकले नाही.
>>आपल्या चित्रपटांसाठी (परदेशॉ कॅटॅगरी) सरकार अनुमोदन करते मला वाटते एक स्वदेस ने स्वतःचे अनुमोदन करून प्रयत्न केला होता. त्यामुळे इतर ऑस्कर न मिळायचे कारण समजेल. <<
प्रत्येक देशात ऍकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस ऍन्ड सायन्सेस(ऑस्कर देणारी संस्था) या संस्थेशी निगडीत एक संस्था असते. आपल्याकडे फिल्म फेडरेशन ऑफ इंडीया ही सरकारी संस्था निगडीत आहे. ऍकेडमी चा नियम आहे की परदेशी चित्रपटाचे नॉमिनेशन त्या त्या देशातील निगडीत संस्थेकडून यायला हवे. अनुमोदनच नुसते नाही तर निवड करते ही संस्था. स्वदेश यामधे कुठेही नव्हती. पण स्वदेश ची पटकथा त्यांच्या अर्काइव्ह मधे घेतलेली आहे.
प्रत्येक देशाकडून एकच चित्रपट येऊ शकतो. हा नियम ७७व्या वर्षापर्यंत नक्की होता. पण गेल्या ३ वर्षांपूर्वी म्हणजे ७८व्या वर्षापासून त्यांनी यामधे काही बदल केला आहे. निगडीत संस्था एक चित्रपट पाठवतेच पण बाहेरूनही एखादा सिनेमा जाउ शकतो परदेशी क्याटेगरी मधेच. अर्थात याचे नियम त्यांच्या वेबसाइटवर त्यांनी स्पष्ट केले नाहीयेत.
दुसरं अजून एक म्हणजे.. काही चिनी चित्रपट मेनस्ट्रीम च्या सर्व क्याटेगरींमधे उतरू शकतात आणि त्याच वेळेला त्या परदेशी क्याटेगरी मधेही असतात. या साठी तुमचा चित्रपट लॉस ऍंजेलिस काउंटी मधे एक आठवडा चाललेला असायला लागतो. चिनी चित्रपटांनी हे मार्केट काबीज केले आहे. आपले परदेशात रिलीज होणारे चित्रपट अश्या चित्रपटगृहात लागतात जिथे आजूबाजूला भारतीय वस्तीच असते, त्या ठिकाणी केवळ भारतीयच चित्रपट लागतात आणि बघायला जाणारेही केवळ भारतीयच असतात (इथे भारतीय हे भारतीय उपखंडातील लोक या स्थूल अर्थाने घ्यावे). सर्वसाधारण अमेरीकन माणूस उठून चिनी सिनेमा बघतो सबटायटल्स असलेला किंवा डबड पण भारतीय सिनेमा बघायला जात नाही. असो.
तर आजवर आपली केवळ परदेशी क्याटेगरी विस्तारण्याचा प्रयत्न कुठल्याच चित्रपटाच्या बाबतीत यशस्वी झालेला नाही.
>>अर्थात तरी देखील त्यात मार्केटींग आणि लॉबिंग करावे लागते हे वेगळे सांगायला नको.<<
या मार्केटींग आणि लॉबिंग हे शब्द एका श्वासात घेऊ नका. व्होटींग करणार्या मेंबर्स नी आपला सिनेमा व्होटींग संपण्यापूर्वी बघावा आणि मग मत द्यावे यासाठी मार्केटींग करावंच लागतं. त्याशिवाय अमेरीकेतल्या कुणाला कसं कळणार की भारतातून एक अमुक अशी फिल्म आली आहे आणि ती बघण्यात कसा इंटरेस्ट वाटणार?
लॉबिंग ही गोष्ट वेगळी आहे. ती बड्या बड्या स्टुडिओज ( MGM, FOX, Miramax, Warner, Paramount, Universal etc) च्या पातळीवर चालतही असेल पण त्यामानाने आपण 'स्मॉल फ्राय' असतो. आपल्याला लॉबिंग करावं लागत नाही.
मी स्लमडॉग अजून पाह्यला नाही त्यामुळे त्या संदर्भाने मी काही बोलणे उचित नाही पण हा सिनेमा 'भारतीय' क्याटेगरी मधे बसत नाही. केवळ विषय, वातावरण व चित्रीकरण स्थळ भारतात आहे. मिळालेल्या पुरस्कारांच्यातून भारताची मान उंचावणे हे केवळ रेहमान च्या संदर्भातच आहे जसं 'गांधी'च्या वेळेला भानू अथैय्यांच्या संदर्भात होतं.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
23 Feb 2009 - 8:00 pm | विकास
आपण दिलेल्या स्पष्टीकरणाबाबत धन्यवाद! मी त्रोटक शब्दात लिहीले असल्याने खालील प्रतिसादात त्या संदर्भात गोंधळ झाला आहे असे दिसले होते आणि आत्ताच त्यावरून लिहीणारही होतो.
मार्केटींग आणि लॉबिंग संदर्भात लगानच्या वेळेस वाचले/ऐकले होते म्हणून तसे लिहीले होते. तरी देखील त्यांचे मतदान गुप्त असते आणि मला वाटते कोण मतदान देते हे ते एकमेकांना पण कळून देत नसावेत. ती मते अतिगोपनियतेत प्राईस वॉटर हाऊस कूपर या कंपनीने या वर्षी घेतल्याचे काल शेवटी सांगितले.
23 Feb 2009 - 8:04 pm | नीधप
>>मार्केटींग आणि लॉबिंग संदर्भात लगानच्या वेळेस वाचले/ऐकले होते म्हणून तसे लिहीले होते. तरी देखील त्यांचे मतदान गुप्त असते आणि मला वाटते कोण मतदान देते हे ते एकमेकांना पण कळून देत नसावेत.<<
मतदान गुप्तच असते. पण व्होटींग मेंबर्स साठी ऍकेडमी एकच शो करते. त्या वेळेला सगळ्यांनी येणं बंधनात्मक नसतं. एवढंच काय मेंबर्सनी मत देण्यासाठी क्याटेगरीमधल्या सगळ्या फिल्मस पाह्यलेल्याच हव्यात हेही बंधनकारक नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
23 Feb 2009 - 10:41 pm | नीधप
आणि हे वाचून ऐकून नव्हे तर अनुभवातून सांगतेय.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
23 Feb 2009 - 11:45 pm | विसोबा खेचर
ती मते अतिगोपनियतेत प्राईस वॉटर हाऊस कूपर या कंपनीने या वर्षी घेतल्याचे काल शेवटी सांगितले.
हा हा हा! प्राईस वॉटर कुपर म्हणजे सत्यम कंपनीचे ऑडिटर ना? छान छान! :)
असो,
एकंदरीत भारतीयांपुढे टाकलेल्या ऑस्करच्या तुकड्यासमोर बरीच लोकं भुलली आहेत हे खरं! :)
तात्या.
24 Feb 2009 - 2:29 am | भाग्यश्री
एकंदरीत भारतीयांपुढे टाकलेल्या ऑस्करच्या तुकड्यासमोर बरीच लोकं भुलली आहेत हे खरं! >>
यात भारतीयांचा काय संबंध आहे.. ए. आर रेहमानला एका विदेशी चित्रपटात संगीत दिल्याबद्दल ऑस्कर मिळालंय.. त्यात योगायोग एव्हढाच आहे की भारतात चित्रिकरण आणि भारतीय कलाकार आहेत. त्यामुळे भारतीयांपुढे कोणीही काही टाकलेलं नाहीए हे या धाग्यात खूप वेळा आलंय तात्या.. तिथे द्या की लक्ष !
बाकी भारतीय म्हणून मला तरी आनंद झाला ब्वॉ! रेहमान, गुलजार भारीच आहेत हे सांगायला कोणाचीही आणि कोणत्याही पुरस्काराची गरज नसली, तरी ती मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन..
तसेच इतर सर्वांचे.. मला सर्व नावं नाही आठवत आहेत..
http://bhagyashreee.blogspot.com/
24 Feb 2009 - 7:09 pm | विकास
.>>>
हा हा हा! प्राईस वॉटर कुपर म्हणजे सत्यम कंपनीचे ऑडिटर ना?
बरोब्बर अगदी माझ्या मुद्याला आपण पाठींबाच दिला. विचार करा जर पीडब्ल्यूसी ने सत्यमच्या बाबतीत गोपनियता राखली नसती अथवा राखू शकले नसते तर सत्यम इतक्या विजयाच्या पताका फडकवू शकली असती का? "नव्हत्याचे होते" करणे हे सकारात्मक काम त्यांनी करून दाखवले असे आपल्याला म्हणायचे असावे ;)
23 Feb 2009 - 11:49 am | मराठी_माणूस
एक परदेशी कॅटॅगरी सोडली तर ऑस्कर ऍवॉर्ड हे हॉलीवूडमधे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मिळतात.
बरोबर . तरीही आपण आभाळाला हात टेकल्या सारखे का करतो ?
आणि केवळ विदेशी असल्यामुळेच या चित्रपटाची ऑस्करमध्ये 'हवा' झाली.
"गांधी" चे पण विदेशी असणे हेच कारण होते का ? मग हा निव्वळ योगयोग आहे का ?
23 Feb 2009 - 12:28 pm | shekhar
असे मला वाटले.
'जय हो' हे गाणे किंवा चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे रहमान यांनी भारतिय संगीतावर आधारीतच दिले आहे - हे
आपल्याला नक्कीच जाणवते. पार्श्वसंगीताचे पारितोषक स्वीकरतांना रहमान हिन्दि सिनेमातला शशीकपूरचा सुप्रसिद्ध संवाद बोलले - हे मला फारच आवडले.
शिवाय, 'जय हो' हे गाणे वाल-इ च्या गाण्यासमोर खूपच चांगले होते. यांबद्दल रहमान यांचे कौतूक करायलाच हवे.
आपल्याला जे चांगले वाटले त्याला छान म्हणावे.
- शेखर
23 Feb 2009 - 1:56 pm | पक्या
>> पार्श्वसंगीताचे पारितोषक स्वीकरतांना रहमान हिन्दि सिनेमातला शशीकपूरचा सुप्रसिद्ध संवाद बोलले .
हो..मेरे पास मा है असं रहमाननी त्यांच्या आई च्या उपस्थितिबद्द्ल सांगताना म्हटले. तसेच तमिळ मध्ये हि एक वाक्य आपल्या छोटेखानी भाषणाच्या शेवटाला म्हटले.
रहमान चे अभिनंदन. अजून एका स्लमडॉग च्या भारतीय तंत्रज्ञाला पुरस्कार मिळाला. अत्त्ता नाव आठवत नाहिये.
23 Feb 2009 - 9:20 pm | नीधप
रेसुल पाकुट्टी - साउंड मिक्सिंग
अतिशय महत्वाची गोष्ट असते ही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
23 Feb 2009 - 12:47 pm | असिम
मला आनंद होत आहे तो ए. आर. साठी...यंदा एका पेक्षा जास्त ऑस्कर मिळवीणारा रेहमान हा एकमेव.
अभिनंदन!!!
-असिम
23 Feb 2009 - 5:25 pm | विसोबा खेचर
म्हणूनच 'स्लमडॉग' ला मिळालेल्या यशाबद्दल आपण आपली पाठ थोपटून कोणाचा जयजयकार करायचा? असा प्रश्न पडतो. आपले मत काय........?
करेक्ट! एका अर्थी भारतीयांच्या पदरी ही ऑस्करची भीकच घातली गेली आहे असाही एक विचार मनात येतो..
तात्या.
23 Feb 2009 - 5:39 pm | विनायक प्रभू
मार्किट को गाजर देना पडता है.
23 Feb 2009 - 6:01 pm | विसोबा खेचर
मार्किट को गाजर देना पडता है.
खरं आहे. संदीप चित्रे साहेबांनी धागा सुरू केल्यावर आम्हीही विजेत्यांचे अभिनंदन केले होते परंतु तेव्हाही निर्भेळ आनंद वाटला नव्हता..
गोर्यांनी भारतीयांच्या झोपडपट्टीवर आणि दारिद्र्यावर शिणेमा बनवून भारतीयांच्याच पुढ्यात ऑस्करचा तुकडा फेकला आणि आम्ही भारतीय त्याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहोत..!
तात्या.
23 Feb 2009 - 8:08 pm | नीधप
>>गोर्यांनी भारतीयांच्या झोपडपट्टीवर आणि दारिद्र्यावर शिणेमा बनवून भारतीयांच्याच पुढ्यात ऑस्करचा तुकडा फेकला आणि आम्ही भारतीय त्याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहोत..!<<
तात्या,
तुकडा आपल्या पुढ्यात टाकलेलाही नाहीये. ही फिल्म केवळ भारतीय विषय, स्थळ आणि काही नट घेऊन केलेली ब्रिटीश वा अमेरीकन फिल्म आहे. आपण उगाचच ओरडतोय आपली फिल्म म्हणून.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
23 Feb 2009 - 8:22 pm | विकास
>>>
गोर्यांनी भारतीयांच्या झोपडपट्टीवर आणि दारिद्र्यावर शिणेमा बनवून भारतीयांच्याच पुढ्यात ऑस्करचा तुकडा फेकला आणि आम्ही भारतीय त्याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहोत..!
<<<
ही उगाचच मराठी बाण्याची स्टाईल वाटते. अमेरिकेत अमेरिकेविरुद्ध अनेक चित्रपट, माहीतीपट निघत असतात ज्यात त्यांच्या समाज, इतिहास, व्यक्तींचे भेदक आणि टिकात्मक वर्णन केलेले असते. कधी त्यांना ऑस्कर मिळते तर कधी नाही.
एकदा का सुरवातीची भिषण दृश्ये संपली की हा चित्रपट बर्यापैकी फिल्मी वाटतो जरी सर्व नटांची कामे आवडली तरी. त्या अर्थी मला हा चित्रपट काही फार आवडला नाही.. स्लमडॉग मधे जे काही दाखवले ते मला आवडले नाही. पण ते दाखवले म्हणून आवडले नाही असे नाही, तर ते वास्तव आहे, ती वस्तुस्थिती आजही आहे म्हणून. एकतर तो का आवडला नाही म्हणताना स्वाभिमान उचंबळून येणार अथवा कसे ऑस्कर मिळाले म्हणून जल्लोश करणार. मात्र ते होत असताना रस्त्यावरील स्लमडॉग्ज तसेच आहेत आणि हे बक्षिस मिळत असताना देखील डोळे गमावून भिका मागत बसवलेले असतील...दुर्दैवाने त्यासंदर्भात कोणीच काही बोलताना दिसत नाही. असो.
बाकी ऑस्कर पारीतोषिके ही त्यात अगदी काही (नोबेल प्रमाणेच) राजकारणे आहेत असे धरले तरी, मानाची पारीतोषिके मानली गेली आहेत आणि ती उगाच उठसूठ रस्त्यावरील कुठल्याही चित्रपटास मिळत नाहीत. कालचे चित्रपट देखील एकमेकांशी अशीच गुणात्मक स्पर्धा करत होते ह्यात शंका नाही. असे बक्षिस ते ही स्क्रिप्टपेक्षा गीत आणि संगीत आणि साउंड मिक्सिंगला मिळाले यात कौतुकास्पद आहेच.
जी कुठली आंतर्राष्ट्रीय किर्तीची पारीतोषिके ज्या कुठल्या भारतीयास मिळतील त्याचे कौतूक आणि त्यातून फक्त त्याचाच नाही तर समाजाच विशेष करून नवीन पिढीचा आत्मविश्वास वाढवावा असे वाटते. म्हणूनच या चर्चेसंदर्भात रेहमानचे दुसर्यांदा बक्षिस घेतानाचे वाक्य लक्षात ठेवले पाहीजे हे परत एकदा म्हणावेसे वाटते: All my life I had a choice between hate and love. I chose love and I am here...
23 Feb 2009 - 8:44 pm | संदीप चित्रे
>> गोर्यांनी भारतीयांच्या झोपडपट्टीवर आणि दारिद्र्यावर शिणेमा बनवून भारतीयांच्याच पुढ्यात ऑस्करचा तुकडा फेकला आणि आम्ही भारतीय त्याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटून घेत आहोत..!
असहमत. 'स्लमडॉग...' हा पूर्णपणे भारतीय चित्रपट नाहीये... तो भारतीय पार्श्वभूमीवर आहे आणि काही कलाकार / तंत्रज्ञ भारतीय आहेत.
मी धागा सुरू केला तो फक्त एका (आणि एकाच कारणासाठी) की एक भारतीय म्हणून मला रेहमान आणि गुलजार यांच्याबद्दल आदर आणि अभिमान आहे.
ऑस्कर मिळाले नसते तरी या आदर आणि अभिमानात काडीचाही फरक पडला नसता.
एखादा पुरस्कार मिळणं हा एक प्रकारचा गौरव असतो आणि ते यश निर्भेळपणे आपण साजरं केलं पाहिजे असं मला वाटतं.
शेवटी पुरस्कार म्हणजे (अगदी कुठलाही पुरस्कार) म्हणजेच सर्व काही नसतं हे मलाही कळतं.
'शोले' या चित्रपटाला 'फिल्मफेअर' पुरस्कारांमधे फक्त संकलनाचा (एडिटिंग) पुरस्कार मिळाला होता हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे?
बाकी चालू दे !
23 Feb 2009 - 7:01 pm | देवदत्त
विजेत्यांचे अभिनंदन.
मी हा सिनेमा पाहिलेला नाही. संगीत/गाणी ही जास्त ऐकलेले नाही. त्यामुळे त्यावर भाष्य नाही.
'स्लमडॉग' ला मिळालेल्या यशाबद्दल आपण आपली पाठ थोपटून कोणाचा जयजयकार करायचा? असा प्रश्न पडतो. आपले मत काय........?
ए. आर.रहमान आणि इतर विजेत्यांचीच पाठ थोपटायला हवी.
तरीही दुपारी सहज एक विचार मनात आला.. राजकारणी लोक आता आपली स्वतःचीच पाठ थोपटून घेणार नाहीत ना? आम्ही केले म्हणून, आमच्या राज्यात भारतीयाला ऑस्कर मिळाला म्हणून ;)
23 Feb 2009 - 7:54 pm | विकास
राजकारणी लोक आता आपली स्वतःचीच पाठ थोपटून घेणार नाहीत ना? आम्ही केले म्हणून, आमच्या राज्यात भारतीयाला ऑस्कर मिळाला म्हणून
एकदम पटले! जर पोलीस, राजकारणी ह्यांनी कायदा-सुव्यवस्था आणि लोकहीताचे राज्य केले असते तर ना धड स्लमडॉग.. चित्रीत होवू शकला असता ना धड रेहमान, गुलजार आणि रिसूल पूकुट्टी यांना ही बक्षिसे मिळाली असती. कदाचीत म्हणूनच रिसूल पूकुट्टी ने, "हे बक्षिस देशाला अर्पण केले", असे म्हणले असावे!
बाकी गुलजार कुठेतरी मनात I think you confused me with someone who gave you a damn, असे म्हणत दूर राहीला असे वाटते.
24 Feb 2009 - 11:42 am | भिडू
http://timesofindia.indiatimes.com/Cong-counts-8-Oscars-as-part-of-UPA-a...
=)) =)) =))
24 Feb 2009 - 2:11 am | विकास
म.टा. मधे यावरून एक चांगला लेख आला आहे:
धारावी... कधी होशील 'मिलिनिअर'?
तिथल्या प्रतिक्रीया वाचत असताना एक गोष्ट डोक्यात आली: असे थोडेसे अतिशयोक्तीने असेल, पण सध्याचे भारतीय दिग्दर्शक हे भारत सोडून इतर कुठेही, चित्रीकरण करतात मग ती अमेरिका असोत, मलेशिया, असोत, बँकॉक अथवा लंडन असोत...तेथील बहुतांशी श्रीमंत एनआर आय दाखवायचे आणि त्यांच्या"व्यथांवर" चित्रपट गुंफायचा. त्या उलट येथे परदेशी दिग्दर्शकाला करावेसे वाटले...
24 Feb 2009 - 3:06 am | लिखाळ
हा हा .. भिंतीपलिकडे काय आहे? अशी उत्सुकता सर्वांनाच असावी.. त्यांना इकडच्याबद्दल..यांना तिकडच्याबद्दल :)
-- लिखाळ.
24 Feb 2009 - 9:35 am | विकास
आज बिझनेस वीक मधे Slumdog Oscars Boost India Film Industry नावाचा लेख आला आहे. तो अवश्य वाचा. त्यातील शेवटचा भाग खाली देत आहे ज्यात अमोल पालेकरचे भाष्य आहे आणि या बक्षिसांचा काय फायदा होऊ शकतो हे सांगितले आहे:
....
The success of Slumdog will help earn respect for the local industry, says Bollywood director and actor Amol Palekar. Hollywood has consistently "ridiculed our song-and-dance sequences, but when the same is done by a British filmmaker, the world laps it up," he says. The biggest beneficiaries of Slumdog's Oscar win are likely to be the Indian technicians, he says. "Four of Slumdog's Oscars were won by Indian technicians," says Palekar. "Now that's sweet victory for us."
It also means that the Pune-based Film & Television Institute of India, which churns out excellent technicians, could be in the limelight. Slumdog's Oscar-winning sound mixer, Resul Pookutty, is an FTII alumnus. If that happens, some industry figures believe India could have yet another institute favored by global professionals looking for low-cost outsourcing possibilities.
24 Feb 2009 - 1:58 pm | समीरसूर
'जय हो' हे गाणं मला तरी फारसं खास वाटलं नाही. रहमानने यापेक्षा कितीतरी सरस गाणी दिलेली आहेत. केवळ हॉलीवूडच्या चित्रपटात हे गाणं आहे म्हणून आणि आधी कुठल्या तरी प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे (गोल्डन ग्लोब) पुरस्कार मालिका सुरु झाली, काही दिवसातच त्या गाण्याची 'हवा' तयार झाली आणि या कारणांमुळे त्या गाण्याला ऑस्कर मिळाले असावे असे मला वाटते. आपल्याकडे 'जय हो' पेक्षा कितीतरी पट सरस आणि उत्कृष्ट गाणी देणारे महान संगीतकार होऊन गेलेत. त्यांनी फक्त हिंदी चित्रपटांना संगीत दिले म्हणून ते फक्त भारतापुरते मर्यादित राहिले. आता सिनेमाच्या कॉर्पोरीटायझेशनचा जमाना असल्याने, अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने आणि परदेशात भारतीय सिनेमाची ओळख बनल्याने ही संधी चालून आली आणि त्याचं सोनं झालं. मी हा चित्रपट अजून पाहिलेला नाही पण माझ्या मित्रांना मात्र तो अजिबात आवडला नाही. ऑस्करच्या लायकीचा तर अजिबात नव्हता असे त्यांचे म्हणणे आहे. आपल्याकडे "आमीर" हा सुंदर चित्रपट आला होता. मल्टीप्लेक्सच्या काही प्रेक्षकांनी त्याला वाखाणले होते. आपल्याकडेही काही चांगले सिनेमे बनत असतात पण त्यांच्या पोस्टरवर हॉलीवूडच्या कंपनीचे नाव नसते म्हणून ऑस्करच्या आस-पास ही ते फिरकू शकत नाहीत. दैनिक सकाळ मध्ये 'जय हो' पूर्ण छापून आले होते. वाचायला कठीण वाटले आणि समजायला त्याहूनही कठीण वाटले. काहीतरी अगम्य शब्द वापरून आणखी अगम्य असे गाणे लिहिणे ही गुलजारची जुनी खोड आहे. अगम्य म्हणजे सुंदर, दर्जेदार असणारच म्हणून जे काही असेल त्याला डोक्यावर घेणे ही भारतीयांची जुनी खोड. म्हणून कदाचित गुलजारचे दिग्दर्शक म्हणून बनवलेले माचिस, हुतुतु वगैरे चित्रपट रटाळ आणि कमालीचे संथ वाटतात. मोसम हा एकमेव चित्रपट जरा बरा होता. आँधी आणि मेरे अपने देखील रटाळ होते. इजाजत मी १०-१५ मिनिटांच्या वर नाही झेलू शकत. अर्थात गुलजारची बरीचशी गाणी खरोखर सुंदर आहेत यात शंका नाहीच. पण 'जय हो' च्या बाबतीत तसे म्हणणे जरा धाडसाचे ठरेल. म्हणूनच की काय चित्रपटाला भारतात मिळणारा रिस्पॉन्स आणि 'जय हो' ला मिळणारी प्रसिद्धी तशी यथा-तथाच आहे. 'स्लमडॉग' च्या बाबतीत सगळ्यांचे नशीब जोरदार होते हे मात्र खरे!
--समीर
24 Feb 2009 - 2:49 pm | रम्या
हे कसं आहे सांगू का?
ते स्त्रियांच्या सौंदर्य प्रसाधनाचे उत्पादन करणार्या कंपन्या नाही का मिस् वर्ल्ड नाही तर मिस् युनिव्हर्स स्पर्धेमध्ये पैसे गुंतवतात. मग एकेका देशाला निवडून त्यातल्या सौंदर्यवतींना सलग पुरस्कार देण्याचा सपाटा लावतात. हे असं केलं की या कंपन्यांचं त्या त्या देशात मस्त पैकी बस्तान बसतं, व्यवसाय होतो आणि आपण मात्र आमच्याकडे बघा कसे प्रतिभावान लोक आहेत म्हणून आपलीच पाठ थोपटून घेतो. तसंच बहूदा या हॉलिवूडवाल्यांनी केलं असेल. इथं भारतात सिनेमावर उड्या मारणारे लोक आहेत म्हटल्यावर इथंच का सिनेमा काढू नये? भारतियांनाच कामाला लावून सिनेमा काढायचा. परदेशात त्याकडे लक्ष जावं म्हणून मुंबईतली गलिच्छ वस्तीचं जगाला दर्शन करून द्यावं. तो भारतात पाहीला जावा म्हणून ऑस्कर मिळवून द्यायची व्यवस्था करायची. आणी आपले गल्ले भरायचे. आपण मात्र भारतीय पार्श्वभूमी असलेला सिनेमा ऑस्कर मिळवतो म्हणून नाचायचं. अजून काय बोलावं? गोरा माणूस पादला तरी काय सुगंध म्हणून दाद द्यायची आपली वॄत्ती काय नवीन नाही.
आम्ही येथे पडीक असतो!
24 Feb 2009 - 3:46 pm | विसोबा खेचर
इथं भारतात सिनेमावर उड्या मारणारे लोक आहेत म्हटल्यावर इथंच का सिनेमा काढू नये? भारतियांनाच कामाला लावून सिनेमा काढायचा. परदेशात त्याकडे लक्ष जावं म्हणून मुंबईतली गलिच्छ वस्तीचं जगाला दर्शन करून द्यावं. तो भारतात पाहीला जावा म्हणून ऑस्कर मिळवून द्यायची व्यवस्था करायची. आणी आपले गल्ले भरायचे. आपण मात्र भारतीय पार्श्वभूमी असलेला सिनेमा ऑस्कर मिळवतो म्हणून नाचायचं. अजून काय बोलावं? गोरा माणूस पादला तरी काय सुगंध म्हणून दाद द्यायची आपली वॄत्ती काय नवीन नाही.
लाख मोलाचा प्रतिसाद...!
तात्या.
24 Feb 2009 - 4:02 pm | विशाल कुलकर्णी
<<'जय हो' हे गाणं मला तरी फारसं खास वाटलं नाही. रहमानने यापेक्षा कितीतरी सरस गाणी दिलेली आहेत. केवळ हॉलीवूडच्या चित्रपटात हे गाणं आहे म्हणून आणि आधी कुठल्या तरी प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे (गोल्डन ग्लोब) पुरस्कार मालिका सुरु झाली, काही दिवसातच त्या गाण्याची 'हवा' तयार झाली आणि या कारणांमुळे त्या गाण्याला ऑस्कर मिळाले असावे असे मला वाटते. आपल्याकडे 'जय हो' पेक्षा कितीतरी पट सरस आणि उत्कृष्ट गाणी देणारे महान संगीतकार होऊन गेलेत<<>>
समीरजी, मनापासुन अनुमोदन.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)